चला मित्रांनो, 'आयटीवाला नवरा' होऊ यात !!

सुहास..'s picture
सुहास.. in काथ्याकूट
16 Sep 2010 - 7:02 pm
गाभा: 

हेतु : सहज-गंमत-जम्मत ..कोणालाही दुखवण्याचा हेतु नाही.

" देखा है पहली बार साजन "....
कधी नव्हे ते ,माझ्या भ्रमणध्वनीवर, सदाशिव-पेठी, पर्‍याच्या फोन आलेला पाहुन,मी ,डॉन्याचा एकोळी प्रतिसाद बघुन जसा धम्या दचकतो,तसा दचकलो.फोन न घेण्यासारख दुसर काहीही कारण समोर न आल्याने मी फोन ऊचलला.तसेही आमच्या मोबाईलात ईनकमिंग फ्री असल्याने आम्ही सगळेच फोन उचलतो.(सध्या वोडाफोनच्या डायलर ट्युन्स प्रमोशनल कॉल्सनी झ्झीट्ट आणली आहे,ते देखील कन्नडात सुरु होतात, निव कर माडिद्रे का असल कायतरी ?). तर फोन ऊचलला (न घेऊन सांगतो कोणाला ? उद्या खरडवहीत " आर्थिक परिस्थितीने गाजुंन आपण आपला फोन गहाण ठेवला आहे काय? अश्या प्रकारची एखादी खवचट खरड आढळली की बाजार ऊठलाच म्हणुन समजा.)

" सुहास , अरे मी बोलतोय "
" हो हो मी पण बोलतोय "
" हो का ? मी चुकुन बोंबलतोय असे एकले"
पचका झाला.
" सदाशिवात किती वाजेपर्यंत येऊ शकतोस "
अचानकच, पर्‍याच्या आवाजात आलेल गांभीर्य लक्षात आल्याने, क्षणभर,वैचारिक धाग्यावर,विचारवंत जसे बाह्या सावरुन, तत्परतेने,कळफलक बडवायला निघतात,त्याच तत्परतेने,बाईकला किक मारुन, लगेच निघावसं वाटल.
पण..
" तासाभरात कावेरीत ये ,तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे ."
" ओके " (हा शब्द फार आवडतो आमच्या पिताश्रींना, 'ओके ' म्हटल्या-म्हटल्या,मग ते कशाच्याही संदर्भात असे ना, त्वरीत फोन ठेऊन टाकतात.)

आम्ही तासाभरात कावेरी-दरबारच्या दरवाज्याच्या जवळ असलेल्या वाहनतळावर आम्ही, आमची 'थंडरबर्ड' पार्क करत होतो(कोण रे तो म्हणतोय की ,आम्ही "आमच्याकडे 'थंडरबर्ड' आहे " अशी जाहीरात करतोय म्हणुन). शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला.

" कसला विचार करतोयस रामैय्या,आयमीन परररय्या ? "
" ............... "
" ? ??? "
" आधी बस तर खर !!"
" अरे पण ईतका गौतम गंभीर का झालायस ? "
" मला एक मुलगी पसंत पडली आहे आणी तिला मी "
" हे धत्तड-तत्तड धत्तड-तत्तड धत्तड-तत्तड "
" ऊड्या काय मारतोस भाड्या,पावसाळ्यातल्या बेडकासारखा '
गप खुर्चीत बसलो.
"तिची एक अट आहे , तिला आयटीवालाच नवरा पाहिजे " ('च' ह्या शब्दावर शभंर टन भार, मी द्विमुढ,कंपण्यात शिव्ही सारायला मित्रांची यादी आठवायला लागलो.)
" सर क्या लाऊं ? "
" एक रॉयल स्टॅग !! झेल लेंगे यार,(आपको भी तो झेल रहे है !! ) बघुयात की आपण जॉब "
" त्याची गरज नाही, मी तिला कन्व्हिंस केलय की मला ते शक्य नाही ,पण तिने कमीत-कमी आयटीवाल्यांसारख वाग अशी अट घातलीये "
तोंडाचा 'आ' वासुन, " मग "
" मला त्यांच्यासारखे वागायचेय,त्या करिता मला तुझ्याकडुन 'टीपा' हव्या आहेत."
" अरे मग कौल नाही का टाकायचा "
" मला काय स्वतासारखा, *** प्रेमी समजलास का ? "
" बर बाबा ! सांगतो !"(खर तर मनात खुष झालो होतो, कधीतरी पर्‍याला आमच्या टीपांची गरज पडली होती,निधर्मीक लोकांच्या धाग्यावर धार्मिक मंडळीना किंवा धार्मिक धाग्यावर निधर्मीक लोकांना जसे अर्धवट अंगुली-धुमारे सुटतात, तसे मला विचार-धुमारे सुटायला लागले.)

