कॉमनवेल्थ गेम्स २०१०

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
22 Sep 2010 - 2:35 am
गाभा: 

४ वर्षा अगोदर ,१८ व्या कॉमनवेल्थ गेम्स च्या मेलबॉर्न येथील क्लोजींग सेरेमनी मधे ज्या आत्मविश्वासाने ( बॉलीवुड नट/नटींचे नाच) भारताने पुर्ण जगाला भारतात( दिल्ली ) मधे यायचे आमंत्रण दीले त्यावेळेस वाटले होते की , नक्कीच आपण हे गेम्स योग्यरीतीने यशस्वी करुन पुर्ण जगात भारताचे नाव उंच करु.

पण जसे जसे १९ व्या कॉमनवेल्थ गेम्स चे दीवस जवळ येत गेले तसा तसा त्याभवतीचा गुंता अधीकच वाढ्त गेला. रोज नवीन नवीन बातमी कधी पुल कोसळण्याच्या तर कधी भ्रष्टाचाराच्या तर कधी स्टेडीयम कशे दीलेल्या वेळेत पुर्ण होणार नाही याची.

आणी आता लेटेस्ट बातमी आहे की आणखी एक पुल कोसळ्ला आहे आणी त्यामधे २४ लोक जखमी आहे.
आता तर काही देश (न्युझीलंड , ईंग्रज) हा खेळ रद्द करण्याच्या गोष्टी करत आहे.

२३ सप्टेंबर पासुन सर्व जगातील खेळाडु येणे सुरु होईल पण अजुनही त्यांच्या राहण्याच्या जागा तयार नाहीत.
सेक्युरीटीचा ईश्शु तर आ वासुन ऊभा आहेच.

आतापर्यंत ८०,००० करोड रुपये ह्या गेम साठी स्टेडीयम बनवीण्यात आणी ईतर सुवीधासांठी खर्च करण्यात आले.
म्हणजे खेळ यशस्वी करण्याकरीता पुरेसा पैसा ऊपलब्ध नसणे हे कारण कधीच नव्हते.
संपुर्ण जगात भारताचे नाव ऊंचावण्याकरीता ही खुपच सुरेख संधी भारताकडे होती पण दुर्द्व्याने आपण ती गमावत आहे असे दीसते.
चायना आणी भारत हे दोन देश ऊद्याचे सुपरपॉवर देश म्हणुन ओळ्खल्या जाते.चायना ने ओलंपीक यशस्वीरीतीने पार पाडुन (आतापर्यंत चे सर्वात यशस्वी ओलंपिक )त्यांचा पावर दाखवीला परंतु भारत हे करुन दाखवेल काय??

सध्याची परीस्तीथी बघता तर नाहीच म्हणावे लागेल...

बघुया काय होते ते..

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

22 Sep 2010 - 3:54 am | पाषाणभेद

असले काही भव्यदिव्य क्रिडाप्रकार अन सिव्हील इंजीनिअरींग मधले काही करण्यासाठी इंडिया लायक नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. साधे व्यवस्थापनही करण्यास इंडीया लायक नाही. अरे पैसे खा पण कामेही करा ना!

बॉलीवूड च्या नाच्यांचे किळसवाणे प्रकार जर कॉमनवेल्थगेम एखाद्या देशात ठेवण्याची कसोटी असेल तर असेच होईल. गेम्स चे आयोजन म्हणजे काय सिनेमाचा सेट लावणे आहे काय? शरमेने इंडियाची मान खाली गेली आहे. भारत बघतोच आहे.

अनामिक's picture

22 Sep 2010 - 4:36 am | अनामिक

+१
वाईट याचं वाटतं की या करप्ट लोकांना असल्या प्रकाराचं काहीच वाटत नाही. पडले तरी तोंड वर अशी गत आहे.

स्पंदना's picture

22 Sep 2010 - 9:26 am | स्पंदना

लाज लाज वाटली ती बातमी वाचुन.
आत्त्ता हल्लिच सिंगापुर ने युथ ऑलिम्पिक भरवुन यशस्वी करुन दाखवल आणी आपण आणि आप्ली मरतुकडी लोकशाही...की बलवान झुंडशाही?

