मदत हवी आहे

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in काथ्याकूट
14 Sep 2010 - 6:17 am
गाभा: 

माझ्याकडे जुन्या दुर्मीळ अशा गाण्यांच्या / संगीताच्या सुमारे दोनशे कॅसेटस आहेत. माझ्याकडील कॅसेट प्लेअर शेवटच्या घटका मोजतो आहे. आता कॅसेट प्लेअर दुरुस्त करुन मिळणेही अवघड होत चालल्याने मला (अत्यंत नाईलाजाने व मनाविरुद्ध) या कॅसेटस सीडी / एमपी ३-४-५ या स्वरुपात बदलून घेणे आवश्यक झाले आहे. अशी सेवा प्रदान करणारा एखादा व्यावसायिक पुण्यात असल्यास जाणकारांनी कृपया कळवावे.
धन्यवाद.
(या माहितीबद्दल माहिती देणार्‍यास / देणारीस एक कप कॉफीबरोबर 'हुस्न हाजिर है' आणि 'दिल ढूंढता है' या गाण्याच्या मदनमोहन यांनी बांधलेल्या पाच वेगवेगळ्या चाली, मदनमोहन यांच्या आवाजातले 'नैना बरसे हे गाणे', 'झनक झनक पायल बाजे' हा अमीरखांसाहेबांचा अडाणा, तलतच्या आवाजातले 'यश हे अमृत झाले' हे 'पुत्र व्हावा ऐसा' मधले गाणे आणि हरीप्रसाद चौरासिया आणि पन्नालाल घोष यांची स्वतंत्र शैलीतली भटीयाळी धून यातले काहीही (किंवा सर्व) फर्माईशीनुसार ऐकवण्यात येईल.)

प्रतिक्रिया

प्राजु's picture

14 Sep 2010 - 6:22 am | प्राजु

मी पहाते चौकशी करून आणि कळवते. :)

सल्ला - ज्या कुणाकडून आपण ही सेवा घ्याल त्या व्यक्ती/ कंपनीला एकदम २०० कॅसेटी देऊ नयेत. प्रथम १०/२० नेहमी बाजारात उपलब्ध अशा द्याव्या. त्या व्यवस्थित रुपांतरीत झाल्या तरच टप्प्याटप्प्यानी इतर देत जाव्या.

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2010 - 6:46 am | मुक्तसुनीत

आणि एम्पी३-४-५ कुठेतरी अपलोड करून येथे लिंक्स द्याव्यात :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Sep 2010 - 11:27 am | बिपिन कार्यकर्ते

त्यापेक्षा, एखादी पुरूषांची मंगळागौर आयोजित करून हा खजिना असलेल्या सीडीज वाण म्हणून वाटा. ;)

रावसाहेब, एम्पी३ कन्व्हर्शन सोपे आहे. बाहेर जायची गरज नाही. उगाचच खूप खर्च येईल. पराने अगदी योग्य मार्ग दाखवला आहेच.

सन्जोप राव's picture

14 Sep 2010 - 7:56 pm | सन्जोप राव

नेकी और पूछ पूछ?

गांधीवादी's picture

14 Sep 2010 - 7:09 am | गांधीवादी

आपल्याकडे संगणक असेलच, एक चांगला कॅसेट palyer साधारण ८००-१००० रु. ला विकत मिळेल. त्याचा ouput आणि तुमच्या संगणकाच्या sound कार्ड मधील LINE IN पोर्टचा उपयोग करून (MIKE IN पोर्ट वापरू नका.) तुम्ही घरबसल्याच mp3 तयार करू शकाल. माझ्या मते ते सुरक्षित राहील. एक दिवसाला अंदाजे जरी आपण १० कॅसेटी करू शकता.

जास्त माहितीसाठी :
http://www.andybrain.com/archive/convert-cassette-to-cd-digital.htm

खुपसे softwares उपलब्ध आहेत, कोणतेही वापरा,
तुम्ही स्वतः convert केलेत तर तेच उत्तम राहील. (एकद्या सोम्या गोम्याच्या नादी लागून वायरस चा ताप नको व्ह्यायला.)
अजून काही मदत लागली तर नक्की कळवा.

