गाभा:
मराठी आणि हिंदीत अनेक शब्द आहेत जे मूळचे फारसी वा अरबी आहेत. जसे गरीब, मेहनत, बिचारा, तारीख, हिशेब. असे शब्द बहुतेक वेळा हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसतात आणि त्याच अर्थाने वापरले जातात. वरील उदाहरणे त्याच गटातील आहेत.
पण असेही काही शब्द आहेत जे फार्सी वा अरबीतून मराठीत आलेले आहेत जे हिंदीत नाहीत वा अगदी तुरळक वापरले जातात. काही उदाहरणे
जाहिरात (हिंदीत विज्ञापन वा इश्तेहार वापरतात)
जबाबदार(री) (हिंदीत जिम्मेदार(री) वापरतात)
राजीनामा (हिंदीत इस्तेफा, त्यागपत्र).
मोहीम (हिंदीत अभियान )
लष्कर (हिंदीत फौज)
रतीब (?)
अजून अशी काही उदाहरणे देऊ शकाल का?
प्रतिक्रिया
4 Sep 2010 - 12:01 pm | संजयशिवाजीरावगडगे
लई भारी..............!
लई भारी ( ) ?
4 Sep 2010 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
हे थोडेसे कळले नाही, कारण हिंदीत बिचारा = बेचारा / हिशेब = हिसाब असे शब्द वापरात येतात.
4 Sep 2010 - 5:57 pm | हुप्प्या
>>जसे गरीब, मेहनत, बिचारा, तारीख, हिशेब. असे शब्द बहुतेक वेळा हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसतात आणि त्याच अर्थाने वापरले जातात.
<<
जवळपास हा शब्द महत्त्वाचा आहे. हिशेब आणि हिसाब हे सारखे नसले तरी खूप साधर्म्य आहे हे नाकारता येत नाही.
4 Sep 2010 - 5:32 pm | चिरोटा
बरकत/गैरवापर/मेवा/शिकस्त?
हिंदीत हेच शब्द आहेत का?
4 Sep 2010 - 5:59 pm | हुप्प्या
शिस्त, गैरशिस्त : हे ह्या वर्गात येतात का?
मुबलक : हा शब्द मूळ अरबी वा फारसी आहे का?
4 Sep 2010 - 6:23 pm | सुनील
धागा मोठा रोचक आहे!
मराठीत जे शब्द हिंदी-उर्दू मार्गाने आले, त्यांचे अर्थ बहुतांशी तसेच राहिले. परंतु जे थेट आले, ते शब्द एकतर हिंदी-उर्दूत वापरले जात नाहीत किंवा वेगळ्या अर्थाने वापरले जातात.
शिकस्त ह्या फार्सी शब्दाचेच उदाहरण घेतले तर, मराठीत त्याचा अर्थ प्रयत्न असा आहे तर, उर्दूत त्याचा अर्थ पराभव असा आहे!
अधिक वाचण्यास (आणि लिहिण्यासदेखिल) उत्सुक.
5 Sep 2010 - 12:26 am | विकास
परंतु जे थेट आले, ते शब्द एकतर हिंदी-उर्दूत वापरले जात नाहीत किंवा वेगळ्या अर्थाने वापरले जातात.
चेष्टा हा असाच एक शब्द ज्याचा मराठीतील वापर आणि हिंदीतील वापर एकदम वेगळा आहे. मात्र तो मूळचा मराठी आहे का इतर (हिंदी/अरेबिक वगैरे) भाषेतील आहे हे माहीत नाही.
5 Sep 2010 - 12:49 am | सुनील
चेष्टा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ प्रयत्न असाच आहे. आता मराठीत त्याचे विडंबन का झाले, हा वेगळ्या संशोधनाचा विषय!
5 Sep 2010 - 9:06 pm | विकास
चेष्टा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ प्रयत्न असाच आहे.
धन्यवाद!
4 Sep 2010 - 7:15 pm | हुप्प्या
मजलदरमजल
जसे मजलदरमजल करत प्रवास केला.
मी हा शब्द हिंदीत वापरलेला ऐकला नाही.
4 Sep 2010 - 7:18 pm | हुप्प्या
जुन्या काळात मराठीत लाल रंगाच्या एका छटेला किरमिजी म्हणत. हल्ली ऐकू येत नाही. फारसीत किरमीज हा शब्द लाल ह्या अर्थाने वापरला जातो. हिंदीत यासदृश शब्द वापरतात का ते माहित नाही.
4 Sep 2010 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते
माझ्या आवडीचा विषय!!! पण सध्या गडबडीत आहे.
त्यामुळे http://www.misalpav.com/node/5283 हे वाचा. मला सापडलेले ओळखीचे अरबी शब्द...
5 Sep 2010 - 6:44 pm | हुप्प्या
खाजगी : हिंदीत वा उर्दूत हा शब्द ऐकलेला नाही.
बडदाश्त : पाहुण्यांची राजेशाही बडदाश्त ठेवली होती. हिंदीत बरदाश्त आहे तो अगदी वेगळा अर्थ.
5 Sep 2010 - 6:59 pm | स्वाती दिनेश
चटकन आठवलेला शब्द बक्षिस,
चित्तंनी या धाग्यात मोलाची भर घालावी ही विनंती..
स्वाती
5 Sep 2010 - 9:05 pm | इन्द्र्राज पवार
"अजून अशी काही उदाहरणे देऊ शकाल का?"
~~ म्हणजे दोन्ही प्रकारची (हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसणारी) व (फार्सी वा अरबीतून मराठीत आलेले आहेत जे हिंदीत नाहीत वा अगदी तुरळक वापरले जातात) असा अर्थ घेतला तर :
(अ) हिंदी-मराठी साधर्म्य
तराजू - तराजू, रेत - रेती, सुई - सुई, खंजीर - खंजर, आक्रमण - आक्रमण, युद्ध - युद्ध, छापा - छापा, लिफाफा - लिफाफा, कलम - कलम, चंदन - चंदन, सुपारी - सुपारी (अजून खूप देता येतील...)
