बेक्ड मोदक

नेहरिन's picture
नेहरिन in पाककृती
7 Sep 2010 - 5:36 pm

सारणासाठी साहित्य:- २ वाट्या सुकं खोबरं, १टेबलस्पून खसखस(भाजून पूड करुन), १वाटी पिठी साखर, १टी स्पून वेलदोड्याची पावडर, चिमुटभर मीठ.
पारीसाठी साहित्य:- १वाटी बारीक रवा, १वाटी मैदा, १/२ वाटी दूध आणि पाणी, १टी स्पून मीठ , १चिमूट बेकिंग सोडा, १ टेबलस्पून वनस्पती तुप.
From मोदक" alt="" />

कृती:- खोबरं खिसून भाजुऊन घ्याव. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक करुन घ्याव.मग त्यात भाजून पूड केलेली खसखस , पिठी साखर, वेलदोड्याची पावडर घालून छान एकत्र कराव. सारण तयार झाले .

मैदा चाळून घ्यावा.त्यात रवा मीठ बेकींग सोडा घालून दूध पाणी घालून भिजवून घ्यावा . थोडासा तुपाचा हात लावून चांगला मळून २/३ तास झाकून ठेवावा .

From मोदक" alt="" />

नंतर त्याला थोडं तूप लावून पीठ कुटून घ्याव. पीठाला चमक आली म्हणजे पीठ तयार झालं. त्याचे दोन भाग करुन त्यातल्या एका गोळ्याची मोठी पोळी लाटून घ्यावी.उरलेले तूप चांगल फेटून घ्याव आणि त्या पोळीवर लावाव.

From मोदक" alt="" />

मग त्या पोळीचा रोल करुन दोन्ही कडा बंद कराव्यात. त्या रोलचे १ इंचाचे तुकदे करावेत. त्या तुकड्यांना दोन्ही बाजूनि पीळ देऊन त्याची पुरी लाटावी.

From मोदक" alt="" />

From मोदक" alt="" />

त्या पुरीला हातावर ठेवून ४पाकळ्या कराव्यात म्हणजे सारण छान भरता येत. १ चमचा सारण त्यात घालून उरलेल्या पाकळ्या करुन मोदक बंद करवा.

ओव्हन १८०सें.ग्रे. ला तापवून घ्यावा. त्यामधे तया केललेले मोदक ५/७ मिनिटं बेक करुन घ्यावेत्. एकदा बघुन गरज वाटल्यास परत ५ मिनिते बेक करावेत. मोदक तयार झाले.
From मोदक" alt="" />

(फोटो- चिंतामणी पळसुले)

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

7 Sep 2010 - 5:46 pm | मेघवेडा

वा! हे देखील मस्तच!

वेताळ's picture

7 Sep 2010 - 5:49 pm | वेताळ

मिपावरतुमचे स्वागत असो व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

नेहरिन's picture

7 Sep 2010 - 5:51 pm | नेहरिन

धन्य.

मदनबाण's picture

7 Sep 2010 - 6:06 pm | मदनबाण

मस्त... :)

मनि२७'s picture

7 Sep 2010 - 6:07 pm | मनि२७

ह्म्म्म..
छानच आहे बुवा....
गौरी गणपती ला वेगवेगळ्या नैवेद्याची मजा आहे आता..
असेच गोडाचे पदार्थ येऊ देत... :-) :-)

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 6:42 pm | मिसळभोक्ता

चिंतामणी पळसुले हा जगातला सर्वात नशीबवान पुरुष असल्याने, त्याचा एक सदरा पाठवून द्यावा, ही विनंती.

माझी भूक चाळवली, मोदक होतील शनिवारी पण आता काहीतरी गोड खाऊन येतो.

सुनील's picture

7 Sep 2010 - 7:08 pm | सुनील

बेक्ड मोदक! नवीन प्रकार!

बेसनलाडू's picture

8 Sep 2010 - 1:37 am | बेसनलाडू

करून पहायलाच हवा! बाप्पालाही यंदा लो क्यालरी नैवेद्य दाखवावा की काय विचार करतो (तसा बाप्पाला त्याने काही फरक पडत नाहीच म्हणा!)
(गणेशभक्त)बेसनलाडू

बेक्ड करंजी ऐकून जुनी झाली, पण बेक्ड मोदक नविनच!
बेक केलेल्या मोदकांचा फोटू दिलात तर वाचकांची पुरती जळजळ होइल.;)

चिंतामणी's picture

7 Sep 2010 - 11:05 pm | चिंतामणी

६वा फोटु बेक्ड मोदकांचाच आहे. ओव्हनमधून काढल्यानंतरचा.

दिपाली पाटिल's picture

8 Sep 2010 - 7:04 am | दिपाली पाटिल

मोदक मस्तच आहेत... मलाही ते मोदक बेक कराय्च्या आधीचे च वाटले...

वा मस्तच आहे ही पाकृ आता करुन बघणार.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2010 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार

वाह वाह हि पाकृ पण उत्कृष्टच :)

मी आधी चुकुन बोकड मोदक असे वाचले, वाटले रमजानमुळे खास बनवले असावेत

अवांतर :-

(फोटो- चिंतामणी पळसुले)

हे श्रेय घेणे अज्जीबात आवडले नाही ! हे स्पष्टपणे बोलुन दाखवल्याबद्दल तुम्ही आता मला वडे खायला बोलवालच.

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 5:35 pm | चिंतामणी

ये संध्याकाळी. तुझ्या आवडीचे वडे घेउन.

बिल मी देइन. वड्यांचे. (पाउस पडत आहे ना. तुला बाकीच्या गोष्टी हव्या असल्यास मात्र स्वखर्चाने आण)

स्वाती२'s picture

8 Sep 2010 - 4:54 pm | स्वाती२

वा! मस्त आहे ही पाकृ!

निवेदिता-ताई's picture

8 Sep 2010 - 6:17 pm | निवेदिता-ताई

करून पहायलाच हवे! मी अजुन असे मोदक कधी केले नाहीत.