गाभा:
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
प्रतिक्रिया
7 Sep 2010 - 7:55 pm | प्रदीप
नुसते कोरडे अभिनंदन नको. त्यांना सध्या आहात तिकडून एकेक चिंग ताओ पाठवा.
7 Sep 2010 - 7:58 pm | मिसळभोक्ता
होहाय स्ट्रीट वरून डायरेक्ट पार्सल ! (पत्ता कळवा पराशेठ, सहज, आणि स्पा.)
7 Sep 2010 - 8:05 pm | सूड
ओ मिभोकाका प्रतिसादकर्त्यांसाठी पण काहीतरी हवं !!
7 Sep 2010 - 8:07 pm | मस्त कलंदर
परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु समोर, पुणे-३०
स्पा: मुंबई
सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका????
7 Sep 2010 - 8:10 pm | पुष्करिणी
नाना = सहजकाका असं तर नव्हे ना?
7 Sep 2010 - 8:20 pm | मस्त कलंदर
नक्कीच नाही.
सहजकाका इतकेही काही वाईट नाहीत. शेवटी नाना तो नानाच!!!
हे लिहिताना आज चुचुची लै आठवण आली...
7 Sep 2010 - 8:22 pm | असुर
आगायायायाया! खरा काय???
7 Sep 2010 - 8:35 pm | मस्त कलंदर
सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत, दिसायला देखणे आहेत, त्यांच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा खूपच तरूण दिसतात..... अर्थातच हे त्यांचे स्वतःचे मत आहे!!!!
आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे, पण नाना उगाच रागावेल म्हणून पुन्हा सांगत नाही!!!!
7 Sep 2010 - 8:50 pm | मिसळभोक्ता
सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत,
हे सहजकाकांचेच मत नाही, तर मिभोकाका, बिरुटेप्राडॉकाका, सामंतकाका, काळेकाका, अशा सर्व काकांचे मत आहे.
(आता, नारायणराव बनू नका, म्हणजे झाले. नाहीतर उगाचा "काका, मला वाचवा" म्हणून झाडावर चढायच्या तुम्ही. तिकडे चोता दोन आहे. त्याला चढायला खूप आवडते.)
7 Sep 2010 - 8:59 pm | मस्त कलंदर
नाही हो... मी अगदी छोटूशा झाडावर ऐसपैस बसलेय. आणि ते झाड चोता दोन यांच्या झाडापासून पुरेसे दूर आहे. उगीच पॉपकॉर्न खाताना मध्ये मध्ये जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!!
बाकी, इतर सगळ्या काकांचे ठीक आहे , पण काळे आणि सामंत आजोबा यांनाही तुम्ही काका बनवून वासरांत घेतलेत हे वाचून डोळे अंमळ पाणावले. आणि हो, सहजकाका किती देखणे आणि तरूण दिसतात हे त्यांचे मत आम्ही खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकले असल्याने इतर काका-आजोबांच्या मतास (पक्षी: तुमच्याही) योग्य ठिकाणी मारण्यात आले आहे!!!
7 Sep 2010 - 9:11 pm | मिसळभोक्ता
जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!!
अरारारा.. बाजार उठवला..
दोन्या, तुझ्या जागी मी असतो, तर हे असे काही पाशवी ऐकून नसते घेतले.
असो, मके, तुझा प्रतिसाद "समृद्ध व्हावे असे काही" ह्या क्याटेगरीत टाकण्याची नवीन मालकांना विनंती करतो.
7 Sep 2010 - 9:18 pm | सहज
ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात नक्की कोणता व किती वर्ष जुना ज्युस आहे याचा कौल घेतला पाहीजे खरा!
7 Sep 2010 - 9:30 pm | मस्त कलंदर
ये तो राजकी बात है सहजजानी!!!! :)
7 Sep 2010 - 9:29 pm | मस्त कलंदर
>>>जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!!
अहो ते त्याने डिझाईन केलेल्या इंजिनात पण येतात म्हणे मध्ये मध्ये!!!
अहाहा.. आज मी धन्य झाले. आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!! (माझे नक्कीच नाही.. स्वतःला बोका समजणार्या पराचे)
7 Sep 2010 - 9:36 pm | मिसळभोक्ता
आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!!
हे घे:
सर्वांना कबूल करण्यात येतेय, की आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय.
(खूष ? आता मीट बघू डोळे.)
7 Sep 2010 - 9:42 pm | छोटा डॉन
डोळे मिटायचीच बात असेल तर आपण पण "आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय." असे कबुल करतो.
7 Sep 2010 - 9:47 pm | मस्त कलंदर
डाण्रावांना एक डोळ्यावर येणार्या केसांतून समोरचं नीट दिसत नाही, पण काका तुम्हालाही दिसलं नाही का, डोळे परा मिटणार आहे!!!
छे:!!! काका, तुमचाही एक फोटू टाकाच इथे.. जरा तुमचाही केशसंभार कितपत लांब आहे पाहून घेत्ये!!! :)
7 Sep 2010 - 9:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मके, ते काका आहेत. केस उरलेले असतील का आता कपाळावर? नाही म्हणजे आता प्रॉस्पेरिटी वाढण्याची खूण म्हणून केसांनी माघार घ्यायला सुरूवात केली असेल, पण चाळीशीचा चष्मा हरवला असेल.
(ढापणी) अदिती
7 Sep 2010 - 9:58 pm | मिसळभोक्ता
आमचे शीक्रेट उघड केल्याबद्दल चायनीज कोर्टात अदितीआत्यांविरुद्ध दावा टाकावा का ?
ता. क. प्रॉस्पेरिटी आणि गळत्या केसांचा काहीही संबंध नाही. प्रूफ आहे. अगदी आदरणीय प्रूफ आहे. विधान मागे घ्यावे. धन्यवाद.
