गाभा:
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुन १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली.
मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते.
१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.( शिवसेना पक्शावर बोलण्या सारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत )आक्रमकपणा हा शिवसेनेचा बाणा आहे, आणि आंदोलन करणे हा शिवसेनेचा स्वभाव आहे. "तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळावा - पण न्याय हा मिळालाच पाहिजे!" हि साहेबांची शिकवण आहे. तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही. लोकांना शिवसेना हि विरोधी बाकांवर च हावी आहे ? की अस्मिता आणि हिंदुत्व ह्याच्याशी लोकांना काही हि घेण-देण राहील नाही.
प्रतिक्रिया
7 Sep 2010 - 1:39 pm | विसोबा खेचर
ओके..!
7 Sep 2010 - 1:52 pm | सुनील
आणिबाणीच्या काळात ठाकरे काय करीत होते, ते जाणण्यास उत्सुक!
7 Sep 2010 - 1:48 pm | सुहास..
जाण्यास उत्सुक! >>>
अहो पाटकर , कुठे जाण्यास उत्सुक?
असो ...
केवळ सहा वाक्यात बाळासाहेंबाना ओळखणार्यांनी आज आमच्यासारख्यांची होती नव्हती तेव्हढी घालवली .
१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं >>
नाही हो, मला वाटते ते वाक्य असे असावे,"१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेना-भाजपन केलं " , बर ते जाऊ दे ' सरंक्षण ' कसे केले ते सांगाल काय ?
धन्यवाद
7 Sep 2010 - 1:53 pm | नगरीनिरंजन
गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर एकेकाळी कडाडून टीका करणार्या या सम्राटांच्या पक्षातल्या घराणेशाहीविरुद्धचा न्याय त्यांच्या पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी कोणाच्या तोंडात वाजवून मिळवायचा तेवढं सांगितलं म्हणजे पुढे बोलायला सोपं जाईल. काय?
7 Sep 2010 - 2:20 pm | गणेशा
राजकारण मला आवडते, पण मला आवडणारे पक्ष किंवा नेते हेच सर्वश्रेष्ट आहेत .. आणि ते कसे हे इतरांना पटवुन द्यायला मला आवडत नाही . .. शिवसेना आवडते म्हंटले की न आवडणार्यांच्या प्रश्नाला उत्तरे द्यावी लागतात .. आणि नाही आवडत म्हंटले की आवडणार्यांच्या ज्वलंत प्रश्नांना बळी पडावे लागते .
तिकडे साहेब .. ठाकरे .. आणि सर्व मजेत असतात आणि आम्ही आपले येथे विनाकारण बोलत राहतो ..
- - -
तरीही मराठी असलेले खालील नेते मला जास्त आवडतात ... राजकारणात अनेक आमदार - खासदार - नेते त्यांच्या विभागात आणि राज्यात कामे करत असतात .. ज्याला जसा अनुभव तशे बोल
आवडते नेते :
१. शरद पवार ..
एक दुरदृष्टिकोन आणि जाणकार .. मुर्रबी राजकारणी . एक जबरदस्त व्यक्तीमत्व
विरोधक सुद्धा यांना साहेब च म्हणतात येव्हडा रुबाब ..
२. बाळासाहेब ठाकरे ..
अजोड संघटन कौशल्य .. थेट वार करणारी बोली .. आणि .. मनाचा राजा माणुस ..
३. राज ठाकरे ...
अप्रतिम संवादकौशल्य ... अभ्यासात्मक विचार ... तडफदार आणि धारदार नेतृत्व ...
----
बाकी शरद पवार नसतील तर राष्ट्रवादी शुन्य आहे...
बाळासाहेब नसतील तर शिवसेना नगन्य आहे ..
आणि राज ठाकरे नसतील तर मराठी स्वाभिमानी असलेली मनसे संपलेली आहे.
----------
7 Sep 2010 - 2:22 pm | विसोबा खेचर
करेक्ट.. :)
7 Sep 2010 - 2:33 pm | विशाल कुलकर्णी
+ १ : सहमत
9 Sep 2010 - 4:13 am | शुचि
>>शिवसेना आवडते म्हंटले की न आवडणार्यांच्या प्रश्नाला उत्तरे द्यावी लागतात .. आणि नाही आवडत म्हंटले की आवडणार्यांच्या ज्वलंत प्रश्नांना बळी पडावे लागते .>>
ह ह पु वा =)) =)) =))
7 Sep 2010 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही फक्त मिपाहॄदयसम्राट परा आणि संपादकहॄदयसम्राट अवलिया ह्यांनाच ओळखतो.
7 Sep 2010 - 2:51 pm | नितिन थत्ते
आम्ही फक्त नवे हिंदुहृदयसम्राट 'गांधीवादी' यांना ओळखतो.
7 Sep 2010 - 2:53 pm | इंटरनेटस्नेही
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुन १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली.
माहित आहे. हे एक तथ्य (फॅक्ट) आहे.
मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते.
बहुधा.
१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.
माहित नाही. कारण आम्ही आणि आमच्या सारखे अनेक नवमतदार तेव्हा पाळण्यात होते.
( शिवसेना पक्शावर बोलण्या सारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत )
असाव्यात.
आक्रमकपणा हा शिवसेनेचा बाणा आहे, आणि आंदोलन करणे हा शिवसेनेचा स्वभाव आहे.
बहुधा.
"तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळावा - पण न्याय हा मिळालाच पाहिजे!" हि साहेबांची शिकवण आहे.
