२६/११ आणि सलमानची माफी

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
13 Sep 2010 - 7:51 am
गाभा: 

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100...

सलमान खानने असे विधान केले होते की २६/११ चा हल्ला हा पंचतारांकित हॉटेलांवरही झाला त्यामुळे त्याचा जास्त गाजावाजा झाला. त्या आधी अनेक हल्ले झाले, बाँब फुटले पण त्याला इतकी प्रसिध्दी मिळाली नाही.

काही प्रमाणात हे नक्कीच खरे आहे. विशेषतः मेणबत्ती मोर्चा वगैरे प्रकार हे ह्या हल्ल्यानंतरच झाले आणि सनाजाच्या उच्चवर्तुळातील लोक ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे कारण की त्यांचा वावर असलेली ठिकाणे ह्या हल्ल्याकरता निवडली गेली.

मुंबईच्या स्टेशनावरील हल्ल्ला हा ही २६/११ चा भाग होता पण तो एका रात्रीच्या काही तासांपुरताच. बाकी भागातला हल्ला (ओबेरॉय, ताज, ज्यूइश सेंटर) कितीतरी दिवस चालू होता. त्यामुळेही ह्या पंचतारांकित स्थळे जास्त अधोरेखित झाली.

ह्या हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा थेट सहभाग नव्हता. (अर्थात नंतरच्या तपासात फारसे सहकार्यही नव्हते.) आपली सुरक्षायंत्रणा कमी पडली. अशी विधाने सलमानने केली आहेत आणि ती मलातरी पटतात.

मी काही सलमान खानचा फॅन नाही. पण इथे त्याचे काही चुकले नाही. त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते.

तुमचे काय मत?

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

13 Sep 2010 - 8:27 am | गांधीवादी

'सरकारला सामान्य जनतेच्या जीवाच्या काळजीपेक्षा काही काही पांढर्या कातड्यांची काळजी जास्त आहे', असे काही मत देण्याअगोदर मला पंचतारांकित हॉटेल्स, विमानतळे, संसद (जिथे केवळ धनाड्य लोकांचा वावर असतो) आणि लोकल, रल्वे / बस स्थानके, चौक, बेकरी, (जिथे सर्व साधारण लोकांचा वावर असतो ) यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत किती बदल घडला आहे हे जाणून घेणे महत्वाचे वाटते.

>>मी काही सलमान खानचा फॅन नाही. पण इथे त्याचे काही चुकले नाही. त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते.
सहमत, खरेतर हि त्याचीच प्रतिक्रिया नसून सर्व सामान्य माणसांत देखील अशीच काही भावना आहे. त्याने फक्त ती चव्हाट्यावर मांडली एवढेच त्याचे पाप.

>>मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सलमानच्या वक्तव्यांबाबत खेद व्यक्त केला.
खेद, निषेध, कडक निषेध, अति तीव्र निषेध खलिते व्यक्त करणे ह्यापलीकडे अजून काय केलं आहे का ?

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2010 - 8:28 am | राजेश घासकडवी

त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते.

१००% सहमत. आजकाल हे अशोक चव्हाण, राऊत, भुजबळ वगैरेंसारखे विचारवंत फार सोकावले आहेत. कोणालाही कशाहीबद्दल माफी मागायला लावतात. सलमानसारख्या मान्यवर विचारवंताला, केवळ विरुद्ध बाजूचा म्हणून माफी मागायला लावणं ही कंपूबाजी झाली. पण हे करून 'सलमान भारताचं वैचारिक प्रतिनिधित्व करायला लायक आहे' या आम्हाला असलेल्या शंकेला दुजोरा दिला हे चांगलंच केलं.

याच स्वरात आम्ही हेही म्हणून घेतो की या धाग्याइतका मौलिक धागा आत्तापर्यंत पाहिला नव्हता. हुप्प्याजी, मिसळपावचं वैचारिक प्रतिनिधित्व तुम्हालाच.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Sep 2010 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार

सलमानसारख्या मान्यवर विचारवंताला, केवळ विरुद्ध बाजूचा म्हणून माफी मागायला लावणं ही कंपूबाजी झाली.

वाह गुर्जी ! माझ्या मनातले बोललात अगदी.

हेच एखादा हिंदु बोलला असता तर सगळ्यांनी "वाह वाह" केली असती. पण आमचा सल्लु पडला 'खान' आणि त्यात आधीच बिचार्‍याचे नाव कानफाट्या पडले आहे ना.

असो...

अविनाशकुलकर्णी's picture

13 Sep 2010 - 9:43 am | अविनाशकुलकर्णी

राज ठाकरे यांनीही सलमानच्या वक्तव्यास पाठिंबा दिला आहे......
दबंग सिनेमा साठी सारे चालले आहे....शहारुखने अमेरिकेत नाटक केले याने काय घोडा मारला?
व्यक्ति व अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अतिरेक होत आहे...आवरा...नाहितर याचे हि काश्मिर होईल

बॉलीवूड मध्ये अनेकवेळा सिनेमे रिलीज व्ह्यायच्या वेळीच, वादग्रस्त होतील अशी विधाने देणे, खळबळ माजवून झालेल्या फुकटच्या पब्लिसिटीचा फायदा सिनेमासाठी करून घेणे, असले प्रकार काही नविन नाहीत. सिनेमा रिलीज होण्याअगोदर, त्या सिनेमात काम करणार्‍या सर्वांवर, सामाजिक विषयावर बोलण्यास बंदी करावी म्हणजे हे असले प्रकार थांबतील.

एक अनामी's picture

13 Sep 2010 - 9:03 pm | एक अनामी

"त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते."
याच्याशी १००% सहमत...
कानफाट्या नाव पडलय ना सलमानच म्हणूनच माफी वैगेरे घडलं...
याएवजी आमीर खानने ही गोष्ट बोलली असती तर कदाचित कमी गहजब झाला असता...

"सिनेमा रिलीज होण्याअगोदर, त्या सिनेमात काम करणार्‍या सर्वांवर, सामाजिक विषयावर बोलण्यास बंदी करावी म्हणजे हे असले प्रकार थांबतील."
ह्याला काही अर्थ नाही... सिनेमात काम करणारे काय आपले स्वातंत्र्य गमावतात की काय...?
आणि काही मंडळी त्यानिमीत्ताने का होइना काहीतरी संवेदनशील बोलतात तरी...

बजरबट्टु's picture

13 Sep 2010 - 11:01 pm | बजरबट्टु

अहो पण सामान्य लोकांची काळजी असणार्‍या सलमानने आपल्या भरधाव कारच्या खाली मुक्ती दिली ते कोण होते???

याला खरोखर सामान्य लोकांचा कळवळा आहे का???

हा भंपक पब्लीसिटी स्टंट आहे..बाकी काही नाही

प्रियाली's picture

13 Sep 2010 - 11:41 pm | प्रियाली

भरधाव गाडीखाली चिरडलेल्यांचे आणि त्या निष्पाप काळविटांचे काय झाले अशी आठवण डोक्यात आली हे वाचून. असो.

अन्या दातार's picture

16 Sep 2010 - 12:37 am | अन्या दातार

हा अजून एक दुवा वाचनात आला. यातील मुद्दाही विचारात घेण्याजोगा आहे असे मला वाटते.

"http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/whose-man-i..."