संस्कृती!

धनश्रीदिनेश's picture
धनश्रीदिनेश in काथ्याकूट
9 Apr 2008 - 11:44 pm
गाभा: 

आजकाल आपण सर्वजण आपल्या मुलाना किति गोष्टी शिकवित असतो. गाणी, नाच, संगणक,विविध भाषा, पण किती जण मुलाना रामरक्षा, गीताश्लोक, हनुमान चालिसा, शिकवितात? अस का होतं , कधि याचा कोणी विचार केलाय का ? आपण मुलाना आपल्या धर्मापासुन वंचित का ठेवित आहोत? मी सध्या कतार मध्ये आहे. गेले १० महिने आहे . एक बघितलय स्पेशियली मुस्लिम , ख्रिश्चन लहानपासुनच कुराण, बायबल शिकवतात, ठरल्यावेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच, आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ? मला गर्व आहे मि हिन्दु आहे , पण मला माझ्या ग्रन्थातील ४ अध्यायांची नावं सुद्धा माहीती नसतात हि परिस्थिति.

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Apr 2008 - 12:54 am | ब्रिटिश टिंग्या

आजच्या जमान्यात लहान मुलं संध्याकाळी देवासमोर बसुन शुभंकरोती अन् परवचा म्हणताना दिसत नाही....
पण याला थोडे फार प्रमाणात आपणच जबाबदार आहोत.....अहो, परवचा म्हणन्याच्या वेळेस घरोघरी 'अवघाची हा संसार' चालु असतो......
अन् त्याने 'कळत नकळत'च आपलेदेखील या धार्मिक गोष्टींना महत्व देणे कमी-कमी होत जाते......
परंतु खरी गोम अशी आहे की आज आपल्यालाच हिंदू धर्माबद्दल जास्त माहिती नाही किंबहुना शालेय अभ्यासक्रमात या बाबींना कमी महत्व दिल्याचा परिणामच म्हणा ना......
असो, कदाचित ह्याच अज्ञानामुळे आपण नेहमी कुराण व बायबल या धर्मग्रंथांची आपल्या गीतेशी तुलना करतो....खरे म्हणजे कुराण वा बायबल हे 'श्रुती' ह्या प्रकारात मोडतात अन् गीता 'स्मृति' या प्रकारात मोडते.....
श्रुती म्हणजे अशा रजना ज्या खुद्द परमेश्वराने ध्यानमग्न असणार्‍या ॠषींना अंतर्ज्ञानाने दिल्या. उदा चारही वेद, उपनिषद इ.इ
वेद अन् उपनिषद ह्यांच्या काठिण्य पातळीमुळे सामन्यजनांना ह्या रचना समजण्यास अडचणी येत्.....त्यावर उपाय म्हणून ऋषीमुनींनी त्यातील सार कथारुपाने सर्वांसमोर मांडला....ह्याच कथा म्हणजे रामायण, महाभारत (गीता) इ.इ. होय.
श्रुती अन् स्मृति यांमधील वादात नेहमीच श्रुतीला वरचे स्थान दिले जाते......
असो, सांगायचा मुद्दा हा की शालेय अभ्यासक्रमात देखील जास्तीत जास्त गीतेचा १५वा किंवा १८ अध्याय पाठांतराला असतो (म्हणजे आमच्या तरी वेळेस होता. सध्याची माहिती नाही) अन् त्याच वयोगटातील ख्रिश्च्नन वा इस्लामी शाळेत त्यांच्या धर्मग्रंथांचे पाठ अभ्यासायला असतात....
त्यामुळे हिंदू धर्माचे ज्ञान जर का हवे असेल तर सर्वांनीच जागरुक होणे महत्वाचे आहे.......