हे मात्र बरोबर. पण न्याय झाला/होतोय का?
तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही.
बहुधा. निदान इतिहास तरी हेच सांगतो.
लोकांना शिवसेना हि विरोधी बाकांवर च हावी आहे ?
माहित नाही. पण इतिसासाकडे बघता हेच अनुमान निघते.
की अस्मिता आणि हिंदुत्व ह्याच्याशी लोकांना काही हि घेण-देण राहील नाही
आमच्या मते लोकांकडे अजुन काही मुद्दे असावेत, बहुधा.
7 Sep 2010 - 5:51 pm | तिमा
का ? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारुन पहावा. त्यांना मोठ्या आशेने जनतेने एकदा निवडून दिले होते. पण त्यानंतर काय काय झाले हे सर्वज्ञात आहे. लोकांच्या कानाखाली वाजवणारे स्वतः स्वच्छ राहिले असते तर एकदाच काय अनेकदा निवडून आले असते. कांग्रेजी राक्षसांना कायमची मूठमाती मिळाली असती. पण काँग्रेस जे शेण खाते तेच ह्यांनी पण खाऊन दाखवले. मग दोघांत फरक तो काय ? म्हणूनच ही आजची दुर्दैवी स्थिती आहे.
10 Sep 2010 - 3:25 pm | चिंतामणराव
+१
अगदी बरोबर. हे प्रामाणिकपणे कबुल करुन स्वच्छ कारभाराची ग्वाही देतील तर जनता क्षमाशील आहे, पुन्हा संधी देइल.
7 Sep 2010 - 7:15 pm | चिरोटा
ह्याचा अर्थ तोंडात वाजवूनही शिवसेना न्याय देवू शकणार नाही असे लोकांना वाटत असावे.!
उथळ अस्मिता,नारेबाजी फार काळ साथ देवू शकत नाहीत.
7 Sep 2010 - 7:19 pm | विश्नापा
दैनिक सकाळच्या वेबसाइटवरील ताजी बातमी
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांचे नाव न घेता, मी "बाटग्यांना' भेटत नाही असा ठाकरी शैलीत जोरदार टोला आज (मंगळवार) लगावला.
शिवसेना पुरस्कृत साहेब प्रतिष्ठानची दहीहंडी फोडणाऱ्या मंडळाचा सत्कार बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. "मनसे'चे आमदार बाळा नांदगावकर यांच्या माझगाव ताडवाडी येथील दहीहंडी पथकाने ही दहीहंडी फोडली होती. बाळासाहेबांच्या हस्ते सत्कार होणार असल्याने बाळा नांदगावकर जाणार का याविषयी चर्चा होती. पंरतु, या सोहळ्याला नांदगावकर यांना आमंत्रण दिले नव्हते. यावेळी बाळासाहेबांनी मी "बाटग्यांना' भेटत नसतो असा टोला लगावला.
दरम्यान, मला पुरस्कार स्वीकारण्याचे आमंत्रण आले तर माझगाव ताडवाडीचा एक कार्यकर्ता म्हणून मी दहीहंडीचे बक्षीस स्वीकारायला जाईल. बाळासाहेब हे ऋषितुल्य असल्याने त्यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारायला मला आवडेल, असे नांदगावकर यांनी म्हटले होते.
व त्यावरील प्रतिक्रिया
On 9/7/2010 6:18 PM Tatya Kote said:
आता मागे भुजबळांच्या गळ्यात गळे घातले होते ते विसरलात काय एवढ्यात...केस काढून घेतली मग लगेच बाटगा पावन करून घ्यायचा काय...याच लखोबाने (तुमच्या भाषेत) तुम्हाला अगदी T . बाळू म्हटलं होतं..आपण तरी त्यांना नुसते भेटला नाहीतर तर पोराबाळा सकट जेवण पण केलं त्याच्याबरोबर...काय तरी एक stand ठेवा...बाळासाहेब एका ला हा न्याय आणि दुसर्याला वेगळा हे बरोबर नाही...असो यात तुमचा मोठेपण नसून मनाचं कोतेपण दिसून येत...
On 9/7/2010 5:57 PM mandar said:
हि प्रतिक्रिया बाळासाहेबांचीच आहे का संजय किवा उद्धवउवाच ......
On 9/7/2010 5:49 PM Putanya said:
या सर्व प्रकारावर एक तोडगा आहे...राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख पद द्या...राज ठाकरे म्हातारे झाले कि त्यांनी पण ते पद पुतण्यालाच द्यावे अशी अट घाला...म्हणजे मग आदित्य ठाकरे कालांतरानी त्या पदासाठी उमेदवार असतील...गादी घरातच राहील आणि उगाच चुलता पुतण्या असा वाद होणार नाही...उद्धव पण खुश, तुम्ही खुश आणी राज पण खुश...आम्ही मराठी खुश उगाच या डोळ्यांनी शिवसेनेची दुर्दशा तर बघायला मिळणार नाही...
