`दबंग'च्या यशाचे इंगित काय?

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
19 Sep 2010 - 6:17 pm
गाभा: 

सलमान खानचे "स्टारडम' आणि दोन-तीन चांगल्या फाइट्‌स, एवढ्याच बाबतीत "दबंग' जगावेगळा, विशेष म्हणावा लागेल. अन्यथा कॉमेडी नाही, जबरदस्त पटकथा नाही, चक्रावून टाकणारी वळणं नाहीत, नायक-खलनायकाच्या दमदार कुरघोड्या नाहीत...असं असतानाही "दबंग' एवढा का चालतोय? का गाजतोय? टाळ्या-शिट्ट्या खेचणारे संवाद, हे एक कारण असू शकतं. पण फक्त तेवढंच? बाकी काय असावं?
तुम्हाला काय वाटतं?

(विशेष सूचना ः "दबंग' पाहिलेल्या व्यक्तींनीच या विषयावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. तो न पाहता प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या तज्ज्ञतेबद्दल पूर्ण मान राखूनही, त्यांनी आधी चित्रपट पाहावा, ही विनंती.)

प्रतिक्रिया

सहज's picture

19 Sep 2010 - 6:21 pm | सहज

न बघताच प्रतिक्रिया देतोय. हॅ हॅ हॅ

दबंग पाहीलेल्या एका मित्राच्या मते - एका अस्सल बाजारु हिंदी सिनेमात जे असणे अपेक्षीत असते ते सगळे (मसाला) दबंग मधे आहे. हीट आहे. मॅटर फिनिश.

आपला अभिजित's picture

19 Sep 2010 - 6:24 pm | आपला अभिजित

एका अस्सल बाजारु हिंदी सिनेमात जे असणे अपेक्षीत असते ते सगळे (मसाला) दबंग मधे आहे. हीट आहे.

ते तर आहेच!
पण ते साफ-सूफ, उत्तम प्रकारे मांडलेले अजिबात नाही!
जबरदस्त, भन्नाट तर मुळीच नाही.

म्हणूनच तर विचारतोय!!

पाषाणभेद's picture

19 Sep 2010 - 6:55 pm | पाषाणभेद

सध्या झंडू बाम लावून बसलेलो असल्याने प्रतिक्रीया नंतर देईन.

सुनील's picture

19 Sep 2010 - 6:59 pm | सुनील

यशाचा फॉर्म्युला (किंवा अपयशाची कारणे) वगैरे काही असत नाही. कुठला चित्रपट चालेल आणि कुठला आपटेल हे काही सांगता येत नाही. एखादा चालला म्हणून तोच फॉर्म्युला वापरून बनवलेले चालतातच असे नाही (क्वचित आपटतातदेखिल!)

संतोषी माता तूफान चालला पण इतर देव-देवतांचे नाही. कारण? माहित नाही.
शोलेने विक्रम मोडले. त्याच धर्तीवर (मल्टीस्टार इ.इ.) बनवलेले इतर फारसे चालले नाहीत. कारण? माहित नाही.

असो, काल दबंग पहाण्याऐवजी एक इटालियन आणि एक पुश्तू चित्रपट पाहिला. त्यांविषयी मिपावर लवकरच!

विकास's picture

19 Sep 2010 - 10:18 pm | विकास

कुठला चित्रपट चालेल आणि कुठला आपटेल हे काही सांगता येत नाही.

असेच संस्थळांवरील चर्चांसंदर्भात पण म्हणता येईल का? :? ;)

सुनील's picture

20 Sep 2010 - 5:17 am | सुनील

असेच संस्थळांवरील चर्चांसंदर्भात पण म्हणता येईल का? :?

हा हा हा!!!!!!!

होय. पण तरीही, माझ्या ४-५ वर्षांच्या आतंरजालीय अनुभवावरून असे अनुमान काढता येईल की, धाग्याच्या शीर्षकात जर खालीलपैकी कोणताही एखादा शब्द असला तर, धागा "यशस्वी" होण्याची शक्यता खूप असते!!