- टिंग्या

ठणठणपाळ's picture

10 Apr 2008 - 10:14 pm | ठणठणपाळ

गीता जरी महाभारतात आढळत असली तरी तिचा उल्लेख हा 'उपनिषद' असाच केला गेला आहे (श्रीमद्भगवद्गीताउपनिषत्सु). गीतेचं वर्णनच मुळी 'वेदरूपी गायीच्या उपनिषदरूपी आचळातून भगवान श्रीकृष्णाने काढलेले गीतारूपी दूध' असे केले गेलेले आहे. मूळ संस्कृत श्लोक आता मी विसरून गेलो आहे.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्मृतींमधे गोष्टीरूपाने अनेक तत्वे समजावून सांगितली आहेत. पण गीतेत त्याप्रकारची एकही गोष्ट आढळत नाही. त्यात उपनिषदंमधलेच तत्वज्ञान अगदी त्याचप्रकारे सांगितलेले दिसते. काही काही श्लोक तर थेट उपनिषदंमधूनच घेतलेले आहेत. (उदा., न तद् भासयते सूर्यो......., अजो नित्यं शाश्वतोयं पुराणो........ वगैरे.)
गीता जर स्मृतींमधे मोडत असती तर आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांना गीतेवर भाष्य करण्याची काहीच गरज नव्हती. शंकराचार्यांनी कोणत्याच स्मृतीग्रंथावर भाष्य केलेले नही हे लक्षात घ्या.
याउलट, बायबलमधे तत्वज्ञानाबरोबरच सधारणपणे भारतीय पुराणांशी सादृश्य असणार्‍या अनेक गोष्टीही आहेत.( उदा., येशू ख्रिस्ताने मृत मुलीला जिवंत करण्याची गोष्ट, मुक्या स्त्रीला वाचा देण्याची गोष्ट इत्यादी). त्यामुळे गीतेला स्मृती आणि बायबलास श्रुती म्हणण्यात तुमचा अपुरा अभ्यासच दिसून येतो.

माझ्या मनात कोणत्याच धर्माबद्दल आकस नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. बायबलात अनेक चांगल्या गोष्टीही आहेत. सदर लेखकाच्या मला चुकीच्या वाटलेल्या मताचा प्रतिवाद करण्यासाठी मी हे लिहिले आहे. म्हणूनच मी काही पुरावेसुद्धा दिले आहेत.
टिंगीसाहेब, आपणही वाईट वाटून घेऊ नये.

आपला,
ठणठणपाळ

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Apr 2008 - 4:36 pm | ब्रिटिश टिंग्या

गीता जरी महाभारतात आढळत असली तरी तिचा उल्लेख हा 'उपनिषद' असाच केला गेला आहे
सहमत! किंबहुना थोडीशी सुधारणा - गीतेचा उल्लेख 'गीतोपनिषद' वा 'युगोपनिषद' असा केला जातो.
असो, गीता ही स्मृती आहे का श्रुती यावर बरेच गैरसमज (वाद?) आहेत......
एक प्रवाह असा आहे की गीता ही महाभारतातली असल्याने तीला स्मृती चा दर्जा द्यावा.....त्याचवेळी तीचा उल्लेख 'गीतोपनिषद' वा 'युगोपनिषद' केला असल्याने ती श्रुती आहे असेही वाचावयास मिळते.....
असो, आमचे ह्या विषयातील ज्ञानसागरात आमचे ज्ञान खरेच तोकडे आहे हो.....

त्यामुळे गीतेला स्मृती आणि बायबलास श्रुती म्हणण्यात तुमचा अपुरा अभ्यासच दिसून येतो.
असेल बापुडा! आंतरजालावर बर्‍याच ठिकाणी गीतेला स्मृती संबोधले आहे.....परंतु खरे म्हणजे यावर अभ्यासकांकडून काही अधिक माहिती मिळाल्यास उत्तमच!

टिंगीसाहेब, आपणही वाईट वाटून घेऊ नये.
अजिबात नाही......आम्ही एकदम निर्लज्ज आहोत हो;)
असो, या विषयावर आपणाकडून अधिक वाचावयास आवडेल. अधिक माहितीकरिता आपल्याला व्य.नि. करीत आहे.

-टिंग्या

झंप्या's picture

10 Apr 2008 - 4:42 am | झंप्या

धनश्रीताई 'संस्कृती' असं लिहितात. मुळात हा शब्द कसा लिहायचा हेच माहित नसेल तर आपण काय पुढच्या पीढीला तरी ते कसे शिकवणार? तुम्ही कतार मधे आहात ना? मग तुमच्या मुलांना एखाद्या मौलवीकडून धर्म शिक्षण द्या म्हणजे त्यांना धर्मापासून वंचित रहायला नको. कारण हिंदू काय मुसलमान काय सर्व धर्मांचे सार एकच आहे हो.

