गणेशोत्सव जवळ आल्याने मोदकांचा वेगवेगळ्या पाककृती देत आहे.
आंब्याचे मोदक
सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्था चमचा साजूक तुप
पारीसाठी साहीत्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी, अर्धा चमचा मीठ, पाणी
From आंब्याचे मोदक" alt="" />
From आंब्याचे मोदक" alt="" />
कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तुप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे.
एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅस बारीक करून वाफ आणावी. ५ मिनीटाने गॅस बंद करावा.
५ मिनीटाने त्यातील उकड काढुन घेउन, तेल पाण्याचे हाताने चांगली मळून घ्यावी. या उकडीचा लिंबा एव्हढा गोळा घेउन त्याला वाटीचा आकार द्यावा.
From आंब्याचे मोदक" alt="" />
यात एक चमचाअ सारण घालून पारीला पाकळ्यांचा आकार देउन मोदक बंद करावा.
तयार झालेले मोदक मोदकपात्रात उकडुन घ्यावेत.
From आंब्याचे मोदक" alt="" />
From आंब्याचे मोदक" alt="" />
From आंब्याचे मोदक" alt="" />
(फोटो- चिंतामणी पळसुले)
प्रतिक्रिया
7 Sep 2010 - 5:30 pm | मदनबाण
वाह...:)
तो फोडलेला मोदक मी फस्त केला आहे असे समजा. ;)
(मोदक प्रेमी)
7 Sep 2010 - 7:43 pm | रेवती
अरे थांब थांब!
त्यातला अर्धा मी मागितला हे विसरलास काय?;)
पाकृ मस्त!
उकडीतही केशरीरंग नव्हे पण थोडा आमरस घालावा असे कुठेतरी वाचले होते.
8 Sep 2010 - 9:59 am | रोचीन
>>उकडीतही केशरीरंग नव्हे पण थोडा आमरस घालावा असे कुठेतरी वाचले होते.
हो, उकडीसाठी लागणार्या पाण्यातच तो रस मिस्ळून घ्यायचा मग नेहेमीसारखी उकड करायची. छान केशरी रंग येतो.
7 Sep 2010 - 5:32 pm | मेघवेडा
व्वा मस्तच! :)
7 Sep 2010 - 6:01 pm | मनि२७
आई ग.....sssssssssssssssssss
तोंडाला पाणी सुटलंय....
आता केव्हा बाप्पा येतंय अस झालय....
खूप मस्त आहेत मोदक....
7 Sep 2010 - 6:01 pm | मनि२७
आई ग.....sssssssssssssssssss
तोंडाला पाणी सुटलंय....
आता केव्हा बाप्पा येतंय अस झालय....
खूप मस्त आहेत मोदक....
7 Sep 2010 - 6:01 pm | मनि२७
आई ग.....sssssssssssssssssss
तोंडाला पाणी सुटलंय....
आता केव्हा बाप्पा येतंय अस झालय....
खूप मस्त आहेत मोदक....
7 Sep 2010 - 6:05 pm | प्रियाली
पाककृती मस्तच आहे. नक्कीच करून बघावी अशी पण हे आंब्याचा मावा प्रकरण कसे निस्तरावे?
स्वाती दिनेश, स्वाती२, चित्रा आणि लेखिका नेहरिन काही टिपा आहेत का?
रिकोटा चीज आणि आमरस एकत्र करून ढवळत राहिले तर पर्यायी मावा होईल का?
7 Sep 2010 - 6:23 pm | नेहरिन
आपण कुठल्या गावात रहाता हे माहीत नाही. (माझे आहे ते नाही हे माहिती आहे.)
त्यामुळे कुठे मिळेल हे सांगता येणार नाही. मात्र तयार मावा मिळ्तो हे नक्की.
7 Sep 2010 - 6:17 pm | स्वाती दिनेश
प्रियाली,
माझ्याही डोक्यात रिकोटा चीजच आले आधी. तसेही त्याचा मावा बनवून मग आंब्याच्या रसात/पल्पमध्ये मिसळून परत आटवल्यास पर्यायी व्यवस्था होऊ शकते असे वाटते.
रिकोटा+ आम्रस+ एकत्र करुन आटवले तरी चालावे.नंतर त्यात ओले खोबरे मिसळून परत एक कढ द्यायचा.
स्वाती
पाकृ छान आहे,:)
8 Sep 2010 - 9:55 am | रोचीन
स्वातीताई, मला वाटतं कि आंब्याचा मावा म्हण्जे आटवलेला आंब्याचा रस! तिने कंसात साटं अस लिहिलेल आहे ना!! मी अनेक कोकणस्थ मैत्रिणींना आटवलेला आंब्याचा रसाला मावा म्हणतांना ऐकले आहे.
8 Sep 2010 - 12:53 pm | स्वाती दिनेश
म्हणजे आटवलेला आंब्याचा गोळा होय? आंबा + नारळ वड्यांसाठी घेतो तो?
पण आमरस+ नारळात खवा घातला तर अजून छान लागेल ना? :)
कोकणस्थ मैत्रिणी साटं म्हणतात? पण आम्ही आंबापोळी, फणसपोळीला आंब्याची साटं,फणसाची साटं म्हणतो त्यामुळे जरा 'कनफूजन' झाले माझे. :)
स्वाती
8 Sep 2010 - 2:14 pm | चिंतामणी
म्हणजे आटवलेला आंब्याचा गोळा होय? आंबा + नारळ वड्यांसाठी घेतो तो?
व्हय हो. तेच ते.
'कनफूजन' होउ नये म्हणून पहिल्या फोटूत दाखवला आहे "आंब्याच्या माव्याचा गोळा"
10 Sep 2010 - 12:51 pm | रोचीन
>>>कोकणस्थ मैत्रिणी साटं म्हणतात?
