अळीवाचे लाडू

अजबराव's picture
अजबराव in पाककृती
22 Sep 2010 - 4:00 am


साहित्य:
१) दोन नारळ खोवलेले
२) ५० ग्राम अळीव
३) २ वाटया गुळ चिरलेला
४) १/२ वाटि साखर
५) जायफळ पुड ४ चिमुट

कृति:
१) एका पातेल्यामध्ये खालि खोवलेले खोब्र्याचा एक थर लावा. त्याच्यावर अळीवाचा थर लावा. आणी त्यावर परत गुळाचा .त्यावर परत खोब्र्याचा थर द्यावा.
म्हणजे सर्वात खालि आणी सर्वात वर खोब्र्याचा थर असावा. खोब्रे आणि अळीव संपत नाहि तोपर्यन्त असे करावे..
२)वरिल मिश्रण अतिशय मंद आचेवर शिजु द्यावे.पातेल्यावर झाकण ठवावे.
३)गुळ विरघळतो त्यामुळे आणि ओल्या खोब्र्यामुळे मन्द आचेवर ते अळिव शिजतात.
४)शिजुन झाल्यावर त्यामध्ये जायफळ पुड टाकावि..
५)थंड झाल्यावर लाडु वळावेत.

अळिव दुधात किंवा नारळाच्या पाण्यात न भिजवता वापरल्यामुळे हे लाडु छान रहातात.

प्रतिक्रिया

ग्रेट आलेत फोटू!
डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात करतात हे माहिती आहे.
अळीव तब्येतीला उष्ण कि थंड?
मला लाडवांची कृती अळीव भिजवून माहित होती पण न भिजवताही लाडू करता येतात ही माहिती नविन!

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2010 - 10:10 am | पर्नल नेने मराठे

अळीव तब्येतीला उष्ण म्हणुनच लाडू थंडीच्या दिवसात करत असावेत.
बाळंतिणीला सुढ्हा देतात अळिवाचे लाडु.

रामदास's picture

22 Sep 2010 - 7:14 pm | रामदास

ताबडतोब उत्तर ?
अळीवमे कुछ काला है.

पर्नल नेने मराठे's picture

23 Sep 2010 - 1:28 pm | पर्नल नेने मराठे

=)) अजिबात नहिये

दिपाली पाटिल's picture

22 Sep 2010 - 4:25 am | दिपाली पाटिल

मस्त आलेय्त लाडू...

आपली पाकक्रुती आवडली. अश्याच नवनवीन पाकक्रुती येवोत.

मदनबाण's picture

22 Sep 2010 - 9:03 am | मदनबाण

वा... तोंडाला पाणी सुटले !!! :)
हा माझा सर्वात आवडता लाडू...बाकी कडक बुंदीचा लाडू पण खायला मज्जा येते... :)

(लाडू प्रेमी)

चिंतामणी's picture

22 Sep 2010 - 11:18 am | चिंतामणी

अजबराव- फोटु आणि पाकृ छान पण अळीव ६-७ भिजवल्याशिवाय हलके होते नाहीत.

मंद आचेवर कच्चे अळीव पुर्ण शिजतील का याची शंका आहे.

(लाडु शिल्लक असतील तर नमुना देउन ती दूर होते का ते बघा.)

सहज's picture

22 Sep 2010 - 11:15 am | सहज

कातील आहेत!

पारुबाई's picture

22 Sep 2010 - 11:15 am | पारुबाई

एकदम मस्त. A1

फोटोची आधी स्तुती करू का लाडवाची ? असा प्रश्न पडला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2010 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण जायफळ आणि साखर कुठे/कशी वापरायचे?

अवलिया's picture

22 Sep 2010 - 11:54 am | अवलिया

क्लास !!

गणपा's picture

22 Sep 2010 - 1:01 pm | गणपा

एकदम जोरदार पाकृ.

रतन's picture

22 Sep 2010 - 1:31 pm | रतन

५० ग्राम अळिव आणि दोन खोवलेले नारळ. कुठे चुकतय का? कि अळिव हलका असतो, मुरमुरया प्रमाणे?

