वॅब साईट

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in काथ्याकूट
19 Sep 2010 - 5:44 pm
गाभा: 

आपल्याला एखादी वेब साइट बनवायची असेल तर त्या साठी काय कराव लागतं ? त्याची प्रक्रिया काय ? याची माहिती देणारा सविस्तर लेख ऑन लाइन कुठे वचायला मिळेल कॄपया मार्गदर्शन करवे

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

19 Sep 2010 - 6:25 pm | गांधीवादी

http://www.w3schools.com/
एक लंबर आहे.

लंबूटांग's picture

19 Sep 2010 - 10:28 pm | लंबूटांग

सर्वात पहिली पायरी म्हणजे तुमच्या वेबसाईट चे नाव म्हणजेच domain name- उदा. www.misalpav.com- register करणे. godaddy.com ही एक चांगली साईट आहे त्यासाठी.

त्यानंतर webhosting company कडून web space म्हणजेच तुमच्या साईटची वेब पेजेस आणि डेटा साठवण्यासाठी जागा खरेदी करणे.

जर तुम्हाला php वापरून साईट बनवायची असेल तर LAMP (Linux Apache MySql Php setup असलेला होस्ट चालेल. अशा कंपन्या साधारणतः domain name free देतात. आणि LAMP servers usually Unlimited Disk Space, Bandwidth & Email offer करतात. म्हणजेच तुम्ही महिन्याला एका ठराविक रक्कमे व्यतिरिक्त इतर कसलेही charges द्यावे लागत नाहीत. http://webhostinggeeks.com/ येथे तुम्हाला अशा कंपन्यांची यादी मिळेल.

बाकी तुम्हाला कशा प्रकारची website बनवायची आहे आणि तुम्हाला कोण कोणते features हवे आहेत हे कळल्यास अजून माहिती देता येईल.

मिपा वगैरे सारख्या वेबसाईट्स ड्रुपल नावाची Content Management Systems वापरून बनवल्या आहेत. ड्रुपल थोडे कठीण आहे समजण्यास. वर्ड प्रेस नावाची अजून एक CMS आहे जी मला स्वतःला जास्ती user friendly आणि समजण्यास सोपी वाटली. बर्‍याचश्या वेबहोस्टिंग कंपन्याकडे CMS pre-installed असते

चन्द्रशेखर गोखले's picture

25 Sep 2010 - 12:25 pm | चन्द्रशेखर गोखले

चांगली माहिती दिलीत , धन्यवाद !
जागा आरक्षित ठेवण्यास आणि एकंदर मिसळ्पाव साईट बनविण्यास साधारण किती खर्च येतो..?

लंबूटांग's picture

27 Sep 2010 - 10:29 am | लंबूटांग

तुम्हाला domain name आरक्षित ठेवण्यास असे म्हणायचे असावे. godaddy.com वर गेलात तर तिथे annual fee दिसते. तेवढी रक्कम भरल्यास एक वर्ष domain तुमच्या नावावर राहिल. तुम्ही एकाहून अधिक वर्षांसाठीही आधीच पैसे भरू शकता.

जागा आरक्षित ठेवण्यास येणारा खर्च वरील site वर दिला आहे. तुम्ही ती जागा वापरा किंवा नका वापरू.

तुम्ही फक्त domain name register करून ठेवू शकता.

वर लिहीलेल्या domain name+webspace व्यतिरिक्त software चा कोणताच खर्च येत नाही कारण Drupal आणि तत्सम CMS मुक्तस्रोत (Open Source) प्रणाली आहेत.

जर कोणाकडून site बनवून घ्यायची असल्यास किती खर्च येतो कल्पना नाही.

चन्द्रशेखर गोखले's picture

3 Oct 2010 - 9:33 pm | चन्द्रशेखर गोखले

माहिती बद्दल आभार