अ‍ॅंमॅझॉन डॉट कॉम वर उपलब्ध असलेले Ion Audio USB Portable Tape-to-MP3 Player हे उपकरण मागवून घ्या, कायम स्वरूपाचा converter तुमच्या घरीच राहील (शिवाय अशीच सोय इतरांना उपलब्ध करून देता येईल :-)), २५०० रुपयांपेक्षा कमी बाजारात कुठे तुमच्या दुर्मिळ गाण्यांचं conversion खात्रीशीर करून मिळेल असं वाटत नाही.

कंप्यूटर वापरून घरी स्वतःच करणार असाल तर वर गांधीवादींनी सांगितल्याप्रमाणे सॉफ्ट्वेअर वापरता येईल. या दुव्यावर आधिक माहिती आहे, ऑडॅसिटी हे सॉफ्ट्वेअर sourceforge.net येथे मिळेल.

सन्जोपराव हे सॉफ्टवेअर बघाल का? -
http://www.digitope.com/cassette-to-cd-and-mp3/default.aspx
हे असच नेटवर ठेवलय , कोणीही घेऊ शकतं.
बहुतेक व्हायरस फ्री आहे.
तुम्हाला आता फक्त डबल एन्डेड वायर (कनेक्टर) लागेल. एक एन्ड कॅसेट प्लेयर ला आणि दुसरा कॉप्युटर्/लॅपटॉप ला.
cNET या नामांकीत साईट वर digitope कंपनीचा उल्लेख आहे. मला वाटतं ही बरी कंपनी असावी.

कुठला व्हायरस फ्री आहे म्हणे? तसे सगळे व्हायरस 'फ्री'च असतात. ;)

शानबा५१२'s picture

14 Sep 2010 - 8:26 pm | शानबा५१२

जॉक लय भारी बनवतुस!

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2010 - 7:30 am | राजेश घासकडवी

एके ठिकाणी मी विचारलं होतं त्याची त्यांनी प्रत्येक कॅसेटला ६० ते ७० रुपये किंमत सांगितली. ते मला खूप महाग वाटलं. त्यापेक्षा कोणी गरजू विद्यार्थी कदाचित 1/४ किमतीत तुमच्या घरी करून देईल असं वाटतं. कारण रेकॉर्ड करण्यासाठी जरी बराच वेळ लागत असला तरी प्रत्यक्ष काम कॅसेटमागे फारतर पंधरा वीस मिनिटांचंच असतं. रेकॉर्डिंग सोपं असतं, त्यातल्या गाण्यांना नावं, लेबलं देणं हे किचकट प्रकरण आहे.
त्याही आधी तुमच्याकडे असलेल्या कॅसेटपैकी किती गाणी अगोदरच मप३ मध्ये अस्तित्वात आहेत हे तपासून पाहिलं तर खर्च व वेळही वाचू शकेल.

सन्जोप राव's picture

14 Sep 2010 - 8:04 pm | सन्जोप राव

त्याही आधी तुमच्याकडे असलेल्या कॅसेटपैकी किती गाणी अगोदरच मप३ मध्ये अस्तित्वात आहेत हे तपासून पाहिलं तर खर्च व वेळही वाचू शकेल.
तेही खरंच आहे म्हणा...

जवळपासच्या एखाद्या फोटो स्टुडियोमध्ये चौकशी करावी.
आम्ही मध्यंतरी माझ्या मामांच्या गाण्यांची cassette अशीच CDमध्ये convert केली घराजवळच.
स्थळ : काका हलवाईच्या शेजारी,पुणे-सातारा रोड, हॉटेल पंचमीजवळ

वारकरि रशियात's picture

14 Sep 2010 - 11:08 am | वारकरि रशियात

संजोपराव,

तुम्ही उल्लेख केलेल्या सर्वांच्या सी.डी. तयार करून पाठवून देणार असाल तर सांगेन ! (ह.घ्या !)
बरोबर एक वर्षापूर्वी (शुक्रवार ०४.०९.२००९) याच स्वरुपाची मदत मी येथे मागितली होती ! त्या माहितीने तुमचेही काम होईल. "औडिओ कसेट्स मधील ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प (!)" या माझ्या काथ्याकुटाचा दुवा देता येत नाहीये. (पुन्हा मदत हवी आहे !)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2010 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2010 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार

अहो एकदम सोपे आहे हो.
तुम्हाला फक्त MusicMatch Jukebox हे सॉफ्टवेअर डाउनलोड करुन घ्यावे लागेल.

