नमस्कार मंडळी,
गणपा शेट बरोबर ग-बोल वर गप्पा करताना टंकन-गल्लती मुळे एक विनोद झाला. त्यावरुन आधीच्या काळचे काही झालेले ग-बोल वरचे गैरसमज आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
कधी कंप्युटर च्या प्रॉब्लेम्स मुळे, कधी घाईगडबडीत टंकण्यामुळे आपण कै च्या कैच बोलुन्/टंकुन जातो, पण परिणाम नेहमीच विनोदी असतील असे नाही ना, ;)
*************************************************************
एकदा मला माझी जुनी मैत्रीण फब वर भेटली. तिच्याशी १-२ वेळा फॉर्मल बोलणं झालं. मग असंच एका दिवशी..
मी: Hi. How r u?
ती: I am fine..
आता मला लिहायचं होतं की "Hows your Daughtar""
पण माझा कीबोर्ड गंड्ला आणि
मी: Hows our Daughtar?
झालं का? तिचं उत्तर नाही.. बराच वेळं.. मग मला कळालं की मी "Y" टाईपच केला नाहिये..
----------------------------------------------------------------------------------
माझी मैत्रीणः pls cum here.
मी: ( आता हापिसात कुठे *** करु?)
----------------------------------------------------------------------------------
असंच एक...
---मी: Dont worry about it.. take it easy (असं लिहायचं होतं.. पण उंदीर खुपच सेंसीटीव अस्ल्याने)
मी: Dont take it easy worry about it.. असं झालं.. मग झालच ना.. आमचे ३ तास टेलीकॉम च्या कर्मचार्यांचे पगार वाढवत होते.. ;)
:(
प्रतिक्रिया
9 Sep 2010 - 3:29 pm | अवलिया
हा हा हा
यावरुन आमच्या एका जुन्या मित्राची एक गंमत आठवली.
लै लै फटके खाल्ल्यावर तो सांगत होता की तो एस (इंग्रजी) टाईप करायलाच विसरला होता... असे ऐकले आहे :)
9 Sep 2010 - 9:00 pm | मस्त कलंदर
तो किस्सा तर सॉलीड होता.. मलाही हाच किस्सा आठवला होता..
बाकी, तो तुझा मित्र होता हे नव्हते ब्वॉ माहित!!!!!!
दुसरा किस्सा:
एका मिपावरच्याच मित्राशी चॅट करत होते.. आणि गमती गमतीत त्याच्या लग्नासंबंधी मी त्याला छळायला लागले.. आणि तो ही गंमतीत ती अशी हवी, तशी हवी, तिने हुंड्यात अमकं आणावं आणि ढमकं आणावं असे फेकत होता. लिहिता लिहिता अचानक त्याने 'ti' ऐवजी 'tu' लिहिले..
मी विचारले, "मेल्या.... हा टायपो आहे की आणखी काय???"
तो पण तिकडं घाबरला.. आणि "नाही गं माझे आई.. टायपो गं टायपो टायपो!!!" असे सांगता सांगता त्याची पुरेवाट झाली!!!!
9 Sep 2010 - 4:07 pm | अरुण मनोहर
एकदा फेसबुक चॅटवर एकाने मला लिहीले-
नमस्कार काक
मी लगेच टंकले-
काव काव
9 Sep 2010 - 4:39 pm | चिरोटा
चॅटवर-
मित्र- कुठे भेटायचे आज?
मी- SEZ झोन च्या बाहेर असे लिहायचे होते. कीबोर्डवर x आणि z बाजुबाजुला असल्याने चुकुन z ऐवजी X लिहिला.
9 Sep 2010 - 6:24 pm | योगी९००
माझ्या एका मित्राच्या बाबतीत असे झाले होते.
ऑफिस मध्ये एका मुलीला कामासाठी त्याच्या डेस्कवर बोलवताना "can you come here for a sec" या वाक्यात sec टंकताना c ऐवजी x (बाजू बा़जूलाच आहेत) असे लिहीले होते...आणि ती बया त्याच्या डेस्कवर येताना जाम घाबरली होती..जेव्हा त्याला नंतर कळले की असा घोळ(?) झाला तेव्हा त्याने १० वेळा माफी मागीतली होती.
आता तो मित्र "can you come here for a minute"असे लिहीतो.
आता दुसर्या मित्राची गंमत
चॅटवर-
मैत्रिण : are you getting bored?
मित्र: Not at all
पण हे उत्तर (Not at all)जेव्हा मित्र लिहीत होता ..त्यावेळी त्याच्या मैत्रिणीने आणखी एक प्रश्न विचारला होता ..त्यामुळे त्याची चॅट अशी झाली..
मैत्रिण : are you getting bored?
मैत्रिण : are you really interested in me?
मित्र: Not at all
मैत्रिण logged out
9 Sep 2010 - 5:01 pm | कानडाऊ योगेशु
एका कंपनीत नुकताच जॉईन झालो होतो सोबत पाँडेचरीची एक मुलगीही जॉईन झाली होती.
एच.आर पाँडेचरीला सारखे सारखे पाँडी पाँडी असे संबोधत होती आणि आम्हाला आमचे हसु कसे दाबावे हे कळत नव्हते.
9 Sep 2010 - 10:59 pm | निवेदिता-ताई
हा हा हा ..........लय भारी .....किस्से मस्त.
10 Sep 2010 - 9:11 am | शामलभाटे
एकदा ओर्कुट वर एक मित्राने मला Hello म्हंटले
मी पण लगेच टाइप केले 'hell ' ( o टाइप करायचा राहिलाच )
मित्राने लगेच signout केले. जरा मला खडसावले असते तर मीही मोकळेपणाने सॉरी म्हंटले असते.
पण तो एवढा रागवला की ओर्कुट मधील अकाउंट पण delet केले त्याने.
10 Sep 2010 - 9:23 am | विलासराव
एकदा ओर्कुट वर एक मित्राने मला Hello म्हंटले
पण तो एवढा रागवला की ओर्कुट मधील अकाउंट पण delet केले त्याने.
अशा लोकांना खरच मित्र म्हणता येईल काय?
10 Sep 2010 - 9:33 am | शामलभाटे
म्हणून तर मी पण फोन करून स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडले नाही.
गेला उडत!!!
10 Sep 2010 - 11:12 am | राजेश घासकडवी
मी तुमचं नाव शाम लभाटे असं वाचलं, त्यामुळे भानगडीत पडले नाही हा टायपो वाटला... :)
11 Sep 2010 - 12:34 am | मी-सौरभ
तुमचा 'टायपो' च्या ऐवजी 'रीडो' झालाय की... :)