आमच्या देखण्या युवराजाचे राहुल चे लग्न आम्ही दणकेबाज पणे लावुन जगात भारताचे नाव उज्ज्वल करु व भारतातील लोकशाही अजुन मजबुत करु.

शिशिर's picture

22 Sep 2010 - 10:50 am | शिशिर

असले काही भव्यदिव्य क्रिडाप्रकार अन सिव्हील इंजीनिअरींग मधले काही करण्यासाठी इंडिया लायक नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. साधे व्यवस्थापनही करण्यास इंडीया लायक नाही. अरे पैसे खा पण कामेही करा ना

अगदी खरे आहे. कामा च्या किमती च्या निम्म्या किमतीत कामे करयला लावायची, निम्मे पैसे आपण खायचे आणि पाठ थोपटून घ्यायची हेच उद्योग सर्व सरकारी कामात चालू आहे. चांगल्या प्रामाणिक माणूस नेमण्या एवजी स्वत: चे नातेवाइक,
पार्टी कार्यकर्त्यांना कामे द्यायची ही आजून एक छुपा उद्योग असतो.
कुणी ही कॉन्ट्रॅक्टर स्वत: पैसे घालून काम करणार नाही. मग पूल कोसळणे, खेळाडूंच्या खोल्यांचे कुलुप नदुरुस्त असणे, खिडक्या बंद केल्यावरही फट राहणे, छत गळणे हे प्रकार झाले तर नवल काय.
कॉमनवेल्थ गेम्स झाल्यावर सगळे विसरतात आणि सर्व धूळ खात पडून राहते.

अनिल २७'s picture

22 Sep 2010 - 11:12 am | अनिल २७

असले काही भव्यदिव्य क्रिडाप्रकार अन सिव्हील इंजीनिअरींग मधले काही करण्यासाठी इंडिया लायक नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या वाक्याचा तीव्र निषेध! ज्या लोकांना सिव्हिल ईजिनीअरींग मधील काडीचेहि ज्ञान नाही तेच असली प्रतिक्रिया देऊ शकतात.. सध्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात ज्या काही गडबडी समोर येत आहेत त्या केवळ एकंदरीत भ्रष्ट व्यवस्थेमुळेच होत आहेत याची कृपया नोंद घ्यावी व 'सिव्हिल ईंजिनिअरींग' सारख्या वैभवशाली शाखेला व त्यातही भारतीय स्थापत्य अभियंते भारतासहीत जगभर आपल्या कर्तुत्वाची छाप पाडत असताना असली बिनबुडाची वक्तव्ये केवळ निण्दनीय आहेत.. लिहिण्याच्या नादात आपण काय लिहून जात आहोत याचे भान राखले जावे. ज्यांना हवे असेल त्यांना 'सिव्हिल ईंजिनिअरींग' क्षेत्रात भारतात काय काय महान गोष्टी झाल्यात व होत आहेत ते सप्रमाण सिध्द करून दाखवेल. राष्ट्रकुलच्या एकंदरीत भ्रष्टाचाराशी 'सिव्हिल ईंजिनिअरींग'चा संबंध जोडू नये ही विनंती (!)