त्यानंतर खाली दिलेल्या दुव्यानुसार ४/५ सिंपल स्टेप्स मध्ये तुम्ही तुमचे काम सहजरीत्या करु शकाल. ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला टेस्ट फाईल बनवुन बघायची देखील सोय आहे.

http://reviews.cnet.com/4520-6450_7-5020866-1.html

ऑडासिटी, विंडोज मुव्हीमेकर वापरुन देखील आपल्याला MP3 बनवता येतील.

आमचा सल्ला उपयोगी पडल्यास गाण्यांच्या ऐवजी शिवसेनेवर एक लेख लिहावा ;)

चिंतातुर जंतू's picture

14 Sep 2010 - 11:37 am | चिंतातुर जंतू

पुण्यात नळ स्टॉपजवळ अशी सुविधा उपलब्ध आहे. 'बार्स अ‍ॅन्ड टोन्स' असं नाव आहे. पत्ता:

Bars and Tone Television Pvt. Ltd. 2/10 Erandawana Shiv-Ganga Apartment. Near Paalande Couriers, Off Karve Road, Opp. SNDT College. Pune 411004. Phone +91 20 25444750 Email: vppatil@vsnl.com
किंमत माहीत नाही.

घरच्याघरी हेच काम करण्यासाठी एक साधा पण नामी उपाय म्हणजे आजकाल कॅसेट/सीडी आणि USB (पेन ड्राईव्ह) ज्यात वापरता येतात असे रेकॉर्डर/प्लेअर मिळतात. त्यांची किंमत मॉडेलमधल्या इतर सोयींनुसार ठरते. संगीताची उपकरणं विकणार्‍या कोणत्याही दुकानात हे मिळतात. सोनीपासून चिनी बनावटीचे वगैरे बरेच पर्याय आहेत. यांतून कॅसेटवरून पेन ड्राईव्हवर रेकॉर्ड करता येतं. नंतर त्याची सी.डी. करणं हे फार सोपं असतं. अर्थात, हे २०० कॅसेटचं करायचं तर वेळ घालवावा लागेल.

ही तयारी असेल तर PHILIPS च एक Tape recorder मिळतो A-21857 Model no.
त्याला USB मधे पेन drive लावा आणि cassete लावा ...MP3 file तयार होते.

त्याची बॅटरी मिळत नाही आहे. ती कशी उपलब्द होऊ शकेल?

शुचि's picture

14 Sep 2010 - 5:51 pm | शुचि

हा का? - http://www.bestbuy.com/site/Sony+-+Walkman+Cassette+Player+with+Digital+... player&contract_desc=null

AA बॅटरी नाही मिळत का भारतात?

दत्ता काळे's picture

14 Sep 2010 - 6:56 pm | दत्ता काळे

फ्रेंडस् म्युझिक सेंटर
( डिजीटल ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडीओ )
१५२६, सदाशिव पेठ, पेरुगेट रस्ता (टिळक स्मारक मंदिरासमोरुन पेरुगेटकडे जाणारा रस्ता )
'दुर्गा नॉनव्हेज ( हॉटेल )' समोर
पुणे : ४११ ०३०.

ह्या स्टुडिओचे मालक श्री. हर्षवर्धन केतकर हे माझे मित्र आहेत आणि ऑडीओ रेकॉर्डींग विषयातले उत्तम जाणकार आहेत.

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 7:21 pm | धमाल मुलगा

हायल्ला!
सह्हीच हो दत्ताकाका.
च्यायला, मी सक्काळपासुन आठवतोय नाव, पण काही केल्या आठवत नव्हतं. (तरी बरं, वर्षभर ह्या फ्रेंड्स म्युझिकच्या डोक्यावरच रहात होतो.)

सन्जोप राव's picture

14 Sep 2010 - 7:21 pm | सन्जोप राव

मदत देऊ करणार्‍या सर्वांचे आभार.