http://img1.orkut.com/images/milieu/1283586494/1284180469373/546100837/g...
मेदूवडा व चट्णी.------------
साहित्य:- दोन वाट्या उडीद डाळ, पाव वाटी चना डाळ, तीन हिरव्या मिरच्या, मिठ थोडेसेच.
मेदुवडा साचा.तेल.जिरे एक छोटा चमचा.
कॄती:-डाळी दोन-तीन तास भिजत घाला, नंतर मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या, मिरचीचे बारीक तुकडे त्यात घाला,मिठ घाला, चमचाभर जिरे घाला मिश्रण जास्त घट्ट नक्को, साच्यात घाला , गरम तेलात साच्याने वडॆ पाडा, तांबूस रंगावर तळा.
चटणीसाठी -एक वाटी खोवलेला नारळाचा चव, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर,दोन हिरव्या मिरच्या, चवीनूसार साखर, मिठ. हे सर्व साहित्य एकत्र करुन वाटून घ्या , त्यात दही घालून सरसरीत करा, वरुन जिरे,मोहरी ,हिंगाची खमंग फ़ोडणी द्या, चटणी तय्यार,
आता आपण जे वडे तळून ठेवले आहेत ते वडे व चटणी यांचा आस्वाद घ्या.
प्रतिक्रिया
21 Sep 2010 - 5:30 pm | मस्त कलंदर
मस्त दिसताहेत वडे.. आताच खावेसे वाटावेत असे.
21 Sep 2010 - 6:56 pm | पर्नल नेने मराठे
http://img1.orkut.com/images/milieu/1283586494/1284180469373/546100837/g...?
ओर्कुत अम्हाला बॅन आहे
21 Sep 2010 - 8:52 pm | मेघवेडा
आणि फेसबुक नाही? सह्हीच! :D
21 Sep 2010 - 5:42 pm | चिंतामणी
ताईंनी सुरवात केली तर पाकृ टाकायला.
अजून येउ द्या.
21 Sep 2010 - 6:02 pm | गणपा
मिरचीच्या तुकड्या सोबत नारळाचे बारीक काप करुन ते पिठात टाकले तर अजुन मस्त लागतात.
-(सध्या फोटोंवरच समाधान मानणारा) गणा
21 Sep 2010 - 7:28 pm | रामदास
अर्धी -बोबडी वाटून थोडी फार घालायला हरकत नाही.
21 Sep 2010 - 7:50 pm | रेवती
आणि थोडे भरडलेले धणे!
चावायला चांगले लागतात पण कधीकधी दातात अडकले चिडचिड होते.;)
21 Sep 2010 - 8:49 pm | शुचि
हा हा चीड्चीड होते :) खरय!!!
21 Sep 2010 - 6:53 pm | रेवती
मस्त फोटू!
साच्यातून वडे असे होतात हे माहित नव्हतं. तसेही मला मेदूवडे नीट जमत नाहीत.
मिक्सरमध्ये डाळ वाटताना थोडं पाणी घातलं तरी मीठ घातल्यावर पीठ पातळ होतं आणे वडा हा मेदूवडा दिसत नाही.
वेडावाकडा आकार होतो. आता इडली ग्राइंडरमध्ये अगदी थोड्या पाण्यात डाळ वाटून बघते.
21 Sep 2010 - 6:59 pm | मदनबाण
हाटिलात गेल्यावर मेदूवडा- इडली सांबार हा माझा आवडता खाण्याचा पदार्थ..मेदूवड्याला काही जण मेंदूवडा म्हणतात !!! आणि ते ऐकले की माझ्या मेंदुत जबरदस्त केमिकल लोच्या होतो !!! ;)
21 Sep 2010 - 7:02 pm | रेवती
बाणा, अगदी हेच म्हणते. जे कोणी मेंदूवडा म्हणतात त्यांचा मला भयानक राग येतो.
मलाही मेदूवडा, सांबार आणि चटणी अतिषय आवडतात.
हा पदार्थ फार प्रेमळ आहे असे उगीचच वाटत राहते.
21 Sep 2010 - 7:09 pm | मदनबाण
*
21 Sep 2010 - 7:09 pm | मदनबाण
"आमच्या इथे मिल्कशेख मिळेल", अशी पाटी वाचुन म्या लयं हसलो व्हतो. :)
21 Sep 2010 - 7:24 pm | सूड
निवेदिता-ताईतै, रेसिपी मस्तच !! गणपाची टीप आम्हाला पण मान्य, नारळाचे काप करुन ते पिठात टाकले तर खरंच छान लागतात वडे.
21 Sep 2010 - 8:36 pm | निवेदिता-ताई
धन्यवाद............धन्यवाद............सगळयांना....मेदूवडा-चटणी आवडल्याबद्दल.