गाभा:
सध्याच्या मॉडर्न जगात मुले व मुली यांना समान हक्क आहेत असे मानले मुला, समानतेने वागवले जाते.
तरीही काही ठिकाणी पालकांनी अथवा सासरच्या लोकांनी मुलींना कमी लेखणे, अन्याय करणे.
नव-याने बायकोला अथवा प्रियकराने प्रेयसीला "taken for granted" समजणे. असे प्रकार आजही होत आहेत.
असेच जर मुलीच्या घरचे जावयाशी वागले किंवा बायकोने नव-याला अथवा प्रियकराला "taken for granted" समजले तर चालेल का?? सर्व बंधने मुलींवरच का?? प्रत्येकवेळी तिने अॅडजस्ट करावे, समजून घ्यावे, माफ करावे ही भावना का?? हे कितपत योग्य आहे.???
या बाबत तुमचे मत काय?
प्रतिक्रिया
5 Sep 2010 - 5:22 pm | सुनील
याबाबत युयुत्सूरावांचे मत जाणण्यास उत्सुक!
5 Sep 2010 - 5:36 pm | शानबा५१२
खीईईई जबराट जॉक!!
बाकी असा फरक करणे म्हणजे आपल्या बेअकलीचे प्रदर्शन करणे.
साला तो एक क्रोमोझोम फास्ट पळाला काय नी हे सर्व लफडे काय सुरु झाले.
Lowering ITS speed may give results,we can achieve decrease in speed by varying the composition of mobile phase or pressure in chromatography but that is not applicable in the case.
5 Sep 2010 - 5:59 pm | अप्पा जोगळेकर
असेच म्हणतो.
5 Sep 2010 - 5:34 pm | यशवंतकुलकर्णी
तुमचा काहीतरी घोळ होतोय का?? मला वाटते जेव्हा आपण कुणाला टेकन फॉर ग्रॅंटेड घेतो तेव्हाच आणि फक्त तेव्हाच कुणीतरी कुणाचा जावाई होतो, बाई असेल तर बायको होते आणि पुरूष असेल तर नवरा होतो... अमुक माणूस हा अमुक माणसाचा नॉट टेकन फॉर ग्रॅंटेड जावई आहे किंवा अमुक बाई ही अमुक माणसाची नॉट टेकन फॉर ग्रॅंटेड बायको आहे किंवा तमुक माणूस हा अमुक बाईचा नॉट टेकन फॉर ग्रॅंटेड नवरा आहे असं मी कधीच ऐकलंलं नाही....
की असंही होऊ लागलंय आजकाल, लोकांचा काही भरवसा नाही म्हणून विचारतोय..
आणि बंधने वगैरे फक्त मुलींवर नाहीत, मुली प्रत्येकवेळी अॅडजस्ट करतात, माफ करतात असंही नाही..तुम्हाला आज ही गोष्ट जाणवली इतकंच.
5 Sep 2010 - 5:40 pm | विनायक प्रभू
१. किक द बगर हु टेक्स यु फॉर ग्रँटेड
२. डोन्ट कंप्लेंट, एन्जॉय इट.
5 Sep 2010 - 5:51 pm | शुचि
मेनापॉजच्या काळात सगळं उट्टं बरोबर निघतं.
5 Sep 2010 - 9:41 pm | शिल्पा ब
हॅ हॅ हॅ...हे भारी..
पण तोपर्यंत आयुष्यातला बऱ्याचश्या आनंदाला आपण मुकलेलो असतो त्याचे काय? मानसिक घावांचे काय?
5 Sep 2010 - 9:46 pm | युयुत्सु
स्त्री स्व-संरक्षण करण्यास असमर्थ असल्याने ती सांभाळ करायची वस्तू बनली. यातून जी स्वामित्वाची भावना निर्माण झाली त्यामुळे ही बंधने निर्माण झाली.
5 Sep 2010 - 10:10 pm | शिल्पा ब
<<स्त्री स्व-संरक्षण करण्यास असमर्थ असल्याने ती सांभाळ करायची वस्तू बनली.
वा वा !!! बहुदा असेच आपले उच्च विचार माहिती असल्याने बायका आपल्याशी नीट वागत नसाव्यात अन त्यामुळे तुमची तणतण होते..असो.
