महाराष्ट्राला शिवसुष्टी ची खरच गरज आहे ?

टग्या टवाळ's picture
टग्या टवाळ in काथ्याकूट
2 Sep 2010 - 3:21 pm
गाभा: 

आज महाराष्ट्रात किमान ३ ते ४ शिवसुष्टी उभारल्या गेल्या आहेत. आता पुण्यात सुद्दा शिवसुष्टी उभी राहत आहे.खरच शिवसुष्टी साठी कोट्यावधी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे. त्या पेक्शा तोच खर्च जर मोडकळीस आलेल्ल्या अनेक गड आहेत त्यांना करुन हे गड सुधारता येणार नाहीत का. महाराष्ट्राची शान कशात आहे.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

2 Sep 2010 - 4:14 pm | यशोधरा

शिवसृष्टी.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Sep 2010 - 4:29 pm | llपुण्याचे पेशवेll

जीवसृष्टी.

सूड's picture

2 Sep 2010 - 8:59 pm | सूड

जीवसृष्टी.....पुण्यासारखी कुठेच नाही

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार

छे कशाला ते गड वगैरे सुधारायचे ? म्हणजे गडाचे रस्ते वगैरे चांगले झाले की लोक तिथे जाउन दारवा ढोसणार, रेव्ह पार्ट्या करणार आणि काय काय चाळे करणार ! नकोच ते.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Sep 2010 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे

चांगली कल्पना आहे. आपली अस्मिता परंपरा व अभिमान इतिहास वगैरे जपला जाइल. तसेच चांगले पर्यटन स्थळ झाल्यावर त्यातुन सरकारी तिजोरीत भर पडेल.

जिप्सी's picture

2 Sep 2010 - 4:32 pm | जिप्सी

तुमचं म्हणणं एका अर्थी बरोबरच आहे पण्,जे लोक गड किल्ल्यांवर जाऊ शकत नाहीत्,परदेशी पर्यटक जे भारतात आलेले आहेत त्यांच्यापर्यंत महाराज पोहोचण्यासाठी शिवसुष्टी सारखे प्रकल्प असणे भाग आहे.
गड किल्ल्यांवरचे आहेत ते अवशेष जपणे आज पावेतो आम्हाला जमलेले नाही,सुधारणेचे नावच सोडा.

खरं सांगायच तर शिवाजी महाराजांना ग्लोबल करणं आपल्याला जमलेलचं नाही. कुठल्यातरी काल्पनिक कथेवरून ३०० सारखा चित्रपट निघतो प्रचंड गाजतो,आणि असाच पराक्रम प्रत्यक्ष करूनही बाजीप्रभू महाराष्ट्राबाहेर लोकांना माहीतही नाहीत. ग्रेट एस्केप चित्रपट प्रचंड गाजतो,पण त्याहूनही सरस बुद्धी वापरून आग्र्यातून निसटलेले महाराज जगात किती लोकांना माहीत आहेत ? कमांडो ऑपरेशनचे चित्रपट आम्ही आवडीनं बघतो पण्,लाल महालात स्वतः कमांडो ऑपरेशनचे नेत्रुत्व करून ते यशस्वी करून दाखवणारे महाराज जगापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसुष्टी व्हायलाच हवी आणि ती प्रत्येक शहरात व्हायला हवी,भावी पिढीला स्फुर्ती देईल आणि आदर्श म्हणून समोर ठेवता येईल असा कोणताही माणूस या घटकेला तरी माझ्या नजरेत नाही.

मृत्युन्जय's picture

2 Sep 2010 - 6:56 pm | मृत्युन्जय

+१.

हो मग. आहेच! भविष्यात जेव्हा महाराजांना देव मानण्यात येईल तेव्हा निरीश्वरवादी आणि तथाकथित बुद्धीवाद्यांनी पुरावे मागितल्यास उत्खननात या शिवसृष्टीचे अवशेष सापडू शकतील. महाराजांवरचे सर्व लिखाण वगैरे सुद्धा जपून ठेवायला हवे. नाहीतर उद्याचे बुद्धीवादी "परकीयांच्या लेकीसुनांना आपल्याकडे ठेवून घेणारा राजा आदर्शवान कसा?" असा प्रश्नदेखील उपस्थित करू शकतात! (आणि हे नजीकच्या भविष्यकाळात शक्य आहे हो!) तेव्हाच्या सश्रद्धांना पुराव्याने शाबीत करता यायला हवं महाराजांनी कुणाला कसं वागवलं ते. म्हणून शिवसृष्टींची वगैरे गरज तर आहेच आहे! :)

छोटा डॉन's picture

2 Sep 2010 - 5:07 pm | छोटा डॉन

मेघ्याशी सहमत आहे.

बाकी शिवसृष्टीची आवश्यकता आहेच असे आमचे मत आहे.
ते का आहे ह्यावर कधी वाटले तर खरडु.
मुलभुत बाबींवर "का?" असे प्रश्न आम्हाला शक्यतो आवडत नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार

मेवेंशी सहमत !

डॉक्युमेंटरीच्या तयारीला लागलेला

मेघवेडा's picture

2 Sep 2010 - 5:25 pm | मेघवेडा

है शाब्बास!

२००-२५० नक्की राव!

अवलिया's picture

2 Sep 2010 - 6:04 pm | अवलिया

मनातलं बोललास गड्या !!