शब्द - मुस्लिम (मुसलमान), काश्मिर, पाकिस्तान, गांधी, नेहेरू, ब्राह्मण, पुणे (पुणेकर, पुणेरी), आयटीतील स्त्री/पुरुष इ. इ.

(हे असे धागे पहिल्या फटक्यात यशस्वी तर होतातच शिवाय, इंचा-इंचाने खाली गेलेच तरी पुन्हा पुन्हा वर येत राहतात!)

निखिल देशपांडे's picture

20 Sep 2010 - 11:06 pm | निखिल देशपांडे

सुनीलराव निवासि अनिवासी राहिलं हा
अश्यात कुणी धागा काढला नाही यावर,

बाकी दबंग हा एक तद्दन फालतु पिक्चर आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.

तिमा's picture

19 Sep 2010 - 8:04 pm | तिमा

दबंग शब्दाचा मराठी अर्थ कोणीतरी सांगावा.

मृत्युन्जय's picture

19 Sep 2010 - 9:29 pm | मृत्युन्जय

दबंग म्हणजे निडर

मृत्युन्जय's picture

19 Sep 2010 - 9:42 pm | मृत्युन्जय

हिंदी चित्रपटांचा आजकाल एक साचा बनत चालला आहे. त्याच्याबाहेर जाउन चित्रपट बनवणारे फार थोडे आहेत. उदा.: आमीर खान. बाकी सगळे जण घिसीपिटी कॉमेडी तरी सादर करत आहेत किंवा फालतुन भोंगळ आदर्शवाद लोकांच्या माथे मारायचा प्रयत्न करत आहेत. "मास" ला समोर ठेवुन एवढ्यात कुठल्याही प्रमुख कलाकाराने चित्रपटा काढलेला नव्हता. सलमानच्या दबंग ने ही कमी भरुन काढली. गेल्या काही वर्षात कुठल्याही मुख्य कलाकाराने एवढ्यात कुठलाही देमारपट दिलेला नाही. वॉन्टेड वगळता. तो सुद्धा सलमानचाच होता. सलमानच्या वॉन्टेड ती कमी पुरी केली. त्यातले सलमान चे कामही बर्‍याच जणांना भावले. आदर्शवाद, नसलेले इनोद आदींनी ग्रासलेल्या प्रेक्षकवर्गाला डोके बाजुला ठेवुन बघता येइल असा अ‍ॅक्शनपट हवा होता आणी वॉन्टेड मुळे सलमान तो देउ शकेल याचा मायबाप प्रेक्षकांना भरवसा होता. मला वाटते दबंग या निकषांवर खरा उतरतो. दबंग - सलमान = शुन्य.

या चित्रपटात कथा शोधायला जाउ नका. सापडणार नाही आणी सलमानला बाजुला काढा काहीच हाती लागणार नाही. पण डोके बाजुला ठेवुन स्टाइल आणी स्टंटबाजी बघायची असेल तर हा चित्रपट उत्तम आहे. एरवी मी हा चित्रपटा बघितलाच नसता आणी बघितला असता तरी तद्दन बकवास आहे असे म्हणालो असतो. बकवास आहे हे अजुनही मान्य करतो तरीही बर्‍याच दिवसांनी असला चित्रपट बघितला त्यामुळे पैसे वसूल झाले.

मी-सौरभ's picture

19 Sep 2010 - 10:13 pm | मी-सौरभ

:)
प्रोमो मधे दिसतो तेवढाच काय तो चांगला आहे हा पिक्चर.

बाकी काय लिहिणे :)

कानडाऊ योगेशु's picture

20 Sep 2010 - 1:07 am | कानडाऊ योगेशु

तो न पाहता प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या तज्ज्ञतेबद्दल पूर्ण मान राखूनही, त्यांनी आधी चित्रपट पाहावा, ही विनंती.

