हसत खेळत चीनी भाषा शिका, व त्यांच्या स्वागतास तयार राहा.

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
19 Sep 2010 - 9:25 am
गाभा: 

आजकाल मी 'आपण गेली काही दिवस काही दिवस रोज एकेक इंच मागे सरकतो आहे', अश्या बातम्या ऐकत आहे. आणि त्यातच आता मला 'नुकत्याच मिपावर झालेल्या चर्चेनुसार' सैनिकांवर जो काही उरला सुरला विश्वास होता तो देखील संपला.
मग आता काय ? आपल्याला दारात आरती घेऊन चीन पाकड्याचे स्वागतास कधी सज्ज व्हावे लागेल सांगता येत नाही. रात्र रात्र झोप देखील लागत नाही, कि कधी दारावर थाप पडते आणि एखादा चीनी दर ठोठावून म्हणेल कि "नि हाव". पाकाद्यांची उर्दू थोडी फार समजते पण हे चीन्यांचे बोलणे माझ्या सारख्या सामान्यांना कसे समजणार ? तर मी गुगल बाबाला साकडे घालून काही चीनी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
नाहीतरी चीनी हे महासत्ता आहेतच. (चिन्यांनी त्यांच्या कोणत्यातरी एका शहराचे शांघाय सुद्धा केलेले आहे. माहिती आहे का ? ) आपण काही तज्ञांनी (विशेष करून ज्यांना चीनी भाषेबद्दल काही माहिती आहे ) भर घालून सगळ्यांना सोप्या भाषेत चीनी शिकण्यास मदत करावी.

तशी चीनी शिकण्यासाठी जालावर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत, पण ऐनवेळी काही वाक्ये तोंडपाठ ठेवावी लागतील त्याची तयारी सुरु करूयात.

तर सुरुवात मी माझ्या पासून करत आहे.
मराठी शब्द.....................पर्यायी इंग्लिश शब्द....................चीनी भाषांतर
नमस्कार.............................. Hi, हेल्लो..............................नि हाव
आपण कसे आहात ? .............How are you ?........................नि हाव मा ?
मी ठीक/बरा आहे...................I am fine ............................. वो हेन हाव
ठीक आहे..............................OK .......................................होदा
हे चांगले आहे........................This is good .......................हाव ची
धन्यवाद...............................Thank You...........................शे शे
(धन्यावादाची) गरज नाही ..........Welcome ...........................बुयो काची
परत भेटू...............................See you soon ................... हेन काय जीन दाव नि
टाटा .....................................Bye bye .............................झाई जिआन

अवांतर :
मी गंप्याला सुद्धा शिकवायला सुरुवात केली . आमच्या गणप्याने मला विचारले, कि
राव हे चिन्यांनी जर भारताला ताब्यात घेतले तर काय करतील ते भारताचे ? मी म्हणालो, काही नाही, सगळ्यांना कामाला लावतील, पांढर्या लोकांकडून मस्त काम करून घेऊन त्यांच्या ढेर्या तरी कमी करतील.
त्याने परत एक विचारले ,
मग हे अतिरेकी वगेरे सगळे , त्यांचे काय होणार ? मी उत्तरलो, कि जर भारत चीनच्या ताब्यात गेला कि पाक काय संपूर्ण जगही डोळे वर करून बघणार नाही. ते अतिरेकी कीस झाड कि पत्ती ? एका सुद्धा अतिरेक्याची हिम्मत होणार नाही परत आत घुसायची. चीनचे राज्यकर्ते निषेध, तीव्र, कडक निषेध खलिते पाठवित नाहीत. डायरेक्ट म्याटर संपवून टाकतात.
त्याने शेवटचे प्रश्न विचारला
मग हे आपले ३३ कोटी देव, त्यांचे काय ?
मी म्हणालो, दे ना भाऊ सोडून, मुला-बाळांना, बाग-बगीचे, लोकांना काम, ठीक ठाक रोड, अन्न, चांगले जीवन मिळत असेल तर काय करायचे आहे ते देव देव, ना गणपती, ना नवरात्री, ना दिवाळी. ना आपले १५ ऑगस्ट २६ जानेवारीच्या दिवशीच्या ट्रिपा. ना त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण , ना त्यामुळे जालावर झडणाऱ्या चर्चा. चांगल्या जीवनापेक्षा हे देव, सन, उत्सव मोठे आहेत काय ?

