क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
2 Sep 2010 - 9:45 pm
गाभा: 

दिवसेंदिवस क्रिकेट खेळात होत असलेला गोंधळ ,रडीचा डाव ,मँच फिक्सिंग,भ्रष्टाचार यामुळे क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

2 Sep 2010 - 9:58 pm | अविनाशकुलकर्णी

नाहि..आता खेळ व्यावसायिक झाला आहे

तूर्त तुमच्या प्रश्नाचे उत्तर घ्या - "नाही, अजिबात नाही."
सविस्तर विचार वेळ आल्यास मांडूच. :)

उग्रसेन's picture

2 Sep 2010 - 10:02 pm | उग्रसेन

क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

नाय नाय आता काय खरं नाय राह्यलं भो क्रिकेट खेळाचं.
दीस वाया घालून म्याच पाह्यचेबी दीस गेलेत.

पाकी खेळाडूंना पाकी क्रिकेट बोरडं त्यायला खेळायचे मोबदला देत नाय म्हणून ते नोबॉल टाकून पैसे कमून राह्यले. म्हुन तुमच्यामनामदी सवाल उभा राह्यला व्हय ?

आपूण काय वाटून नाय घ्याचं आपल्याला वाटतं तव्हर म्याच पाह्यचा नायतर सोडून द्याचं.

श्रीलंकेबरोबर म्याच हरलो त्या दिवशी आपल्या टीमीला रन नाय काढता आले. त्यायला कोणी मोठी ऑफर तर दिली नस्सन अशी शंका काय आपल्याला येत नाय अजून तेवढं बरं हाय.

बाबुराव :)

कार्लोस's picture

2 Sep 2010 - 11:29 pm | कार्लोस

भाउ जरा दुस्र्या गमेस कधे पन लक्श्या द्या काय नुस्तेच क्रिकेत

माझीही शॅम्पेन's picture

3 Sep 2010 - 12:01 am | माझीही शॅम्पेन

हा एक ओळिचा धागा वाचून वेळ वाया गेला + प्रतिक्रिया टन्कण्य्च्या पण :)

मदनबाण's picture

3 Sep 2010 - 5:15 am | मदनबाण

हॅन्सी क्रोनिए प्रकरण झाल्यापासुन क्रिकेट मधला रस संपला, हल्ली मॅच पाहण्यात वेळ घालवत नाही...ते पैसे छापतात आणि आपण मुर्खा सारखे टाळ्या वाजवत बसतो.

जाता जाता :--- पैसा हाच जगात सर्वात मोठा खेळ झाला आहे. तो ज्याच्याकडे आहे ,तोच खरा" प्लेयर."

अरुण मनोहर's picture

3 Sep 2010 - 9:39 am | अरुण मनोहर

तुम्हाला काय वाटतं?

इन्द्र्राज पवार's picture

3 Sep 2010 - 10:33 am | इन्द्र्राज पवार

श्री.पाटकर यांच्या या लेखाच्या शीर्षकामुळे याच संदर्भातील एक योगायोग वाचनात आला होता.

इ.स. १९२७ साली त्या वेळच्या मुंबई सरकारने शाळाकॉलेजातून 'शारीरिक शिक्षणा'चा विचार करण्यासाठी नेमलेल्या मुन्शी समितीने 'क्रिकेट'चे भूत याबाबत ज्या काही मान्यवरांच्या मुलाखती/मते विचारात घेतली तीत एक मान्यवर होते 'महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार'. त्यांचे त्यावेळचे मत या धाग्याशी किती मिळतेजुळते आहे ते पाहण्यासाठी अहवालातील एक वानगीदाखल नमुना :

"क्रिकेटच्या नादात विद्यार्थी वाजवीहून किती तरी वेळ फुकट दवडीत असतात. सरकारी पाठबळामुळे व लोकांच्या उत्तेजनाने क्रिकेटच्या नादात म्हणजे पाहण्यात्/खेळण्यात - दोन्ही प्रकारात विद्यार्थी सतत रमलेले दिसतात. क्रिकेटचा मोसम सुरू असला म्हणजे शाळा, महाविद्यालये यांचे एक पावसाळी अधिवेशन जवळजवळ याच नादात अभ्यासाविना संपून जाते, हजेरीचे दिवस नावाला भरले जातात. या प्रकारात कडकपणा कामी येत नाही, कारण शिक्षक, अधिकारीदेखील क्रिकेटमध्ये मनाने गुरफटलेलेच असतात. थोडक्यात सर्वत दृष्टीनी क्रिकेट हा फाजील खर्चाचा आणि फाजील वेळ खाणारा खेळ आहे. महाविद्यालयात दरवर्षी अन्य खेळावर दरडोई ३ रुपये खर्च होतो, तर क्रिकेटवर दरडोई ६० रुपये. म्हणजे हा खेळ किती खर्चिक आहे हे दिसून येते, सबब तो सरकारने बंद करावा."

म.मो.पोतदारांची ही मते सन १९२७ ची, ज्यावेळी केवळ पंचरंगी आणि कसोटी क्रिकेट अस्तित्वात होते....७०-७५ वर्षे होऊन गेली... आणि आजची स्थिती पाहता श्री.पोतदारांचे काय मत झाले असते?

इन्द्रा

विदेश's picture

3 Sep 2010 - 7:30 pm | विदेश

मराठी वाहिन्यांवरील मालिका पहाण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा क्रिकेटचा खेळ पहाणे बरे !

उपेन्द्र's picture

3 Sep 2010 - 11:16 pm | उपेन्द्र

क्रिकेट हा माझा धर्म आहे आणि मी तो खेळणारच आणि पहाणारच..
ज्याना मॅच फिक्सिंग करायचे त्याना करू दे.. त्याने सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्ह किंवा लक्ष्मणच्या लेग ग्लान्स मधले सौंदर्य थोडेच कमी होणार आहे...????????

काही अपवाद वगळता देशासाठी खेळणारे कितीजण आहेत?? जाहिरातींच्या "Ranking" मध्ये आपला नंबर घसरला म्हणून पुढचे काही सामने चांगले खेळणारे सर्वांना माहिती आहेतच, तरीसुद्धा त्या खेळाडूंना डोक्यावर घेऊन लोक मिरवतात. देशासाठी खेळतोय असा आव आणणारे स्वतःचे अर्धशतक किंवा शतक जवळ येताच दचकून दचकून का खेळत असतात? क्रिकेट खेळ बंद करण्यापेक्षा त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवा.

क्रिकेट खेळ व्यावसायिक झाला आहे हेच सत्य..!!