हॅ हॅ हॅ..एक कारण तर इथेच मिळाले. (ह्.घ्या)

केवळ प्रतिर्किया देण्यासाठी दबंग आणि सल्मान असा डबल अत्याचार सहन करणे शक्य नाही.कुठल्यातरी चॅनेलवर महिन्याभरात त्याचा वर्ल्ड प्रिमिअर होईल तेव्हा पाहु.तो पर्यंत पाषाणभेदांनी लिहिल्याप्रमाणे गुडघ्यावर झेंडुबाम चोळत बसतो.

-स्टाईल आणि स्टंटबाजी चा उल्लेख झाल्या म्हणुन..
रोबोट चे प्रोमोज पाहीले असतील तर त्यात ट्रेनच्या खिडक्यांवरुन टणाटण उड्या मारत आडवा पळणारा (जमिनीला समांतर) रजनीकांत पाहुन चक्क धाय मोकलुन हसलो.

बाकी सध्या मी वाट पाहतोय ते खिचडी द मूव्ही च्या रिलिजची.प्रोमोजवरुन तर सिरियल सारखाच फुल्ल धुमाकुळ असणारेय असे वाटतेय.

(प्रफुल्लचा फॅन ) योगेशु

मी ऋचा's picture

20 Sep 2010 - 10:39 am | मी ऋचा

>>रोबोट चे प्रोमोज पाहीले असतील तर त्यात ट्रेनच्या खिडक्यांवरुन टणाटण उड्या मारत आडवा पळणारा (जमिनीला समांतर) रजनीकांत पाहुन चक्क धाय मोकलुन हसलो

>>बाकी सध्या मी वाट पाहतोय ते खिचडी द मूव्ही च्या रिलिजची.प्रोमोजवरुन तर सिरियल सारखाच फुल्ल धुमाकुळ असणारेय असे वाटतेय

+१

Pain's picture

20 Sep 2010 - 4:07 am | Pain

दोन-तीन चांगल्या फाइट्‌स

चांगल्या ? चोरलेल्या. आँग बॅक, ट्रान्सपोर्टर इ इ

ज्या माणसाला राजस्थान कोर्टाने दोषी ठरवून शि़क्षा दिली होती, ज्याने दारू पिऊन बेफाम गाडी चालवून (शेजारी बसलेल्या पोलिसाच्या साक्षीने) चौघांना ठार केले व ज्याच्या 'भाई'बरोबरच्या संभाषणांच्या टेप्स पोलिसांकडे आहेत असे वृत्तपत्रांत वाचल्याचं मला आठवतं अशा नटांच्या चित्रपटांवर मी वैयक्तिक बहिष्कार घालतो व आपणा सर्वांनाही असेच आवाहन करतो. (असा आणखीही एक नट आहे)
सलमान कुठल्या मुद्द्यावर जामीन मिळवून बाहेर आला व किती वर्षें हा प्रश्नही वाजवी आहे. 'मिपा'वरील कायदेतज्ञांनी ते सांगावे अशी विनंती.
सलमानसारखाच गुन्हा एका गोव्यातल्या ड्रायव्हरने त्याच्यानंतर वर्षभराने केला होता आणि त्याच्यावर खटला होऊन त्याला शिक्षासुद्धा झाली. पण सलमान मात्र मोकाट हिंडतोय आणि (उज्ज्वल निकम यांनी म्हटल्याप्रमाणे) मूर्खासारख्या मुलाखती देतोय्. त्याच्या चित्रपटांवर 'जनता कर्फ्यू'च घातला पाहिजे.

Pain's picture

20 Sep 2010 - 8:05 am | Pain

तोच न्याय संजय दत्त, मोनिका बेदी(?) इ. यांनाही लावा.

तुम्ही सांगितललेला मुद्दा रास्त आहे. शिवाय इतर अभिनेत्याचा असता तरी इतका फालतू चित्रपट कसा काय आवडू शकतो देव जाणे. असो. कोणाला काहीही आवडू शकते.

