सामना व राहुल गांधी

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
18 Sep 2010 - 7:35 pm
गाभा: 

भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्याविरुद्ध सामना या वर्तमानपत्रात असे लिहिले आहे

* कश्मीर प्रश्‍नासंदर्भात ओमर यांना अधिक वेळ व मदत देण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
* पावट्याला पावटा मिळाला!
अरे राहुल पावट्या,
तुझ्या पणजोबांंनी म्हणजे पं. नेहरूंनी कश्मीरची वाट लावली. उरलीसुरली कश्मीरची वाट तू लावणार असे दिसते!

भारतातील आदरणीय व्यक्तींची क्रमवारी लावायची झाली तर सोनियाजी एक क्रमांकावर, राहुलजी दोन क्रमांकावर आणि प्रियांकाजी तीनवर हे कुठलाही सामान्य माणूसही सांगू शकेल.
मयत व्यक्तींची लावायची झाली तर म्हात्मा गांधी एक क्रमांक, न्हेरू दोन क्रमांक असे म्हणता येईल.

तर भारतातील २ क्रमांकांच्या आदरणीय व्यक्तींबद्दल (जिवंत व मयत) असे वाईट छापल्याबद्दल सामन्यावर बंदी घालावी का त्याच्या कचेरीत जाऊन मोडतोड आणि जाळपोळ करावी?

कुठल्या पर्यायाने ह्या उन्मत्त दैनिकाला धाक बसेल?

प्रतिक्रिया

निवांत पोपट's picture

18 Sep 2010 - 7:53 pm | निवांत पोपट

तुम्ही उपहासाने लिहीलंय ते ठीक आहे.पण मला तरी इतर वर्तमान भारतीय राजकारण्यांच्या तुलनेत राहुल गांधी उजवा वाटतो. विचार राजीव गांधीसारखेच प्रामाणिक वाटतात.

राजीव गांधींसारखे प्रामाणिक म्हणजे नक्की कुठले विचार?
इंदिराजींच्या हत्येनंतर शिखांच्या कत्तली झाल्यावर "मोठे झाड पडल्यावर आसपासची झुडपेही मरतात" असे म्हणण्यासारखे प्रामाणिक का बोफोर्स प्रकरणासारखे प्रामाणिक का शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणारे प्रामाणिक का वादग्रस्त रामजन्मभूमी स्थानाचे कुलुप उघडून तिथे हिंदूंना पूजापाठ करु देणारे प्रामाणिक?

हां, बहुधा टेलिकॉम आणि कंप्युटर क्रांती आणणारे प्रामाणिक असेल.

का आपले दिसायला गोरागोमटा, उमदा, हसतमुख म्हणून प्रामाणिक?

निवांत पोपट's picture

18 Sep 2010 - 8:48 pm | निवांत पोपट

इंदिराजींच्या हत्येनंतर शिखांच्या कत्तली झाल्यावर "मोठे झाड पडल्यावर आसपासची झुडपेही मरतात" असे म्हणण्यासारखे
हे वाक्य कठॊर असेल, अपरीपक्व असेल, पण प्रामाणिक आहेच.ऎरवी बेरकी राजकारणी असे म्हणू शकणार नाही.आणि मूळात हे वाक्य नेत्यापेक्षा आई गमावलेल्या मुलाचे जास्त वाटते.
बोफोर्स प्रकरणासारखे प्रामाणिक ?
बोफोर्स प्रकरणात अजून काही सिध्द झालेले नाही. तेंव्हा संशयाचा फ़ायदा राजीव गांधीना दिला पाहिजे.
शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणारे प्रामाणिक ?
शाहबानो खटल्याचा निकाल फिरवणारे राजीव गांधी मला पण पटलेले नाहीत.त्यांनी ज्या अपवादात्मक राजकीय तडजॊडी केल्या त्यातील ही पण एक. पण तुमच्या विचाराशी सहमत.
रामजन्मभूमी स्थानाचे कुलुप उघडून तिथे हिंदूंना पूजापाठ करु देणारे प्रामाणिक?
त्यांनी ती राजकीय चूक केली एवढेच.पण त्यात त्यांनी राजकीय, वैयक्तिक कॊणता स्वार्थ साधून अप्रामाणिकपणा केला?

हुप्प्या's picture

18 Sep 2010 - 10:17 pm | हुप्प्या

>>
इंदिराजींच्या हत्येनंतर शिखांच्या कत्तली झाल्यावर "मोठे झाड पडल्यावर आसपासची झुडपेही मरतात" असे म्हणण्यासारखे
हे वाक्य कठॊर असेल, अपरीपक्व असेल, पण प्रामाणिक आहेच.ऎरवी बेरकी राजकारणी असे म्हणू शकणार नाही.आणि मूळात हे वाक्य नेत्यापेक्षा आई गमावलेल्या मुलाचे जास्त वाटते.
<<
काही शिखांनी इंदिराजीना मारले म्हणून तमाम जमातीला वेठीस धरणे, त्या लोकांच्या हत्या करणे आणि त्याचे समर्थन करणे हे योग्य आहे? प्रामाणिक आहे? अशा राजपरंपरेमुळे आजही त्या दंगली घडवून आणणार्‍या लोकांना शिक्षा होत नाही. उलट मानाची पाने मिळतात.
तसे तर दाउद इब्राहिमही म्हणत असेल की मी भारताचे वाट्टोळे करणार, तिथे बाँब फोडणार आणि तसे वागतोही आहे. म्हणून त्याचा प्रामाणिक म्हणून गौरव करायचा का? आपला न्याय मोठा अजब आहे.