पाषाणभेद's picture

22 Sep 2010 - 8:14 pm | पाषाणभेद

पुल तुटला ना? अच्छा तो लोखंडी होता होय! मग मेकॅनिकल इंजीनिअरींग मध्ये येतो का तो? आम्हाला पुलासारखा पुल हवा होता. आम्हास काही ज्ञान नाही त्यातले. आम्ही पुल म्हणजे दोन निसर्गाच्या खोलगट झालेल्या भागाला सांधणार्‍या मानवी आकृतीला पुल समजतो. इकडून तिकडे अन तिकडून इकडे सोपे व्हावे म्हणून तो वापरतात. बाकी किती सिव्हील इंजिनिअर बांधकाम करतात तेव्हा m3, m4, m5 सिमेंट कॉन्क्रीट चे मिस्क बरोबर घेण्याचा आग्रह करतात ते मला माहीत नाही. मिक्सर चे किती रोटेशन किती सिमेंट बॅग्ज ला किती हवे ते माहीत नाही. स्लॅब भरतांना मजुरांच्या सोईसाठी किती गरज नसणारे पाणी वापरतात ते माहीत नाही. किती जण वाळूचेही लॅब टेस्टींग करतात ते माहीत नाही. बांधकामाला लागणारे पाणी किती जण पोट्याबल वापरतात अन त्याचे टेस्टींग करतात ते माहीत नाही. ही माहीती तुम्ही द्या.
काही अपवाद जरूर आहेत. सर विश्वेश्वरय्या यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. त्यांनी रात्री खाजगी कामाला आलेल्या लोकांसमोर कंदिल विझवला अन मग त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. कारण कंदीलातले रॉकेल सरकारी होते.

माझा उद्देश या ठिकाणी (CWG मध्ये) किती सिव्हील इंजीनिअरींग मध्ये तृटी आहेत ते बघण्याचाच होता. जर सिव्हील इंजिनिअरींग च्या प्रिंसीपलबरोबर काम चालत नसेल तर तेथील इंजीनिअर्स नी तुटी दाखवायला पाहीजे होती. काम नकारायला पाहीजे होते.

>>> राष्ट्रकुलच्या एकंदरीत भ्रष्टाचाराशी 'सिव्हिल ईंजिनिअरींग'चा संबंध जोडू नये

ठिक आहे नाही जोडत संबंध. पण भ्रष्टाचार वरच्या लेव्हलला होतो. म्हणजे टेंडर काढणारे अधीकारी, मंत्री अन टेंडर घेणारी संस्था. नंतर काम करणारे इंजिनीअरच, ऑफीसर, मजूर असतात. मग कंपनी काम करतांना त्यांना असे सांगते का की आपण जास्त पैसे लावले आहेत टेंडर मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही ४ सिमेंट बॅग्ज चे मिक्स करण्याऐवजी २.५ सिमेंट बॅग्जचेच मिक्स करा अन व्हा सुरू. ७०० टन स्टिल वापरण्याऐवजी ३०० च टन स्टिल वापरा अन बांधा पुल. जे लागते ते लागणारच. मग तो इंडीया असो की भारत. मग त्यात तडजोड का?

बाकी ब्रिटीश काळातले काही पुल आजही वापरात आहेत अन भक्कम आहेत. त्या नंतर बांधलेले पुल बांधकाम चालू असतांनाच का कोसळतात माहीत नाही बुवा. काही पुलच्या पुल वाहून जातात ते ही समजत नाही.

अनिल २७'s picture

23 Sep 2010 - 12:04 pm | अनिल २७

राष्ट्रकुल स्पर्धेत भ्रष्टाचार झालाच असणार हे मान्य पण म्हणून संपुर्ण भारतीय सिव्हिल ईंजिनीअरींग नालायक कसे ठरते? त्या भ्रष्टाचारात सर्वच संबंधित सामील नसतील काय? ऊदा. आपल्या ईकडे शालेय पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार होतो व तो उघडकीस आल्यानंतर फक्त तो आहार बनवणारेच दोषी असतात का? व त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र खाद्य बनवण्यास नालायक आहे असे तुम्ही म्हणाल काय? सिव्हिल ईजिनीअरींग मधून साकार झालेले अनेक नोंद घेण्यासारखे प्रकल्प भारतात आहेत.. (जसे भाक्रा नांगल प्रकल्प, हिराकुड प्रकल्प, अगदी अलिकडचा वांद्रे सी लिंक, अगदी पलिकडचा ताजमहाल ....) जागेअभावी व विषयांतर नको म्हणून खोलात जात नाही, पण भारतीय सिव्हिल ईंजिनीअरींगला वैभवशाली ईतिहास आहे व भविष्यही आहे..
>>बाकी किती सिव्हील इंजिनिअर बांधकाम करतात तेव्हा m3, m4, m5 सिमेंट कॉन्क्रीट चे मिस्क बरोबर घेण्याचा आग्रह करतात ते मला माहीत नाही. मिक्सर चे किती रोटेशन किती सिमेंट बॅग्ज ला किती हवे ते माहीत नाही. स्लॅब भरतांना मजुरांच्या सोईसाठी किती गरज नसणारे पाणी वापरतात ते माहीत नाही. किती जण वाळूचेही लॅब टेस्टींग करतात ते माहीत नाही. बांधकामाला लागणारे पाणी किती जण पोट्याबल वापरतात अन त्याचे टेस्टींग करतात ते माहीत नाही. ही माहीती तुम्ही द्या.