7 Sep 2010 - 10:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आधी प्रूफ द्या, मग ते आदरणीय आहे का नाही याचा विचार करू आणि नंतर डीलिटमंडळाला सांगू!
बाप दाखव नाहीतर ...
7 Sep 2010 - 10:19 pm | मिसळभोक्ता
प्रूफ हवे आहे ना ? मग हे घे. ~.. (हा गळलेला केस आहे, हे सांनल, एका कुरलकेशसंभारित काकांचा. हेहीसांनल.)
7 Sep 2010 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचं प्रूफ अमान्य आहे. मगाचाच डॉन्याचा गळलेला केस दाखवून स्वतःचे पांढरे केस लपवण्याचा क्षीण प्रयत्न!!
7 Sep 2010 - 10:38 pm | मस्त कलंदर
डॉन्याच्या केसांच्या लांबीला अंडरएस्टीमेट केल्याबद्दल डाण्रावांच्या राकोतैंचा अंमळ णिशेढ!!!
7 Sep 2010 - 10:52 pm | मिसळभोक्ता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हायलाईट करायला विसरू नका..
चावट कुठले.
(खुद के साथ बांता: लांबीला महत्त्व नाही, असे जगातील सर्व पाशवी लोक म्हणत असतात, तरी इथल्या पाशवी लोकांना मात्र (केसांच्या) लांबीविषयी भलतीच उत्सुकता !)
7 Sep 2010 - 10:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बारा नाही का वाजले तुमचे?
7 Sep 2010 - 8:57 pm | पुष्करिणी
अस्स आहे काय ..
नाना सारख्या भूता बितांच्या गोष्टी लिहित असतात..इतकच माहिते आहे
8 Sep 2010 - 12:05 pm | विजुभाऊ
आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे,
नाना थोडा सावळट गोरा आहे, उंची मध्यम , कपडे घालतो ,नाक मध्यम ,डोळे तपकिरी काळे , डोक्यावर विरळ केस , चश्मा आहे पण कधितरी चष्मा काढून ठेवतो. अधूनमधून चिरूट ओढतो , किंवा तंबाखू चघळतो , बोलणे संथ लयीत , हॅ हॅ हॅ करून हसण्याची सवय ,
त्याच्या फोनमधून फक्त प्रभू मास्तर आणि बिका यानाच फोन करता येतो.
हा ईसम बरेचदा ठाण्यात गोखले रस्त्यावर आढळतो.
8 Sep 2010 - 12:09 pm | Nile
नानाचे स्थळ किती ठिकाणी सुचवले होते हो विजुभौ?
स्वगतःम्हणुनच नाना, लगीन करणार नाही असे म्हणत असतो की काय?
7 Sep 2010 - 8:46 pm | मिसळभोक्ता
सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका????
"नाना इज अ फूल, आय टेल यू." हे वाक्य गेल्या आठवड्यात कमीत कमी तीनदा ऐकले आहे.
आणि नानाविषयी, हेचि फळ काय मम तपाला, असे नानाचे नाना म्हणतात, असे ऐकिवात आहे.
त्यामुळे भा पो.
7 Sep 2010 - 8:48 pm | श्रावण मोडक
मेलो. =))
7 Sep 2010 - 8:19 pm | श्रावण मोडक
चिंग ताओ - बिअर? शिंताओ की शिंताव नावाची एक अट्टल चिनी बिअर ऐकून आहे.
पऱ्या, आलो रे...;)
7 Sep 2010 - 8:25 pm | मिसळभोक्ता
त्सिंग-ताओ असे स्पेलिंग, शिंगताव असा मेनलँड मँडरिनमध्ये उच्चार, आणि कँटोनीजमध्ये कदाचित चिंग-ताओ म्हणत असतील.
7 Sep 2010 - 10:11 pm | मिसळभोक्ता
हा धागा पहिल्या पंचविसात येणार ह्याबद्दल कोणी स्पॉट ग्यांबलिंग करायला तयार आहे का ? १:१०० रेट आहे.
(मझर मजीद)
7 Sep 2010 - 10:25 pm | छोटा डॉन
आम्ही शाहिन आफ्रिदीला ... हे आपलं शाहिद आफ्रिदीला गोंडस समजत होतो.
आता तुम्हीच फिक्सिंग ?
मिभोकाकांना ह्यापुढे मिपाचे 'रणदीव' संबोधावे असा प्रस्ताव मी मांडतो ;)
- डॉनरत्ने धुमशान
7 Sep 2010 - 10:30 pm | मिसळभोक्ता
तो कोण रणदीव / समररत्ने / विंटररत्ने आहे, त्याला अनेक इनिशियल्स आहेत, म्हणे. त्याबद्दलः
रणदीव ने सर्वात जास्त इनिशियल असण्याचा अभिमान बाळगू नये. आमच्याकडे त्यापेक्ष्या जास्त इनिशियल असलेला क्रिकेट खेळाडू आहे.
टी एम एम के वाय रैना.
रैनाचे पूर्ण नाव काय, तर म्हणे: "तेरे मेरे मिलन की ये रैना."
आत हसा.
7 Sep 2010 - 10:39 pm | मस्त कलंदर
ठ्ठोssssssssssssss
7 Sep 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे आमच्या कोणाच्या एका प्रतिसादाला तुमचे १०० प्रतिसाद का कसं?
7 Sep 2010 - 10:30 pm | मस्त कलंदर
मी आहे तयार.... (हो पण कुणी डिलिट बटण वापरले की झालेच कल्याण)
पण सध्या तुमच्याकडचेच पैसे लावा माझ्या नावाने!!!
7 Sep 2010 - 10:32 pm | मिसळभोक्ता
चार संपादक आपल्या बाजूने आहेत. कुणी डिळीट बटन दाबले, की माझे गंगापूरचे तिकीट आधीच बूक केलेले आहे.