On 9/7/2010 5:47 PM DATTA said:
बाळासाहेबांनी अतिशय कष्ठ सोसून उभी केलेली संगठनेला यांनी छेद केला आहे. त्यांची जागा त्यांना दाखवायलाच हवी. बाळासाहेब जिंदाबाद
On 9/7/2010 5:45 PM Durdaivi Vadil said:
शिवसेनेचे कार्याध्यक्ष सर्वेसर्वा उद्धवजी अजून किती वर्ष वयोवृद्ध वडिलांच्या मागे लपून तीर चालवणार आहेत देव जाने...अहो कारभार घेतलाय ना हातात मग चालवा कि आपल्या कर्तुत्वावर.. एकदा वडिलांकडून तीर चालवायचे दुसरीकडे मिसरूड न फुटलेल्या मुलासाठी युवा सेना काढून त्याने तरुणांना आकर्षित करावा अशी अपेक्षा करायची...अरे देवा अजून काय वाढून ठेवलाय शिवसेनेच्या नशिबात देव जाने...मागे एकदा मराठी लोकांना पण आपण गद्दार म्हटलात काय तर तुम्हाला मत न देता मनसे ला दिली.. आता काय मग लोकांना पण भेटू नका...आराम करा..
On 9/7/2010 5:37 PM Dhrutrashtra Kaurvakar said:
बाळासाहेब संजय राउत, निर्मला गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर सारख्या धड्गुजारी नेत्यांना तुम्ही भेटता मग एके काळी शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलेल्या हाडाच्या कार्यकर्त्यांना फारतर भेटू नका पण त्यांचा असल्या शब्दात अपमान करून स्वतःचं महत्व कमी करू नका...तुम्ही बाटगा म्हटल्यानं भुजबळ, राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांचं काय वाईट झालं? त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळेच लोकांनी स्वीकारला ना? बाळा नांदगावकरचही शिवसेनेत असतानाचा योगदान कमी न्हवत...पुत्रप्रेमाची आंधळी शोकांतिका याशिवाय दुसरा समर्पक वाक्य नाही..
On 9/7/2010 5:36 PM sandip said:
वृद्धापकाळ ...............खूप वाईट
On 9/7/2010 5:28 PM Prabhodhan Vaghmare said:
अरेरे दुर्दैवी पण अपेक्षित प्रतिक्रिया... या वयात खरतर राजकारणापासून दूर राहून जुनी माणसं जोडायला हवीत...राज उद्धव आपापल्या मार्गाला लागले आहेत...त्यांच्या लायकीप्रमाणे ते आपापले पक्ष चालवतील आणि वाढवतील...या वयात आपण पक्षाच्या चौकटीच्या बाहेर येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करायची गरज आहे...कुणा एकाची बाजू घेऊन दुसर्यांवर शरसंधान करून आपण आपला मोठेपणा कमी करून घेऊ नये...भुजबळ, राणे, गणेश नाईक किवा राज ठाकरे आपापल्या कुवती प्रमाणे त्यांनी जनमानसात स्थान मिळवलं आहे..लोकमताचा आदर करायलाच हवा..
On 9/7/2010 5:28 PM Amit Pandit said:
ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वर आणले आज त्यांच्यामुळे तुम्ही आमदार झालात त्यांच्या पाठीत सुर घोपसून राज बरोबर गेलात मग आता त्यांना भेटण्याची काय अपेक्षा करतात mr बाला nandgaonkar . असल्या गद्दारांना असाच धडा शिकवला पाहिजे.
On 9/7/2010 5:22 PM Shreedhar Wakhare said:
म्हणजे भुजबळ साहेब बाटगे नव्हते ? अहो कसली आली आहे ठाकरी शैली. ठाकरे ठाकरी शैलीत बोलुन स्वतःच घायाळ होतात. दुसर्यांना बाटगे बोलायच्या आधी आपलेच घर बाटले आहे त्याचे काय ?
On 9/7/2010 5:18 PM sachin said:
इथेच तर चुकतो मराठी माणूस ,एवडा द्वेष नको .
On 9/7/2010 4:59 PM abhijit said:
..........बाळा ला बाळा भेटत नाही याला काय अर्थ नाही ..............................
On 9/7/2010 4:57 PM shivaji patil said:
बाळासाहेबांनी आत्म चितन करावे
On 9/7/2010 4:28 PM vikrant jadhav said:
नेहमी प्रमाणेच श्री बाळासाहेब बोलले नवीन काहीही नाही.
On 9/7/2010 4:23 PM उमेश said:
वा वा छान... म्हणजे मग अजून काही वर्षांनी कुणालाच भेटणार नाही वाटते ...
Thank you.
Your Comment will be published after Screening.
7 Sep 2010 - 7:40 pm | अनाम
येवढी उचेलेगीरी करण्यापेक्षा सरळ दुवा दिला असता तरी चालण्या सारख होत. :)
7 Sep 2010 - 8:56 pm | एक अनामी
तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही....
ह्याला उत्तर आपणच संवेदनशील (की संवेदनाहीन) जनताच ना... (आणि काही बाबतीत निवडणूक प्रक्रिया अशी अनेक कारणे ह्या चर्चेसाठी अजून एक काथ्याकूटचा धागा लागेल)
8 Sep 2010 - 12:26 am | कार्लोस
कुनाला हि ब्स्वा हेच होत रहनर
8 Sep 2010 - 12:34 am | सुनील
कुनाला हि ब्स्वा हेच होत रहनर
दहा पैकी फक्त चार गुण. स्वरांची रिडन्डन्सी पूर्ण गेलेली नाही. पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी वाक्य असे हवे -
क्न्ल ह ब्स्व ह्च ह्त र्ह्न्र
8 Sep 2010 - 12:40 am | चतुरंग
ध्न्य अह्त ह्सुन्ह्सुन प्द्लो! ;)
च्तुरंग
8 Sep 2010 - 12:45 am | सुनील
ध्न्य्व्द!
