ही फोटोची लिंक.
तर काय आहे कि आज मी भेंडीच्या भाजीचा एक छोटासा प्रयोग करून पहिला...कुरकुरीत..
साहित्य : १) भेंडी २) लसूण ३) लाल मिरच्या (वाळलेल्या) ४) दाण्याचा कुट ५) मीठ
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
कृती : भेंडी धुवून बर्यापैकी पातळ गोल काप करून घ्या.
एक मोठे पसरट फ्राय पॅन घेऊन त्यात फोडणीसाठी तेल टाका...तुम्हाला जर भाजीच्या अंदाजानुसार फोडणीसाठी तेल ठरवता येत नसेल कृपा करून स्वैपाकाच्या भानगडीत न पडता हाटेलात खा
तर फोडणीच्या तेलात मोहरी तडतडली कि जिरे टाका मग लगेच थोडा हिंग अन हळद टाकून त्यात लाल मिरच्या टाका..या पण तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे
२०-३० सेकंद त्या परतून घ्या अन मग काप केलेली भेंडी टाका...मिश्रण हलवा..
झाकण अजिबात ठेवू नका नाहीतर भाजी चिकट होईल
गॅस मध्यम आचेवर ठेवून भाजी हलवत राहा...मीठ टाका..अन भाजी अजून २-३ मिनिटे परतून घ्या...मग त्यात एक दीड चमचा (भाजीच्या प्रमाणात) दाण्याचा कुट घाला अन भाजी अजून परतून परतून घ्या...चांगली कुरकुरीत होईपर्यंत परता अन मग पोळीबरोबर खा...पोळी नसेल वरण भाताबरोबर खा. पण खा.
फोटो टाकताना काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणुन लिंक दिली आहे.
प्रतिक्रिया
2 Sep 2010 - 12:53 pm | Nile
काय हे!!! एकट्यापुरतीच भाजी करुन फोटु टाकला होय? अशी कंजुषी केल्याबद्दल प्रतिसाद देणार नाही. ;-)
(बाकी एरवीही भाजी खाल्ल्याशिवाय काय प्रतिसाद द्यायचा? ;-) )
2 Sep 2010 - 2:45 pm | असुर
जर ही पाकॄ काल आली असती तर माझी भेंडीची भाजी बिघडली नसती! काल मला भेंडीचं भरित खायला लागलेलं आहे! काय झालं होतं देव जाणे, चव ओक्के होती पण जाम लगदा झाला होता!
शिल्पातै, तुम्ही उशीर केल्याबद्दल जाहीर णिसेद(ज्याचा त्याचा कॉपीराईट)!
पाकॄ वर प्रतिसाद देणार नाही!!! उलट आता मीच नवीन पाकॄ टाकतो, भेंडीचं भरीत!
पुढच्या वेळी मी हीच भाजी केली आणि जमली तर मात्र न विसरता प्रतिसाद देईन!
--असुर
2 Sep 2010 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
हाच का तो फोटु ?
साला भेंडी म्हणजे आमचा जिव कि प्राण. भेंडीवर आमचा भारी जिव.
2 Sep 2010 - 1:04 pm | शिल्पा ब
हो...धन्यवाद..मी किती वेळ प्रयत्न केला पण फोटू काही माझे ऐकेना...म्हणून लिंक दिली शेवटी.
3 Sep 2010 - 2:05 am | स्वप्निल..
>>साला भेंडी म्हणजे आमचा जिव कि प्राण. भेंडीवर आमचा भारी जिव.
आमचा पण :)
3 Sep 2010 - 4:24 am | शुचि
तुम्हाला मसाला भेंडी म्हणायचय का परा? म खाल्लात वाटत?
3 Sep 2010 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
छे ! मसाला असे नाही, भेंडीचा कुठलाही पदार्थ, अगदी कच्ची भेंडी देखील आमचा जीव कि प्राण आहे.
4 Sep 2010 - 8:53 pm | मिसळभोक्ता
आजवर मी एक व्यक्ती शोधत होतो, की जिला कच्ची भेंडी आवडते, माझ्यासारखी. (पण, हा तर "ज्याला" निघाला, "जिला" नव्हे. तरी ओक्के.)
जियो !
4 Sep 2010 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जिले इलाही, तुम्ही अनेक माणसं खाता तश्या भाज्याही कच्च्या खाऊ शकता हे नवीनच कळत आहे!
2 Sep 2010 - 1:16 pm | कवितानागेश
भेंडी उभी चिरली तर अजिबात चिकट होत नाही.
शिवाय, टोमॅटो (शिजताना) / आमसुल(फोडणीत) / लिंबूरस ( शिजल्यावर) घातले
तरी भाजी चिकट होत नाही.
2 Sep 2010 - 6:24 pm | सुनील
गोलपेक्षा उभी कापलेली भेंडी माझी जास्त आवडती.
शिवाय, टोमॅटो (शिजताना) / आमसुल(फोडणीत) / लिंबूरस ( शिजल्यावर) घातले
तरी भाजी चिकट होत नाही.
चिंचदेखिल चालू शकेल.
बाकी दाण्याचे कूट घातलेली भेंडी नवीनच. करूनच पहायला हवे. कदाचित म्हणूनच कुठल्याही आंबट पदार्थाची गरज भासत नसावी.
2 Sep 2010 - 1:44 pm | सूड
>>लिंबूरस ( शिजल्यावर) घातले तरी भाजी चिकट होत नाही.
सहमत...
भेंडी म्हणजे आहाहा....असो !! नवीन रेसिपी कळली..
