कच्छी दाबेली

भानस's picture
भानस in पाककृती
8 Sep 2010 - 7:37 am

वाढणी : चार माणसांकरिता ( प्रत्येकी दोन या अंदाजाने...... करताना दीडपट प्रमाणाने करा बरं का, म्हणजे कमी का केलीची भुणभूण होणार नाही )

साहित्य :

चार मध्यम-मोठे बटाटे उकडून + कुस्करून

एक मोठा कांदा बारीक चिरून

एका मोठ्या डाळिंबाचे दाणे
( डाळिंब न मिळाल्यास लाल/काळी द्राक्षे मध्ये चिरून घ्यावी.
तीही नसतील तर मनुका घ्याव्यात. )

चिंचगुळाची चटणी एक वाटी

मूठभर कोथिंबीर चिरून

बारीक शेव वरून भुरभुरायला

चवीनुसार मीठ

पाच चमचे कच्छी दाबेली मसाला

चार/पाच चमचे बटर/तूप ( वितळवलेले )

मसाला शेंगदाणे एक मोठी वाटी भरून

दोन वाट्या पाणी

आठ पाव ( आपल्याकडचे बेकरीतले पाव असतील तर अजूनच मस्त )
( किमान आठ हवेतच. शक्यतो दोन लाद्या आणाव्यात. )

तयारी

कृती:

चिंचगुळाची चटणी :

दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )

मसाला शेंगदाणे करताना......

दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )

शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून वरीलप्रमाणेच उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.

कच्छी दाबेली

मसाला बनविताना :

उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून/किसून घ्यावे. एका पसरट पातेल्यात तीन चमचे तूप टाकावे. गरम झाले की लगेच कुस्करलेले बटाटे, मीठ व दोन वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवावे. एक वाफ आली की कच्छी दाबेली मसाला घालून हालवावे. मिश्रण कोरडे होते आहे असे वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालावे. पुन्हा पाच मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे.

सगळे साहित्य तयार झाल्यानंतर पाव मधून कापून त्याचे दोन भाग करावेत. तव्यावर दोन चमचे बटर टाकून सगळे पाव खालून वरून शेकून घ्यावेत. नंतर लगेचच एकेका पावाच्या तळच्या भागावर बटाट्याचा मसाला पसरावा. ( दोन चमचे तरी हवाच. आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घ्यावे ) त्यावर मसाला शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर व शेव घालावी. पावाच्या वरच्या भागावरही हलकासा बटाट्याच्या मसाल्याचा थर लावून चिंचगुळाची चटणी घालून तळच्या भागावर किंचितसे दाबून ठेवावे व गरम गरमच खायला द्यावे.

टीपा :
कच्छी दाबेली तसा वेळखाऊ पदार्थ मुळीच नाही. तयार मसाला शेंगदाणे, एखादा दिवस आधी चिंचगुळाची चटणी तयार करून ठेवली तर अक्षरशः: अर्ध्या तासात काम तमाम होऊ शकेल.
कच्छी दाबेलीचा तयार मसालाच वापरावा. मी टिट-बिट कंपनीचा दाबेली मसाला वापरला आहे. बर्‍याच कंपन्यांनाचा मिळतो पण त्यातल्या त्यात हा जास्त छान वाटला. खाताना पावही गरम हवेत व आतला बटाट्याचा मसालाही गरम हवा, त्यामुळे अजूनच मजा येते.
कच्छी दाबेली अतिरेक तिखट नसते. खट्टामीठा व थोडा तिखा अशी लागायला हवी.

लहान-मोठ्या मुलांच्या पार्टीसाठी हिट व पोटभरीचा पदार्थ. :)

प्रतिक्रिया

वा! धन्यवाद.
कित्येक दिवसात बघायलाही मिळाली नव्हती.
बघू, खायचा योग कधी येतोय ते

गणपतीत रात्री जागरणात जमलेल्या पाहुण्यान साठी करण्याचा विचार करतोय

सविता's picture

8 Sep 2010 - 9:50 am | सविता

छान

मदनबाण's picture

8 Sep 2010 - 10:05 am | मदनबाण

यम यम... :)
यातले मसाला शेंगदाणे मला फार आवडतात... :)
काही ठिकाणी डाळिंबाचे दाण्या ऐवजी चेरीचे तुकडे किंवा अननसाचे छोटुले तुकडेपण टाकलेले पाहिले आहेत. :)

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2010 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या !!
काय शॉल्लेट दिसतीये फोटुत.

जागु's picture

8 Sep 2010 - 11:24 am | जागु

मस्तच.

निवेदिता-ताई's picture

8 Sep 2010 - 12:04 pm | निवेदिता-ताई

काय मस्त दिसतेय .........दे इकड पाठ्वून..........फस्त करते.

संजयशिवाजीरावगडगे's picture

12 Sep 2010 - 1:24 pm | संजयशिवाजीरावगडगे

काय मस्त दिसतेय .........दे इकड पाठ्वून..........फस्त करते. छान !!