8 Sep 2010 - 7:45 am | नगरीनिरंजन
जपून बरं चतुरंगराव, 'प्द्लो' चा भलताच अर्थ निघायचा. ;-)
8 Sep 2010 - 9:43 am | सविता
अगदी हेच मनात आले माझ्या!!!!
8 Sep 2010 - 12:36 am | कार्लोस
कुणाला हि सत्ता द्या हे लोक वाट लावणारच
आज राज उद्या आणि कोणी
आज सत्ते मध्ये नाही म्हणून बोंबा मार्तेत उद्या सत्ता गेली कि बोंबा मारणार
स्वता काही तरी विचार करा उगाच नसत्या लफड्यात पडू नका
राजकारण करून ,समाज सेवा करून का ह्यांचे पोट भरतील हि मंडळी
बागा जमले तर नित विचार करावा .
कळावे
जरा सरळ बोललो म्हणून कुणाला काही राग आला तर उत्तमच
8 Sep 2010 - 1:06 am | विकास
मधेच असा लेख का आला? आणि त्यातही काही माहीतीपूर्ण असे दिसले असते तर बरे झाले असते. असो.
बाळासाहेबांबद्दल जे "चार" शब्द आपण लिहीलेत त्यात अजून एक म्हणजे - वक्तृत्व. ते कुणाला आवडोत अथवा न आवडोत त्यांची वक्तृत्वशैली (विशेष करून ऐन उमेदीच्या काळातली) फारच चांगली आहे (होती). दुसरे म्हणजे आपण एखादी गोष्ट फटकारत का बोलतो, त्याचा अर्थ, गर्भितार्थ, ऐकणारे, कुणासाठी म्हणले आहे, ह्याचे पूर्ण भान असलेला मुरब्बी राजकारणी असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल.
१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.
तेच १९८३ च्या ठाणे-भिवंडी दंगलीच्या संदर्भात म्हणता येईल. सरकारने दंगलखोरांना नियंत्रणात आणण्याऐवजी राजकारण करण्यावर भर दिला तर त्याचा असा परीणाम होतो. असे एखाद्या पक्षाने अथवा समुहाने रक्षण केले वगैरे म्हणावे लागणे हे एकाअर्थी कायदासुव्यवस्था असायला हव्या असलेल्या देशाचे दुर्दैव आहे.
"तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळावा - पण न्याय हा मिळालाच पाहिजे!"
तान्हे मूल जेंव्हा भुकेले असते तेंव्हा जोरजोरात रडते, थोडे मोठे झालेले भुकेले मूल आरडाओरडा करणे/आदळाआपट करणे वगैरे करत आईला खायला मागते. मात्र तेच मूल जेंव्हा विशीच काय पंधरावर्षच्या वरचे झाले तरी तसेच वागले तर आई पण कानाखाली आवाज काढेल. शिवसेना हा पक्ष आता वयाने मोठा झाला आहे. त्याबरोबर पक्षाचे वागणे पण प्रौढ असले पाहीजे. मात्र पक्षातील अनुयायी त्यांच्या नेत्याचे नावच वागण्यासाठी लक्षात ठेवत आहेत...
तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही.
जेंव्हा आले, तेंव्हा "त्यांनी चाळीस वर्षे खाल्ले, आम्ही चार वर्षे खाल्ले म्हणून काय बिघडले?" असे म्हणले आणि पहील्यांदा बिघडले. नंतर दोन भावांच्या भांडणात पक्षाला वेठीस धरले. मग काय होणार? जनतेचा जेंव्हा अपेक्षाभंग होतो तेंव्हा होणारी शिक्षा ही रोजच्या चोरांना होणार्या शिक्षेपेक्षा अधिक असते. :-(
------------------------------------------
वर सुनील यांनी त्यांच्या आणिबाणीला पाठींबा केलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. तो खरा आहे. मात्र त्यासंदर्भात देखील एक लक्षात ठेवायला हवे की त्यांनी ते कधी नाकारले नाही अथवा माझ्यामाहीती प्रमाणे ते म्हणणे मागे देखील घेतले नाहीत. तसले गट्स असलेला हा कदाचीत एकमेव राजकारणी असावा. - हे त्यांचीबाजू ती देखील आणिबाणीसंदर्भात घेण्यासाठी वगैरे म्हणून नाही तर केवळ निरीक्षण म्हणून आहे इतकेच...
8 Sep 2010 - 11:26 am | इन्द्र्राज पवार
"आपण एखादी गोष्ट फटकारत का बोलतो, त्याचा अर्थ, गर्भितार्थ, ऐकणारे, कुणासाठी म्हणले आहे, ह्याचे पूर्ण भान असलेला मुरब्बी राजकारणी असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल."
~~ श्री.विकास यांच्या या निरिक्षणाला होकार दिलाच पाहिजे, पण पुढेपुढे त्याचा अतिरेक होत गेला आणि मुरब्बीपणाचे भान सुटत जावून केवळ फटकारण्याचा झाडूच लोकांना प्रकर्षाने दिसू लागला, हे मान्य केल्यास निरपेक्षवृत्तीने श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाकडे आणि त्यांच्या विचारप्रणालीकडे पाहता येईल. बाळासाहेबांची अमोघ वाणी ही खरंतर शिवसेनेची खरी तलवार. या तलवारीच्या छायेखाली ज्या तृणपात्यांनी पुढे झाडाचे रूप धारण केले, त्यावेळी त्यांनाही आपण म्हणजे 'प्रती बाळासाहेब' असेच वाटू लागले आणि या गल्लीबोळातील पुढार्यांनी 'भाषण म्हणजे शिवीगाळ...राडा...दंगा...चिंध्या...विस्कटून टाकतो..." हीच भूते लोकांच्यासमोर नाचविली. सुरुवातीला चौक संस्कृतीत जमलेल्यांना ही अभद्र भाषा [टाळ्याखाऊ असल्याने] बरी वाटली. पण मतदार संघाच्या अस्ताव्यस्तपणाचा विचार करता सर्वच ठिकाणी तसल्या भाषेचे स्वागत होत नसते.