तुम्हाला कोणी सांगितले कि बायका स्वसंरक्षण करू शकत नाहीत ते? पूर्वीच्या काळी बायका शेती करत असत, त्यांच्या मुलांची काळजी घेत असत...पुरुष फक्त शिकार करीत असे...बायकांनी विचार केला असेल कि यांना अजून थोडे कामाला लावावे आपल्याला मदत होईल अन त्या नादात त्या स्वतःचीच ओळख विसरत गेल्या..अन आताशा स्वामित्वाची भावना वगैरे स्वत्वावरच घाला घालणाऱ्या विचारांना बायका फाट्यावर मारायला शिकताहेत हि चांगली गोष्ट आहे...अन असे झाले कि लगेच तुमचे पुरुषमुक्ती चे झेंडे फडकतात .
5 Sep 2010 - 10:20 pm | युयुत्सु
'स्वसंरक्षण' या शब्दाचा अर्थ आपल्याला कळू नये याचे आश्चर्य वाटले.
5 Sep 2010 - 10:49 pm | शिल्पा ब
अर्थ मला माहित आहे...आपण पूर्ण प्रतिसादातील एकाच वाक्यावर लक्ष केंद्रित केले आहे...संपूर्ण प्रतिसाद हे उत्तर आहे..
अन स्त्रिया जास्त खंबीर असतात...त्या स्वसंरक्षण करायला समर्थ आहेत...तसे नसते तर विधवांना मुले वाढवणे शक्य झाले नसते..(.हे केवळ एक उदा. म्हणून दिले आहे. )
6 Sep 2010 - 1:08 pm | Pain
स्त्री स्व-संरक्षण करण्यास असमर्थ असल्याने ती सांभाळ करायची वस्तू बनली.
वा वा !!! बहुदा असेच आपले उच्च विचार माहिती असल्याने बायका आपल्याशी नीट वागत नसाव्यात अन त्यामुळे तुमची तणतण होते..असो.
हे उच्च विचार नसून वस्तुस्थिती आहे/होती.
तुम्ही इतिहासाची थोडीफार तरी पुस्तके वाचा, सध्या आजूबाजूला ( विकसनशील आणि आविकसित देशांमधे) काय चालू आहे ते बघा आणि मग बोला.
6 Sep 2010 - 9:49 pm | शिल्पा ब
<<तुम्ही इतिहासाची थोडीफार तरी पुस्तके वाचा, सध्या आजूबाजूला ( विकसनशील आणि आविकसित देशांमधे) काय चालू आहे ते बघा आणि मग बोला.
विकसित अन विकसनशील देशांमध्ये जे काही आहे त्याला स्त्रियांना संरक्षण येत नाही म्हणून नाही तर इतक्या वर्षांच्या दबावामुळे / ब्रेनवॉशिंगमुळे आहे...काय चालू आहे ते मला व्यवस्थित कळतेय म्हणूनच लिहिलेय..
तुम्ही थोडासा विचार करायचा प्रयत्न करा अन मगच लिहा.
6 Sep 2010 - 11:09 pm | Pain
विकसित अन विकसनशील देशांमध्ये जे काही आहे त्याला स्त्रियांना संरक्षण येत नाही म्हणून नाही तर इतक्या वर्षांच्या दबावामुळे / ब्रेनवॉशिंगमुळे आहे...
हास्यस्पद आणि खोटे. आणि कारणे जरी बाजूला ठेवली तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे आणि स्त्रियांकडून पुरुषांवर होणारे (?) बलात्कार इ. यांच्या आकडेवारीची तुलना करा.
शिवाय
आपल्यासारख्या पांढरपेशा मुलीबाळींचे घराबाहेर फिरणे अशक्य व्हायचे..
हे तुमचे वाक्य पाहता तुम्ही या धाग्यावर जे बोलता त्याला काहीच अर्थ उरत नाही. मग कशाला उगाच गुरुत्वाकर्षणासारख्या वस्तुस्थितीबद्दल वाद घालता ?
7 Sep 2010 - 12:08 am | शिल्पा ब
<<आपल्यासारख्या पांढरपेशा मुलीबाळींचे घराबाहेर फिरणे अशक्य व्हायचे..
मी हे शरीरविक्रयाच्या व्यवसायात असणार्यांबद्दल म्हंटले आहे...कोणत्याही कारणाने या व्यवसायात आलेल्या व्यक्ती असुदेत जर हा व्यवसाय नसता तर काय होऊ शकते हे मी सांगितले आहे...
राहिला तुमचा आकडेवारीचा मुद्दा...त्याबद्दल हास्यास्पद हेच म्हणणे योग्य होईल कारण स्त्रियांवर पुरुषांकडून होणारे अत्याचार हे जास्त प्रमाणात आहेत हि वस्तुस्थिती आहे...तुम्हाला मान्य करायची नाही तो तुमचा प्रश्न. अन जे तुम्ही खोटे म्हणताहात ते कशावरुन हे सांगितले तर बरे होइल.