नाही, मावा म्हणतात. :)
>>आम्ही आंबापोळी, फणसपोळीला आंब्याची साटं,फणसाची साटं म्हण>>.
आम्हीपण!!! :)
>>आमरस+ नारळात खवा घातला तर अजून छान लागेल.
हो , पण तो हवाच असे नाही म्हणून त्यासाठी रिकोटा चीजचा खवा बनवण्याचे कष्ट कशाला?? म्हणजे वेळ असेल तर जरूर करा पण वेळ नसेल तर नाही केला तरी चालेल, एवढंच!!
बाकी केल्यावर फोटो टाकालच!!! :) :)
7 Sep 2010 - 6:21 pm | मितान
तुमची पाककृती नि स्वातीतैचा सल्ला एकत्र करून बघते :) काय बिशाद मोदक बिघडण्याची !!!
7 Sep 2010 - 7:08 pm | मेघवेडा
अरे वा! कधी करतेस? म्हणजे तेव्हा यायला तुझ्याकडे.. :D
7 Sep 2010 - 6:55 pm | सूड
छान !! आणि मोदकाची पारी नीट खोलगट झालीये.
7 Sep 2010 - 7:04 pm | सुनील
वेगळा प्रकार.
7 Sep 2010 - 10:07 pm | प्राजु
वेगळ्या प्रकारचं सारण..! करून बघेन.
7 Sep 2010 - 11:02 pm | चिंतामणी
निमंत्रणाची वाट बघत आहे.
(आम्हाला =मी फोटु काढणारा आणि बनवणारी माझी बायको)
7 Sep 2010 - 11:11 pm | मिसळभोक्ता
सदरा पाठवताय ना ?
7 Sep 2010 - 11:32 pm | चिंतामणी
पत्ता कळवा.
पण शर्ट टोचल्यास मी जबाबदार नाही.
8 Sep 2010 - 5:29 am | सहज
दोन्ही प्रकारचे मोदक आवडले!
8 Sep 2010 - 7:27 am | अजबराव
उकड कशि घ्यायचि या साथि अजुन महिति हवि आनि काहि खास टिप्स असतिल तर सान्गा....मला निट जमत नाहि...
8 Sep 2010 - 11:17 am | नेहरिन
एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅसबारीक करूनझाकण ठेवून ५ मिनिटे वाफ आणावी.गॅस बन्द करुन ५ मिनिटे तसेच ठेवावे
8 Sep 2010 - 7:42 am | स्मिता_१३
छान मोदक
8 Sep 2010 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार
हायला !
संध्याकाळी आलोच कॅफे बंद करुन ;)
8 Sep 2010 - 11:23 am | नेहरिन
येताना नारळ आणि देसाई बंधू आंबेवाले यांचे कडुन आंब्याचा मावा घेऊन येणे.
8 Sep 2010 - 11:26 am | छोटा डॉन
>>येताना नारळ आणि देसाई बंधू आंबेवाले यांचे कडुन आंब्याचा मावा घेऊन येणे.
+१, हेच म्हणतो.
परा, ते सगळे विकत घेऊन झाले की मगच माझ्याकडे ये, आपण दोघे मिळुन जाऊ मोदक खायला.
नेहरिन मॅडम, जबरा झाली आहे हो पाकॄ.
फोटो पाहुन तर जीवाचे पाणीपाणी झाले, फारच उत्तम !!!
- छोटा डॉन
8 Sep 2010 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार
बर बर ! बिल काका देणार म्हणल्यावर काय कुठुनपण आणु की ;)
डोन्या भोसडीच्या अजुन पुण्यात आला पण नाहीत आणि किती गोष्टीत शेअर मागुन ठेवतोस बे ?
पब्लिक लिमिटेड प्रेमी
8 Sep 2010 - 11:37 am | जागु
रेसिपी आणि दिसताहेत पण सुंदर.
8 Sep 2010 - 1:32 pm | विसोबा खेचर
माझं मत -
आंब्याचा आटीव रस..आंब्याची साठं उपेगाची नाहीत.. हापूस आंब्याचा ताजा रसच हवा. डब्यातलाही चालणार नाही..
रसरशीत पिकलेल्या हापूस आंब्याच्या ताज्या रसाकरता अन्य कोणताही पर्याय नाही..
तात्या.
8 Sep 2010 - 4:09 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! टोन्डाला* पाणी सुटले!
*टोन्डाला आभार: वैदर्भिय!
8 Sep 2010 - 4:51 pm | स्वाती२
मस्त! पण सध्या दर्शनावरच समाधान मानावे लागणार. माझ्या कडे कॅन आहे आमरसाचा. तो आणि खोबर्याचा कीस एकत्र शिजवून चालेल का?
9 Sep 2010 - 9:26 am | नेहरिन
कॅन मधला आमरस घेतला तर सारण कोरड व्हायला खूप वेळ लागतो. करुन बघायचे असल्यास हरकत नाहि.आंब्याच्या साट्यामुळे सारण पटकन तयार होईल.
8 Sep 2010 - 6:08 pm | निवेदिता-ताई
काय सुंदर दिसतायत............लगेच खावेसे वाटत आहेत ..
9 Sep 2010 - 12:01 pm | विलासराव
आधी स्वाती ताईंचा केक, मग भानसांची कच्छी दाबेली आनी आता तुमचे मोदक.
असे जिवघेणे फोटो पाहून एकच प्रश्न पडतो.
जगाव की मराव ?
जगाव -तर नुसतेच फोटो बघायचे.
मराव - कारण असे पदार्थ खायला मिळत नाहीत.
उद्या काही बरवाईट झालच तर त्याची जबाबदारी सर्व मिपाकर पाकॄवाल्यांचीच.