त्यमुळे स्वतःचेच पैसे लावावे, ही विनंती. नाही तर मिपा फाउंडेशन आहेच. (कुणी त्या "योजनेला" पैसे पाठवलेत काय रे ? सॉरी.)
7 Sep 2010 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग ३% कमिशन क्यान्सल का?
7 Sep 2010 - 10:36 pm | मिसळभोक्ता
अहो तो भगिनीफंड होता. त्यावर कमिशन मागता ?
अर्थात, आता तो फंड नक्की कुठल्या "भगिनींसाठी" होता, ह्याविषयी शंका आहेच म्हणा.
7 Sep 2010 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छे, मी एवढे प्रतिसाद देऊन तुमचं नाव रोशन करण्याबद्दल कमिशन मागते आहे!
7 Sep 2010 - 10:42 pm | मस्त कलंदर
कोण म्हणते मिभोकाका पाशवी नाहीएत????
होऊन जाऊ द्या आता.. धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड
मकुत्सु!!!
8 Sep 2010 - 9:24 am | निखिल देशपांडे
सर्वांचे अभिनंदन
साला एवढा मनोरंजक धागा चुकला.
छे, आज काल असा दंगा घालायलाच मिळत नाही.
8 Sep 2010 - 11:28 pm | पैसा
तुम्ही तेव्हा पु. लं. च्या भाषेत "उपदेशपांडे" झाला असाल (संपादक म्हणून)
8 Sep 2010 - 9:20 pm | llपुण्याचे पेशवेll
घुसखोरीबद्दल क्षमस्व. पण मिभो आमच्या पर्याला लारा का म्हणत आहेत? लारा दत्ता आणि पर्या यांच्यात सडपातळ (शब्द एकसंध आहे तो तसाच वाचावा) असणे याशिवाय दुसरे काहीच साम्य नाही.
8 Sep 2010 - 9:38 pm | मस्त कलंदर
परा सडपातळ आहे???? गेल्यावेळेस भेटला तेव्हा तर "देशा"वरच्या संपादक-आनंदयात्री-सहजकाका यांच्यासोबत आकारमानात स्पर्धा करतोय असे म्हणाला रे मला तो..
7 Sep 2010 - 8:04 pm | मस्त कलंदर
प्रतिसादांची शंभरी पार केल्याबद्दल मिभोकाकांचेही अभिनंदन.
कुणीतरी असे म्हणावे यासाठी हा धागा काढला असेल तर उगीच जास्त वाट पाहायला लागू नये यासाठी त्वरित 'अपेक्षित' प्रतिसाद दिला आहे
7 Sep 2010 - 8:11 pm | मी-सौरभ
क ड क प्रतिसाद..
7 Sep 2010 - 8:26 pm | मिसळभोक्ता
हा कसला आवाज हे तुमच्यासारख्या संशोधकांना सांगायला नकोच.
7 Sep 2010 - 8:39 pm | मस्त कलंदर
नक्कीच!!!!
तो मनावर न घेण्याइतक्या पाशवी आणि उर्मट आम्ही नक्कीच आहोत!!!
7 Sep 2010 - 9:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए मके, तू गं कधी संशोधक झालीस गं? मला नाही बोल्लीस ते!
बाकी तुझ्या झाडावर थोडी जागा ठेव गं माझ्यासाठी, मी आलेच आणखी एक पॉपकॉर्नचा पुडा घेऊन!
आणि काय म्हणे सहजकाका देखणे आहेत? तू चष्मा काढला होतास का झोप कमी झाली होती तुझी??
7 Sep 2010 - 9:45 pm | चतुरंग
सहजकाकांचं आडनाव देखणे असेल, त्यामुळे समजुतीचा घोटाळा झाला असणार! ;)
चतुरंग
7 Sep 2010 - 9:52 pm | मस्त कलंदर
नाही गं.. हे त्यांचे स्वतःचे मत आहे म्हणून सांगितले ना!!! ते केस आधी बांध बघू नीट... सगळ्यांना वाईट सवयी लागल्या आहेत. आणि तेव्हा मी टक्क जागी होते.. आता बॅकग्राउंडला काहीतरी आवाज येत होता.. त्यामुळे मला नीट ऐकूच आले नव्हते आधी.. तो गं तो आवाज.. मी रेकॉर्ड करून व्यनि केलेला...
आता मात्र लै मार खाणार आहे मी.. कुठल्या काकांना शरण जाऊ???? :(
7 Sep 2010 - 9:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तू आज रंगरावांना शरण जा! तेही सहजकाकांना 'देखणे' म्हणताहेत आणि रेकॉर्ड केलेल्या आवाजात त्यांचा काही हातही नाहीये.
माझे केस ना? व्यवस्थित बांधून घेतले आहेत आणि मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.
7 Sep 2010 - 10:38 pm | मिसळभोक्ता
तू आज रंगरावांना शरण जा!
नको. रंगरावांना कुणी पाशवी व्यक्ती शरण गेल्याचे रेवतीआत्यांना आवडणार नाही.
8 Sep 2010 - 12:00 pm | मस्त कलंदर
हा हा हा... रेवतीतै या स्त्री या न्यायाने त्याही पाशवीच की हो...
आता तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ते स्पष्ट करा... रेवतीआत्या पाशवी नाहीत की त्या रंगाकाकांना शरण जात नाहीत... ;)
(आता सगळे मिळून मारतील मला.. पळाssssssss)
8 Sep 2010 - 10:58 pm | रेवती
वाचतिये! ;)
8 Sep 2010 - 8:01 am | सहज
>मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.
पाशवी शक्तींमुळेच मिभोंना हे शक्य झाले. २० जणांनी मिळून हा धागा टोप २५ मधे आणला. नेहमीचे ही & ही मिपाकर (पक्षी: परा, नाना वगैरे वगैरे) नसुनही हे शक्य झाले याचाच अर्थ पाशवी शक्तींचा प्रभाव. आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली! ही म्हण मिपाच्या समृद्ध भांडारात यायला प्रत्यवाय नसावा.