धनश्रीदिनेश's picture

10 Apr 2008 - 7:00 pm | धनश्रीदिनेश

झन्प्या दादा,
शब्द चुकीचा लिहिल्याबद्दल क्षमा असावी, अजुन सन्गणकावर लिहायचा सराव करतेय. राहीला प्रश्न माझ्या मुलाचा तर तो मुम्बईला पप्पाकडे, आजी आजोबाकडे आहे, तुमच्या माहीतीसाटी तो अडीच वर्षाचा आहे आणि त्याला बरेच श्लोक म्हणता येतात . हे मलाहि माहीती आहे सर्व धर्माची शिकवण एकच आहे, पण समजावयाची पदधत वेगळी आहे. उद्या कोणी विचारल तर आपल्या मुलाना सान्गता आले पाहिजे, ईक्डे मी ब-याच हिन्दुना भेट्लीय ज्याना स्वत:च्या धर्माबद्द्ल काहिच माहिती नाहि

प्रियाली's picture

10 Apr 2008 - 6:02 am | प्रियाली

:)))))))))))))))))))))))))))

तात्या! रामरक्षा आणि तत्सम श्लोकांची भयंकर आठवण झाली.

विसोबा खेचर's picture

10 Apr 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

रामरक्षा आणि तत्सम श्लोकांची भयंकर आठवण झाली.

तत्सम? म्हणजे कुठले गं? ;) जरा विस्ताराने चर्चा करुया की! ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Apr 2008 - 7:45 pm | llपुण्याचे पेशवेll

हां भुतांना या श्लोकांची भयंकर भिती वाटते असे म्हणतात बॉ...
(ह.घ्या.)

पुण्याचे पेशवे

अनामिका's picture

10 Apr 2008 - 11:44 am | अनामिका

मुलांना बसवुन श्लोक शिकवणे सध्या अशक्य होवुन बसलय...............मुळात हल्लीची मुले फारच चंचल आणि त्यांना बैठक अशी नाहिच्.त्यामुळे पाठांतराचा कंटाळा..............!
आपण ज्या वयात श्लोक अथवा स्तोत्र शिकलो तेंव्हा त्याचा अर्थ माहीत होताच असे नाहि.जसजसे मोठे होत गेलो तसतसेच त्याचे अर्थ माहित होत गेले.पण श्लोक ,स्तोत्र पाठ केल्याने वाणी आणि विचार शुद्ध झाले हे मात्र नक्की !
सध्या एक सोयीचे झालय !बाजारात स्तोत्रांच्या,मनाचे श्लोक याच्या ध्वनीफिती उपलब्ध आहेत्.सगळ्या अतिशय नादमधुर आणि श्रवणीय आहेत्.
मी माझ्या मुलांपुरत सांगायच झाल तर त्यांच्या अभ्यास घेत असताना हळु आवाजात या ध्वनीफित लावुन ठेवते, जेणे करुन त्यांच्या कानावर पडावे. या सगळ्याच्या चाली साध्या सरळ आणि सोप्या असल्या कारणाने हे श्लोक अथवा स्तोत्र लवकर पाठ होतात असा निदान माझा तरी अनुभव आहे.
प्रयोग करुन बघायला हरकत नाहि.
या प्रयोगाचे मला माझ्या मोठ्या लेकाच्या बाबतीत १००% उपयोग झालाय्,त्याचे गणपती स्तोत्र.अथर्वशिर्ष ,तसेच थोड्याफार प्रमाणात रामरक्षा पाठ झाली आहे.सध्या मी माझा मोहरा धाकट्या लेकीकडे वळवलाय.
विषयांतर झाले असेल तर क्षमस्व!
"अनामिका"

