अग्रलेख कसा लिहावा आणि कसा लिहु नये याची उत्तम उदाहरणे लोकसत्ताच्या आजच्या एकाच आव्रुत्तीत बघायला मिळाली.
पर्यावरणाय नम: या अग्रलेखाचा विषय तसा सोपा अथवा दुसरी बाजु थोडिशी कमकुवत असलेला आहे. तरिसुद्धा अत्यंत संयत भाषेत लिहलेला हा अग्रलेख मला आवडला.
दुसऱ्या फाळणीचे कारस्थान! हा दुसरा अग्रलेख, विषय तसा हाताळणयास कठीण, पण खप आणि प्रसिद्धी मिळवण्यास उपयुक्त असा. फक्त एकांगी लिहलेला कुठलाही संदेश न देणारा म्हणुन या अग्रलेखाची गणना होउ शकते.
या चर्चेचा उद्देश या दोन विषयांवरुन लोकसत्ताला नावे ठेवणे किंवा भाजप/कॉग्रेस, हिंदु/मुस्लिम यावर चर्चा करणे नसुन, अग्रलेख कसा असावा/नसावा यावर या दोन्ही लेखांच्या अनुशंगाने चर्चा करणे हा आहे. मागे एकदा मिपावर संपादकीय असे असावे अशी चर्चा झाली होती (मिपा संपादकीयच्या अनुशंगाने) तशी थोडिशी चर्चा अपेक्षीत आहे.
टीपः वरील दोन लेखांबद्दलची मते ही माझी वयक्तीक मते आहेत.
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 11:32 am | अवलिया
अग्रलेख असा असावा की तो वाचल्यानंतर वाचकांच्या मतांमधे काहीही फरक पडु नये आणि आपलीच मते मांडली आहेत असे सगळ्यांना वाटावे. थोडक्यात ज्याला संयत आणि विवेकी (म्हणजेच कोणतीही बाजु न घेता गोलमटोल) असे अग्रलेख लिहुन दोन्ही (किंवा सर्व बाजुंना ) खुश करुन जाहिरातीचे उत्पन्न कमी न होऊ देणे हे धोरण योग्य ! अशी भुमिका आजकाल अनेक पेपरांची असते.
22 Sep 2010 - 11:37 am | चेतन
तुमच्या मते पहिला अग्रलेख तुम्हि म्हणता त्या क्याटेगरीत बसतो (गोलमटोल) तर दुसरा थोडसा विसंगत
माझ्या मताविरोधी मत आलेले वाटुन बरे वाटले ;)
22 Sep 2010 - 11:41 am | अवलिया
तुमच्या मते पहिला अग्रलेख तुम्हि म्हणता त्या क्याटेगरीत बसतो
मी माझे मत नाही तर आजकालच्या वर्तमानपत्रांच्या चालक, मालक, संपादकांचा दृष्टिकोन सांगितला होता. अग्रलेख कसा असावा आणि कसा असु नये यावर माझ्या मताने काही फरक पडेल असे वाटत नसल्याने माझे मत सांगितलेलेच नाही. :)
22 Sep 2010 - 11:55 am | चेतन
>>मी माझे मत नाही तर आजकालच्या वर्तमानपत्रांच्या चालक, मालक, संपादकांचा दृष्टिकोन सांगितला होता.
आजची वर्तमानपत्रे आणि स्वातंत्र्यापुर्वीची वर्तमानपत्रे यांची उद्दीष्टे आणि विषय वेगळे आहेत आणि त्यात मला काही गैर वाटत नाही. थोडेफार समाजप्रबोधन आजची वर्तमानपत्रेही करतात.
>>माझ्या मताने काही फरक पडेल असे वाटत नसल्याने ....
या चर्चेनेदेखील लोकसत्ताला काही फरक पडणार नाही हे मला ही माहित आहे. पण जर मला पुढे कधी अग्रलेख लिहावासा वाटला तर तो कसा असावा या माहितीसाठी हा चर्चाप्रस्ताव आहे.
(तुम्ही एक संपादकीय लिहले आहे त्यामुळे तुमच्या मताने मला/चर्चेला फरक नक्कीच पडतो)
22 Sep 2010 - 12:01 pm | अवलिया
>>>आजची वर्तमानपत्रे आणि स्वातंत्र्यापुर्वीची वर्तमानपत्रे यांची उद्दीष्टे आणि विषय वेगळे आहेत आणि त्यात मला काही गैर वाटत नाही. थोडेफार समाजप्रबोधन आजची वर्तमानपत्रेही करतात.