मिभोकाकांचे अभिनंदन!
8 Sep 2010 - 10:57 pm | रेवती
आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली!
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग! हसणं थांबत नाहिये माझं!
7 Sep 2010 - 8:06 pm | पुष्करिणी
बोर्डात आलेल्या सर्व गुणीजनांचे हार्दिक अभिनंदन ...बंगलोर, बिजिंगवर लक्ष ठेवता ठेवता मिपा बोर्डावर पण डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणार्या मिभोंचेही अभिनंदन.
7 Sep 2010 - 8:20 pm | असुर
+१
बोर्डात आलेली व्यक्तीच बोर्डात आलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना पाहून गळॅ दाटूण आला, डॉळॅ पाणावले.
लाराकथेतील पराकुमार यांचे उत्तुंग अभिनंदन. आपल्या पुढील लेखनाससुद्धा भरभरुन प्रतिसाद लाभो ही इश्वरचरणी प्रार्थना!
सहजकाकांचे जोरदार अभिनंदन. उसाच्या देशात असा मान मिळवल्याबद्दल ऑफशोअर वरील तमाम मिपाकरांचा ऊर दाटून आला असेल याची खात्री!
जर परा हे लारा असतील सहजकाकांना 'व्हिव रिचर्ड्स'अशी पदवी मिळावी ही विनंती!
स्पा यानी एक लेखनाचा एक नवा आयाम खुला करुन दिला आणि त्याद्वारे पदार्पणातच दैदीप्यमान सेन्च्युरी ठोकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या सगळ्या सांख्यिकीबद्दल मिभोकाकांचे वैयक्तिक आभार! सार्वजनिक आभाराचे लिखाण करण्यासाठी जागा राखून ठेवत आहे.
--असुर
7 Sep 2010 - 8:09 pm | छोटा डॉन
स्वगत मोड :
च्यायला, गेला काय आमचा पहिला नंबर.
खर्याचा जमाना नाही राहिला आजकाल, पब्लिक कायबी धागे काढते आणि लोक त्याला टाळ्या वाजवतात...
काय ३०० चे कौतुक करायचे ? पराचे स्वतःचे प्रतिसादच ५० असतील, शिवाय नान्या आणि पुप्याची बेरीज पण ८० च्या खाली नाही.
तसे बरेच अवांतर प्रतिसादही आहेत, लोकांना पण नुस्ता दिखावा लागतो.
क्वालिटी बघा लेको क्वालिटी, छ्या, साला आपला मुडच गेला एकदम ....
मिभोकाकांना प्रतिसाद देणे आता बंद करतो, फुडच्या वेळी झाडावरच जाऊन बसतो. लगेच धागा काढायची काय गरज होती का ? च्यायला आपल्या कंपुतल्या माणसाला संभाळुन घ्यायचे राहिले बाजुला, जाऊ दे, आपला मुडच गेला साला !
जाहिर मोड :
पराचा पहिला नंबर आला ह्यात आम्हाला आनंदच आहे, 'इतिहासाचे पुनर्लेखन' ह्यासारख्या धाग्याने पहिला नंबर गाठणे हे मिपासाठी भुषणास्पद बाब आहे. मी तर म्हणेन की ह्या धाग्यामुळे त्या गुणवत्ता यादीचा सन्मानच झाला.
मी गुणवत्ता अशासाठी म्हणतो आहे की प्रतिसादांच्या संख्येपेक्षा मला त्यातला कन्टेन्ट अधिक भावला, एक ऐतिहासिक काम झाले व अशा धाग्याचा प्रवर्तक असणार्या पराचा उचित सन्मान करण्याचे औचित्य दाखवणार्या मिभोकाकांचेही मी शतशः आभार मानतो.
धन्य ते मिपा ... धन्य तो परा आणि धन्य ते मिभोकाका !!!
- ( दुटप्पी ) छोटा डॉन
7 Sep 2010 - 8:14 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी पुलंच मी आणि माझा शत्रु पक्ष आठवल ब्वॉ!
7 Sep 2010 - 8:16 pm | श्रावण मोडक
काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय?
7 Sep 2010 - 8:21 pm | छोटा डॉन
>>काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय?
ह्या बाबीवर आम्ही "टाळ्या आणि दणके" ह्या शेप्रेट लेखाद्वारे भाष्य करु ;)
आज काही आमची मनस्थिती ठीक नाही, तुर्तास रजा घेतो :)
7 Sep 2010 - 8:30 pm | श्रावण मोडक
टाळ्यांच्या संदर्भात, दणके? :) त्याविषयी लिहितात? ते देतात ना फक्त? पण लिही. लिही. वाट पाहतोय.
ता. क. (म्हणजेच नंतर सुचलेलं) : प्रतिसादातील दणके याविषयी लिहिताना मिभोकाकांचंच व्यक्तिचित्र व्हायचं. तसं नको करू. व्यक्तिचित्र हा एक कॉपीरायटेड प्रकार आहे!
7 Sep 2010 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टाळ्या?
म्हण्जे श्रामो, ते "एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है" ते काय हो??
(स्पष्टलाडू) अदिती
7 Sep 2010 - 8:21 pm | मिसळभोक्ता
वा बंगलोरला असणारा धोका, म्हणजेच,चोता दोन, आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर !
भविष्य उज्ज्वल आहे.
7 Sep 2010 - 8:29 pm | छोटा डॉन
>>आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर !
तयारी चालु आहे ...
सध्या पुण्यातल्या 'घराच्या वाढत्या किमती, घरमालकांची वाढती मग्रुरी आणि मस्तवालपणा' आदी विदाचे संकलन चालु आहे.
