मराठी पुस्तके कधी बेस्ट सेलर होणार ?

शेलार मामा मालुसरे's picture
शेलार मामा मालुसरे in काथ्याकूट
31 Aug 2010 - 3:49 pm
गाभा: 

मराठी पुस्तके खपतात (विक्री) नाही असे नाही.
पण हॅरी पॉटर सारखी इंग्रजीतील अनेक पुस्तके महाराष्ट्रात आणी देशात प्रचंड खपतात आणि "बेस्ट सेलर' ठरतात.
साहित्य संमेलनातून होणारी अनेक विषयावरील अनेक पुस्तकांची विक्री तर डोळे दिपवणारी असते.
मोठ्या संख्येने अनेक पुस्तके विकली जाणे वेगळे व एखादे पुस्तक रेकॉर्डब्रेक खपणे वेगळे.

मराठीत तर हजारो पुस्तके खपली तरी डोक्‍यावरून पाणी गेले अशी परिस्थिती असते. त्यामुळे नेहमी प्रश्‍न असा पडतो की,
मराठी भाषिकांच्या सुशिक्षित महाराष्ट्रात एखाद्या मराठी पुस्तकांचा विक्रमी खप का होत नाही? ती "बेस्ट सेलर' का ठरत नाहीत?
तुमचे यावर काय मत आहे ?

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

31 Aug 2010 - 3:53 pm | मेघवेडा

तुम्हालाही हे आणि त्यावरचे प्रतिसाद, आणि त्यात दिलेले दुवे वाचण्याची अत्यंत गरज आहे, नुसते गरम विषय घेऊन त्यावर काथ्याकुटं केली की झालं का? कचरा करून टाकलाय नुसता बोर्डावर.

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 4:29 pm | शेलार मामा मालुसरे

मराठी पुस्तके हा गरम विषय आहे हे मला आत्ताच कळाले.
आपण एखाद्याविषयी टोमणा मारण्यापुर्वी सर्वंकष माहिती घेऊनच बोलावे हे बरे !
असो हाताची सर्व बोटे सारखी नसतात,
मिपा संपादक मंडळी बोर्डाची़ काळजी करायला समर्थ आहेत असा माझा विश्वास आहे.
आपण दुखावले गेले असाल तर क्षमस्व !!!!

माझा संपूर्ण प्रतिसाद हा केवळ तुम्हाला उद्देशून नव्हता. आणि या काकुतून तुमचा केवळ 'मराठी पुस्तके' या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा उदात्त हेतू असेल तर तुम्हाला सलाम! पण तो तसा नाही. भाषिक तुलना ही या काकुचा मूलाधार आहे. गरम विषय नाही तर काय? आणि तुमची आजवरची वाटचाल काय सांगते? भगवा दहशतवाद, शेतकर्‍यांची लूटमार, हिंदु कुटुंबपद्धती हे गरम विषय नाहीत तर काय? माझा विषयांना विरोध नाही, काथ्याकुटांच्या-कौलांच्या वारंवारतेला आहे. सध्या बोर्डावरील २५ मधील किमान १४-१५ धागे हे फुटकळ कौल-काकुंचेच असतात. त्यावरील रागाचा हा उद्रेक समजा. माझ्या लिखाणाला नाही दर्जा, पण म्हणून प्रकाशझोतात राहण्यासाठी मी उगाच गरम बातम्यांची काथ्याकुटं काढत बसत नाही. तसा तुमच्यासह बर्‍याच जणांचा प्रयत्न चाललेला दिसतो सध्या. असो, "घटं भिन्द्यात्, पटं छिन्द्यात्.." हे फार पूर्वीपासून चाललेले आहे. हाताची पाचही बोटे सारखी नसतात हेच खरं.

आणि घासकडवींच्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांतून मिपावरील लिखाणाचा दर्जा काय आहे हे अनेकांना कळावे हा त्या प्रतिसादाचा हेतू होता. असोच.

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 4:59 pm | शेलार मामा मालुसरे

येथे काही प्रकटन आवश्यक वाटले म्हणुन टंकवतो की,
माझा येथे लिहीण्याने प्रकाशझोतात यावे हा उद्देश निश्चितच नाही.
मी माझ्या क्षेत्रात आवश्यक तेव्हढा प्र.झोतात आहे,आपण निश्चिंत असावे.
आपल्या लेखनदर्जाबद्दल मी काहीही मत व्यक्त केलेले नाही.
असोच.