सहमत आहे. आज वर्तमानपत्र हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय कसा चालवायचा हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत आहे.
>>>या चर्चेनेदेखील लोकसत्ताला काही फरक पडणार नाही हे मला ही माहित आहे. पण जर मला पुढे कधी अग्रलेख लिहावासा वाटला तर तो कसा असावा या माहितीसाठी हा चर्चाप्रस्ताव आहे.
:)
>>>(तुम्ही एक संपादकीय लिहले आहे त्यामुळे तुमच्या मताने मला/चर्चेला फरक नक्कीच पडतो)
माझ्या मते - अग्रलेखात जास्तीत जास्त तथ्यांशी प्रामाणिक राहुन सर्व बाजुंनी साधक बाधक विचार करुन योग्य काय ते ठासुन सांगता यायला हवे. त्याचबरोबर सदर लेख वाचुन वाचक आपले विचार बनवणार असल्याचे लक्षात ठेवुन आपले पूर्वग्रह बाजुला ठेवुन विचारपूर्वक प्रतिपादन करणे आवश्यक असते. भडक आणि खोडसाळपणा अनावश्यक असला तरी प्रसंगी स्पष्ट शब्दांचा आधार घेणे चूकीचे नसते, योग्य शब्दात ठामपणा मांडता यायला हवा. माझ्या मते माझ्यापेक्षा प्रसन्न केसकर किंवा श्रावण मोडक हे अधिक चांगल्या रितीने हा मुद्दा मांडू शकतील.
22 Sep 2010 - 11:50 am | पाषाणभेद
अवलियाशी एकदम सहमत. मागे एका प्राध्यापकांना एक प्रश्न विचारला होता. पोस्ट ग्रॅज्युएशन च्या एमए च्या विद्यार्थ्याने वादात्मक निबंध कसा लिहावा या बद्दल. माझे म्हणणे होते की या वयापर्यंत त्या विद्यार्थ्याचे विचार पक्के, पोक्त झालेले असतात. त्याने दोन्ही बाजू मांडून एका बाजूला अनुमोदन देणारे मत व्यक्त केले तर नाही का चालणार? ते नको म्हणाले. अन माझा शिक्षणपध्धतीवरचा विश्वास आणखी एकदा उडाला.
22 Sep 2010 - 11:58 am | चेतन
@पाषाणभेद
दोन्ही बाजू मांडून एका बाजूला अनुमोदन देणारे मत व्यक्त केले तर नाही का चालणार?ते नको म्हणाले...
मला हे चांगले वाटले ते नको का म्हणाले हे जाणुन घ्यायला आवडेल...
22 Sep 2010 - 12:29 pm | पाषाणभेद
>>> की या वयापर्यंत त्या विद्यार्थ्याचे विचार पक्के, पोक्त झालेले असतात.
हे वाचलेले दिसत नाही. प्राध्यापकांचे सोडा. त्यांनी मार्कांसाठी सांगितले असेल. पण विद्यार्थी पक्का विचाराचा असू शकतो अन वादात एक बाजू भक्कम असू शकते की नाही?
22 Sep 2010 - 1:20 pm | चेतन
@पाषाणभेद
माझा मुद्दा तुला बहुतेक लक्षात आला नाही. तु सांगितलेलेच उदाहरण घेतो
मला या बद्दल माहिती घ्यायची आहे की जर लेख दोन्ही बाजु सांगुन एखादी बाजु घेउन लिहला तर कमी प्रभावी होतो का? (कदाचित मार्क देणारा दुसर्या बाजुचा असेल तर मार्क मम मिळतिलही) पण जर दोन्ही बाजु घेउन लेख लिहला तर तो मिळ्मिळित होतो का? किंवा एक स्पष्ट विचार नसणारा होतो का? (कदाचित अशा निबंधालासुद्धा कमी मार्क मिळु शकतात)
>>पण विद्यार्थी पक्का विचाराचा असू शकतो अन वादात एक बाजू भक्कम असू शकते की नाही?