विजुभाऊ's picture

10 Apr 2008 - 1:00 pm | विजुभाऊ

हे असे प्रयोग सर्वप्रथम फ्रॅन्क बन्कर गिल्ब्रेथ ने केले तो मुलाना भाषा शिकवण्यासाठी मुले आंघोळ करताना भाषांच्या रेकॉर्ड्स लावायचा. गणीत / शास्त्रातली सूत्रे शिकवण्यसाठी तो ती सूत्रे छतावर लिहुन ठेवायचा. संदर्भ. पुस्तक :चिपर बाय डझन . ले.मन्गला निगुड्कर

स्वाती दिनेश's picture

11 Apr 2008 - 1:22 pm | स्वाती दिनेश

गिलब्रेथच्या मुलांनी हे पुस्तक लिहिले. मंगला निगुडकर यांनी अनुवाद केला आहे.त्या ह्या पुस्तकाच्या मूळ लेखिका नव्हेत.अर्थात त्यांचा अनुवाद अत्यंत सकस आहे.हेवेसांनल.
चीपर बाय दी डझन नावानेच त्यावर सिनेमाही आला होता.
विषयांतराबद्द्ल क्षमस्व!
स्वाती

मनापासुन's picture

11 Apr 2008 - 5:09 pm | मनापासुन

मला सहज विचारावेसे वाटते की आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ? मला गर्व आहे मि हिन्दु आहे , पण मला माझ्या ग्रन्थातील ४ अध्यायांची नावं सुद्धा माहीती नसतात हि परिस्थिति याने असा काय फरक पडतो. एखादा /एखादी रामरक्षा येत नाही म्हणुन आयुश्यात फार मागे पडला/ली आहे किंवा पुढे गेला आहे असे काही होत नाही.
विवेकानन्द म्हणतात की सगळा युरोप जेंव्हा प्रगती साठी यंत्रे शोधत होता तेंव्हा आपण निव्वळ शास्त्रार्थ चिवडत बसलो होतो. पूजेचे ताम्हन उजव्या बाजुला ठेवावे की डाव्या/ घण्टा डाव्या हताने वाजवावी की उजव्या या सारख्या बाष्कळ चर्चेत मग्न होतो. शौचाला जाताना जानवे कानात कसे अडकावावे या चर्चा घालत होतो.
जगात ईतरत्र लोक जग पालथे घालत असताना आपण मात्र सिंधु बन्दी सारख्या भोंगळ कल्पना बाळगुन समुद्र ओलंडणार्‍या ना प्रायश्चित्त घ्यायला लावत होतो. प्लुटो ब्रह्मांड ढुंडाळत असताना आपण मात्र वराहमिहीर विसरत होतो.
आज जगात नीट पाहीले तर सगळेच धर्म कालबाह्य ठरत आहेत. सातव्या/आठव्या शतकातील आचरणासाठी केलेले नियम हे एकविसाव्या शतकात लावु पहाल तर निराशाच येइल. आणि आज हे सर्वत्र अनुभवास येत आहे.
आपण मुलांवर जे धर्म संस्कार करतो उदा: मुण्डन / मुंज या संस्कारांचा आज काय उपयोग आहे? की आपण काहीतरी धर्म पाळतो हे मनाला फसवे समाधान ? मिलांवर जर संस्कार करायचे असतील तर त्याना दुसर्‍याच्या मतांचा आदर करायला शिकवुया.आणि आपण्ही ते शिकुया. प्रत्येक धर्माने आज डोळस विचार करुन स्वतःमध्ये बदल करावयास हवा. नवनवीन मते आत्मसात केली पाहिजेत.
खलील जिब्रान ने पैगम्बरांच्या शिकवणुकीचा जितका समर्पक अर्थ सांगितला आहे तितका कोणत्याच मौलवीने/हाफीझ ने सांगितला नाही.
विवेकनन्दानी याची सुरुवात केली / सावरकरानी या बाबत पाऊल उचलले. त्यांच्यासारख्या कट्टर हिन्दुने गाय हा उपयुक्त पशु आहे हा आग्रह त्याने धरला. सिन्धुबन्दी चा धिका:र केला.पण हे विचार सनातन प्रभाती विचारांच्या लोकानी सोयीस्कर पणे बाजुला केले.
जुने ते सगळ ए वाईट असे मी म्हणत नाही . पण आपण संस्कार या गोंडस नावाखाली परवचा/ रामरक्षा/अजान्/यासरख्या जुनाट कल्पनाना किती काळ चिकटुन रहायचे याचा जरा डोळे उघडुन विचार करायला हवा. मुलांवर जर उत्तम संस्कारच जर करायचे असतील तर गायन /वादन/शिल्प कला/चित्र कला या सारख्या माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करणार्‍या कलांचे संस्कार करायला हवेत.
असे मला मनापासुन वाटते