माझ्या लेखनदर्जाबद्दल कुणी काही बोलू नये म्हणून आधीच काळजी घेतली होती! ;)

चला आता पुरेच. खूप झाली बॅटिंग. तुमचं चालू द्या!

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 5:18 pm | शेलार मामा मालुसरे

तुमचंही चालू द्या !!

यशोधरा's picture

31 Aug 2010 - 3:56 pm | यशोधरा

इंग्लिश भाषा आणि मराठी भाषेतील पुस्तकांची 'खप' ह्या मुद्द्यावरुन तुलना मला तरी पटत नाही. मराठी भाषेतील पुस्तकांचा वाचकवर्ग, इंग्लिश भाषेतील पुस्तकांच्या वाचकवर्गापेक्षा संख्येने कमी आहे, असे मला वाटते, मग मराठीतील एखाद्या पुस्तकाची एकापेक्षा अधिक आवृत्त्या निघून विक्री झाली, तरीही ती इंग्लिश भाषेतल्या पुस्तकांच्या खपापेक्षा कमीच वाटेल ना?

मेव्या, दोन्ही काथ्याकुटं वेगळी आहेत.

येडबंबू's picture

31 Aug 2010 - 4:00 pm | येडबंबू

>>>>> नुसते गरम विषय घेऊन त्यावर काथ्याकुटं केली की झालं का? कचरा करून टाकलाय नुसता बोर्डावर.

काय झेपलं नाही बुवा. म्हणजे आता काथ्याकुटं करायचीच नाहीत का?
आणी हा विषय आधी येवून गेला असेल तर जुन्या काथ्याकुटं ची लिंक मिळेल का?

बाकी यशोधरा यांच्याशी सहमत.

--

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Sep 2010 - 8:58 am | विश्वनाथ मेहेंदळे

येडबंबू साहेब, बरेंचदा काय लिहिले (किंवा म्हटले) आहे या पेक्षा कुणी लिहिले (किंवा म्हटले) आहे ते महत्त्वाचे असते. टिळकांनी दाखविला तो बाणेदारपणा, तेच आपण केले असते तर "काय आगावू कार्टा आहे" असे म्हणून थोबडावून नसते का काढले ??

मिपा वर नुकतीच बाब्या आणि कार्टे या विषयावर चर्चा होऊन गेली. आत्ता धागा मिळत नाही आहे. मिळाला तर पाठवेन. ( सर्व माननीय सदस्यांनी हलके घ्यावे)

मृत्युन्जय's picture

1 Sep 2010 - 10:37 am | मृत्युन्जय

हॅहॅहॅहॅहॅ. मला तर त्याचा प्रसादही मिळाला आहे. तेव्हापासुन टिळकांचा जमाना संपला हे कळुन चुकले मला.

गांधीवादी's picture

1 Sep 2010 - 12:50 pm | गांधीवादी
परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

मराठीतपण पुस्तके असतात ? च्यायला ऐकावे ते नवलच.

आमचा नान्या काय काय ते हैदोस, उनाड मैना वगैरे वाचतो असतो तेवढे माहिती होते आपल्याला.

मराठीत अनेक पुस्तकं आहेत ज्यानी वैयक्तिक खपाचे अनेक विक्रम केले, मोडले.

शिरवळकरांचं दुनियादारी, बरसात चांदण्यांची, झूम, लटकंती हे काही बेस्ट-सेलर्स!

बाबासाहेब पुरंदरे यानी लिहिलेलं राजा शिवछत्रपती गेल्या वर्षी पुनरावृत्तीसाठी आलं तेव्हा ४ महिने वेटींग होतं त्या पुस्तकाला.

कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' ने काव्यविभागात जो विक्रम केलाय त्याला तोड नाहीये.

बाबा कदम आणि गुरुनाथ नाईक हे एकेकाळचे हॉट लेखक. अरुण हरकारेंची 'क' सिरिज पाहून त्या एकता कपूरला फेफरं येईल.

'तें' च्या 'गिधाडे'चा अजून ही खप आहे!

अजून अनेक उदाहरणे आहेत, पण तूर्तास इतकी पुरे!

मराठी वाचणारे आणि खरेदी करणारे खूप लोक आहेत, काळजी करु नये.