असुर's picture

2 Sep 2010 - 6:15 pm | असुर

+४
मेवे! अतिशय चांगला मुद्दा!
ज्या दिवशी महाराज होते की नाही हे सिद्ध करायची वेळ येईल त्या दिवशी सर्वांनी डोईला पांढरं कापड गुंडाळून मराठी अस्मिता नावाची चीज वैकुंठात पोहोचवून यावी हे उत्तम!
सध्या शिवाजी महाराजांच्या नावाखाली फुकाची बोंबाबोंब करणार्‍या लोकांनी "त्यांचे आदर्श" ही गोष्ट फाट्यावर मारली आहे हे दिसतेच आहे!

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

सध्या शिवाजी महाराजांच्या नावाखाली फुकाची बोंबाबोंब करणार्‍या लोकांनी "त्यांचे आदर्श" ही गोष्ट फाट्यावर मारली आहे हे दिसतेच आहे!

मालक, आजकाल ज्या आपल्याला सोयीस्कर पडतात त्या गोष्टींन आदर्श म्हणले जाते.

>>>मालक, आजकाल ज्या आपल्याला सोयीस्कर पडतात त्या गोष्टींन आदर्श म्हणले जाते.<<<
दुर्दैवाने खरंय आपलं म्हणणं!
'शिवाजी महाराजांचा आदर्श' याबाबत तरी सोय पाहीली जाउ नये. पण ते होत नाही, आणि मग त्यांचंच नाव घेउन लोक हाणामार्‍या करतात! हे असले लोक म्हणजे कर्मकरंटे, दुसरं काय!

--असुर

आम्हाघरीधन's picture

2 Sep 2010 - 8:37 pm | आम्हाघरीधन

रामाने आदर्शवाद शिकवला, तर कृष्णाने कर्मयोग! आदर्श कर्म करून योगी बनता येतं हे महाराजांनी शिकवलं!
+१
अतिशय उत्तम प्रतिसाद.

अर्धवटराव's picture

2 Sep 2010 - 9:20 pm | अर्धवटराव

एका वाक्यात शिवचरित्र कथन केलेत राव !

(शिवभक्त) अर्धवटराव

असं म्हणू नका! महाराजांच्या बद्दल बोलावं आणि लिहावं ते थोडं आहे. आणि त्यांच्याबद्दल लिहिणं, वाचणं, बोलणं, त्यांचा आदर्श ही आजच्या काळाची गरज आहे. दुर्दैवाने आपण कुठेतरी कमी पडतोय!

--असुर

अर्धवटराव's picture

3 Sep 2010 - 1:31 am | अर्धवटराव

तुमचं बरोबर आहे. शिवप्रभूंचे चरित्र गायला व्यास्-वाल्मिकीची प्रतीभा सुद्धा तोडकी पडेल हो... पण सारभूत म्हणुन मला हे वाक्य अतीशय सम्यक वाटलं.
जसं वेद भगवंताचे गुणवर्णन भारंभार करोत, पण (बहुतेक)तुकोबा एका वाक्यात वेदांताचा अर्थ सांगतात
वेद अनंत बोलला | अर्थ इतुकाची साधला |
विठोबासी शरण जावे | निजनिष्ठे नाम घ्यावे ||

(शिवभक्त) अर्धवटराव

मृत्युन्जय's picture

2 Sep 2010 - 10:31 pm | मृत्युन्जय

+५

असेही महाराज होउन गेल्याचा कुठलाच पुरावा आज उपलब्ध नाही आहे. कशावरुन महाराज होउन गेले? मी तर असेही ऐकले आहे की शिवनेरीवर जन्मलेला शिवाजी, आग्र्यातुन निसटलेला शिवाजी आणी अफजलखानाला मारणारा (किंवा मरण्यास कारणीभूत ठरलेला) शिवाजी वेगवेगळे आहेत म्हणुन. आणि हो सूरत नावाचे एक शहरही लुटले होते म्हणे त्याने. असा लूटमार करणारा दरवडेखोर महान राजा होउच कशा शकतो ब्वॉ?

अवलिया's picture

3 Sep 2010 - 10:45 am | अवलिया

>>>>असा लूटमार करणारा दरवडेखोर महान राजा होउच कशा शकतो ब्वॉ?

+१

अगदी सहमत. पण इथल्या काही बिनडोक भोळसट लोकांना कोण सांगणार? देव म्हणुन डोक्यावर चढवुन ठेवलं आहे त्यांनी शिवाजीला !! अजिबात विवेकवाद नाही. असो ज्याची त्याची जाण समज हेच खरं.. नाही का !

प्रशु's picture

2 Sep 2010 - 9:05 pm | प्रशु

लोक कल्याणकरी राज्य चालवुन अवघा महाराष्ट्रच शिवसुष्टी का करत नाहीत....

नितिन थत्ते's picture

3 Sep 2010 - 10:57 am | नितिन थत्ते

त्याला 'शिवशाही' असे नाव आहे.

तो प्रयोग एकदा झाला करून. :(

भारी समर्थ's picture

3 Sep 2010 - 9:58 pm | भारी समर्थ

हा हा हा हा....

ओ थत्ते का थट्टा करता राव त्यांची...करायचीच असेल तर कीव करा...एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळू नये म्हणतात...तुम्ही तर मिर्चीची पूडच घेऊन चाललात राव.

बाकी, शिवसृष्टी व्हायला हवी हे पटतं...महत्वाच्या गडांवरच झाली तर उत्तमच की....

भारी समर्थ