साहित्य-
२ अंडी
५० ग्राम साखर (साधारण २ टेबलस्पून)
२५० ग्राम मस्कार्पोन चीज
१५ ते १६ लॉफेल बिस्किटे /तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे (बिस्किटाच्या पाकिटावर तिरामिसु असे लिहिलेले असते.)
म्हणजेच लेडिज फिंगर बिस्किटे
कोको पावडर साधारण २ ते ३ मोठे चमचे
२ चमचे रम/कोनिऍक/आस्बाख
१/२ कप कोरी कडू कॉफी (बिनादुधाची) मोक्का किवा एस्प्रेसो वापरली तर उत्तमच.
कृती-
अंड्यातील पांढरे व बलक वेगळे करणे व पांढरे फेटून घेणे.
अंड्यातील बलकात साखर घालून भरपूर फेटणे. इतके फेटणे की ऑफ व्हाइट रंग यायला हवा. त्या मिश्रणात चमचाभर रम घालणे. नंतर मस्कार्पोन चीज एकेक/दोनदोन चमचे घालत हळूहळू फेटणे. घट्टसर क्रिम किवा श्रीखंडापेक्षा जरा पातळ मिश्रण तयार होते. (अगदी चपखल सांगायचं झालं तर केकचे मिश्रण बेकिंगपूर्वी असते तशी कन्सिस्टंसी आली की फेटणे थांबवणे.)
आता त्या मिश्रणात फेटलेले पांढरे घालून नीट एकत्र करणे.
कोर्या कॉफीमध्ये रम घालणे.
एका चौकोनी/लंबगोल साच्यामध्ये लॉफेल बिस्किटे एकापुढे एक लावणे. नंतर त्यावर चमच्याने हळूहळू ती रमयुक्त कॉफी घालणे. बिस्किटे कॉफी शोषून घेतील. अशी सर्व बिस्किटांवर कॉफी ओतून झाली की मस्कार्पोनच्या मिश्रणातील काही भाग त्यावर घालून बिस्किटे पूर्णपणे झाकून टाकणे. परत लॉफेल बिस्किटांचा थर लावून त्यावर कॉफी चमच्याने घालणे. मग परत मस्कार्पोनचा क्रिमी थर देणे. बिस्किटे- क्रिम-बिस्किटे -क्रिम असे ४ थर एकावर एक येतील.
आता साचा फॉईलने झाकून सेटिंग साठी फ्रिझमध्ये ठेवणे. (फ्रिझरमध्ये नाही. जेली सेटिंगला जसे फ्रिझमध्ये ठेवतो तसे.)
६ ते ७ तास फ्रिझमध्ये ठेवून थंड करणे. वाढायच्या आधी थोडा वेळ त्यावर कोको पावडर भुरभुरणे.
थंड असताना वाढणे.
आमचे म्युनशन मध्ये राहत असलेले खवय्ये स्नेही आमच्याकडे आलेले असताना हा बेत केला होता. गप्पांच्या आणि खाण्याच्या नादात फोटो काढायचा राहून गेला, लक्षात आले तेव्हा आधी एक पिस फस्त झालेला होता त्यामुळे डिशमधल्या फोटोवर नसत्या कामेंटा करु नयेत ही "नम्र" विनंती, ;)
ज्यांना आमच्या हातचे तिरामिसु खायची इच्छा आहे त्यांचे फ्रांकफुर्टात स्वागत आहे, :)
प्रतिक्रिया
3 Sep 2010 - 5:40 pm | पुष्करिणी
जुग जुग जियो स्वातीताई..
तिरामिसू जीव की प्राण आहे मला!
3 Sep 2010 - 7:57 pm | सहज
तुम्ही एकसे बढकर एक केक व तत्सम गोड पदार्थ टाकायचे, आम्ही आमच्या सुट्या व फ्रांफुची डिल्स याची सांगड घातली जाती आहे अशी स्वप्ने बघत रहायची. हे नेहमीचेच झाले आहे.
3 Sep 2010 - 8:08 pm | वेताळ
जर्मनीला येणे सोप्पे झाले तर पहिल्यांदा तुमच्या कडे यायचा बेत नक्की. राकलेट आणि केक खायला तुमच्या कडे यायलाच पाहिजे.