विकास's picture

11 Apr 2008 - 5:13 pm | विकास

लहान मुलांना केवळ घरात नुसते श्लोक म्हणायला लावणे वगैरे म्हणजे कधी कधी आहार-व्यायाम न करता व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यासारखा प्रकार होऊ शकतो. अर्थातच त्याला कधी कधी पर्याय नसतो हे समजते (विशेष करून आपण जेथे आहात तिथे भारतीय नसले तर वगैरे...) पण जेंव्हा असतो तेंव्हा नक्कीच पहावेत आणि किमान काही तयार करण्याचा प्रयत्न करावा. कारण श्लोक आणि हिंदू विचार हे केवळ धर्म म्हणून न शिकवता त्यातून चांगल्या अनेक गोष्टी समजतात. असो. अमेरिकेतील काही अनुभव/निरीक्षण: माझे बॉस्टनमधील असले तरी अमेरिकेत अनेक ठिकाणी अशा संस्था आहेत. (या सर्वांमधे आम्ही काही जात नाही पण माहीती आहेत इतकेच). या सर्व स्वतंत्र अमेरिकन संस्था आहेत भारतातील संस्थांशी संबंध अर्थातच आहे पण संलग्नता नाही.

हिंदू स्वयमसेवक संघाचे बालगोकूलम: "बच्चा खेले बच्चे का (मॉ-)बाप खेले" हा फॉरमॅट... आधी सूर्यनमस्कार, योगासने, नंतर खेळ, मग वयानुसार गोष्टी, बौद्धीक आणि श्लोक वगैरे असतात. हा राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि १००-१०५ ठिकाणी चालतो. बालगोकूलम नावाचे त्रैमासीक पण असते ज्यात मुले लिहीतात. २००६ नंतर या वर्षीपण कौन बनेगा रामायण एक्सपर्ट ही (केबीआरई) स्पर्धा ठेवली आहे. गेल्या वेळेस ३५०० मुलांनी भाग घेतला होता.

बालविहार - ह्या नावाने व्हिएचपी ऑफ अमेरिका आणि चिन्मय मिशन, अमेरिका चालवतात. दोघांचा अनुभव नाही पण व्हिएचपीए मला वाटते खेळ पण घेते चिन्मयमिशनचा भर संस्कारांवर आहे.

बॉस्ट्न भागात ३ ठिकाणी शिशूभारती ही रविवारची शाळा असते. त्यात संस्कार, संस्कृती, इतिहास वगैरे शिकवले जाते. खूप प्रसिद्ध आहेत. (यांचे संकेत स्थळ दुवा चालत नाही आहे).

स्वामी नारायण मंदीरात पण असेच लहानमुलांसाठी काहीतरी चालते आणि तसेच "न्यू इंग्लंड हिंदू टेंपल" मधे.

संस्कृत भारती ही संस्था दरवर्षी श्लोकस्पर्धा ठेवते. मोठ्यांना अवघड असलेले श्लोक लहान पटकन मुखोद्गत करतात असा घरचा अनुभव आहे!

अशापैकी कुठल्यातरी ऍक्टिव्हीटीमधे मुलांना घातल्याचा परीणाम म्हणजे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड असे दोन्हीकडील चांगल्या गोष्टी मिळतात आणि त्याचबरोबर त्यांना भारतीय वंशाचे मित्र-मैत्रीनी मिळतात, आई-वडीलांपेक्षा वेगळेपण कोणी (नातेवाई़कांपासून दूर असूनही) सांगणारे मिळतात, मुलांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो वगैरे...