"सर्वात पहिले , एक रिकामं कार्ड-सॉकेट विकत घे,त्याला निळी,पिवळी,हिरवी किंवा काळी रिबीन घाल,त्या रिबीनीवर कसलीतरी विंग्रजीत (झिजलेली असली तरी) अक्षरे असली पाहिजेत, एक छानसा,पाढंर्‍या शुभ्र शर्टात,काळा टाय घालुन ,चालु फॅशनचा चष्मा चढवुन, एक फोटो काढुन घे.प्लास्टीक प्रिंटेड कार्ड मिळाल तर ठीक नाहीतर नाव पत्ता असलेल,कागदी कार्ड घे,आणी त्यात घाल.

ते कार्ड फक्त दोनच ठिकाणी असल पाहिजे,एक तर तुझ्या गळ्याभोवती किंवा मग घरातल्या खूंटीवर, मग तु कोठेही असला तरी चालेल,बाईकवर,पिएमटीत,मित्रांबरोबर,पार्टीला,मॉलमध्ये,बाजारात,तुळशीबागेत,केळकर वस्तुसंग्रहालयात,देशी दारु दुकानाच्या बाहेर किंवा मग सार्वजनीक मुतारीत, फक्त तु सायबर कॅफेतल्या संगणकासमोर बसलेला असताना घालायच नाही, टेबलावर काढुन ठेवायच.

तेच कार्ड घालुन ,मुद्दामुन मित्रांच्या किंवा स्नेह्यांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात जायच,जरा अंमळ ऊशीर करायचा आणी कोणी कारण विचारले की तोंडावर 'ब्रॅड पिट'चा भाव आणुन " अरे, एक क्रिटीकल 'ईश्श्यु 'आला होता ,"(ईश्श्युच म्हणायच बर का ? प्रॉब्लेम म्हणालास तर पोरदेखील ओळखेल की तु आयटीवाला नाहीस ते) "अरे,कॉलवर होतो "(ईथे क्लांईट हा शब्द वापरायचा नाही.) ," अरे, बग फिक्स करत होतो " किंवा मग " कॅब-मिटीग होती रे " ,अशी वाक्ये चारचौघांत मोठ्या आवाजात बोलायची,समोरचा गांगरुन गेला तर त्याला गांगुलीछाप स्माईल द्यायची, आख्ख्या कार्यक्रमात, आपली कंपनी किती भिकार आहे, आमच्या कामाची किमंत करत नाही,मॅनेजरपेक्षा आपल्यालाच टेक्नीकल नॉलेज जास्त आहे,आयटीतल्या मुली किती फॉरवर्ड झाल्यात वगैरै विषयावर चर्चा करायची.

दुसरे म्हणजे सिगरेट प्यायला सुरुवात कर,पण अट अशी आहे की त्या सिगारेटची किंमत 'पाच रुपयांपेक्षा' जास्त असली पाहिजे आणी बाहेर निघताना आख्खा वीस सिगरेट असलेलं पाकिटच घ्यायच,बाळगायच.आपण किती परफेक्ट आहोत हे दाखविण्याकरता'माचिस' खिशात बाळगलीच पाहिजे.लाईटर असेल तर ऊत्तम, पण तो दहा-वीस रुपड्यांना मिळणारा नव्हे, मग भलेही तुला त्यात गॅस भरायला, पुण्याचा दुसर्या टोकावर जावे लागले तरी चालेल,चकचकीत असेल तर मग जबराच.

साधी राहणी ऊच्च विचार हा सुविचार फक्त कपड्यांपुरताच वापरायचास, सगळ्या दिवशी फक्त आणी फक्त फॉर्मल्स कपडेच घालायचे,एक वेळ पन्नास-एक खिशे असलेली,थोडीशी घुडघ्याच्या खाली आलेली,अर्धचड्डी चालेल (कुठल्या खिशात काय आहे हे लक्षात राहिल नाही तर अजुनच छान !!)'जॉन प्लेयर्स,ला-कोस्ट,काल्विन क्लेंन या कंपन्यांशिवाय दुसर्‍या कंपन्यांना सदरे बनविता येत नाहीत असा ठाम विश्वास ठेवायचा.मंडईतल्या भाज्या खायच्या नाहीत,भाज्या फक्त 'रिलायन्स फ्रेश'मध्येच स्वस्त मिळतात असा आपण स्वता फेरीवाल्याकडुन विकत आणलेली भाजी खात-खात घरी येणार्‍या पाहुण्याला सुनवायच.