येथे थोडिशी मेख आहे विद्यार्थी पक्का विचाराचा असूही शकतो अन वादात एक बाजू भक्कम असूही शकते पण अग्रलेख लिहताना फक्त एका बाजुने लिहावे का हा माझा प्रश्न आहे . मुद्दा असा आहे कि निबंध आणि अग्रलेख यामध्ये माझयामते थोडा फरक असावा. निबंध कदाचित नुसताच आढावा घेणारा असु शकतो अग्रलेखात एक स्पष्ट विचार असावा.(वरिल दोन्ही अग्रलेखात तो आहे.)
22 Sep 2010 - 12:08 pm | अविनाशकुलकर्णी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3799010.cms
असा असावा
22 Sep 2010 - 12:19 pm | चेतन
परत सांगतो बघा पटतय का..
वरील अग्रलेखाचा विषय तसा सोपा आहे. एखाद्या चांगल्या माणसाच्या निर्वाणानंतर आलेला अग्रलेख हा सर्वसाधारणपणे त्याच्या कार्याची महती गाणारा असतो. पहिल्या अग्रलेखाचा विषय माझ्यामते ह्याच कॅटेगरीत मोडतो त्यामुळे मी त्याला सोपा म्हणलं आहे.
दुसर्या लेखाच्या विषयाला अनेक पदर अनेक भुमिका आहेत (म्हणुन माझ्यामते कठिण)
चेतन
24 Sep 2010 - 11:01 am | अनिल २७
दै. पुढारी कधीही ऊघडून त्यातला अग्रलेख वाचा... कसा असावाचे उत्तर मिळेल.. भाषा जहाल असते, पण अग्रलेख तळमळीने लिहिलेला असतो..
24 Sep 2010 - 11:11 am | ऋषिकेश
माझ्या मते अग्रलेख हा संपादकाच्या अखत्यारीतला मामला आहे. त्याला एखाद्या प्रश्नाच्या अनेक पैलुपैकी ज(अधोरेखित?)प्रकाशात आणायचे आहे (हायलाईट करायचे आहे) किंवा जी बाजु योग्य वाटाते ती मांडण्यासाठी अग्रलेख असावा. कोणतीच बाजु न घेता नुसतेच गोलगोल लिहिणे हे मला चांगल्या अग्रलेखाचे लक्षण वाटत नाही.
[केतकरांचे अग्रलेख बर्याचदा गोलगोल नसतात ते नेहमी एक बाजु (गांधी घराण्याची बाजु) घेऊन लिहितात असे माझे निरिक्षण आहे. व हे संपादकाचे मत असल्याने प्रसंगी माझ्यापेक्षा वेगळे असूनही मला आवडते]
24 Sep 2010 - 11:18 am | अनिल २७
>> केतकरांचे अग्रलेख बर्याचदा गोलगोल नसतात ते नेहमी एक बाजु (गांधी घराण्याची बाजु) घेऊन लिहितात असे माझे निरिक्षण आहे. व हे संपादकाचे मत असल्याने प्रसंगी माझ्यापेक्षा वेगळे असूनही मला आवडते
अगदी सहमत.. हिच गोष्ट दै. लोकमतबाबतही आहे असे माझे निरीक्षण आहे.
24 Sep 2010 - 6:47 pm | चेतन
>>>माझ्या मते अग्रलेख हा संपादकाच्या अखत्यारीतला मामला आहे.
मान्य.
>>त्याला एखाद्या प्रश्नाच्या अनेक पैलुपैकी ज(अधोरेखित?)प्रकाशात आणायचे आहे (हायलाईट करायचे आहे) किंवा जी बाजु योग्य वाटाते ती मांडण्यासाठी अग्रलेख असावा.
किंचित असहमत. असं असेल तर सामना मधिल हिंदू किंवा मुसलमान या विषयावर लिहलेले सगळेच अग्रलेख चांगले
म्हणता येतिल.
चर्चाविषय या करता टाकला होता की अग्रलेखाची सर्वसामान्यपणे मांडणी कशी असावी. विषयाशी संबधित मुदद्दे किती विस्तार करुन लिहावे. जर दोन्ही बाजुंनी लेख लिहला तर तो किती प्र्भावी होतो. ई.
अवांतरः तरिच मोडक म्हणाले @ मोडक संपादकीयाविषयी (किंवा अग्रलेखाविषयी) कधीही काहीही प्रश्न करायचे नसतात. तुझ्या धाग्याचा समारोप इथेच झाला पहा!