सकाळीच फेसबुकावरुन मदतीचे आश्वासन आले आहे, लेट्स सी काय होते ते.
फक्त आता पुण्यात आमचा 'थातुरमातुर करुन गंडवण्याचा धंदा' चालतो की नाही इतकीच काळजी आहे, कारण तिकडे सगळेच तसे, मग आम्हाला कोण विचारणार ? ;)
- ( धावपळीतला ) छोटा डॉन
7 Sep 2010 - 8:11 pm | सहज
मिभो यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आज विरझणाऐवजी त्यांनी आम्हाला फ्रोजन योगर्ट (मराठीत दह्याचे आईस्क्रीम) दिले आहे त्याकरता मी त्यांचा आभारी आहे.
बाकी मसंस्थळावर प्रतिसादांचा खरा लुफ्त जर चित्रीत करायचा झाला तो काहीसा असा दिसेल. एन्जॉय!
7 Sep 2010 - 8:19 pm | सूड
:D, :D
7 Sep 2010 - 8:31 pm | मिसळभोक्ता
पाय-फाईट म्हटले, की आम्हाला ३_१४ का कोण जाणे आठवतात.
7 Sep 2010 - 9:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आले, आले! मिभोकाकांना माझी आठवण झालेली पाहून डोळ्यात पाणी आलं, एकदम अलका कुबल ष्टाईल! ते पुसतपुसत प्रतिसाद द्यायला अंमळ उशीरच झाला!!
7 Sep 2010 - 9:41 pm | छोटा डॉन
येवढ्या उशीराने येऊन काय उप्योग ?
भाशान तर कवाच संपले, आता घ्या सतरंज्या उचलायला ...
7 Sep 2010 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात वेळ गेला ... फुलं बडवून झाल्यावर मगच वेळ मिळतो ना कीबोर्ड बडवायला! मिभोकाका पळाले का काय?
ओ मिभोकाका, पहिल्या धारेची नारायणगावाची वाईन आहे हो माझ्याकडे!!
7 Sep 2010 - 10:02 pm | मिसळभोक्ता
तारीख : १९ सप्टेंबर २०१०.
स्थळः तुम्ही ठरवा.
अधिक माहितीसाठी : केशवसुमारांना भेटा.
7 Sep 2010 - 10:09 pm | मस्त कलंदर
अदिती, ठरव गं.. मला प्यायची नसली तरी प्यायलेल्यांची विमाने उडालेली पाहायला आवडेल!!!
7 Sep 2010 - 10:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्थळः या आमच्या गरीबाच्या होस्टेलात कधीतरी!
-- अदितीयात्री
अधिक माहितीसाठी बिकाकांना व्यनी करा.
7 Sep 2010 - 10:20 pm | मस्त कलंदर
तुमचा १ बीएचके नाही.....
त्यामुळे तुमच्या आमंत्रणास पुढे काही लिहिले नाही.. लागले लग्गेच हायलाईट करून वाचायला!!!!
7 Sep 2010 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे पहा, यायचं असेल तर या! पण तरीही, आमच्याकडे "प्यार्टी" नसणारे!!
7 Sep 2010 - 10:05 pm | पुष्करिणी
२१ मिनिटांच फारच मनावर घेतलस की काय ?
7 Sep 2010 - 10:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही गं! पण फुलं बडवल्यावर तशीच आले असते कीबोर्ड बडवायला तर धाग्यालाही घाम लागला असता! ;-)
8 Sep 2010 - 11:05 am | परिकथेतील राजकुमार
सहमत सहमत सहमत.
आज आम्ही धन्य झालो. आमचा आनंद आम्ही आज सदाशीव पेठेत बालुशाही (शाहीन न्हवे) वाटून व्यक्त करणार.
8 Sep 2010 - 11:50 am | नरेश धाल
बालुशाही (शाहीन न्हवे) ऐकताच तोंडाला पाणी सुटले. लाळ गळायला लागली आहे.
7 Sep 2010 - 8:17 pm | अविनाशकुलकर्णी
परा..कधी बसायचे?
......................................

7 Sep 2010 - 8:19 pm | छोटा डॉन
काय ?
१२ वर्षाची जुनी शिवास रिगल ?
मिभोकाका मारतील बरं का, कमीत कमी १६ वर्षे जुनी आणा नायतर तुम्ही कटाप ह्या खेळातुन ;)
- ( १२ चा ) छोटा डॉन
7 Sep 2010 - 8:28 pm | मिसळभोक्ता
अठरा !!!
सोळा नाही !!
7 Sep 2010 - 8:32 pm | छोटा डॉन
सहमत आहे, कानाखाली वाजवण्याला नव्हे तर वर्षांच्या हिशेबाचा.
पण आम्ही गणितात पहिल्यापासुन कच्चे असल्याने काहीतरे थातुरमातुर कारणे सांगुन असेच दुसर्याला गंडवत असतो.
बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो ;)
( पळा, आता खातोय मार ... )
- छोटा डॉन
7 Sep 2010 - 8:34 pm | श्रावण मोडक
यासाठी गणीत पक्कं असावं लागतं. टक्केवारी काढायची असते ना! माहिती घ्या थोडी कोणा माहितगारांकडून.
7 Sep 2010 - 8:39 pm | मस्त कलंदर
तुम्हाला मिळाली तर मलाही द्या.. मलाही दोन टक्के ट्यार्पीचं गणित अजून समजलं नाहीए. ;)
7 Sep 2010 - 8:45 pm | श्रावण मोडक
हितं ट्यार्पीचा न्हवं, याजाचा इषय चाललाय बाई! आनी आमी काय याजावर पैसं द्येत नाय. ते डान्रावांनाच इचारा! ;)
7 Sep 2010 - 9:01 pm | मस्त कलंदर
याजाचं गणित तर आहेच हो.... पण डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली. तुम्ही रिकामटेकडे नसल्याने तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही.. तेव्हा, मोठे व्हा!!