कॅफेत संगणकासमोर बसलेला असताना संगणकाशिवाय दुसरीकडे बघणे म्हणजे पाप आहे,त्यात जर कानात हेडसेट घातलेला असेल तर दुग्धशर्करा योग,शिवाय संगणक हा कंपनीने आपल्याला काम करायला दिलेला नसतो,दिवसभर,चेहर्‍यावर 'अर्जुन रामपालचा" मख्ख भाव आणुन,सोशल नेटवर्कींग साईटवर,आपल्या वेगवेगळ्या आयडीने, कधी गेम्स खेळणे,ऊगाच यु-ट्युब वा न्युज साईटवरच्या लिंका,ईकडे तिकडे पेस्ट करणे,आपल्याला आलेले तद्दन भिकार व रटाळ ई-पत्रे ईतरांना पाठवुन त्यांचा मेल बॉक्स फुल्ल करण्याचे पवित्र कार्य करणे किंवा मग काही कळत नसल तरी ऊगाच ऑनलाईन शेयर ट्रेंडीग साईट वर जाऊन टंगळ-मंगळ करणे,हे सर्व आलेच पाहिजे.

आता ईतर काही महत्त्वाचे " स्वयंपाक आलाच पाहिजे ", चार मित्रांत बसल्यावर ,एखादी गहन चर्चा चालु असेल तर आपल्याकडुन येणार्‍या प्रत्येक मुद्दयाच्या पहिल्याच वाक्यात 'मी ऑनसाईटला असताना' हे शब्द आलेच पाहिजेत.शिवाय चारचौंघात पिताना, बियर माईल्ड,व्हिस्की हाय-फाय,व्होडका ज्युस टाकुन,रम भरपुर आईस आणी थम्स टाकुनच प्यावी आणी तीही फक्त दोनच पेग (एकांतात पिऊन,गटारात पडुन,टाकीभरुन ऊलट्या केल्यास तरी चालेल)"

" अरे बस-बस "
" अरे पर्‍या, हे तर काहीच नाही. गरज नसताना,वेगवेगळ्या बॅकेतुन,पर्सनल लोन्स घेणे चालु ठेवावे. होमलोन तर हवेच शिवाय कार-लोनही घ्यावे, मग तुझी कंपनी चालत जायच्या अंतरावर का असेना.मोबाईल ब्लॅकबेरीच असावा मग भलेही तो चायना मेड का असेना .........................................

अचानक, पर्‍या मला समोरच्या खुर्चीतुन,एखाद्या हिन्दी चित्रपटातल्या सीन सारखा ढीश्श-करुन 'गायब झालेला स्पष्टपणे दिसला........

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

16 Sep 2010 - 7:15 pm | धमाल मुलगा

क ह र!

अवांतरः कळताहेंत बरं टोमणें! ;)

स्वप्निल..'s picture

16 Sep 2010 - 8:20 pm | स्वप्निल..

क ह र!

श्रावण मोडक's picture

16 Sep 2010 - 8:36 pm | श्रावण मोडक

न कळून करतो काय? पऱ्याच्या नावाखाली तुझाही बाजार उठवला सुहासनं.
एका दगडात किती पक्षी रे, सुहास?
बाकी लेखन छानच. खुमासदार. अजून येऊ द्या अशी कल्पनारम्यता!

संदीप चित्रे's picture

18 Sep 2010 - 12:33 am | संदीप चित्रे

बेष्ट रे सुहास !

हाहाहाहाहाहाहाहाहाहा..........

झकास !

छोटा डॉन's picture

16 Sep 2010 - 7:29 pm | छोटा डॉन

अरे काय रे सुहाश्या ?
एवढा बाजार का म्हणुन उठवला ...

च्यायला परवाच्या कट्ट्याचे बील तुला भरायला लावले म्हणुन असा बदला ?
बाकी लेख एकदम कडक !!!

