बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी
(१) बुद्ध आणि चातुर्वर्ण
(अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो.
(आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई. बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.
(२)बौद्ध धर्म प्रसार
बुद्धाच्या हयातीत फक्त १०५ भिक्षू संघांत सामिल झाले होते. त्यातले ब्राह्मण ३९, क्षत्रिय २८, (बरेचसे त्याच्याच शाक्य कुळातले), उच्चकुलीन २१, व फक्त ८ शूद्र जातीतले. ब्राह्मणातले सुखवस्तूच जास्त, पुरोहित वगैरे नगण्य. बुद्धाच्या हयातीत अस्पृष्यांनी त्याकडे फार लक्ष दिलेले दिसत नाही. ( क्र. ३ पहा.)
(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.
(४) तात्विक फरक
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही. याचे साधे कारण हिन्दू विचारसारणीतली विविधता. तुम्ही कोणताही तत्वज्ञानातला विचार मांडावयाचा ठरवला तर येथील कोणत्या तरी दर्शनात त्याची पुसट का होईना छाया तुम्हाला आढळून येईलच. बुद्ध धर्मातील किती तरी विचार उपनिषदांत दिसतात. डॉ. र्हिस डेव्हिड्स (पाश्चात्यांना बौद्ध धर्माची ओळख करून देणारा, "बुद्धिझम" या ग्रंथाचा लेखक) म्हणतो "" गौतम बुद्ध हा अतिशय शहाणा,विद्वान, थोर पुरुष होता. तो सर्वोत्कृष्ठ हिन्दू होता." दुसर्या बाजूने जगत्गुरू शंकराचार्यांना "प्रच्छन्यबुद्ध" म्हणतात. दोघेही सरळ किंवा आडवळणाने वेदप्रामाण्य नाकारतातच. दोघांनाही पुनर्जन्म मान्य आहे. वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.
(५) डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्म
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला. पण या धर्मांतरात तांत्रिक गोंधळ झालाच. डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
शरद
प्रतिक्रिया
5 Sep 2010 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे
प्रतिसादात जरुर लिहा!
5 Sep 2010 - 1:41 pm | शेलार मामा मालुसरे
>>>>>महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.<<<<<
आज जे लोक किंवा अनुयायी किंवा रिपब्लिकन कार्यकर्ते आम्ही बुध्दिस्ट आहोत असा शंखनाद करत असतात त्या सर्वांनी (एखादा अपवाद वगळून) कधीही बुध्दाच्या पंचशील तत्वांचे पालन केल्याचे तसुभरही आढळून येत नाही.
चांगल्या विषयावरील धागा टाकला आहे.
अवांतर - http://www.youtube.com/watch?v=s1QM0F4crr8
5 Sep 2010 - 1:37 pm | शेलार मामा मालुसरे
सध्याच्या (तथाकथित) बुध्दांच्या अनुयायांच्या विचारांचे मुल्यमापनही करायला पाहिजे.
5 Sep 2010 - 6:49 pm | दत्ता काळे
महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही.
इथे त्यांना कोणी समजावून सांगावे हे अपेक्षीत आहे ? - कारण इतर ज्ञात धर्मात जे धर्मप्रमुख असतात. उदा. ख्रिश्चन धर्मात पोप, हिंदू धर्मात शंकराचार्य, मुस्लिम धर्मात शाही इमाम तसे बौध्द धर्मात आदेश / आज्ञा देणारे , फतवे काढणारे धर्मप्रमुख खूप अभावानेच दिसतात. त्यामुळेच मग डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत
पध्दत ठरविणार कोण ? जी ठरवली गेली ती चुकीची कशी ?