स्वातीदेव's picture

8 Sep 2010 - 12:27 pm | स्वातीदेव

मस्तच!! मी शोधतच होते पाककृती.
बर पुर्वी तो सिद्धी मसाला यायचा ना. अजुन मिळतो का तो?
सध्या पुण्यात कुठला चांगला मसाला मिळेल?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2010 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

सध्या पुण्यात कुठला चांगला मसाला मिळेल?

हे फोन केला की हवा तो मसाला घरपोच आणुन देतात आणि चांगला मसाला कुठला हे पण सांगतात ;)

http://pune.justdial.com/garam-masala-manufacturers_Pune.html

मितान's picture

8 Sep 2010 - 12:38 pm | मितान

तोंडाला पाणी सुटले !!!
पण तो दाबेली मसाला कसा करायचा ?
सांगा लवकर..

स्वाती दिनेश's picture

8 Sep 2010 - 12:44 pm | स्वाती दिनेश

छान दिसते आहे कच्छी दाबेली.
मी ही भारतातून येताना नेहमी दाबेली मसाला,मसाला शेंगदाणे घेऊन येते.आता तुझ्या पध्दतीने मसाला शेंगदाणे करुन पाहिन. मी कांदाही बारीक चिरुन,बटरवर परतून घेते आणि बाकीच्या मिश्रणात घालते. येथे आल्यावर मग मसाला संपेपर्यंत ३,४ दा तरी दाबेलीचा बेत होतो.
स्वाती

स्वातीतै, दाबेली मसाला कसा करायचा ते शोधून दे !

विलासराव's picture

8 Sep 2010 - 3:33 pm | विलासराव

करु शकत नाही. फोटो पाहुन तर खावीशी वाटतेय.
संध्याकाळी जातो बाहेर खायला.

अवांतर: हे बर नाही ओ... पाकॄ तुम्ही टाकणार ,खिशाला फोडणी आमच्या बसणार.असो.

अरुंधती's picture

8 Sep 2010 - 4:04 pm | अरुंधती

फोटो पाहून तोंडाला जाम पाणी सुटले आहे!!!
सही कृती आणि रसरशीत फोटोज!!! :-) आता करुन बघणार नक्की!

मितान, मला दाभेली मसाला पावडरच्या तरला दलाल ने दिलेल्या कृतीची ही लिंक सापडली : दाभेली मसाला पावडर रेसिपी : तरला दलाल

मितान's picture

8 Sep 2010 - 5:07 pm | मितान

सोपी रेसिपी आहे ही ! नक्की करेन :)
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद :)

मेघवेडा's picture

8 Sep 2010 - 4:09 pm | मेघवेडा

हा आमच्यासारख्या एकट्या राहणार्‍या ब्याचलर मंडळींवर अन्याव है..

स्वाती२'s picture

8 Sep 2010 - 5:00 pm | स्वाती२

व्वा! या शनिवार चा बेत पक्का!
अरु, दाभेली मसाला लिंक साठी धन्यु ग!

रेवती's picture

8 Sep 2010 - 5:50 pm | रेवती

उद्याचा बेत ठरला!
फोटू खल्लास!
मसाला शेंगदाणे करण्याची पद्धत छानच! (मला माहीत नव्हती.)
मी आधी 'सिद्धी' मसाला वापरायचे पण 'कपोल' नावाचा मसालाही छान आहे.
भारतातून येताना दोन पाकिटे तरी आणते.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2010 - 8:00 pm | प्रकाश घाटपांडे

हा कच्छ प्रांतातील पदार्थ आहे म्हणुन कच्छी दाबेली असे नाव आहे काय?

भानस's picture

8 Sep 2010 - 8:28 pm | भानस

Pain, कुक, सविता, मदनबाण, परिकथेतील राजकुमार, जागु, निवेदिता-ताई, स्वातीदेव, मितान, स्वाती दिनेश, विलासराव, स्वाती२, अरुधंती, रेवती सगळ्यांचे आभार.

मदनबाण, बरेचदा डाळिंब उपलब्ध होत नाही. अशावेळी लाल द्राक्षे किंवा अननसाचे छोटे तुकडे वापरता येतात.
Pain, इथेही बाहेर कुठेही दाबेली मिळत नसल्याने लहर आली की गेलो आणि खाल्ली असं करता येतच नाही. :( तुमचा खायचा योग लवकर येवो. :)
निवेदिता, खरेच असे जालावरुन उचलून खाता/पाठवता आले असते तर किती मज्जा झाली असती. पण...
स्वाती, अगं मीही भारतातून येताना टिट-बिटची तीनचार पाकिटे घेऊन येतेच. इथेही काही कंपन्यांचे मसाले मिळतात पण ती मजा येत नाही.
विलासराव, अर्रर्रर्रर्र... असं झालं का? माफी. तरीही चैन आहे बरं तुमची. खिशाला चाट बसली तरी निदान आयतीमायती खायला मिळतेयं... स्वाती, रेवती खरं ना? :)
मेघवेडा, माफी द्या राव.
अरुंधती, नक्की करून पाहा. सगळ्यांना आवडेल यात शंकाच नाही. :)
रेवती, अगं इथे ना खारे शेंगदाणे चांगले मिळत ना मसाला शेंगदाणे. इंडियन स्टोअर मधल्या मसाला शेंगदाण्यांना तर हमखास खवट वास येतो. त्यामुळे घरी केलेलेच बरे. आणि होतातही मस्त. खारे शेंगदाणेही झटपट व अगदी सेम टू सेम होतात. टाकेन कृती त्याची.