छान रंगात आणलेली गोष्ट एकदम संपवल्यासारखी वाटली.
असो, तुम्हा आयटीवाल्यांना वेळ तरी कसा असणार म्हणा (हापिसात कामं, शिवाय घरी स्वयंपाक)!;)

छान रंगात आणलेली गोष्ट एकदम संपवल्यासारखी वाटली

सहमत.
लेख खूप आवडला. मस्त आहे :)

प्रसन्न केसकर's picture

16 Sep 2010 - 7:31 pm | प्रसन्न केसकर

आधी थोडे दिवस मित्रांबरोबर बोलताना प्रोजेक्ट संपत आलाय अशी हवा करायची. मग हळुच गायब व्हायचं. सायटींवर अस्सल आयडीनं लॉगीन करायचं नाही (डुप्लीकेट आयडी चालते.) मग थोडे दिवस गेले की एखादी डुप्लीकेट आय डी वापरुन धागा काढायचा परा कुठे आहे, किंवा पराच अमुक अमुक आहे म्हणुन. मग परत ओरीजिनल आयडीनं अवतीर्ण व्हायचं अन धागालेखन्-प्रतिसादकांवर `रेशन' घ्यायचं. तेव्हा जाहीत करायचं की सध्या मी बेंचवर आहे म्हणुन.

अन अजुन एक राहिलं:

अधुन्-मधुन दोन चार दिवस साईटींवरुन गायब व्हायचं. मग थोडावेळ अवतीर्ण होऊन पुडी सोडायची की सध्या इथं इथं ऑनसाईट आहे. (जागेचं नांव असं सांगायचं की तिथं ओळखीचं कुणीच नसेल.) मग पुढचे पंधरा दिवस एक एक करत धागे सोडायचे - इथे थंडी फार आहे स्वतःचं संरक्षण कसं करु, इथे भांडी नाहीत स्वयंपाक्-बिंपाक कसा करु - असे. आपोआप सगळ्यांचा तुम्ही आयटीवाले असल्यावर विश्वास बसतो.

धमाल मुलगा's picture

16 Sep 2010 - 9:15 pm | धमाल मुलगा

हाण्ण हाण्ण तिच्यायला!!!

काय खंडेनवमी कालच झाली की काय? =))

श्रावण मोडक's picture

16 Sep 2010 - 9:26 pm | श्रावण मोडक

+१

गणेशा's picture

16 Sep 2010 - 7:34 pm | गणेशा

खुप आवडले सगळे . विषेशता

//*
शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला.
*//

हे जबरी आहे .. पहिल्यांदाच असे वाचले आहे.

चिंतामणराव's picture

17 Sep 2010 - 10:46 am | चिंतामणराव

//*
शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला.
*//

छानच शब्दचित्र. लिहा लिहा अजुन लिहा

ऋषिकेश's picture

16 Sep 2010 - 7:39 pm | ऋषिकेश

अरे सुहाश्या!!!!!!!! मारशील ना एके दिवशी
स्वतःच हसून मरेन किंवा हाफीसातले हाकलतील!!!
=))
=)) =))

लय भारी!!!

-(ऐटीतला आपलं.... आयटीतला) ऋ

सूड's picture

16 Sep 2010 - 7:43 pm | सूड

शुचि's picture

16 Sep 2010 - 7:48 pm | शुचि

अ-प्र-ति-म नीरीक्षण!!!!! मी वाचलं हसत बसले. मग ३ दा चूकीचं संकेताक्षर दिलं या हसण्यात आणि माझा संगणक लॉक झाला.
_______________
माझे काही मुद्दे -
(१) मीटींगमधे हजेरी लावता आली पाहीजे. एक ना एक अतिउत्साही बकरा असतोच. जो बडबड करून गाडं पुढे नेत असतो. आपल्याला मधेमधे फक्त संमती दर्शवता आली पाहीजे.
(२) मुख्य म्हणजे कलाकारी!!! सिस्टीम इन्टीग्रेशन चे क्रिप्टीक आणि अर्धवट डायग्रॅम्स बनवता आले पाहीजेत, ज्यांचा उपयोग मीटींगमधे लोकांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देणं हा आणि हाच असतो. लोकं फक्त आ वासून ते डायग्रॅम्स उकलू पहातात आणि तुमचा हेतू साध्य होतो.
(३)मीटींगमधे कोणत्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देऊ नका मात्र एखाद्या "गीक" ने काही उत्तर दिलं तर ताबडतोब त्याच्या हो मधे हो मिळवा.

शानबा५१२'s picture

16 Sep 2010 - 7:51 pm | शानबा५१२

" ओके " (हा शब्द फार आवडतो आमच्या पिताश्रींना, 'ओके ' म्हटल्या-म्हटल्या,मग ते कशाच्याही संदर्भात असे ना, त्वरीत फोन ठेऊन टाकतात.)

