गाभा:
राम राम,
बर्याच दिसापासून या एका अप्रतिम गाण्यावर काही रसग्रहणात्मक लिहायचा विचार आहे.. गेले अनेक दिस हे गाणं मनी घर करून राहिलं आहे..
परंतु तत्पूर्वी,
'मेरे मौला करम हो करम...'
या त्या गाण्यातील पहिल्याच ओळीचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बरं होईल..'करम हो करम' म्हणजे काय?
त्याचप्रमाणे या गाण्यातील 'बेकसो को सहारा मिले..' या ओळीतल्या 'बेकसो को..' या शब्दाचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बर होईल..
उत्तराच्या प्रतिक्षेत..
(चांगल्या चांगल्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकणारा) तात्या.
प्रतिक्रिया
14 Sep 2010 - 2:32 pm | हंस
तात्या...
"करम" म्हणजे कॄपा आणि "बेकसो" म्हणजे कदाचित बेबस म्हणजे असहाय असा अर्थ असावा.
14 Sep 2010 - 2:42 pm | टग्या टवाळ
छान आहे गाण मला तर आज ईद असल्या सारख वाट्ल आणि अर्थाच म्हणाल तर सुगावा लागताच आपणास सांगु.
14 Sep 2010 - 2:51 pm | चिंतामणराव
बेकस म्हण़जे दुर्दॅवी....आणि करम म्हणजे क्रुपाच
"बेकसपे करम कीजिये, सरकारे मदिना......"
14 Sep 2010 - 2:56 pm | विसोबा खेचर
खाकी नावाच्या चित्रपटात या गाण्याचा फार सुंदर उपयोग केला आहे. येथे पाहाता येईल..
परंतु हे गाणं ज्या मूळ उर्दू गाण्यावरून घेतलं आहे ते गाणं इथं ऐकता येईल.. त्यातला तर एकही शब्द समजत नाही.. परंतु सूर मात्र अस्वस्थ करतात..
धनंजयासारख्या भाषापंडिताने वा अन्य कुणी जाणकाराने मूळ उर्दू गाण्याचा अर्थ जरी संपूर्ण उलगडून सांगितला तरीदेखील मी आभारी राहीन..
(सुफी प्रेमी) तात्या.
14 Sep 2010 - 10:14 pm | धनंजय
उर्दूचा फारसा अभ्यास नाही :-(
पण घरी उर्दू-मराठी शब्दकोश आहे :-)
गाण्याचे सुर छानच आहेत. मिश्र रागांबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद.
14 Sep 2010 - 10:18 pm | विसोबा खेचर
हरकत नाही.. शब्दकोशात पाहून कधी सवडीने अवश्य लिहा या गाण्याच्या अर्थाबद्दल.. उत्सुकता आहे..
तात्या.
14 Sep 2010 - 2:57 pm | विसोबा खेचर
चिंतामणराव आणि हंस चे आभार..
तात्या.
14 Sep 2010 - 3:08 pm | JAGOMOHANPYARE
परंतु सूर मात्र अस्वस्थ करतात..
पिलू रागाचे सूर आहेत ना?
14 Sep 2010 - 3:28 pm | विसोबा खेचर
मिश्र स्वर आहेत..
कोमल गंधार खास 'पिलू'तला आहे.. परंतु किरवाणी, पटदीपचेही काही रंग आहेत..
कॉम्पोझिशन जबराच आहे!
(गाण्यातला) तात्या.
14 Sep 2010 - 4:19 pm | अवलिया
गल्ली चुकली का विसोबा ?
अक्षरं, त्यांचे बनणारे शब्द, त्यांचे अर्थ, अर्थाचा अनर्थ असल्या चर्चा मिपावर कधीपासुन तुम्ही टाकायला लागलात?
मनात येईल ते लिहुन टाकायचे, शब्द केवळ भारवाहक, मनातले विचार ते खरे असा तुमचा खाक्या ना?
मग हे भलते डोहाळे कसे लागले? अजुनही वेळ गेलेली नाही ! सुधरा !!
:)
बाकी अर्थाबद्दल तज्ज्ञ लोक सांगतीलच काय ते ! आपली तेवढी कुवत नव्हती, नाही, नसेल.
14 Sep 2010 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll
नान्या कैच्या कै लिहीतोस काय रे? अरे बोळा निघाला की लोकं सुधारतात. :)
14 Sep 2010 - 4:35 pm | अवलिया
काय सांगतोस ? मला वाटले गणेशोत्सवाच्या उन्मादात तात्या निधर्मी झाल्यामुळे नेटके लिहिण्याचा सराव करत असेल
14 Sep 2010 - 4:45 pm | प्रदीप
सरकारे मदिना, गर्दीश मे है तक़दीर, भंवर मे है सकिना'
नौशाद व लता ह्यांनी दिलेले हे अप्रतिम गाणे इथे ऐका व पहा
बेक़स : असहाय्य
करम : दया
14 Sep 2010 - 9:26 pm | सुनील
दिलेले अर्थ बरोबर वाटतात.
15 Sep 2010 - 2:30 am | पाषाणभेद
अर्थ योग्य वाटतात.