सामोसे

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
23 Sep 2010 - 8:48 pm

From माधुर्य

साहित्य:- मटार एक वाटी, बटाटा एक मध्यम,एक कांदा,मिरची-लसूण -आले पेस्ट एक चमचा, कढीपत्ता,मीठ, साखर एक चमचा, मैदा एक वाटी, तळणीसाठी तेल.
कॄती:- प्रथम मैदयात एक चमचा कडकडीत मोहन घालून व किचिंत मिठ घालून घट्ट मळून ठेवा.
कांदा बारीक चिरावा, मटार वाफ़वून घ्यावा,बटाटा उकडून घ्या,फ़ोड्णी करून त्यात कढीपत्ता टाका,आले-लसूण-मिरची पेस्ट घाला,कांदा घाला चांगला परतून घ्या नंतर त्यात वाफ़वलेले मटार,बटाटा फ़ोडी घाला , चवीनूसार मिठ,साखर घाला, थोडी कोथींबीर बारीक चिरुन घाला.हे झाले सारण तयार.
आता भिजवलेल्या पिठातील थोडे पिठ घेउन त्याची पारी लाटून घ्या , त्याचे दोन भाग करा, प्रत्येक भागात सारण भरुन त्याचे सामोसे बनवा,कड्क तेल तापवून त्यात तळून घ्या..गरम सर्व्ह करा. यात चिंचेचे गोड पाणी ही घालून खातात.

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

23 Sep 2010 - 8:54 pm | मेघवेडा

हायला निवेदितातै फॉर्मात हायेत! :D

लै लै भारी!

पैसा's picture

23 Sep 2010 - 8:55 pm | पैसा

करून बघायला हवेत. बरोबर चटणी कसली चांगली लागेल?

सामोसे नारळाच्या, खजुराच्या, चिंचगुळाच्या, तीळाच्या, कारळ्याच्या, जवसाच्या, भोपळ्याच्या, भोपळीच्या अशा कुठल्याही चटणीसोबत उत्तम लागतात अशी आमची 'श्रद्धा' आहे!

- (सामोसेप्रेमी) मेघवेडा.

पैसा's picture

23 Sep 2010 - 9:10 pm | पैसा

("देवा तू पाव" च्या चालीवर) असे च म्हणते.

इंटरनेटस्नेही's picture

23 Sep 2010 - 10:20 pm | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो.
(रोज किमान ३ समोसे खाणारा)

ह्म्म.
सामोशाच्या मूळच्या रेसिपीमध्ये कांदा नसतो.
पण बाकी इतर आवृत्त्यांमध्ये सारणासाठी पालक , पनीर , खिमा, इतर मिक्स भाज्या वगैरे घालतात त्यावेळी कांदा घालत असावेत.
पण मूळ मटार , बटाटा हे सारण वापरुन केलेल्या सामोशात कांदा मी अजूनपर्यंत पाहिला नाही.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2010 - 11:13 pm | पिवळा डांबिस

मूळ मटार , बटाटा हे सारण वापरुन केलेल्या सामोशात कांदा मी अजूनपर्यंत पाहिला नाही.
सहमत!
आणि अस्सल समोश्याच्या सारणात कढीपत्ता घातलेलाही माझ्या पहाण्यात आलेला नाही...

मला अजिब्बात प्रसन्न न होणारा पदार्थ ! ( खाताना नाही; बनवताना )

खूपदा समोशांची पपडी चाट बनवून खावी लागली आहे :(
आता तुझ्या पद्धतीने पण करून बघेन..

निवेदिता-ताई's picture

24 Sep 2010 - 7:28 am | निवेदिता-ताई

कढीपत्ता आणी कांदा घालून तर पहा.......काय मस्त चव येते ते ?????

चिंतामणी's picture

24 Sep 2010 - 8:19 am | चिंतामणी

वेगळ्या सारणाचा सामोसा खाउन बघायला आवडेल नक्की.
(सामोश्यातील टिपीकल सारणाचा कंटाळा आला होता).

सदाची पहुणी's picture

24 Sep 2010 - 10:23 am | सदाची पहुणी

सारणामढ्ये जाडसर लवन्ग आणी बडीषेप घालुन बघा.

काजुकतली's picture

24 Sep 2010 - 11:37 am | काजुकतली

येस्स्स्स.. पंच फोडण (मोहरी,जिरे, मेथी, बडिशोप, कलोंजी) घालुन भाजी केली तर मस्त लागेल एकदम...

कोणीतरी वेज समोसा - आत पोहे भरलेला पट्टी समोसा - त्याचीही रेसिपी टाका ना.... परवाच ठाण्याला राजमाताचा खाल्ला....

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2010 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार

छे काय हे ? चटावरचे श्राद्ध उरकल्यागत पाकृ उरकली आहे. थोडे विस्तारानी, सारणाचे फोटु वगैरे टाकुन अजुन खुलवली का नाही ? सामोसा हा जेवढा आवडीने खायचा विषय आहे तेवढाच आवडीने वाचायचा देखील ;)

**फोटु आंतरजालावरुन ढापलेले आहेत.

निवेदिता-ताई's picture

24 Sep 2010 - 1:22 pm | निवेदिता-ताई

धन्यवाद...........

स्वैर परी's picture

27 Sep 2010 - 3:29 pm | स्वैर परी

नमसकार ! बाकि सगले थिक दिस्तेय, पन ती पारि लातुन मग समोस्याचा शेप कसा देतात हे कुनितरि सान्गावे!

सविता००१'s picture

4 Oct 2010 - 12:04 pm | सविता००१

नमस्कार. मी पहिल्यान्दाच लिहिते आहे. याच सारणात थोडिशी बडीशेप, गरम मसाला आणि धणे घातले की पन्जाबी सामोसा होतो.
शिवाय कडकडीत तेलात न तळता तेल तापले की मन्द आचेवर सावकाश तळावेत. याला वेळ लागतो पण अतीशय खुसखुशित होतात.