हाहाहा

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Sep 2010 - 7:59 pm | llपुण्याचे पेशवेll

हाहाहाहा.. खल्लास. मी पण हा लेख वाचून अंमळ अदॄष्य झालो. अजून एक चेहर्‍यावर कायम मुजोरीचा भाव पाहीजे. :)

मदनबाण's picture

16 Sep 2010 - 8:18 pm | मदनबाण

छान लेख... ;)

(सध्या खरोखरचं बेंचवर असलेला)

बेसनलाडू's picture

16 Sep 2010 - 8:28 pm | बेसनलाडू

वाचून मजा आली.
(सॉफ्टवेअर अभियंता)बेसनलाडू

प्रभो's picture

16 Sep 2010 - 8:29 pm | प्रभो

=)) =)) =)) =))

टिंग्याचा हल्कटश्री किताब काढून तुला द्यावा का रे????

मी-सौरभ's picture

16 Sep 2010 - 11:40 pm | मी-सौरभ

'महा. आय. टी. हल्कटश्री' असा द्या की...

पन हे आय टि काय भानगड हाय बॉ आमि कय टिआयटि केलेल नाय (माफ करा टायपो झाला) टि *च्या जागि ति ?ल्ह्याय्चा व्हता....

पारुबाई's picture

16 Sep 2010 - 8:53 pm | पारुबाई

सही रे सही

मस्त खुमासदार लेखन.

मृत्युन्जय's picture

16 Sep 2010 - 9:14 pm | मृत्युन्जय

सहा चेंडुंवर ७ षटकार ठोकलेय सुहासराव.

आयटी, आयटी वाइफ, स्वयंपाक, सदाशिव पेठ, परा, निरीश्वरवाद आणी बोनस चेंडु असावा तसे चोता दोन सगळे एकाच लेखात कवर केलेत तुम्ही.

कुसुमिता१२३'s picture

16 Sep 2010 - 9:22 pm | कुसुमिता१२३

मस्त लिहिलय~

कुसुमिता१२३'s picture

16 Sep 2010 - 9:22 pm | कुसुमिता१२३

मस्त लिहिलय~

प्रीत-मोहर's picture

16 Sep 2010 - 9:32 pm | प्रीत-मोहर

हहपुवा....मला बॉस ओरडला,,,एवढी हसले,,,,,

आय्टीवाली प्रीमो....:)

मस्त कलंदर's picture

16 Sep 2010 - 9:35 pm | मस्त कलंदर

अगदी फर्मास, खुसखुशीत लेखन!!!
बाकी, एक कळत नाही.. असले लेख लिहायला लोकांना बकरा म्हणून 'परा'च बरा सापडतो!!!!
http://www.misalpav.com/node/8893
http://www.misalpav.com/node/8906
http://www.misalpav.com/node/8917

परा, नक्की प्रॉब्लेम काय रे तुझा??

छोटा डॉन's picture

16 Sep 2010 - 9:38 pm | छोटा डॉन

>>परा, नक्की प्रॉब्लेम काय रे तुझा??
हम्म्म्, प्रॉब्लेम पराचा नसुन खुद्द पराच प्रॉब्लेम असावा असे वाटते.
पुण्यात आल्यावर मी जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालुन संबंधितांना कानपिचक्या देईन ...

- ( डागदर ) छोटा डॉन

मस्त कलंदर's picture

16 Sep 2010 - 10:13 pm | मस्त कलंदर

>>>खुद्द पराच प्रॉब्लेम असावा असे वाटते.
(तिसरा डोळा नावाच्या भंपक मालिकेतल्या कर्णिक बाईंची कॉपी करत) मलाही असंच वाटतंय..

बाकी इतरांचे कान काय पिचकवताय? आधी आपली 'केस' सांभाळा!!!

श्रावण मोडक's picture

16 Sep 2010 - 9:50 pm | श्रावण मोडक

बकरा कोण? ऑं? पऱ्याला बकरा म्हणतीस? त्या लेखमालेचे पुढचे लेखन त्वरेने चालू करावे लागेल आम्हा इतरांना.
;)

मस्त कलंदर's picture

16 Sep 2010 - 10:09 pm | मस्त कलंदर

हो.. तो असा दोनवेळा दोनलोकांच्या तावडीत सापडला म्हणून.

बाकी, मी आताच पुन्हा एकदा तिन्ही भाग वाचून काढले. आणि तेव्हा नवीन होते, म्हणून उगीच स्वत:च स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद कसा काय द्यायचा म्हणून कुणालाही उपप्रतिसाद न देण्याचा उर्मटपणा म्हणा किंवा पाशवीपणा, तिथे मी दाखवलाय असे वाटलं मला!!!!