रतन

मेघवेडा's picture

22 Sep 2010 - 2:16 pm | मेघवेडा

एकदम क आणि ड आणि क!

वॉव , सर्व फोटोज फारच सुंदर. माझे आवडते लाडू.
परदेशात करायचे झाल्यास फ्लॅक्स सीड्स वापरल्या तर चालतील का?

एक दुरुस्ती : अळीव असा शब्द नसून तो हळीव असा शब्द आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2010 - 4:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग लाडवांना "हळव्याचे लाडू" म्हणतात का? ;-)

(अळीवलाडूप्रेमी) अदिती

नाही नाही!
फ्लॅक्स सीडस् ची आपण चटणी करतो. त्याचे मराठी नाव आठवले कि सांगते.

पुष्करिणी's picture

22 Sep 2010 - 9:01 pm | पुष्करिणी

कारळ्याची चटणी ?

पैसा's picture

22 Sep 2010 - 9:03 pm | पैसा

जवस ते.

रेवती's picture

23 Sep 2010 - 7:30 am | रेवती

हां हां! जवस!
धन्यवाद पैसामॅडम!

हो माझ्या माहीतीप्रमाणे तसच.

दिपाली पाटिल's picture

22 Sep 2010 - 10:20 pm | दिपाली पाटिल

हे हळीव भारतीय दुकानात "हालिम" म्हणून मिळतात.

चित्रा's picture

23 Sep 2010 - 3:39 am | चित्रा

हळीव म्हणतात, पण आमच्या घरी अळीवच म्हणतो.

लाडू खरेच मस्त दिसतायत.

मस्त कलंदर's picture

22 Sep 2010 - 4:05 pm | मस्त कलंदर

सही आहेत लाडू.. मला माझ्या ताईच्या डिलीव्हरीनंतरचे दिवस आठवले. तिच्यासाठी बनवलेले लाडू आम्ही सगळ्या भावंडांनी खाऊन संपवले होते.

आळीव म्हणजे हालीम काय?
ते पाण्यात टाकल्यावर सब्जा सारखे चिकट होतात तेच ना?

प्लिज सागा

पैसा's picture

22 Sep 2010 - 9:00 pm | पैसा

तेच ते

यम यम!!! मस्त चविष्ट दिसतायत.

अजबराव's picture

22 Sep 2010 - 8:57 pm | अजबराव

@रेवति..अळीव उष्ण असतात..त्यामुळे थंडीच्या दिवसात तब्येतिला छान
@ ३_१४ विक्षिप्त अदिती ...लाडु वळायच्या आधि जायफ्ळ पुड टाकायचि...४ थ्या पायरि मध्ये सांगितल्याप्रमाणे
आणि साखर गुळाबरोबर टाकावि.
@पक्या,रेवती,कुक... फ्लॅक्स सीडस् म्हणजे जवस. त्याचि चटणि करतात. जवसामध्ये ओमेगा ३ असते.अळिव पटेल मध्ये बघितल्याचे आठवत आहे. अळिवाला इंग्लिश मध्ये वॉटरक्रेस सिड्स म्हणतात. आळीव म्हणजेच हालीम .
@चिंतामणी ..अळिव अगदि पाण्यात भिजव्ल्या प्रमाणे चिकट नाहित होत. पण ते शिजतात. कारण खाताना ते दाताखालि चावले जातात. कडक लागत नाहित.
माझि आज्जि या पध्धतिने लाडु करायचि.

मी गार्डन क्रेस असे नाव वाचले आहे.
आणी हळीव (हळीवाचे लाडू ) हा शब्द आहे . त्याचा उल्लेख बरेच लोक अळीव करतात. गुगल्यास तुम्हाला हळीव हाच शब्द दिसेल.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Sep 2010 - 5:17 pm | अविनाशकुलकर्णी

आळिवाचा लाडु गिळगिळीत लागतो..पण मस्त वाटतो खायला