=== बांधकामात काँक्रीटीकरण करताना डीझाईन मिक्स m3, m4, m5 अशी काही वापरली जात नाहीत..ती M10, M15, M20, M25..अशी आहेत व सामान्यपणे M20, M25 आपल्या भारतात सामान्य वातावरणात वापरली जातात.. बाकी तुम्ही वर जे उल्लेख केले आहेत ते केवळ 'गावखाती' कामांमध्ये होते (मिक्सर रोटेशन, पाणी ज्यादा वापरणे ई.) अन ईतर शास्रीय माहीती हवी असल्यास जरूर देईन.. अगदी संपुर्ण.. खरडवहीद्वारे वा व्यनिद्वारे..
तुमच्या लिखाणाचा हेतू शुद्ध आहे हे लक्षात येतेच त्याला आक्षेप नाही माझा फक्त अपवादालाच नियम समजू नका व त्यातून एका वैभवशाली ईंजिनीअरींग शाखेला बदनाम करू नका हि विनंती...

विशाल कुलकर्णी's picture

23 Sep 2010 - 4:00 pm | विशाल कुलकर्णी

१००% सहमत :)

विशाल (भारतीय स्थापत्यशास्त्राचा अभिमानी एलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयर)

पाषाणभेद's picture

23 Sep 2010 - 7:39 pm | पाषाणभेद

अनिलभौ सहमत आहे. सिव्हिल इंजीनिअरींग बाबत अभिमानाचे कामे झालेली आहेत हे नाकारत नाही. पण असले काही भव्यदिव्य करण्यासाठी जे व्यवस्थापान लागते त्यात सगळी टिमनेच खराब कामगीरी केली आहे. मागेही दिल्लीलाच पुलाचा गर्डर कोसळला होता. त्यानंतर क्रेन उलटली होती. आता स्टेडीयम मध्ये पाणी गळतेय. देशाच्या इभ्रतीचा प्रश्न येतो तेव्हा जबाबदार व्यक्तिंनी कसे वागले पाहीजे याची वास्तपुस्त आता आपण चीनकडून आऊटसोर्स करायची का?

पुल पडल्याची बातमी शीळी झाली हो,आता फाल्स् सिलींग पड्ले,आणी काय हो ४ देश ओरडले कि अमुक नाही तमुक नाही तर त्यात काय लाज वाटायची(इती श्रीयुत सुरेशजी कलमाडी साहेब)
आणी सामान्य माणसाला काय मिळेल या सगळ्यातुन

सामान्य माणसाला काय मिळेल या सगळ्यातुन

देशाबद्द्ल अभिमान (National Pride) पण आता तर वाट्ते देशाचा अभिमान वगैरे फक्त सामान्यांसाठीच ...ह्या गेंड्याच्या कातडी असलेल्या नेंत्यांना कसला आला देशाचा अभिमान आपापली पाकीट भरण्यात सर्व मग्न आहे.

अनिल २७'s picture

23 Sep 2010 - 12:24 pm | अनिल २७

काय करावे बुवा? आभाळ फाटले पळा पळा असेच सध्या आपल्या सर्वाचे होतेय.. फॉल्स सिलींग पडले नाही, फॉल्स सीलिंगमध्ये आर्मस्ट्राँग टाईल्स असतात त्या तीन टाईल्स पडल्या असे आम्हास कळाले आहे.. ह्या टाईल्स सीलिंगच्या सांगाड्यावर फक्त ठेवलेल्या असतात व त्या कुणीही हाताने काढू शकतो.. आपल्या हिंदी न्युज चॅनेल्सची एकंदरीत प्रवृत्ती बघता ही बातमी "तयार" केली नसु शकेल काय?