श्रावण मोडक's picture

16 Sep 2010 - 11:01 pm | श्रावण मोडक

माझे प्रश्न तीन आहेत. सोयीस्कर उत्तरं नकोत. ती मालिका पुढं लिहावी लागेलच आम्हा इतरांना आता.

निखिल देशपांडे's picture

16 Sep 2010 - 9:52 pm | निखिल देशपांडे

मस्त रे सुहाश्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खपले!

जिवंत झाले की सविस्तर प्रतिक्रिया देईन!

अनामिक's picture

16 Sep 2010 - 10:20 pm | अनामिक

ज ह ब ह रा !!!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2010 - 10:29 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच!!!

दाद's picture

16 Sep 2010 - 10:38 pm | दाद

मस्त लेखन ! पऱ्याला मस्त कापलाय ! बरोबर सगळ्या आयटीवाल्यना पण!

चिरोटा's picture

16 Sep 2010 - 10:45 pm | चिरोटा

हा हा. मस्तच रे सुहास. शुक्रवारी फक्त वीटलेली जीन्स,रीबॉक्/नायकी शुजआणि कंपनीचा लोगो असलेला टी-शर्ट घालायचा हे सांगायला विसरलास!

चिगो's picture

16 Sep 2010 - 11:41 pm | चिगो

झ्याक लिहीलंय.. बाकी आमी त्या गावचे नाय, म्हुन जास्त बोलत नाय.

राजेश घासकडवी's picture

17 Sep 2010 - 1:06 am | राजेश घासकडवी

मस्त खुसखुशीत शंकरपाळे आणि कुरकुरीत चकल्या खाल्ल्याचा आनंद मिळाला.

पुष्करिणी's picture

17 Sep 2010 - 1:08 am | पुष्करिणी

मस्तच, मजा आली.

स्वाती२'s picture

17 Sep 2010 - 2:21 am | स्वाती२

मस्त!

सहज's picture

17 Sep 2010 - 5:59 am | सहज

पुन्हा एकदा आयटी संमेलन भरलं वाटतं. पराची पुन्हा एकदा मंडळाचा मानद अध्यक्ष म्हणुन निवड केली गेलेली दिसते. सेक्रेटरी सुहास.

चालू द्या. सध्या बिझी आहे लेख वाचीन नंतर. तूर्तास वर्गणी आपलं प्रतिसाद घ्या.

कडक लेख !! :-)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2010 - 8:39 am | llपुण्याचे पेशवेll

अरे पण या ष्टॉरीचा हीरो कथेचा नायक परा कुठे आहे?

विवेक मोडक's picture

17 Sep 2010 - 9:04 am | विवेक मोडक

आय टी म्हणजे काय?

sneharani's picture

17 Sep 2010 - 10:16 am | sneharani

मस्त लेख.!

विजुभाऊ's picture

17 Sep 2010 - 11:37 am | विजुभाऊ

आयटी वाले नवरे शनीवारी घरी सकाळी सकाळी लायब्ररीत जातात. एखादे पाचशे पानी बाड आणतात. आणि मग सगळा दिवसभर लोळत घालवतात.
रवीवारी त्यांचे हापिसातलेच मित्र भेटणार असतात. तीन तीन कटिंग चहा पीत ट्रेकिंगच्या फक्त गप्पा मरतात. वगैरे वगैरे. हे पण ल्ही ना रे भौ.

आयटी वाले नवरे शनीवारी घरी सकाळी सकाळी लायब्ररीत जातात. एखादे पाचशे पानी बाड आणतात. आणि मग सगळा दिवसभर लोळत घालवतात.

???
कुठल्या देशात ?
शनिवारी सकाळी उठणे, लायब्ररीत जाणे, पुस्तक आणणे .... छ्या छ्या छ्या, काय पण कल्पनाविलास !

रवीवारी त्यांचे हापिसातलेच मित्र भेटणार असतात. तीन तीन कटिंग चहा पीत ट्रेकिंगच्या फक्त गप्पा मरतात. वगैरे वगैरे. हे पण ल्ही ना रे भौ.

रविवार, मित्र आणि चहा ?