2 Sep 2010 - 5:44 pm | सविता
टाकायचा राहिला की शिल्पातै.... सामग्री मध्ये लिवलंय... कॄतीमध्ये नाय......
2 Sep 2010 - 10:56 pm | शिल्पा ब
हो..राहिलं खरं.
फोडणीत घालायचा लसूण.
2 Sep 2010 - 6:27 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
करुन सांगेन ..मलाही भेंडी खूप आवड्ते.
2 Sep 2010 - 7:38 pm | मस्त कलंदर
छान दिसतेय भाजी. कुरकुरीतपणा खाल्ल्याशिवाय कळायचा नाही. ;)
तेलही अगदी व्यवस्थित मापात घातलंय. नाहीतर बर्याच ठिकाणी भेंडीची भाजी अंमळ तेलकटच असते.
बाकी, मला मी पहिल्यांदा बनवलेली भेंडीची भाजी आठवली. त्यात भाऊ होता सोबत, आणि दोघांनी मिळून पाणी ओतले होते भाजीत. आणि मग रामा शिवा गोविंदा!!!! तेव्हा घरी म्हैस होती. तीनेही तोंड नाही लावले तिला. :(
3 Sep 2010 - 2:13 am | पिवळा डांबिस
>>तेव्हा घरी म्हैस होती. तीनेही तोंड नाही लावले तिला.
पण म्हशीला भेंडी नक्की आवडेल असं का बरं वाटलं तुला मके?
:)
बाकी शिल्पा, भाजी मस्त दिसतेय!!!
3 Sep 2010 - 2:16 am | मेघवेडा
तुला आवडते का भेंडी मके?
3 Sep 2010 - 2:47 am | पिवळा डांबिस
मला असं विचारायचं होतं की मांजर, कुत्रा, गाय, बकरी असे इतर पाळीव प्राणी सोडून तिला एक्दम म्हैसच का आठवली त्यामागचं राशनाल काय असेल?
एव्हढंच, बाकी काही नाही.
3 Sep 2010 - 1:03 pm | मस्त कलंदर
अहो, सहावीत असताना आमच्या शाळेत केक कसा करायचा हे कार्यान्भावात शिकवले. आणि शेवटी बिना ओव्हनचा कुकरमध्ये वाळू घालून कसा करायचा तेही सांगितले. मग मी कधीतरी माझ्या वाढदिवसाला दुपारी कुणीच घरी नव्हतं, तेव्हा हा प्रयोग करून पाहायचे ठरवलं. कुणीतरी म्हटलं होतं की अंड्याशिवाय केक चांगला होत नाही. मग मी आजीचा डोळा चुकवून, मुद्दाम घरापासून दूर असलेल्या दुकानातून अंडं आणलं. (कळलं तर लगेच बाहेर हो म्हणायची!!) आणि केला उपद्व्याप. काय नक्की बिघडलं होतं देव जाणे, पण तो केक काही भाजला गेला नाही. पोटात सुरी खुपसून खुपसून त्याची चाळण झाली. शेवटी मी पण हात टेकले. वरचा अगदी थोडासा भाजल्या सारखा वाटलेला केक मी, आणि राहिलेला म्हशीने खाल्ला. नंतर संध्याकाळी आईला हळूच सांगितले, "आज आजीची म्हैस बाटली" ;)
या अनुभवावरून वाटले की ती माझे सारे अपराध असे "पोटात" घेईल म्हणून!!! पण तिनेही मान फिरवली. त्यानंतर स्वयंपाकाचे प्रयोग थांबवले ते गेल्याच वर्षी चालू केले. :D
4 Sep 2010 - 8:56 pm | मिसळभोक्ता
कुणीतरी म्हटलं होतं की अंड्याशिवाय केक चांगला होत नाही. मग मी आजीचा डोळा चुकवून, मुद्दाम घरापासून दूर असलेल्या दुकानातून अंडं आणलं. (कळलं तर लगेच बाहेर हो म्हणायची!!)
एकदा मी मित्राच्या घरी अंडाकरी खाऊन आलो, हे कळल्यानंतर माझ्या आजीने मला घराबाहेर उभे करून अंगावर तांब्याभर थंड पाणी ओतले होते, त्याची आठवण झाली.
4 Sep 2010 - 9:09 pm | मस्त कलंदर
माझ्या आजीला बाबांच्या बाबतीत साधा संशय जरी आला, तरी त्यांना बाहेरच उभं करून बादलीभर पाणी ओतायची, वर त्यांच्या अंगावर आणि घरभर गोमूत्र शिंपायची. वर गोमूत्र आणायला आम्हालाच पाठवायची. तिच्या या सततच्या आम्हाला पाठवण्याने गायी फक्त आमच्या आजीसाठीच शू करतात असे आम्ही म्हणायचो. :P
4 Sep 2010 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यापेक्षा फ्रीजमधे स्टॉकच ठेवायचात ना! ;-)
3 Sep 2010 - 2:12 am | प्राजु
मी बर्याचदा भेंडी, बटाटा उभे काप करून, गरम मसाला,हिरवी मिरची आणि सगळ्यात शेवटी ओला नारळ करते.. अफाट होते ती भाजी..
अशी करून बघेन आता.
3 Sep 2010 - 4:22 am | शुचि
पिडा =))
भेंडी मस्त दिसतेय.
3 Sep 2010 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हंस भेंडी खायला उतरला का काय?
3 Sep 2010 - 4:33 pm | सविता
घ्या...म्हशीला नाय आवडली भेंडी... पण हंसाला आवडली असे दिसतेय!!!