काही अपवाद वगळता बहुतांश चित्रपट यासारखेच फालतू असतात. चित्रपटगृहात किंवा कुठल्याही कायदेशीर मार्गाने ते न पाहणे कसे वाटते ?

सुधीर काळे's picture

20 Sep 2010 - 4:56 pm | सुधीर काळे

न्यायालयाने अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून संजय दत्तची मुक्तता केली, पण बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरविले. त्यामुळे त्याच्या गुन्ह्याची धार 'जर्रा' कमी झाली! पण तरीही जामीनावर तो सुटलाच. हेही बरोबर नाहीं. त्याला पुन्हा आत टाकलेच पाहिजे. पण असले गुन्हे केलेले हे लोक असे सुटतातच कसे?
मी स्वतः संजय दत्तलासुद्धा वाळीत टाकले आहेच. पण त्याचा गुन्हा देशद्रोहाचा नाहीं. आणि तो एक टुकार अभिनेता आहे! (हे आपले माझे मत हं!)
त्या मानाने 'भाई'बरोबर केलेल्या संवादांची टेप असल्याची बातमी सलमानला देशद्रोही बनवू शकते. तो गुन्हा जास्त गंभीर आहे. म्हणून सलमानच्या चित्रपटांवर 'जनता कर्फ्यू' लावणे जास्त बरोबर वाटते.
मोनिका बेदीचे चित्रपट आहेत काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2010 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मोनिका बेदीचे चित्रपट आहेत काय?

उगाच का ती सिनेअभिनेत्री आहे?
होय, तिचा आणि सलमान खानचा 'जानम समझा करो'ही आहे.

बाकी संजय दत्तला अभिनय जमत नाही ही गोष्ट खरीच! मुन्नाभाई पिक्चर्स खरंतर अर्शद वारसीचेच!

सुनील's picture

20 Sep 2010 - 5:15 pm | सुनील

ज्या कायदेशीर प्रक्रियेनुसार संजय दत्त दोषी ठरला त्याच कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे त्याला जामिनदेखिल मिळाला. तो तुरुंग फोडून बाहेर आला नसावा!

बाकी, सुनावणीपूर्वीच त्याला क्लीन चीट देणारे कोण ते? ज्याच्यामुळे सरपोतदारांना एकवार "वॉक ओवर" मिळाला?

मोनिका बेदीचे चित्रपट किती आहेत ते ठाउक नाही पण बरेच नीलपट आहेत (असे ऐकून आहे!)

बोका's picture

20 Sep 2010 - 7:25 pm | बोका

सलमान आणि संजय दत्त च्या चित्रपटांवर आमचा बहिष्कार आहे.
टिव्हिवर त्यांचा चित्रपट दिसला की लगेच आम्ही (माझा मुलगासुद्धा) चॅनेल बदलतो.
मुन्नभाई अजून बघितलेला नाही.

बट्ट्याबोळ's picture

20 Sep 2010 - 9:22 am | बट्ट्याबोळ

लय भारी पिच्चर आहे !!
आपन पुन्यामंदे निल्याम टॉकीजला बघितला ...
अपली आक्की गँग आल्ती.
आयला सल्ल्या कसला धूतो एकेकाला. आनी कायपन नाचतो. एक नंबर!!
आपन पन गनपतीत तसलाच डान्स करनार ए. आनी संत्याला पन तसच फोड्नार आहे.
आनी तो पादायचा डायलॉग तर लईच भारी. असलं घान हसलो आमी सगळे.
ती आयटम पन भारी ए. मुन्नी वर तर पिच्या च्या शिट्ट्या थांबतच नवत्या... आपन सगळे नाचलो.
फुल्ल पैसे वसूल ए पिच्चर !!
गेल्या वर्षी मिशी उडवली तर बापाने गालफाडला होत आपल्याला .. आता सल्ल्या सारखी मिशी ठेवनारे.

बट्ट्याबोळ प्रतिक्रिया छान दिलीय...