श्री.ठाकरे यांनी या त्यांच्याभोवती जमा झालेल्या 'पुरुषोत्तमां'ना (विशेषतः त्यांच्या बेलगाम भाषेला) आवर घातला नाही, आणि पुढे हाच वामन त्यांच्या डोक्यावर बसू लागल्यावर मात्र त्यांचा तोल सुटला. मग 'राज' पंगतीत आपली पाने मांडायला गेलेल्यांना कोणत्या भाषेत त्यानी आहेर केले हे आपण जाणतोच.
काही इंग्रजी पत्रकारांनी सेना सत्तेवर असो वा नसो, बाळासाहेबांच्या राजकारणाचे वर्णन कायमपणे फॅसिझमसम आहे असेच केले. फॅसिझममधील सत्ताधार्यांना अभिप्रेत असलेली "हिंसा" हिचा पुरस्कार जरी बाळासाहेबांनी कधी केला नसला तरी अन्य दोन वैशिष्ठ्ये 'अहंकार', आणि 'विरोधकांविषयी तिरस्कार' यांचा मात्र त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी स्थापनेपासून स्वीकार केला आहे. फॅसिझम विचारांची अंमलबजावणी 'हुकुमशाही' राज्यपद्धतीत ठीक आहे, पण भारतासारख्या खंडप्राय देशात, जिथे लोकशाहीच्या मुळांची वीण जनमानसात घट्ट आहे, तिथे अन्य भडकाऊ विचारसरणी रुजणे शक्यच नाही.
श्री.शरद पवार यांच्या राजकारणाचा श्री.बाळासाहेब ठाकरे यांनी (राजकीय पटलावरील चालीमुळे) विरोध करणे निकोप लोकशाहीचे लक्षण मानू या...पण हा विरोध जेव्हा तिरस्काराच्या पातळीवर जातो, त्यावेळी भाषेचे भान असे काही सुटते की, आपण पवारांच्या राजकारणाला विरोध करीत आहोत की, समोर बसलेल्या हजारो श्रोत्यांसाठी "हसविण्याचा माझा धंदा..." हा हमखास टाळ्या घेणारा कार्यक्रम करीत आहोत याची सीमारेषा ते विसरून जातात.
"ते मैद्याचे पोते काल सोनियासमोर कडमडले..." ~~ टाळ्या. "बारामतीकराचे बारा उद्या वाजविणार..." ~~ परत टाळ्या :: कसली ही भाषा...आणि कोण ते टाळ्या वाजविणारे? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेल्या वर्षातच शरद पवार 'बारामती' मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्या दिवसापासून मुळामुठेखालून कितीही पाणी वाहिले तरी ते तिथून हमखास निवडून येतातच आणि राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात सातत्याने सक्रीय आहेतच, हा इतिहास आहे. (प्रश्न ते 'कसे' येतात हा नसून 'येतात' हा आहे, तसेच त्यांच्या राजकारणाचे पीक कुठल्या प्रतीचे आहे, ते त्यांनी कसे कमावले आहे....याबाबी वेगळया धाग्याच्या अंतर्गत येतात, त्यामुळे त्यांच्या निवड यशाचे विश्लेषण इथे नको.)
पुढे पुढे "शरद पवार" नावाची अॅलर्जी इतकी वाढली की, कोल्हापुरात बाळासाहेबांचा एक जंगी सत्कार वरूणतीर्थ मैदानावर करवीरकरांनी केला होता. त्या सभेत दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये कलाशिक्षण घेणार्या एका विद्यार्थ्यांने त्यांचे एक मोठे आणि अतिशय देखणे असे ऑईल केले होते...ते त्या तरूणाने सभेत बाळासाहेबांना प्रदान केले, ते त्यांनी स्वीकारले, चित्रकाराच्या पाठीवर शाबासकीची थापही मारली, माईकसमोर येऊन त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली, आणि त्याच्याकडे वळून 'अरे तुझे नाव काय?' असे सहज विचारले, तर तो तरूण विनयाने म्हणाला, "सुरेश पवार..." झाले, आता या आडनावाच्या अनुषंगाने जमलेल्या हजारो लोकांच्यासमोर काहीतरी टवाळकी टाईप विनोद केलाच पाहिजे, म्हणून मग बाळासाहेबांनी, "अरेरे, इतका चांगला तू चित्रकार, आणि हे देवाने तुला कसले आडनांव दिले रे ?" ~ काय बोलणार तो बिचारा चित्रकार यावर? लोकही नेहमीप्रमाणे हसले.
त्यामुळे 'टोकाचा तिरस्कार' हे त्यांचे ट्रेड सीक्रेटच बनले जणू.....'जावेद मियाँदाद' चे 'मातुश्री' वर स्वागत होते, जेवणेही होतात....हे ठीक आहे. पण हाच जावेद मियाँदाद' बारामतीच्या फार्मवर गेला असता तर?