समंजस's picture

23 Sep 2010 - 12:36 pm | समंजस

>>>ह्या टाईल्स सीलिंगच्या सांगाड्यावर फक्त ठेवलेल्या असतात व त्या कुणीही हाताने काढू शकतो.. आपल्या हिंदी न्युज चॅनेल्सची एकंदरीत प्रवृत्ती बघता ही बातमी "तयार" केली नसु शकेल काय?

---- हिंदी न्युज चॅनेल्सनी ह्या तीन टाईल्स हातानी काढल्यात आणि बोंब ठोकली असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

अनिल २७'s picture

23 Sep 2010 - 12:42 pm | अनिल २७

असू शकेल तसेही....

समंजस's picture

23 Sep 2010 - 2:04 pm | समंजस

मग तर हा प्रश्न फक्त गलथान कामाचा किंवा निकृष्ट कामाचा न राहता त्या पेक्षा गंभिर होउन जातो.
म्हणजे इथे निकृष्ट कामाच्या ऐवजी खेळाडूंच्या सुरक्षतेबद्दल काळजी करावी लागेल. खेळसंकुलांमध्ये जर फॉल्स सीलींग मधील टाईल्स काढून टाकणे(हेतूपुरस्सर) शक्य असेल तर फॉल्स सीलींगच्या वर सहज दिसणार नाही अश्या प्रकारे एखादा डब्बा(स्फोटकं भरलेला) ठेवणे का शक्य नाही?

प्रदीप's picture

22 Sep 2010 - 6:06 pm | प्रदीप

खरे तर सगळे काही आलबेल आहे. हा सगळा आरडाओरडा चाललाय तो केवळ प्रगत देशांतील लोकांना आमची नेत्रदीपक प्रगति पहावत नाही, म्हणून. ह्यामागे केवळ असूया आहे.

ह्यांच्या बातम्या पहा कशा:

कालच 'इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून' ('न्यूयॉर्क टाईम्स' चा आंतरराष्ट्रीय अवतार) ने ह्याविषयी बातमी देतांना कसा खोडसाळपणा केला पहा. बातमी लिहीणारे वार्ताहर लिहीतात :" भारताने आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय खेळ-स्पर्धेचे वादंगात असलेले प्रमुख अधिकारी श्री. सुरेश कलमाडी जगास एक अगदी साधा संदेश देत आहेत, पण तो देण्यासाठी त्यांना (घर)बांधणीच्या आवाजावर आवाज चढवावा लागतोय.

'अगदी १०० % तयारी झालेली आहे' हा तो संदेश होय. हा संदेश श्री. कलमाडी आम्हा (पत्रकारांना) जवाहरलाल नेहरू स्टेडियममधून फिरवतांना सांगत होते, त्यासाठी त्यांना आपला आवाज, आजूबाजूस वेगाने काम करत असलेल्या कामगारांच्या ईलेक्ट्रिक करवतींच्या व वेल्डिंग मशीनींच्या आवाजावर चढवावा लागत होता. जरा खोदून विचारल्यावर 'अजून "थोडे" काम बाकी बरीक आहे' असे ते म्हणाले.

आताच मी आमच्या स्थानिक टी. व्ही. वर श्री. जयपाल रेड्डींना पाहिले. 'हे पहा, सर्व तयारी झालेली आहे. ह्या (गेल्या एकदोन दिवसात झालेल्या किरकोळ पडझडींचा उल्लेख होता हा--) काही किरकोळ घटना आहेत (These are minor hiccups).

तेव्हा उगाच परदेशीयांच्या, विशेषतः प्रगत देशांतील लोकांच्या, लिहीण्या-सांगण्यावर विश्वास ठेऊ नका. आपले सरकार ('मागे' बरं का, त्याचे सगळे पडद्याआड चाललेले असते) सगळी जय्यत तयारी करीत आहे. मेरा भारत महान, आणि तो २२ व्या शतकात जोरदार घोडदौड करीत आहे, ही सगळी कोल्हेकुई चाललीय ना, ती त्याचेच निदर्शक आहे.