7 Sep 2010 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली.
अरे हो, या ट्यार्पी वरुन आठवण झाली. मीपाचा ट्यार्पी केवळ आमच्यामुळेच वाढतो असे समजणारे, असे धागे आणि भलते प्रतिसाद पाहून आफ्रिकेतील जंगलात मोठमोठ्या झाडांना धडका मारत असतील. :)
छ्या, काय धागे आणि काय प्रतिसाद. कुठे गेलं रं आपलं डिलीटमंडळ !
-दिलीप बिरुटे
7 Sep 2010 - 8:38 pm | मिसळभोक्ता
बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो
आश्वासक डॉनरावांचे भवितव्य बंगलोरलाच उज्ज्वल आहे, त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता.
7 Sep 2010 - 8:42 pm | छोटा डॉन
>>त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता.
इन दॅट केस "आंतरजालीय आत्महत्या करावी वाटते ..." असा चिंतनात्मक धागा काढतो लगेच ;)
हा हा म्हणता म्हणता ५-५० प्रतिसाद घेईन.
- छोटा डॉन
7 Sep 2010 - 8:48 pm | सहज
मग ५१ व्या प्रतिसादात कोणीतरी विचारेल की अरे चोता तु तर जीवनाचा खरा अर्थ समजुन दिला होतास, आता एकदम आत्महत्येची वेळ कशी आली?
मग मिभो काहीतरी उपप्रतिसाद देतीलच! मग पुन्हा डिट्टेल धागा काढायचे वचन वायदे आझम देतील.
अशी प्रोसीजर आहे बर का!
7 Sep 2010 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो मग 'छोटा डॉन यांचे खाते का उडवले' हा धागा कोणी आणि कसा काढायचा त्याबद्दलही मार्गदर्शन करावे ही विनंती!
8 Sep 2010 - 9:06 am | केशवसुमार
इन दॅट' केस' हा पॉईंट नोट करावा..
केशवसुमार
8 Sep 2010 - 9:02 am | केशवसुमार
वय कमीतकमी अठरा अहे.. हे विसरू नको म्हणजे झाले.. बंगळूरुचा गाशा गुंडाळून पुण्याला येणामागचे छुपे कारण आम्हाला माहिती आहे.. म्हणून हा 'सावधान'तेचा इशारा..
(सुचक)केशवसुमार
7 Sep 2010 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अठराच्च का हो मिभोकाका? ते काय संमतीवय आहे काय??
7 Sep 2010 - 9:47 pm | मिसळभोक्ता
अगदी बरोबर..
१८ ला आमची संमती आहे.
त्यामुळे हे संमतीदर्शक वय मानावे.
9 Sep 2010 - 11:00 am | llपुण्याचे पेशवेll
अठरा !!!
सोळा नाही !!
अष्टादशेपेक्षा षोडशेत जास्त मजा असते असं ऐकलं आहे. अनुभव नाही बॉ.
7 Sep 2010 - 8:22 pm | श्रावण मोडक
या धाग्याबद्दल अभिनंदन करणारा धागा तयार करावा काय? :)
7 Sep 2010 - 8:24 pm | छोटा डॉन
>>या धाग्याबद्दल अभिनंदन करणारा धागा तयार करावा काय?
ह्या धाग्याचे अभिनंदन करण्याइतके प्रतिसाद यावेत अशी सुपारी निघाली होती काय ?
असल्यास काय रेटने गेली ?
असो, तुर्तास श्रामोंना अनुमोदन देतो. :)
7 Sep 2010 - 8:30 pm | नितिन थत्ते
>>परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे
यातील 'लारा' या शब्दाबाबत अधिक खुलासा आवश्यक. उगाच नसत्या शंका यायला नको. ;)
7 Sep 2010 - 8:36 pm | मेघवेडा
२००३-२००७ च्या विश्वचषकातली एक सूत्रसंचालिका आठवली! :D
अवांतर : ती म्हणे केळं आडवं खात असे!
7 Sep 2010 - 8:40 pm | मिसळभोक्ता
अवांतर : ती म्हणे केळं आडवं खात असे!
अरे भाड्यांनो, नीट पिऊ द्या रे.
साली ६५ यूएस डॉलरची बाटली आहे, ड्यूटी-फ्रीत घेतली तरी !
7 Sep 2010 - 8:43 pm | मेघवेडा
चढली वाटतं? :P
7 Sep 2010 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे आल्यामुळे आम्हाला प्रतिसाद लिहावा लागतोय.
अनुक्रमे सहज,परा,स्पा यांचे अभिनंदन...! :)
अवांतर : खरा धोका विदर्भाकडून असा एक धागा कोणीतरी काढा रे...!
-दिलीप बिरुटे
7 Sep 2010 - 8:45 pm | छोटा डॉन
>>अवांतर : खरा धोका विदर्भाकडून असा एक धागा कोणीतरी काढा रे...!
:)
एक अल्पशी दुरुस्ती सुचवतो.
"मराठवाड्याला धोका विदर्भाचा" असा धागा काढा अशी सुचना करतो ( म्हणजे आम्ही प. महाराष्ट्रीय मज्जा बघायला मोकळे ) ;)
7 Sep 2010 - 8:54 pm | मिसळभोक्ता
म्हणजे आम्ही प. महाराष्ट्रीय मज्जा बघायला मोकळे
'आम्ही "नीतिशून्य" प. महाराष्ट्रीय' असे हवे.
7 Sep 2010 - 8:56 pm | छोटा डॉन
>>'आम्ही "नीतिशून्य" प. महाराष्ट्रीय' असे हवे.
बरं बरं.