इन्द्रा
8 Sep 2010 - 9:55 pm | चिरोटा
ही अॅलर्जी फक्त लोकांना दाखवण्यासाठी होती. खाजगीत पवार-ठाकरे कुटूंबियांचे उत्तम संबंध आहेत. 'सामना' मधून ठाकरे ह्यांनी 'आमचे खास मित्र शरदबाबु' असा उल्लेखही अनेकवेळा केला आहे.तसे सर्वपक्षीय राजकारण्यांचे एकमेकांशी चांगले संबध असतातच म्हणा.!
8 Sep 2010 - 11:31 am | आप्पा
नमस्कार मंडळी,
मी एक माजी शिवसैनिक. माजी या अर्थाने आता संघटनेपासुन दुर आहे. १९७९ च्या सुमारास धर्मवीर आनंद दिघेसाहेबांमुळे शिवसेनेच्या कार्यात सहभागी झालो. ते २००५ पर्यंत ठाण्यात असे पर्यंत संघटनेशी संबंध होता. मुंबई-ठाणे येथील शिवसेना व इतर महाराष्ट्रातील शिवसेना येथील कामकाजात फरक आहे तो नक्की जाणवला.
१९९२ च्या दंगलीत सुरवातीला हिंदुवर बरेच हल्ले झाले. महिलांवर अत्याचार झाले. तेव्हा बाळासाहेबांनी सामनात लेख लिहुन प्रतिकार करण्याचे आदेश दिल्याचे आठवते. त्यापुढील इतिहास मुंबई ठाण्यातील लोकांना माहीत आहे. अर्थात इतर महाराष्ट्रातील लोकांना ती झळ पोचली नसल्याने त्याना या गोष्टीचे महत्व माहीत नाही. त्यावेळी हिंदुना आपल्या मागे कोणीतरी आहे याची जाणीव झाली. मला आठवते माझा एक मद्रासी मित्र मला म्हणाला होता ,"हम लोग बालासाहबकी वजहसे बच गये." १९८४च्या शिख विरोधी दंगलीच्या वेळी बाळासाहेबांमुळे मुंबई ठाण्यातील एकाही शिख बांधवाचे नुकसान झाले नव्हते.
शिवसेनेचे मुंबई ठाण्यातील सामाजीक कार्य खुप आहे. आनंद दिघेंचे काम ज्यानी बघीतले असेल त्यांचे या विषयावरील मत जाणुन घेण्यास आवडेल.
अर्थात शिवसेनेत काही वैयक्तिक न आवडणारे प्रसंग आले. छ्गन भुजबळ, गणेश नाईक व राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर वाईट वाटले.
असो. पण त्यामुळे बाळासाहेब व शिवसेना यांचे महत्व अबाधीत आहे व रहाणार.
जय महाराष्ट्र
8 Sep 2010 - 9:20 pm | गणेशा
अप्पा .. तुमची तळमळ आणि बोल मनाला भिडले एकदम.
दिघे साहेबांचे खुप नाव ऐकलेले आहे. उरुली कांचन आणि बारामती गाव असल्याने तेथील सगळ्या गोष्टी माहित आहे.
दिघे साहेबांच्या काही गोष्टी सांगीतल्यात तर आवडतील ऐकायला.
माझे गाव बारामती .. तेथील सुधारणा आणि माणसांचा झालेला विकास हे शरद पवाराच्या मुळेच साध्य झालेले आहे.
परंतु मुंबई- ठाणे शिवसेने मुळे तग धरुन आहे हे मान्य आहे.
एक बारामती कर असुन जेव्हडा मी साहेबांचा चाहता आहे.
तेव्हडाच उलट त्याही पेक्षा थोडा अधीक मी बाळासाहेब आणि राज ठाकरेंचा चाहता आहे.
आणि निवडनुक म्हणाल तर तेथील माणुस आणि त्यामागची सुधारणेची कास लक्स्।आत घेतो न्मी.
\
पण शिवसेनेचे मुंबईतील कार्य खरेच छान होते .. अआणि एक मराठी मआणुस म्हणुन त्याचा अभिमान वाटतो.
-- गणेशा
8 Sep 2010 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
च्यायला इथले काका लोक साधी बाटली पण देत नाहीत पुतण्यांना, आणि ह्यांना म्हणे पक्षाचे प्रमुखपद पाहिजे.
8 Sep 2010 - 11:50 pm | मिसळभोक्ता
इथले पुतणे लोक काकांना वगळून वेगळीच आपापली प्यार्टी करतात ! मग कोणता काका पुतण्यांना बाटली देईल ?
8 Sep 2010 - 12:37 pm | अमोल मेंढे
नाना पाटेकर चे मराठी साहीत्य संमेलनातील भाषण आहे का हो कुणाकडे..? असेल तर एकदा परत वाचुन पहा. अगदी खरा बोलला होता नाना. ( आज हा गेला उडत, उद्या तो, परवा आणखी कुणीतरी. बाळासाहेब एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळुन पहाल तेव्हा मागे कुणीच राहणार नाही. .....असाच काहीतरी बोलला होता)
9 Sep 2010 - 6:14 am | सन्जोप राव
या लेखाला प्रतिक्रिया म्हणजे अनुक्रमणिकेतले या लेखाचे नाव
'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख - नवीन - टग्या टवाळ'
यापेक्षा बोलके काही नाही.
