या वाक्यांचा अर्थ काय?

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
7 Sep 2010 - 12:26 pm
गाभा: 

जालावर फिरतांना अचानक काही संस्कृत वाक्ये दिसली. त्यांचा अर्थ काय असावा हा प्रश्न मनात आला तरी जाणकारांनी आपापल्या परिने (विजुभाऊंची नव्हे) उत्तरे द्यावी ही णम्र इनंती

न लेखनं न व्यनीं तदपि च न जाने खरडमहो।
न प्रतिसादं सहमतम् तदपि च न जाने च्योपपेस्तम् ।
न जाने धोरणम् तदपि च न जाने डुआयडीम्।
परं जाने मालकानुसरणं क्लेशहरणम्।।

संकेतस्थळे सदस्यास्ते बहव: सन्ति सरला:।
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव मित्रम्।
मदीयोऽयं त्याग: समुचितमिदं नो तव आर्य।
कुसदस्य जायेत क्वचिदपि कुसंपादक न भवति।।

कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा

प्रतिक्रिया

मदीयोऽयं त्याग: समुचितमिदं नो तव आर्य।
कुसदस्य जायेत क्वचिदपि कुसंपादक न भवति।। >>>

(ईथे पाच-एकशे लोळणार्‍या स्मायली कल्पाव्यात )
ह्या नान्यात तं..

विसोबा खेचर's picture

7 Sep 2010 - 1:22 pm | विसोबा खेचर

जबरा रे नान्या....:)

तुझ्याकडे गीर्वाणभारती शिकायला केव्हापासून येऊ बोल! :)

तात्या.

छोटा डॉन's picture

7 Sep 2010 - 1:31 pm | छोटा डॉन

टीप :
१. आम्ही जाणकार नोहे.
२. आम्हाला संस्कृत अंमळ कमीच समजते.

आता आम्हाला कळालेला अर्थ सांगतो, अर्थात तो अनर्थही असु शकतो.

>> न लेखनं न व्यनीं तदपि च न जाने खरडमहो।
ही बहुदा 'लेखन अधिकार' काढुन घेतल्याची स्थिती असावी.
किंवा
'स्वयंघोषीत वाचनमात्र' हा प्रकारही असु शकतो. पण ह्यात बर्‍याचवेळा 'संयम पाळला जात नाही' म्हणुन नानाना अपेक्षित असलेला अर्थ हा नसावा असे वाटते.

>> न प्रतिसादं सहमतम् तदपि च न जाने च्योपपेस्तम् ।
हे बहुतेक आमचेच वर्णन आहे, नान्याचा निषेध !

>> न जाने धोरणम् तदपि च न जाने डुआयडीम्।
वा वा, नान्याने ह्यात त्याच्या स्वतःवरही भाष्य केल्याचे आवडले ;)

>> परं जाने मालकानुसरणं क्लेशहरणम्।।
नाय कळाले ... ;)

बाकी नंतर सवडीन ..

सूड's picture

7 Sep 2010 - 1:41 pm | सूड

>>संकेतस्थळे सदस्यास्ते बहव: सन्ति सरला:।

या ओळीशी अगदी सहमत. :D.