आम्ही प. महाराष्ट्रीय मिभोकाकांसमोर 'इंचा इंचाने माघार घेत आहोत' असे कबुल करतो ;)
- छोटा डॉन
7 Sep 2010 - 8:58 pm | सहज
अमेरीकेने जरा दबाव आणला की भारतीय नेते कच खाणार हे काही नवे नाही.
7 Sep 2010 - 9:01 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... हे नावाचेच डॉन निघाले... ;)
7 Sep 2010 - 9:08 pm | छोटा डॉन
हा व्यनीखरडहृदयसम्राट सहजकाका ह्यांनी (सर्वो)हुच्च छोटा डॉनचा केलेला अपमान समजावा का ?
तसे असल्यास आंतरजालीय श्रामो पवारांना होणारा आनंद अनपेक्षित नाही
7 Sep 2010 - 9:01 pm | मिसळभोक्ता
इंचा इंचाने माघार घेत आहोत'
ह्म्म.. काळेकाकांचा धागा फारसा मागे नाही. (सध्या क्रमांक पाच.) चोता दोन ला सदर धाग्याचा मुद्दाम उलेख करून तिथले प्रतिसाद वाढवावे, आणि पर्याला इंगा दाखवावा, असे वाटत असल्यास नवल नाही.
पण काहीही म्हणा. "इंचा इंचाने माघार" हे विज्युअलाईज करणे म्हणजे जरा पॉर्नोग्राफिक वाटते. नाही का ?
7 Sep 2010 - 9:08 pm | सहज
आणि कोणाला वाटले तरी तूर्तास लायसन्स आहे ना, पूर्ण १८ वर्षे (जुनी शिवास)
7 Sep 2010 - 8:49 pm | मस्त कलंदर
आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परा आणि सहजकाकांना विदर्भाची भीती कसली???
7 Sep 2010 - 8:53 pm | छोटा डॉन
>>आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परा आणि सहजकाकांना विदर्भाची भीती कसली???
ऑ ?
पुण्याचा परा पश्चिम महाराष्ट्राचा कसा झाला ?
पुणेकरांना पुण्याशिवाय इतर काही अस्तित्वात आहे हे मान्य आहे का ?
तसे असल्यास त्वरित बिजींग, बेंगलोर आणि बे-एरियासह 'संयुक्त महाराष्ट्र' व्हावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत :)
7 Sep 2010 - 8:57 pm | मिसळभोक्ता
तसे असल्यास त्वरित बिजींग, बेंगलोर आणि बे-एरियासह 'संयुक्त महाराष्ट्र' व्हावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत
सहमत आहे.
(आता खुद्द संपादकशिरोमणी चोता दोन ह्यांनी पराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मिभोकाकाचा धागा ३१५ पार नेण्याची प्रतिज्ञाच केली आहे, तर आम्ही कोण नाही म्हणणार ? शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त ह्या नेताजीप्रणित न्यायाने आम्हाला चोता दोनने दोस्त केलेले पाहून आनंद झाला.)
7 Sep 2010 - 9:00 pm | छोटा डॉन
>>शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त ह्या नेताजीप्रणित न्यायाने आम्हाला चोता दोनने दोस्त केलेले पाहून आनंद झाला.)
ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना की तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या काढणार नाही ;)
मग असे का का काका ?
9 Sep 2010 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll
ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना की तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या काढणार नाही
पुणे कराराच्या प. म्हाराष्ट्रीय नकला पाहून काहीच णवीण वाटले नाही.
9 Sep 2010 - 11:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चालायचंच हो पेशवे! तुम्ही नका मनाला लावून घेऊ!
(आपलं ठरल्याप्रमाणे मी तुमची खोडी काढलेली नाही याची कृपया नोंद घेणे!)
9 Sep 2010 - 11:29 am | llपुण्याचे पेशवेll
अहो मनाला कसलं लागतंय. अंबळ गम्मत वाटली इतकेच. :)
(कंसाची नोंद घेतली आहे)
7 Sep 2010 - 9:06 pm | मस्त कलंदर
वाचलं नाहीस का, माझ्या घरी माझी बिघडलेली भेंडी न खाणारी म्हैस ही खरंतर सांगलीहून भेट म्हणून आली होती. आणि तिच्या शिंगांत "आमच्या घरी नातू आल्याने आता कोणत्याही जनावराची गरज नाही" अशी चिठ्ठी अडकवली होती!!!!
छे:, दहावेळा पराची खव लिहून आण अशी शिक्षा द्यायला हवी तुला!!!! ढ कुठचा!!!
7 Sep 2010 - 8:58 pm | सूड
तासाभरात ५० प्रतिसाद गोळा करणारा धागा म्हणून अभिनंदन होणार आता बहुतेक !!
7 Sep 2010 - 9:04 pm | मिसळभोक्ता
साली काढणारे देवरुखकर साहेब, अभिनंदनपर धाग्याचे अभिनंदन करण्याचा धागा काढण्याचा उत्कृष्ट विचार केल्या बदल अभिनंदन करण्याचा धागा आम्ही काढायच्या आधी तुम्हीच काढा.
7 Sep 2010 - 9:08 pm | सूड
धागा आम्ही काढण्यात काही मजा नाही, मिपावरील जुन्याजाणत्या लोकांना हा मान मिळावा.
सध्या तरी आम्ही प्रतिसादच देऊ म्हणतोय.
7 Sep 2010 - 9:43 pm | मिसळभोक्ता
नो च्श्शिशिंगताव फॉर यू.
8 Sep 2010 - 7:00 am | सूड
चालेल हो काका !!
नाहीतर नंतर कोणत्या तरी धाग्यात, काय पण म्हणा राव या धाग्यात काकांनी कुणाला शिंगताव ऑफर नाय केली असा रिप्लाय येईल. किंवा कुणीतरी निव्वळ डोळे मिटण्यासाठी शिंगताव मागेल. त्यामुळे नकोच. शिंगताव वर तुम्ही ताव मारा.