विजुभाऊ, मुकाट्यांनी तुम्ही स्वतःच आता "मी आयटीतला नाही" हे कबुल करुन टाका बरं. ;)

- छोटा डॉन

विजुभाऊ, मुकाट्यांनी तुम्ही स्वतःच आता "मी आयटीतला नाही" हे कबुल करुन टाका बरं.
अरे आयटी तला नवरा. तो देखील चांगला सीझन्ड.
अनमॅरीड आयटीवाला वेगळाच असतो. तो पक्का पांडुरंग सांगवीकर + चांगदेव पाटील असतो.
( आता पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव पाटील म्हणजे कोण हे विचारून आपले नेमाडपंथीय अज्ञान प्रकट करू नकोस )

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 12:58 pm | धमाल मुलगा

>>अनमॅरीड आयटीवाला वेगळाच असतो. तो पक्का पांडुरंग सांगवीकर + चांगदेव पाटील असतो.
विजुभाऊ, ऊदाहरणार्थ वगैरे, तुमचे विचार थोरच आहेत.

आम्हीतरी अनम्यारिड आयटीवाला असताना विलासी मुघल बादशहापेक्षा कमी नव्हतो बॉ. ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Sep 2010 - 1:02 pm | ब्रिटिश टिंग्या

हे तुमचं वैयक्तिक मत आहे!

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 1:13 pm | धमाल मुलगा

मिश्टर पांडुरंग सांगवीकर,
खुलाशाबद्दल धन्यवाद.

आता जिथं तिथं कोसू नका. ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Sep 2010 - 4:00 pm | ब्रिटिश टिंग्या

>>आता जिथं तिथं कोसू नका.
वाचलेले प्रतिसाद आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

स्पंदना's picture

17 Sep 2010 - 11:39 am | स्पंदना

ओ आणि एक राहिल ना?
कुठेही गप्पा मारताना फोन वाजला की लगेच अ‍ॅक्सेंट बदलुन इंग्लिश बोलायच्..यास फ्यास यास फ्यास.
अहो शिष्य तयार करायचा तर असा की बायकोला सुद्धा भ्रम झाला पाहिजे.

लेखण 'परिस्थीती चित्रण' म्हणुन अवर्णनिय!

अवांतर्-आणि म्हणे आम्ही हल्लि रसाळ लिहिण सोडलय.

अवलिया's picture

17 Sep 2010 - 12:07 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Sep 2010 - 12:11 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ.....काही मापं एक्दम क्वालिटी :)

विजुभाऊ's picture

17 Sep 2010 - 12:29 pm | विजुभाऊ

हे आले आणखी एक आयटी तले नवरे ( नवरा = गुजराथी भाषेत रीकामटेकडा)

चिंतामणी's picture

17 Sep 2010 - 12:38 pm | चिंतामणी

हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
+१११११११११११११११११
हहपुवा

घाटावरचे भट's picture

17 Sep 2010 - 3:04 pm | घाटावरचे भट

वाहवा!!!

प्राजक्ता पवार's picture

17 Sep 2010 - 3:48 pm | प्राजक्ता पवार

मस्तच :)

रश्मि दाते's picture

17 Sep 2010 - 4:24 pm | रश्मि दाते

मस्तच जमलाय लेख्

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 4:50 pm | नितिन थत्ते

भारी खुसखुशीत लेख.

मजा आली वाचून.

(आयटीतला नॉन आयटी)

चतुरंग's picture

17 Sep 2010 - 8:22 pm | चतुरंग

लै जणांचा बाजार उठवला सुहासनं! ;)
बरेच जबरा पंचेस! ;)

चतुरंग नॉनायटी

रामदास's picture

17 Sep 2010 - 8:48 pm | रामदास

आय टी वाल्यांची संभाषण कानावर येत असतात.
एक कॉमन पॉईंट ऐकला तो असा की या सगळ्या मुलांना एचआरच्या मुली फार चमत्कारीक वाटतात पण आवडतातही.
तुमच्या ऐकण्यात असं कधी आलं आहे का ?

ऐकण्यातच नाहि .. पाहण्यात ही आले आहे
एच्.आर ... सदाबहार

संदीप चित्रे's picture

18 Sep 2010 - 12:44 am | संदीप चित्रे

हे पण लिही रे मित्रा...
म्हणजे असं की साधं कुठल्या रेस्टॉरंटमधे जेवायला जायचं हे ठरवायलाही चार-पाच जणांना कॉन्फरन्स कॉलवर घ्यायचं आणि मग चर्चेचं गुर्‍हाळ वाढवत नेऊन एक दोन विषयांबद्दल तरी कॉलवरच्या कुणाला तरी म्हणायचं की लेट'स टेक इट ऑफ लाईन !