( युयुत्सुंना मदत म्हणून पुरुषमुक्ती संघटनेत सहभागी होणार का?).
धन्यवाद.
7 Sep 2010 - 8:45 am | Pain
तुम्हाला मी काय लिहिले आहे ते कळले नाही.
स्त्रियांवर होणारे अत्याचार खूप जास्त आहेत, त्यामानाने पुरुषांवर होणारे जवळजवळ नाहीतच ( म्हणून कंसात "?" दिले आहे)
त्या तुलनेवरून स्त्रियांना संरक्षणाची गरज आहे हे सिद्ध होते.
6 Sep 2010 - 8:15 am | युयुत्सु
आपला संपूर्ण प्रतिसाद हा माझ्या दृष्टीने निरर्थक आहे कारण मूळ मुद्दयाला सोडून आहे. स्त्री जर खरोखर समर्थ असती तर आज चालू असलेली पुरुषविरोधी ओरड आणि कायदे करायची गरज निर्माण झाली नसती.
6 Sep 2010 - 9:03 am | शिल्पा ब
स्त्रियांवर बंधने का आली ते मी लिहिलेले आहे...आणि ती बंधने आजच्या स्त्रिया झुगारून देत आहेत...
पुरुषविरोधी ओरडा हा स्त्रियांवर आलेल्या जाचक बंधानामुळेच आहे...माझा प्रतिसाद पूर्णपणे विषयाला धरूनच आहे...नीट वाचून समजून घ्या...मग कळेल.
6 Sep 2010 - 8:24 am | बेसनलाडू
एकाच दिवसात आलेले काही रोचक धागे पाहून मिसळपावच्या वाचकांनाच टेकन फॉर ग्रान्टेड समजले जाते आहे की काय, अशी भीती वाटत आहे.
(भयभीत)बेसनलाडू
काही प्रश्न -
१. बायकोने/प्रेयसीने नवर्याला/प्रियकराला टेकन फॉर ग्रान्टेड समजले तर चालेल का?
२. पुरुषांनी बायकांकडून होणार्या शारीरिक/मानसिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवलेला चालेल का?
३. एकंदरीतच कुणीही कुणाला टेकन फॉर ग्रान्टेड घेतले तर चालेल का? (लेखकांनी वाचकांना, गायकांनी श्रोत्यांना इ.)
(जिज्ञासू)बेसनलाडू
6 Sep 2010 - 10:29 am | ज्ञानोबाचे पैजार
या भारत वर्षाने अनेक प्रकारचे अन्याय पाहीले आहेत. या अन्यायग्रस्त लोकांसाठी अनेक स्वयंघोषित मसीहे पण आता पुढे येत आहेत.
माणुस इतर प्राण्यांवर / निसर्गावर स्वतःच्या स्वार्था साठी अत्याचार करतो.
पुरुषांनी बायकांवर अनेक अत्याचार केले.
ब्राम्हणांनी इतर मानव जातींवर जातिंवर अनन्वीत अत्याचार केले (अगदी ईतिहासाचा सुध्द्दा विपर्यास केला असे माझ्या वाचनात नुकतेच आले आहे. माझ्या एका विद्वान मित्राने आता खरा इतिहास लिहायला सुरुवात केली आहे.)
म्हणजे पुर्वापार काळा पासुन फक्त ब्राम्हण पुरुषच सुखाने जगत आले आहेत. बाकीच्यांवर जगात दुसरे कोणीतरी सतत अत्याचार करत असतात. संख्येने २%पेक्षा कमी असलेले इतर ९८% ना वेठीला धरतात.
(बाकी कोकणस्थ ब्राम्हणांनी देशस्थ ब्राम्हणांवर अत्याचार केले याची अजुन तरी कुठे नोंद नाही. कोणितरी धागा सुरु करा रे)
समर्थांच्या जनी सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्णाला "ब्राम्हण पुरुष असेच द्यावे लागेल"
सध्या अशा अनेक पिडीत लोकांचे संमेलन मि.पा. वर भरले आहे. चला आपणही आपल्यावर होत असलेल्या अन्यायांना वाचा फोडुया,
लांडगा आणि कोकराची गोष्ट लक्षात ठेवा आणि तू नाही तर तुझ्या बापाने पाणी खराब केले असे म्हणायला लागा. आणि मग मजा पहा आपल्यावर होणार्या कितीतरी अत्याचारांची जाणिव तुम्हाला होईल. तुमच्या असे लक्षात येईल की कोकरा सारखे असणारे लहानगे जीव सुध्दा आपल्या सारख्या लांडग्यांवर कीती अत्याचार करत आहेत.
पैजारबुवा,
6 Sep 2010 - 1:19 pm | Pain
.