9 Sep 2010 - 12:31 pm | चिगो
नाना पाटेकर जे बोलले ते पु.लं. ना पहिला "महाराष्ट्र भुषण" पुरस्कार मिळाल्यावर बाळाच्या प्रतिक्रीयेवर बोलले.. आणि त्यावेळी नानाचे भाषण खरेच सुरेख होते.
अवांतर - बाळाचा एक अगदी "बिलो द बेल्ट" वाग्बाण सांगतो.. सोनिया गांधींनी केसरींकडुन काँग्रेसचा पदभार घेतल्यानंतर हे पचकले, "बाई आली आणि केसरीची लंगोट टाईट झाली.'' कमीत कमी शिवाजीमहाराजांचा वारसा सांगत पक्ष स्थापना-यांनी तरी एका स्त्रीबद्दल हे जाहीर उद्गार काढू नयेत..
12 Sep 2010 - 1:42 pm | अप्पा जोगळेकर
नाना पाटेकर जे बोलले ते पु.लं. ना पहिला "महाराष्ट्र भुषण" पुरस्कार मिळाल्यावर बाळाच्या प्रतिक्रीयेवर बोलले.. आणि त्यावेळी नानाचे भाषण खरेच सुरेख होते.
पु. लं च्या बद्दल काय बरळला होता ? व्यनि ने कळवा. उगाच पुलंच्या सारख्या थोर माणसाबद्दलचे वाईट उद्गार जाहीरपणे नकोत. आणि बरळणार्या बद्दल बिलो द बेल्ट बोलताही येईल.
आताशा बाळासाहेबांची आणि शिवसैनिकांची कीव येते. कोणीही अपयशी ठरले, परीक्षेत नापास झाले, मॅच हरले की काय रे तुझी शिवसेना झाली का? किंवा का रे तुझे बाळासाहेब झाले का ? अस वाक्प्रचार सर्वत्र रूढ झाला आहे.
10 Sep 2010 - 12:29 am | चिगो
नाना पाटेकर जे बोलले ते पु.लं. ना पहिला "महाराष्ट्र भुषण" पुरस्कार मिळाल्यावर बाळाच्या प्रतिक्रीयेवर बोलले.. आणि त्यावेळी नानाचे भाषण खरेच सुरेख होते.
अवांतर - बाळाचा एक अगदी "बिलो द बेल्ट" वाग्बाण सांगतो.. सोनिया गांधींनी केसरींकडुन काँग्रेसचा पदभार घेतल्यानंतर हे पचकले, "बाई आली आणि केसरीची लंगोट टाईट झाली.'' कमीत कमी शिवाजीमहाराजांचा वारसा सांगत पक्ष स्थापना-यांनी तरी एका स्त्रीबद्दल हे जाहीर उद्गार काढू नयेत..
10 Sep 2010 - 1:09 am | मिलींद
मी लहानपणापासून ठाण्यात राहिला आहे.
माझा कोणत्याही राजकीय पारटिशी घेणा देणा नाही आहे तरी पण आनंद दिघे साहेब वारले त्या वेळेस माझ्या घरात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
बाळासाहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब -- एकदम जबरदस्त आणि मनाची मोठी माणसा
धर्मवीर आनंद दिघे साहेब -- ठाण्याच्या विकासासाठी सदैव लढणारा आणि शिवसेना वाढिविण्यासाठी आयुष्य वेचणारा देव माणूस. तुम्ही जे सामाजिक कार्य केले ते आजवर कोणालाच जमलेले नाही आणि जमणार पण नाही.
बाळासाहेब -- एक महान योद्धा आहे आणि योद्धा कधीही म्हातारा होत नाही.
10 Sep 2010 - 12:15 pm | आप्पा
धर्मवीर आनंद दिघे एक नाथ पंथीय योगी, ब्रह्मचारी, समाजसेवक, जगतमित्र, शिवसेनेचा खंदा सेनानी, हिंदुरक्षक, सर्व पक्षात, धर्मात, पंथात मित्र असणारा असामान्य माणुस.
त्यांचा दिवस लोकांसाठी सुरु व्हायचा सकाळि ११ वाजता, त्या आधी त्यांची वैयक्तीक कामे, पुजा, योगसाधना. त्यांचा दिवस संपायचा साधारण दुसर्या दिवशी पहाटे ३-४ च्या सुमारास. सदैव नागरीक व कार्यकर्त्यांच्या गराड्यात. लो़कांसाठी सतत धावणारा, सामान्य माणसांच्या जास्त जवळ असणारा, छोट्या कार्यकर्त्यांना मोठा करणारा पण स्वतः कधीही स्टेजवर न जाणारा नेता. त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा स्टेजवर गेले असतील ते पण प्रमुख पाहुण्यांच्या आग्रहाखातर अतिशय थोड्यावेळासाठी. त्यांनी कधी मोठी भाषणे केली नाहीत. आपल्या कोणत्याही नातेवाईकाला पदे दिली नाहीत. लग्नच केले नाही त्यामुळे कुठलेही पाश नाही. स्वतः भाड्याच्या जागेत रहात होते. तोच आनंद आश्रम. तेच कार्यालय. सामान्य नागरीक, शिवसैनिकांबरोबर इतर पक्षीयांचाही वावर कायम त्यांच्या कार्यालयात असायच. लहान मुलांना त्यांच्याकडे प्रथम स्थान होते. सामान्य नागरीकांचे आमंत्रण ही ते स्विकारायचे. व आवर्जुन जायचे. या माणसाला वैयक्तीक आयुष्य जणु नव्ह्तेच. त्यांच्या नंतर कोणीही दिघे तेथील राजकारणात दिसत नाही.