त्याने परत विचारले कि हे चीनी भाई कधी येणार आहेत ?
मी म्हणालो कि रोज एकेक इंच येत आहेत.

ते स्पीड का वाढवत नाहीत ?
इथे येऊन पस्तावाणार तर नाय ना, कदाचित ह्याचा विचार करत असतील. अरे ते दमादमाणी पावले टाकतात राजा. घिसाड घाई करत नाहीत.

आपण इंग्रजांना १५० वर्षे चान्स दिलाच आहे आता चिन्यांना देऊन बघुयात ना, काय हरकत आहे ?
केलं त्यांनी भले तर ठीक नाहीतर आपण परत आपले अव्हिंसा नामक ब्रम्हास्त्र* टाकून त्यांना परतून लाऊ शकतो. नाही का ? त्या अस्त्राला संपूर्ण विश्वात काही तोड नाही. चीनी सुद्धा त्या शस्त्राला घाबरून पळून जातील. अरे हाय काय , नाय काय.
-------------------------------------------------------------------------------------------
*अव्हिंसा नामक ब्रम्हास्त्र केवळ आणि केवळ भारताकडेच आहे.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

19 Sep 2010 - 9:55 am | मदनबाण

नि हाव
नि हाव मा ?
वो हेन हाव
हाव ची

या चीन्यांची हाव वाढतच चालली आहे !!! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्यांनी त्यांच्या कोणत्यातरी एका शहराचे शांघाय सुद्धा केलेले आहे.

=))

लेखाबद्दलः हाव ची.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Sep 2010 - 10:03 am | अविनाशकुलकर्णी

चिनी मुली सुंदर असतात का?
वो हेन हाव

गांधीवादी's picture

19 Sep 2010 - 10:39 am | गांधीवादी

>>चिनी मुली सुंदर असतात का?
मला माहित नाही ? (आता माहित असून उपयोग तरी काय म्हणा ?)

तुम्हाला कदाचित हे वाक्य उपयोगी पडेल
माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे, I love you : वो आय नि.
(आणि हे ऐकण्याची तयारी ठेवा.
जातोस का आता, पोकळ बांबूचे फटके देऊ , I hate you : वो हेन नि.)

पैसा's picture

19 Sep 2010 - 6:58 pm | पैसा

हाव ची!

शिल्पा ब's picture

19 Sep 2010 - 10:54 am | शिल्पा ब

काय बरा हाव ना?
संपूर्ण भारत चिन्यांच्या ताब्यात जाणे शक्य नाही...झालेच तर युध्द होईल...इतकी वर्ष पाकिस्तानने किती प्रयत्न केला पण पाठीमागून खंजीर खुप्सुनसुद्धा भारताचे विशेष काही वाकडे झाले नाही...उलट भारत प्रगतीच करत आहे...

फक्त उगाच आंधळेपणे आंतरराष्ट्रीय कारभार न केला तर बरे..

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2010 - 11:04 am | राजेश घासकडवी

पहिल्याप्रथम अतिशय संयत भाषेत लेखन केल्याबद्दल गांधीवादी यांचे अभिनंदन. त्यात उत्कृष्ट तिरकस शैली वापरल्याबद्दल बोनस पॉइंट्स.

चीनी लोक दररोज इंचाइंचाने पुढे येत असतील तर हा हा म्हणता तीन लाख वर्षांमध्ये कन्याकुमारीपर्यंत पोचतील. बापरे. तुमच्या संस्थळावरच्या मुक्त चर्चा लवकर आटपून घ्या. 'परकीय सत्ता आपला देश जिंकू शकेल इतकं आपलं सरकार कुचकामी आहे. परकीय सत्तेने आपला देश जिंकून घेतला तर बरंच होईल.' वगैरे गोष्टी चीनी लोक आल्यावर म्हणता यायच्या नाहीत!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 11:19 am | अवलिया

खो खो खो ! बेस्ट !!!

पाषाणभेद's picture

19 Sep 2010 - 6:54 pm | पाषाणभेद

उपरोधीक लेख आवडला. पण आपले सरकार या चीन प्रकरणातून बोध घेईल तेव्हाच खरे.

गोगोल's picture

20 Sep 2010 - 1:31 am | गोगोल

एकदम आवडला.