(ब) फार्सी/अरबीतून आलेत पण हिंदीत नाहीत
नकल (मराठीत नक्कल असा ठाशीव उच्चार झाला) ~ तिच गोष्ट "कत्ल" ची, इथे 'कत्तल' झाला.
तालीम (इथेही 'तालीम' त्याच अर्थाने म्हणजे शिक्षण या अर्थाने)
[खात्री नाही, पण आपल्याकडील 'शाई' ची आई ही देखील फार्सीच ~ 'सिहायी' या उच्चाराने अस्तित्वात आहे.]
दर्वाझा (इकडे दरवाजा झाला)
बेफिक्र (इकडे बेफिकीर)
त्याचप्रमाणे "बहार" हा एक असा फार्सी शब्द आहे जो मराठी आणि हिंदी दोन्ही भाषात त्याच रूपात आणि त्याच अर्थाने वापरला जातो.
इन्द्रा
5 Sep 2010 - 9:14 pm | सुनील
चंदन आणि सुपारी हे शब्द अरबी वा फार्सीतून आले आहेत, ही माहिती नवी आहे!
5 Sep 2010 - 10:41 pm | इन्द्र्राज पवार
"चंदन आणि सुपारी हे शब्द अरबी वा फार्सीतून आले आहेत, ही माहिती नवी आहे!"
नाही, नाही... ती माझी 'गलती' झाली. लिहिण्याच्या ओघात "हिंदी-मराठी" समान उच्चाराचे आणि अर्थाचे शब्दही स्मरणात येत गेले....आणि त्यांचा उगम मध्यपूर्वेतील गाठोड्यात आहे असा (चुकीचा) समज झाला...(त्यात ते'आक्रमण, युद्ध' ही काढून टाकायला हवे....पण आता स्व्-संपादनाची सोय नसल्यामुळे तो तिथे राहणार असे दिसते.)
क्षमस्व !
इन्द्र
6 Sep 2010 - 12:12 am | हुप्प्या
मला असे शब्द संग्रहित करायचेत जे
१. मूळचे अरबी वा फारसीतून आले आहेत.
२. मराठीत आहेत पण हिंदीत तसे वा त्याच्या जवळपास येणारे शब्द नाहीत.
कत्तल/कत्ल, तालीम, ताकद हे फारसे वेगळे नाहीत त्यामुळे ते ह्या गटात मोडत नाहीत.
काही शब्द अजून आठवतायत पण हिंदी/उर्दूचे ज्ञान पुरेसे नसल्यामुळे माझी माहिती चुकीचे असेल. ताकीद, तफावत.
चूभूद्याघ्या
7 Sep 2010 - 8:15 pm | हुप्प्या
रदबदली
सफरचंद
मस्करी
खूषमस्कर्या
11 Oct 2010 - 12:39 am | हुप्प्या
काटकसर. वस्तू मोजूनमापून वापरणे . हा शब्द हिंदीत ऐकलेला नाही. पण कोई कसर नही छोडी असा प्रयोग ऐकला आहे.
रदबदली
वारेमाप (?) हा फारशी मूळ असलेला शब्द आहे का?
11 Oct 2010 - 5:49 am | गुंडोपंत
मराठी मध्ये असलेले फारशी भाषेतील शब्द आणि त्यांचा प्रभाव ही चर्चा उपक्रमावर विस्तारीत स्वरूपात श्री. चित्तरंजन भट यांनी केली होती. तेथे या विषयाचे अनेक कंगोरे पाहायला मिळतील.
या चर्चेत चित्तरंजन म्हणतात, 'मराठी भाषेत अनेक फार्शी शब्द इतके रूढ झाले आहेत की, आता एखादा शब्द फार्शीतून आला आहे हे सांगताही येणार नाही. ह्या शिवाय मराठीतले काही शब्द फारशी नसले तरी त्यांच्या निर्मितीमागे फार्शी प्रभाव आहे.'
चर्चेचे दोन भाग आहेत आणि प्रतिसादही अप्रतिम आहेत.
मराठीतली फार्शी १
मराठीतली फार्शी २
उपक्रमावर वाचक्नवी नावाचे एक अतिशय ज्ञानी सदस्य आहेत. त्यांच्याकडेही माहितीचा खजिना आहे. पण ते हल्ली दिसत नाहीत!
आशा आहे या लेखांचा आपल्याला उपयोग होईल.
14 Oct 2010 - 10:34 pm | हुप्प्या
हे एक चमत्कारिक वाटणारे नाव आपण एका सुक्या फळाला दिलेले आहे.
फारसीमधे ज़र्द (ज + नुक्ता) म्हणजे पिवळा. आणि आडू हे पीच ह्या फळाचे उर्दू नाव आहे. ते फारसीतही असावे असा अंदाज.
जर्दाळूची ओली फळे पिव़ळी, थोडी शेंदरी छटेची असतात त्यामुळे हे नाव पडले असावे.
ह्या फळाला हिंदी वा उर्दूत काय म्हणतात?
लाल हा रंग दर्शवणारा शब्द कुठल्या भाषेतून आला ह्याची कल्पना आहे का?
सफरचंद ह्या फळाचे हे नाव केवळ मराठीत व गुजराथीत आहे. खरेतर हे अगदी फारसी वळणाचे वाटते पण त्या किंवा अन्य कुठल्या जवळपासच्या भाषेत ह्या फळाला सफरचंद किंवा तत्सम नाव नाही. हे कसे आले कुणाला माहित आहे का?