दुसरे म्हणजे बर्याच अंशी बौध्द धर्म हा - धर्म म्हणून मानण्यापेक्षा ती विचारप्रणाली म्हणूनच विचार केला जातो. त्या विचारसरणीमध्ये माणसाचे दैनंदिन आचरण , व्यक्ती-व्यक्तीमधले नाते आणि जगण्या मरण्याचा दृष्टीकोन ह्यावर मूलतः भर दिलेला दिसतो. त्यामध्ये काटेकोर आग्रह नाही. कारण धर्माची कठोर चौकट नाही. उदा. झेन विचारप्रणाली. अनेक झेनगुरु होऊन गेले त्यांच्या विचारात 'बुध्दासारखेच सर्वांनी वागावे' असे दिसणार नाही, परंतु जे वागणे योग्य वाटत नाही ते वागणे बुध्दासारखे नाही असे ते म्हणतात. ह्याचाच अर्थ कसे वागावे ह्या बाबत चौकट ठरलेली नाही, पण माणसाकडे काय आचरण असावे - मग त्यात अहिंसा, करुणा, प्रेम, त्याग, आत्मज्ञान- ह्याची समज दिलेली आहे.
एकूण हिंसेला स्थान नाही त्यामुळे शत्रू ही संकल्पनाच नाही. फक्त आत्मसंरक्षणासाठी उपयोगी पडेल अशी विद्या शिकून घेण्यावर भर आहे पण त्याचा आक्रमतेने, हव्यासापोटी वापर करण्यावर बंधन आहे. शत्रू नसल्यामुळे युध्द / क्रुसेडस / जिहाद नाहीत.
आता प्रश्न उरतो कि त्यांच्या अनुयायांनी केवळ प्रेम, करुणा अहिंसा ह्याचाच विचार करायचा कां ?(कारण त्यांनी बौध्द धर्माचे अनुकरण केले म्हणून ) ह्याचे उत्तर सध्याच्या काळात सुचणे अवघड आहे. असे गमतीने म्हणता येईल कि त्यांनी हे विचार सोडावेत आणि इतर कुठल्याही धर्मात प्रवेश करावा. तिथे हे शत्रू ठरलेलेच असतात ( अगदी धर्माच्या सुरवातीच्या काळापासूनच ) आणि त्याचा नि:पात करणे हे देखील धर्माच्या विचारसरणीला अनुसरून असते.
8 Sep 2010 - 7:13 pm | प्रशु
पध्दत ठरविणार कोण ? जी ठरवली गेली ती चुकीची कशी ?
स्वतः बुद्धाने ठरवली आहे..
संदर्भ.
पैस आणी दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा...
5 Sep 2010 - 9:27 pm | युयुत्सु
हे अर्धसत्य आहे. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले, वेद प्रामाण्य नाकारले, कारणा शिवाय कार्य घडते ही कल्पना, हे फरक हिन्दू आणि बौद्ध धर्मात आहेत.
आत्म्याचे अस्तित्व नाकरण्यासाठी बौद्धानी केलेला युक्तिवाद हा भारतीय तर्कशास्त्राच्या इतिहासातला अजोड नमूना आहे.
5 Sep 2010 - 9:30 pm | युयुत्सु
सहमत आहे.
5 Sep 2010 - 9:37 pm | युयुत्सु
बौद्ध धर्मात मोक्ष ही कल्पना नाही. तर निर्वाण ही कल्पना आहे. निर्वाण हे याच जन्मात साधता येते मात्र मोक्ष याच जन्मात मिळत नाही. कोणतीही दरी पार करणे म्हणजे निर्वाण असा या संकल्पनेचा अर्थ एका बौद्ध पंडीताने सांगितल्याचे स्मरते.
8 Sep 2010 - 7:10 pm | प्रशु
युयुत्सु साहेब, माफ करा पण हे सगळे संदर्भ मला दुर्गा भागवत यांच्या पैस आणी प्रतिभा रानडे ह्यांच्या 'दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा ह्या पुस्तकात वाचलेले आठवतात....
11 Sep 2010 - 9:15 pm | युयुत्सु
ते पुस्तक माझ्याकडे आहे आणी मला दूर्गाबाईंविषयी नितांत आदर आहे. तरी पण त्यांच्या काही निरीक्षणांविषयी माझ्या मनात शंका आहेत.
9 Sep 2010 - 7:28 pm | विश्नापा
गौतम बुद्धावरील विवेचन
'ओशो" यांनी केलेले आहे ते जरूर वाचावे..
9 Sep 2010 - 8:35 pm | सुहास..
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम ! >>>
गम्मत वाटतेय लेख आणी प्रतिसाद वाचुन ........
(पाली भाषेत 'मिलींदवख्ख,त्रिपिटीका,आणी कालींदिग्रम वाचणारा )