वसंत डावखरे यांच्या सारखे कट्टर राष्ट्र्वादी सुध्दा त्यांचे मित्र. आताचे आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे यांना त्यांनीच शुन्यातुन वर आणले. रवी फाटक यांच्या सारखे नारायण राणेंचे कार्यकर्ते त्यांचे शिष्य. त्यांचे चरित्र थोडक्यात लिहणे अशक्य. अर्थात एवढ्याशा लिखाणात मी त्यांची पुर्ण ओळख करुन देऊ शकलेलो नाही. शक्य असल्यास इतर ठाणेकरांनी मदत करावी व इतर माहीती व अनुभव लिहावेत हि विनंती.
11 Sep 2010 - 1:15 am | कुंदन
सिंघानिया रुग्णालयाच्या तोडफोडीचे काय ?
अपघात झाला रस्त्यावर , तोडफोड मात्र रुग्णालयाची.
11 Sep 2010 - 2:11 am | सुनील
सिंघानिया रुग्णालयाच्या तोडफोडीचे काय ?
रुग्णालयाच्या तोडफोडीसाठी दिघे थेट जबाबदार नाहीत. ते तर मृत्युमुखी पडले होते.
अर्थात, जे पेरावे ते उगवते ह्या नियमानुसार, तोडफोडीचीच शिकवण मिळालेल्यांकडून तोडफोड होणे अपेक्षितच होते! त्याप्रमाणे तोडफोड झाली आणि ठाणे एका चांगल्या रुग्णालयाला कायमचे मुकले.
12 Sep 2010 - 12:09 pm | आप्पा
सिंघानीया रुग्णालयाची मोडतोड झाली ती चुकीची होती यात शंका नाही. त्या घटनेच्या वेळी मी ठाण्यात होतो. दिघे साहेबांच्या अपघातामध्ये त्यांना फ्रॅक्चर झाले होते, त्यांची परिस्थीति सुधारत आहे असे निवेदन देण्यात आले होते. व अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. लोकांना सयंम राहीला नाही व रुग्णालयाची मोडतोड झाली. ठाकरे बंधुनाही लोकांनी जुमानले नाही. त्यांना मागील दरवाज्याने जाण्याची वेळ आली. अर्थात हे सर्व चुकीचे घडले पण जमाव जेंव्हा बिथरतो तेंव्हा त्या जमावाला नियंत्रणात ठेवणे हे कठीण असते.
महात्मा गांधीच्या हत्येनंतर झालेल्या महाराष्ट्रातील ब्राह्मण हत्या, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या हत्या हि त्याची उदाहरणे आहेत. या नेत्यांच्या ह्त्या करणारे व नंतरच्या हिंसाचारात मारले गेलेले निरपराध लोक यांचा काय संबध होता? एक तर या हिंसाचार करणार्या लोकांना कोणीतरी भडकवते किंवा काही लोक जुने राग किंवा सुड उगवतात असे वाटते.
आता ही चाललेला दादोजी कोंडदेवांच्या वादाला जातीय रुप दिले जात आहे असे वाटते. दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु होते किंवा नाही यावरुन हा वाद सुरु झाला. ते गुरु असोत किंवा नसोत ते महाराजांचे सेवक होते हे तरी निश्चित आहे. त्यांच्या बद्द्ल काही नतद्रष्ट माणसे काही कुजबुजतात. पण या गोष्टी फार थोड्या लोकांना माहीत आहेत पण अशा आंदोलनाने ही कुजबुज पसरवुन आपणच महाराजांची बदनामी करीत आहोत असे वाटते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या बद्दल वाईट बोलुन किंवा वाईट लिहुन त्यांचे महत्व कंमी होणार नाही.
12 Sep 2010 - 2:10 pm | आनंदयात्री
उत्तम उत्तर आणि सुयोग्य उदाहरणे.
12 Sep 2010 - 2:50 pm | सुनील
ठाकरे बंधुनाही लोकांनी जुमानले नाही. त्यांना मागील दरवाज्याने जाण्याची वेळ आली. अर्थात हे सर्व चुकीचे घडले पण जमाव जेंव्हा बिथरतो तेंव्हा त्या जमावाला नियंत्रणात ठेवणे हे कठीण असते.
हा हा हा!!!!!!!!!
जमावाला "हे तोडा", "हे पाडा", असले आदेश देऊन, xxxसम्राट किंवा xxxपुरुष इत्यादी इत्यादी बनलेले नेते जगाने पैशाला पासरी पाहिले आहेत!
परंतु, जमाव चुकीचे करतो आहे हे पाहून, जमावाला थांबण्याचा आदेश देणारे आणि तसे थांबवणारे फार फार कमी!
खूप मोठा फरक आहे दोघांच्यान जातकुळीत!
11 Sep 2010 - 1:08 am | अशक्त
http://www.youtube.com/watch?v=m_FLp9l3BPM&feature=related
6 Apr 2013 - 10:50 pm | आशु जोग
> बाकी शरद पवार नसतील तर राष्ट्रवादी शुन्य आहे...
बाळासाहेब नसतील तर शिवसेना नगन्य आहे .. >
बाकी शरद पवार नसतील तर
शिवसेना नगन्य आहे .. असेही म्हणायला हरकत नाही
कारण तेच आहेत खरे सेनाप्रमुख