8 Sep 2010 - 7:05 am | सहज
चिनी मालावर बंदी घालायचे धोरण मिपावर एकदा स्वीकारले म्हणजे स्वीकारले. नो शिंगताव ऑन मिपा.
7 Sep 2010 - 9:07 pm | अनामिक
चला आता "प "चा "ला" करणारे (परा चा लारा) म्हणून मिभोकाकांची इतिहासात नोंद होणार तर!
7 Sep 2010 - 9:11 pm | छोटा डॉन
पण काय पण म्हणा राव, आख्ख्या धाग्यात मिभोकाका कुणाचेच 'फॅन' झाले नाहीत ह्याचे फार वाईट वाटले.
7 Sep 2010 - 9:14 pm | सूड
चोता दोन अरे ते फ्यान होतात फॅन नाही.
7 Sep 2010 - 9:22 pm | मिसळभोक्ता
जरा इतरत्र बघा. साला कॉपीरायटेड व्यक्तिचित्रात (श्रेयः श्रामो, अव्हेरः मी) लावलेल्या फोटोचा फ्यान झाल्यापासून हे सगळे संकेतस्थळ वगैरे झूट वाटते.
साला, तिकडे फोरास रोडवर गणेशोत्सवात सदा सर्वदा म्हणायला बोलवावे ह्या आशेत आहोत सध्या ;-)
(बाकी, बीजिंग्मध्ये एक महिला क्यान्सरग्रस्त आहे, तिला वाचवायला पैसे मागतोय. आणि बंगलोरच्या बोलबच्चनांचा पराभव करणारी बीजिंगमधली कंपनी, आहे. त्यात गुंतवणुकीची गरज आहे. महिन्याभरात तीन टक्के. पैसे पाठवताय ना डॉनराव ? वाटल्यास अकाउंटनंबर पाठवतो.)
7 Sep 2010 - 9:37 pm | मस्त कलंदर
रूजवात घातली की कळवा मग!!!
7 Sep 2010 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे बाप रे, ते अकाऊंट इकडे आलंय का काय?
7 Sep 2010 - 9:45 pm | मिसळभोक्ता
ह्म्म्म्म.. असो.
पाशवी, कुठल्या !
(योग्य ठिकाणी स्वल्पविराम घालावा, असे नानाचा उपदेश पाळतो आहे.)
7 Sep 2010 - 9:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो त्या मकताई पश्चिम महाराष्ट्राच्या आहेत. पुन्हा अभ्यास कमी पडू देऊन 'कुठच्या' असं विचारू नका!
7 Sep 2010 - 9:54 pm | मिसळभोक्ता
अहो त्या मकताई पश्चिम महाराष्ट्राच्या आहेत.
खरे की काय ?
मग आम्ही उगाच संमती का देतो आहोत त्यांना ?
सावधकेल्याबद्दल धन्यवाद, ताई !
(ता. क. काकांच्या ताई = आत्या. यापुढे अदितीताईंना आत्या असे संबोधावे, ही नम्र विनंती. नाहीतरी त्या सगळ्या काकांना "मयतरि देनार क?" असे विचारतच असतात.)
(ता. ता. क. "तुमने इतना मारा. हमने एकच मारा. पर शॉल्लेट मारा न?)
7 Sep 2010 - 9:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या, काय दिवस आल्येत माझ्यावर ... जॉन अब्राहम सोडून या काका लोकांना "मयत री देनार का?" विचारावं लागतंय!
आणि मी कोणत्या काकांची ताई आहे हो, काका?
मग काय उगाच "खपले, वारले, मेले" खरड टाकली का काय?*
* इच्छुकांनी मिभोकाकांची खव पहावी.
7 Sep 2010 - 10:16 pm | राजेश घासकडवी
फास्टेस्ट सेंचुरीबद्दल मिभोंना शाहीन अफ्रिदी म्हणावं का? अर्रर्रर्र, ते शाहीन लिहिलं का चुकून, मला शाहीद अफ्रिदी म्हणायचं होतं.
7 Sep 2010 - 10:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शाहीद आहे काय? मला वाटलं आता तरी मिभोकाकांचा फोटू बघायला मिळेल!
7 Sep 2010 - 10:22 pm | मिसळभोक्ता
मयतरी आहे. फोटू बघितला आहे. तरी देखील हा प्रश्न विचारने हे पाशवीपनाचे लक्षन आहे.
(भुभुत्सु)
7 Sep 2010 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो, तो तुमचाच फोटो कशावरून? लोकं आपले किंवा कुटुंबियांचे फोटो म्हणून फिल्मस्टार्सचे फोटो लावतात!!
पण तरीही मला फोटो दिसला, इतरांना कुठे दिसला? तुमच्या आगामी व्यक्तीचित्रात परिपूर्णता कशी येणार??
7 Sep 2010 - 10:48 pm | मिसळभोक्ता
तुमच्या आगामी व्यक्तीचित्रात परिपूर्णता कशी येणार??
हेही खरेच म्हणा.
हल्ली सगळी कॉपीरायटेड व्यक्तिचित्रे ही आत्मव्यक्तिचरित्रेच असतात.
बाळांनो, काकांनो, आत्यांनो, मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा, असे म्हणतो...
बाकी तुमचे चालूद्या. १:१०० चा रेट विसरू नका.
7 Sep 2010 - 10:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही आता घरी जाणार का झोपायला जाणार? घरी जायचं तर झोपेचे नक्की बारा वाजतील!!
7 Sep 2010 - 10:52 pm | मस्त कलंदर
मला काकांनी बाळ म्हटलं असं मी समजून घेते!!!!
7 Sep 2010 - 10:30 pm | राजेश घासकडवी
फोटो म्हटल्यावर एकदम होंडा सिटी मध्ये बसून चुम्माचाटी करणारे मिभो डोळ्यासमोर आले.