शुचि's picture

18 Sep 2010 - 1:45 am | शुचि

सह्ही!!!! =)) =))
हे " लेट'स टेक इट ऑफ लाईन !" भारी प्रकरण असतं =))
ह** पा** सगळ्याला आपलं लेट'स टेक इट ऑफ लाईन !

चतुरंग's picture

18 Sep 2010 - 1:48 am | चतुरंग

ऑफलाईनच बरं ना पण! ;)

अथांग's picture

18 Sep 2010 - 1:01 am | अथांग

'खुसखुशीत' आहे हो लेख. आवडला.

चतुरंग's picture

18 Sep 2010 - 1:04 am | चतुरंग

युनुवर्सिटी (हा शब्द असाच लिहितात ;) ) ऑफ विस्काँन्सिन किंवा फ्लोरीडा स्टेट युनुवर्सिटी असे लिहिलेला एखादा रंग उडालेला टी शर्ट (भले तिकडे शिकत असलेल्या एखाद्या भाचा पुतण्याने का पाठवलेला असेना? ;) ) कायम घालत रहायचा म्हणजे मग लोक चोरुन त्याकडे बघत राहतात आणि तुमची हवा होते, निदान नवख्यांसमोर तरी! ;)

(युनुवर्सिटी ऑफ मिपाचा)चतुरंग

इंटरनेटस्नेही's picture

18 Sep 2010 - 1:57 am | इंटरनेटस्नेही

अतिशय खुमासदार लेख. माननीय श्री परिकथेतील राजकुमार यांच्या वर लिहिलेल्या लेखात आमच्या सारख्या पामराचा सुरवातीलाच आलेला ***प्रेमी असा उल्लेख पाहुन डोळे पाणावले.

सुंदर!

(पुर्वीचा इंटरनेटप्रेमी)

चिंतामणी's picture

18 Sep 2010 - 11:38 am | चिंतामणी

महाशय,

तुमच्या अमुल्य प्रतीसादाची वाट बघत आहे.

अवतरा आता.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Sep 2010 - 11:24 am | llपुण्याचे पेशवेll

अरे हा परा कुठे गायबला आहे? का गणेशोत्सवात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पर्‍याला आत टाकलाय?

मृत्युन्जय's picture

21 Sep 2010 - 12:15 pm | मृत्युन्जय

का पोलिसांच्या जीवावर उठताय राव?

अर्धवटराव's picture

24 Sep 2010 - 9:27 pm | अर्धवटराव

लाल केली आय टी वाल्यांची...

(आय टी वाला) अर्धवटराव

च्यायला आयटी नवरा होणे म्हणजे वाटाणे लावण्याच्या गोष्टी करण्यासारखे आहे...

चला म्हणजे मी पण त्याच वाटेवर आहे तर.. ;)

प्यारे१'s picture

5 Jul 2012 - 5:23 pm | प्यारे१

आयला वाश्या,

कोमेडी पन ल्हितोस व्हय? म्या म्हनलं नुस्ती ट्रॅजेडी आस्तीय तुज्याकड...
लय भारी हाय ह्यो!

मस्तच रे ! ;)

श्रावण मोडक's picture

5 Jul 2012 - 5:54 pm | श्रावण मोडक

कोमेडी पन ल्हितोस व्हय?

सूत-भूत सिद्धांत लागू होतो. इलाज नाही. :-)
लेख पुन्हा वाचला. मजा आली.

पर्‍या कबूल झाला काय मग?

" आयटि वाल्यांसारख वाग " ही अट त्याला सुधरवण्यासाठी घातली असेल तर?

बघाव तेव्हा पिक्चरं बघत बसतो आणि इथं येऊन लोकाना श्टोर्‍या सांगत बसतो
त्यापेक्षा थोड आयटिवाल्यांसारख वाग अस म्हटलं तर काय बिघडलं.?

आणि मित्राने एवढ्या आपूलकिने सजेशन विचारलं तर इतकेहि जिवघेने टोमने
आयटिवाल्यना मारण्याची काय गरज?

पर्‍या तु का गेला सुहासला विचारायला?

हुश्श ... :P

हवांतर :- लेख सॉलिड्.....इतक उशिर झालाय तरि वाचल्याविना रहावल नाहि ..भारी शब्द वापरलेत कीप इट अप सुहास .....

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2012 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते

मना लगीन कराव पायजे, आयटीवाला नवरा पायजे!!!!! ;)

पैसा's picture

5 Jul 2012 - 6:11 pm | पैसा

पुन्हा आवडला!