विकास's picture

22 Sep 2010 - 6:37 pm | विकास

खरे तर सगळे काही आलबेल आहे. हा सगळा आरडाओरडा चाललाय तो केवळ प्रगत देशांतील लोकांना आमची नेत्रदीपक प्रगति पहावत नाही, म्हणून. ह्यामागे केवळ असूया आहे.

अगदी अगदी! १००% सहमत! याच संदर्भात मी आत्ता एक चर्चा टाकणार होतो, तेव्हढ्यात हा धागा दिसला...

म्हणूनच मला शीला दिक्षीत आणि दिल्ली सरकार आणि माननीय श्री. सुरेशीजी कलमाडीसाहेबांचे अभिनंदन करत प्रसिद्धीमाध्यमांचा निषेध करावासा वाटत आहे!

आत्ताच एनडिटीव्हीवर वाचले... मा.मु.शीला दिक्षीत म्हणाल्या की, "कुठेतरी सिलींग गळाले, सिलींग टाईल पडली, फूटब्रिज पडला इतकेच काय ते तुम्हाला दिसत आहे. आम्ही (म्हणजे दिल्ली सरकार आणि अर्थातच माननीय श्री. सुरेशीजी कलमाडीसाहेब) १००० बसेससाठी पार्कींगची व्यवस्था केली, जेव्हढी व्यवस्था आख्या जगात कुठे नाही, त्याबद्दल मात्र काहीच कौतुक नाही!"

मेरा भारत महान, आणि तो २२ व्या शतकात जोरदार घोडदौड करीत आहे, ही सगळी कोल्हेकुई चाललीय ना, ती त्याचेच निदर्शक आहे.

असेच म्हणावेसे वाटते. फक्त घोडदौडीच्या ऐवजी बसदौड आणि त्यातही १००० पैकी एक नाही, दोन नाही तर एकदम चार बसेस सीएनजीवर चालणार असून त्यामुळे दिल्लीतील हवा देखील कमी प्रदुषित होणार आहे!

अशक्त's picture

23 Sep 2010 - 7:57 pm | अशक्त

हि पहा आपलि प्रगती

http://news.bbc.co.uk/sport2/hi/commonwealth_games/delhi_2010/9025907.stm

विकास's picture

23 Sep 2010 - 8:31 pm | विकास

Ridiculous या शब्दाव्यतिरीक्त दुसरा शब्द नाही.

पाषाणभेद's picture

23 Sep 2010 - 10:05 pm | पाषाणभेद

अंतरराष्ट्रिय दर्जा राखला नाही पण देशी दर्जा राखला हेच महत्वाचे. बहूतेक मजूर अन अधिकारी बिहारी असतील काय?

जवळ जवळ सगळ्या देशातले खेळाडु स्पर्धेतुन माघार घेत असल्यामुळे जास्तीत जास्त पदके जिंकायची भारताला सुवर्णसंधी आहे .त्यामुळे इज्जत गेली तरी आपण पदकतालिकेत आपले स्थान उंचावु शकतो. मला तर ही सुरेश कलमाडीची भारत जास्त पदके जिंकावा ह्या साठी खेळलेली एक चाल वाटते.सुरेश कलमाडी हे एक शातीर खिलाडी आहेत.

गांधीवादी's picture

23 Sep 2010 - 9:15 pm | गांधीवादी

श्री कलमाडी यांना एक नम्र विनंती,
इथून पुढे सर्व खेळ भारतातच (आणि तेहि अश्याच प्रकारे) आयोजित करावेत.
जेणेकरून, सगळी सुवर्णे पदके नेहमी आपल्यालाच मिळतील नाही का ?

गांधीवादी's picture

24 Sep 2010 - 12:02 pm | गांधीवादी

जाऊदे बोलतच नाही, शब्दच सापडत नाहीयेत,
डोके सुन्न झाले आहे.
England athletes to stay at hotels instead of CWG village
http://timesofindia.indiatimes.com/sports/events-tournaments/commonwealt...