मितान, हा मसाला मी घरी करत नाही. परंतु त्यातले साहित्य मला माहीत आहे. ते मी देते इथे.
साखर, लाल मिरची, डेसिकेटेड कोकोनट पावडर, मीठ, आमचूर, लवंग, जिरे, लिंबू(सायट्रिक अ‍ॅसिड) व हींग. ( मोठ्या प्रमाणात मसाला बनवून ठेवायचा झाल्यास नेमक्या प्रमाणाबद्दल थोडी शंका असल्याने त्याची खात्री करून तुला सांगते. )

विलासराव's picture

9 Sep 2010 - 9:23 pm | विलासराव

विलासराव, अर्रर्रर्रर्र... असं झालं का? माफी. तरीही चैन आहे बरं तुमची. खिशाला चाट बसली तरी निदान आयतीमायती खायला मिळतेयं.

माफी कसली ओ. अहो तुमच्यामुळे निदान बाहेर जाउन खायला तरी मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.

प्रियाली's picture

8 Sep 2010 - 8:51 pm | प्रियाली

मी गेल्यावेळी दाबेली मसाला आणून दाबेली केली होती पण मग तो घरात आहे हे विसरले. ;) आता पुन्हा करून पाहिले पाहिजे.

मसाला शेंगदाण्याची कृती आवडली पण शेंगदाणे उकडल्यावर साले काढायची का? की सालांसकट घ्यायचे?

बायदवे, मला फोटोच दिसत नाहीत. इतरांना कसे काय दिसले?

प्राजु's picture

8 Sep 2010 - 9:52 pm | प्राजु

खल्लास फोटू!!
आता होईलच हा प्रयोग...

मसाला शेंगदाण्याची पाकृ सह्हीच आहे. माहीती नव्हती मलाही. धन्यु गं.

चतुरंग's picture

8 Sep 2010 - 9:56 pm | चतुरंग

कृती सुद्धा झांटामॅटिक. मसाला दाणेही घरीच केले आहेत हे उत्तम.
ते मॅकडीचे बर्गर बिर्गर गेले सगळे त्या तिकडे...जरा हे देशी बर्गर बघा म्हणावं बाजार उठेल बाजार!!!

(कच्छी दाबेलीचा चाहता)चतुरंग

भानस's picture

9 Sep 2010 - 9:15 pm | भानस

प्रकाश घाटपांडे, काय की... मलाही खूप वर्षांपूर्वी हा प्रश्न पडला होताच. कदाचित असेच कोणीतरी एका पदार्थातून दुसरा शोधताना ही जन्माला आली असेल. :)

अगं प्रियाली, शेंगदाण्याचे साल मुळी काढायचेच नाही. उकडून जेव्हां आपण भाजतो नं तेव्हां अगदी शेवटी शेवटी काही साले आपोआपच निघून जातात. मायक्रोव्हेव मध्ये तीन मिनीटे उकडले की पुरेसे होते.

प्राजू, ट्राय कर गं. मस्तच लागतात असे बनवलेले खारे/मसाला शेंगदाणे.

चतुरंग, तुम्ही एकदम दिलखुलास प्रतिक्रिया दिलीत. धन्यू. :)

शुचि's picture

10 Sep 2010 - 5:03 am | शुचि

खलास!!!
वारले, मेले, खपले.
काय जबरी फोटो आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

रंगाशेठशी १००% सहमत.
कहर आहे फोटु/पाकृ म्हणजे.

प्रभो's picture

10 Sep 2010 - 8:59 am | प्रभो

मस्तच!!!!

संजयशिवाजीरावगडगे's picture

12 Sep 2010 - 1:45 pm | संजयशिवाजीरावगडगे

शॉल्लेट दिसतीये !!! तोंडाला पाणी सुटलं बुव्वा !!!! एकदम शॉल्लेट !!!!

मितान's picture

12 Sep 2010 - 3:34 pm | मितान

झकास झाली एकदम !
पण मी एक चोरटेपणा केला. दाबेली मसाल्याच्या ऐवजी पावभाजी मसाला वापरला. थोडा कमी. तरीपण चव छान दाबेलीसारखीच आली :))
मसाला शेंगदाणे तर लेकीला फारच आवडले.
धन्यवाद !

फोटो भयानक टेंम्टिंग आहे ! पा.क्रु. छानच !:)

मितान, पावभाजी मसाला वापरलास... :) आवडली नं सगळ्यांना. मग झाले तर.

सुनील's picture

17 Sep 2010 - 7:11 am | सुनील

आजवर फक्त गाडीवर खाल्ली होती. करून बघायला पाहिजे.

फोटो मस्त!