>>
रामजन्मभूमी स्थानाचे कुलुप उघडून तिथे हिंदूंना पूजापाठ करु देणारे प्रामाणिक?
त्यांनी ती राजकीय चूक केली एवढेच.पण त्यात त्यांनी राजकीय, वैयक्तिक कॊणता स्वार्थ साधून अप्रामाणिकपणा केला?
<<
व्होटबँकेकरता आगीशी खेळ केला. हा स्वार्थीपणा आहे. थोड्या फायद्यासाठी दीर्घकाळ चिघळणारी जखम निर्माण करणे हा स्वार्थीपणा आहे. प्रामाणिकपणा नाही.

नितिन थत्ते's picture

18 Sep 2010 - 7:56 pm | नितिन थत्ते

जाऊद्या हो हुप्प्याजी....
'सामना'ला किती महत्त्व द्यायचं.

हुप्प्या's picture

18 Sep 2010 - 8:23 pm | हुप्प्या

त्या कुठल्याशा किरकोळ डॅनिश दैनिकात आदरणीय प्रेषिताचे अनादरणीय चित्र छापले म्हणून जगभर दंगली केल्याच ना? इथेतर भारताच्या भावी राजाच्या अपमानाचा प्रश्न आहे आणि तोही एका भारतीय दैनिकाकडून! ह्याकडे दुर्लक्ष करू म्हटले तरी केले जात नाही हो!

सुनील's picture

18 Sep 2010 - 8:32 pm | सुनील

हुप्प्याजी, राजानी माफ केलं हो बाळ्याला!

(आणिबाणीत नाही का राजाच्या आजीनी माफ केलं होत बाळ्याला? बाळ्या नाक घासत गेला होता तेव्हा?)

त्याना पाहिले कि ते खुप प्रामाणिक वाटतात.त्याच्या वडीलाना टेलिकॉम क्रांती आणली त्यामुळे राहुलला निदान झोपडीत जावुन भाकर खाता आली. आजीच्या विचारांशी तो प्रामाणिक आहे. त्याला देखिल पणजोबा,आजी,बाप व आई प्रमाणे भारतातील गरीबी हटवायची आहे.तसेच त्याचे भाचरे रेहान व इतर मंडळी देखिल गरीबी हटवायला सज्ज झाली आहेत.

राजेश घासकडवी's picture

18 Sep 2010 - 10:41 pm | राजेश घासकडवी

उत्तम चर्चा. चर्चाप्रस्तावकाने गेल्या चर्चेत अशोक चव्हाण, राऊत, भुजबळ व अर्थातच थोर विचारवंत सलमान खान यांच्यातलं वैचारिक द्वंद्व मिपाकरांसमोर मांडलं. आता त्या यादीत राहुल गांधी व सामना यांची भर घालून मिपावरील वैचारिक वातावरणात निश्चितच नवीन जान आणली आहे.

हुप्प्याजी, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमची दैदिप्यमान वैचारिक लेखनाची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो ही प्रार्थना.

हुप्प्या's picture

20 Sep 2010 - 10:03 am | हुप्प्या

कसचं कसचं मास्तर. आपणही आपल्या परीने मिसळपावमधे अशीच मोलाची तर्री... आपलं भर घालत जावा असा मनोमन आशिव्राद.

हुप्प्या's picture

20 Sep 2010 - 11:37 am | हुप्प्या

http://www.saamna.com/2010/September/20/Link/Main2.htm

नुकत्याच छापून आलेल्या वृत्तानुसार शाह्जादा राहुलबाबाने ओमार अब्दुल्ला ह्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली त्यामुळे काँग्रेसी नेते अस्वस्थ झाले. त्यांनी राजमाता सोनियाकडे तक्रार नेली. मग राहुलबाळ अपरिपक्व आहे त्याचे बोलणे मनावर घेऊ नका असे महान विचार त्यांनी मांडले. काय हा त्याग! किती ही महान माता! जणू आधुनिक जिजाऊच !

एकंदरीत राहुलबाळाच्या पादर्‍या पावट्यांवर हा खास घरचा त्रिफळा चूर्णाचा उतारा!
धन्य तो पावटा आणि धन्य तो त्रिफळा!

मास्तर आमची कारकीर्द आपल्या आशिव्रादाप्रमाणे वृध्दिंगत होत्ये ना?

इंटरनेटस्नेही's picture

20 Sep 2010 - 4:38 pm | इंटरनेटस्नेही

सामना हे अत्यंत विनोदी आणि बालीश वर्तमानपत्र आहे.

सुनील's picture

20 Sep 2010 - 4:42 pm | सुनील

अगदीच "बाळ"पत्र नै?