India bribed 72 nations to get Delhi CWG: Report
http://timesofindia.indiatimes.com/sports/events-tournaments/commonwealt...

India shouldn't have got CWG: Aussie Olympic boss
http://timesofindia.indiatimes.com/sports/events-tournaments/commonwealt...

97% say Games bosses have tarnished India's image: Poll
http://timesofindia.indiatimes.com/sports/events-tournaments/commonwealt...

विकास's picture

24 Sep 2010 - 6:33 pm | विकास

जाऊदे बोलतच नाही, शब्दच सापडत

काही बोलायचे आहे पण बोलणार नाही
भ्रष्ट शासनकर्त्यांवरूनी क्रिडा तोलणार नाही... :(

India bribed 72 nations to get Delhi CWG: Report

हे विधान (टाईम्सचे तुमचे नाही) वेगळाच गैरसमज पसरवत आहे. भारत आणि कॅनडा यांच्यामधे जेंव्हा यजमानपदासाठी शेवटची चुरस चालली होती तेंव्हा कॅनडाने $७०,००० तर भारताने $१००,००० (त्यावेळचे $१४०,०००) हे त्यांच्याबाजूने मतदान करणार्‍या देशांना देण्याची तयारी (ऑफर) दाखवली होती. भारताने ते पैसे अ‍ॅथलीट ट्रेनिंग साठी देणार म्हणून सांगितले होते. ऑस्ट्रेलीयाल स्पेशल $१२५,००० दिले (आणि आता ऑसी गळे काढत आहेत),,, ह्या गोष्टी जाहीरपणे झाल्या होत्या आणि असे दिसतयं की ते नियमात बसणारे होते.

ऋषिकेश's picture

24 Sep 2010 - 1:02 pm | ऋषिकेश

लाज वाटते आहे.. काय बोलणार! :(

मदनबाण's picture

24 Sep 2010 - 7:05 pm | मदनबाण

सारं जगं हसतय माझ्या देशावर... :(
आपल्या देशाचे पंतप्रधान कोणत्या दुसर्‍या देशातल्या पंतप्रधान /राष्ट्राध्यक्षांना चेहरा कसा दाखवु शकतील ? सगळ्यात जास्त कारकिर्द लाभलेला पंतप्रधानां मधे यांचा ३ रा क्रमांक आला आहे...( http://timesofindia.indiatimes.com/india/Manmohan-Singh-becomes-third-lo... )
आणि यांच्याच काळात हा भ्रष्टाचार इतका वाढावा की आपल्या देशाची जगभर अशी प्रतिमा खालवावी ?
भ्रष्टाचार देशाला कुठे नेउ शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे असे मला वाटते... :(

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 2:44 pm | गांधीवादी

It’s time for India… to say enough is enough


the big question:
do we boycott the Games to tell the corrupt politicians that we will not sit quietly while they splurge/pocket our hard-earned money? Or do we participate in them whole-heartedly because the entire world is watching?


The answer probably lies somewhere in between: every sports lover who turns up at the Games must consider wearing a black ribbon on his/her arm? Across the country, too, wherever we go – malls, bazaars, schools, colleges, and offices – we must demonstrate our protest in the same manner during the length of the Games.

This is a wonderful opportunity to tell all of them: enough is enough. We cannot afford to let this anger subside; otherwise, they will come back to plunder us in the name of the nation and its pride all over again.

केशवसुमार's picture

27 Sep 2010 - 3:07 pm | केशवसुमार

मोर नाचायला लागला की त्याचा पिसारा पुढून पहावा .. मागून नाही..

हे २४ फोटो बघा ते बीबीसी वाले आणि भारतीय मिडीया दाखवते ते ७-८ फोटो कशाला बघता..
आर आर आबांच्या भाषेत सांगायचे झाले तर इतक्या मोठ्या आयोजनात चोता चोता चुका होणारच नाही का ;)
आता आपण सुपर'पावार' होणार आहोत.. तेव्हा हायजीनचे वगैरे आताचे फालतू स्टॅन्डर्ड बदलून टाकू.. आपण आपले नवे नियम बदलू.. हे सारे जग बदलू..