3 Sep 2010 - 8:32 pm | सुनील
पाकृ आणि फोटो नेहेमीप्रमाणे मस्तच!
काही शंका -
१) तिरामिसू स्पेश्शल बिस्किटे मिळाली नाहीत तर, पर्याय काय?
२) अंड्यातील पांढरा आणि पिवळा भाग वेगळे करण्यासाठी उत्तम (कमी वेळखाऊ) पद्धत कुठली?
माझी पद्धत -अंड्याच्या निमुळत्या भागाला एक लहान छिद्र पाडणे. त्यातून सगळा पांढरा भाग एका वाटीत काढून घेणे. टरफलात राहिलेला पिवळा भाग वेगळा करणे.
(पेठकरकाकांनी एक दुसरी पद्धत दिल्याचे आठवते पण सापडत नाहीये)
3 Sep 2010 - 11:29 pm | स्वाती२
२) अंड्यातील पांढरा आणि पिवळा भाग वेगळे करण्यासाठी उत्तम (कमी वेळखाऊ) पद्धत कुठली
एग सेपरेटर वापरायचे.
किंवा हा दुवा पहा.
http://www.youtube.com/watch?v=yAGX-54iR30
4 Sep 2010 - 1:37 am | सुनील
कचेरीत यूट्यूब बंदी आहे. घरी गेल्यावरच बघेन.
पण माझा मूळ प्रश्न कोणतेही यंत्र न वापरता (कारण यंत्राची उपलब्धता) हे कमी वेळात कसे करावे असा होता. माझ्या पद्धतीत एका अंड्याला एक मिनिट लागते, शिवाय प्रत्येक अंडे स्वतंत्रपणे करावे लागते.
धन्यवाद!
4 Sep 2010 - 11:18 pm | चित्रा
मी छिद्र न पाडता सरळ अर्धे नेहमीप्रमाणे करते, पण अंडी एकमेकांना जरा जोडलेली (पण एकदम न दाबता, किंचित भेग खालच्या बाजूला राहील अशी) धरते. मग टरफलाच्या एका बाजूला (ती जोडलेलीच धरून) किंचित कलते करायचे, मग दुसर्या बाजूला कलते करायचे असे करत करत शेवटी पिवळे टरफलाच्या आतल्या बाजूला राहते आणि पांढरे बाहेर भांड्यात जमा होते. जरा सवय लागते, पण सवयीने जमते.
8 Sep 2010 - 1:01 am | सुनील
धन्यवाद! हा प्रकारदेखिल करून पहायला हवा!
3 Sep 2010 - 11:23 pm | स्वाती२
फोटो पाहून माझा नि:श्चय ढासळायला लागलाय!
3 Sep 2010 - 11:27 pm | रेवती
सहमत!
दोन दिवसांपूर्वी आम्हाला आठवण आली होती तिरामिसूची तर आज पाकृ हजर!
4 Sep 2010 - 8:59 pm | मिसळभोक्ता
आम्हाला
हे वाचून गहिवरलो.
4 Sep 2010 - 1:12 am | चित्रा
ते तिरामिसू तेवढे पार्सल करा बरे.
फारच छान दिसते आहे.
4 Sep 2010 - 12:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरंतर तुझ्या रेसिप्यांवर बहिष्कार टाकण्याचा विचार होता. पण अर्थातच फोटो आणि रेसिपी पाहून तो प्ल्यान क्यान्सल झाला आहे. ;-)
पुन्हा एकदा फ्राफुला आले तर मिळेल ना तिरामिसू, कॉफी केक आणि कॉफी? मी गॉसिपला कच्चा माल पुरवणार ही माझी काँट्रीब्यूशन!
4 Sep 2010 - 12:42 pm | विसोबा खेचर
छान.. :)
4 Sep 2010 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार
कृपया ' स्वाती दिनेश' हा आयडी ब्लॉक करावा अशी विनंती.
4 Sep 2010 - 1:05 pm | जागु
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.. मस्तच.
4 Sep 2010 - 6:07 pm | चतुरंग
मी फोटो बघितला नाही आणि काही वाचलेही नाही!
मिसुरंग
4 Sep 2010 - 8:57 pm | प्राजु
.............
7 Sep 2010 - 9:26 pm | अम्रुताविश्वेश
:) ..... मला पण पाहिजे .....
:( ;)