--असुर

चिंतामणी's picture

31 Aug 2010 - 4:42 pm | चिंतामणी

कोणिही काहिही म्हणोत. परन्तु प.पु. दासगणु महाराज विरचीत "गजानन विजय" ह्या पुस्तका इतक्या कुठल्याच मराठी पुस्तकाच्या प्रती खपल्या नाहीत आजपर्यन्त.

सागर's picture

31 Aug 2010 - 7:23 pm | सागर

किती आवृत्त्या निघाल्या आहेत या ग्रंथाच्या?

माझ्या संग्रहात स्वामी कादंबरीची २८वी आवृत्ती आहे.

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 12:41 am | चिंतामणी

आवृत्या किती निघाल्या पेक्षा प्रती किती खपल्या हे महत्वाचे आहे. आणि मी वरती प्रती असेच म्हणले आहे.

माझ्या माहिती प्रमाणे आजपर्यन्त पन्नास लाखाचे घरात आकडा आहे. कदाचित जास्तच असेल.

अवांतर- या पोथीच्या खपामुळेच संस्थान आर्थीकद्रुष्ट्या सक्षम बनले.

ही पोथी प.पू. दासगणुमहारांजानी लिहावी अशी विनंती त्यावेळच्या संस्थानाच्या पदाधिकार्यांनी केली आणि साईबाबांच्या आज्ञेने त्यांनी स्विकारली. त्यासाठी एकही पैसा घेतला नाही. त्याचे सर्व हक्क संस्थानाला दिले.

परन्तु हे कुठेही लेखी स्वरूपात नव्हते. त्याचा खप बघून काही लालची प्रकाशक त्यांचे उत्तराधिकारी श्री. अनंतराव आठवले उर्फ स्वामी वरदानंद सरस्वती यांचेकडे आले आणि मुद्रणाचे हक्क देण्यासाठी अधिकारपत्र द्यावे म्हणून गळ घालू लागले. परन्तु त्यांनी त्या प्रकाशकांना लिहून दिले की याचे हक्क शेगाव संस्थानाचे आहेत. (अर्थातच त्याची प्रत संस्थानाला पाठवली)

प्रकाश घाटपांडे's picture

31 Aug 2010 - 5:24 pm | प्रकाश घाटपांडे

बेस्ट सेलर म्हणजे काय? त्याचे निकष काय आहेत?

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

बेस्ट सेलर म्हणजे काय? त्याचे निकष काय आहेत?

बेळगावला छापली जातात ती.

जाणकार

भाऊ पाटील's picture

31 Aug 2010 - 5:40 pm | भाऊ पाटील

हा प्रश्न डॉ. प्रां ना विचारा. ते त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या मदतीने उत्तर देऊ शकतील ;)

मराठी पुस्तकांच्या खपाचे आकडे कोणतेच प्रकाशक बाहेर येऊ देत नाहीत.
बेस्ट सेलर व्हायला निदान त्या पुस्तकाची आवृत्ती किती छापली होती हे सुद्धा कोणी डिक्लीयर करत नाहीत.
बेस्ट सेलर कोणत्या निकषांवर ठरवणार?

सागर's picture

31 Aug 2010 - 7:21 pm | सागर

विजुभाऊ जबर्‍या,

१००% सहमत आहे. ही प्रथा आपल्याकडे पडली तर खरी बेस्ट सेलर पुस्तके कळतील :)

मराठी पुस्तके बेस्ट सेलर नाही झाली तरी चालतील बेस्ट कंटेट व्हावीत...

>>>मराठी पुस्तके बेस्ट सेलर नाही झाली तरी चालतील बेस्ट कंटेट व्हावीत...<<<
मराठीमधील बहुतांश बेस्ट सेलर्स ही बेस्ट कंटेंट आहेत. आता दुनियादारी आणि स्वामी यांच्या कंटेंट मधेच मूलभूत फरक आहे ही गोष्ट अलाहिदा!

पण हे वाक्यच मुळी पसायदान असल्यासारखे वाटले, आणि त्यामुळेच संपूर्ण सहमती!

--असुर

प्रभो's picture

31 Aug 2010 - 7:32 pm | प्रभो

नान्याशी सहमत आहे.

चिरोटा's picture

31 Aug 2010 - 9:10 pm | चिरोटा

मराठी भाषिकांच्या सुशिक्षित महाराष्ट्रात एखाद्या मराठी पुस्तकांचा विक्रमी खप का होत नाही?

वाचनसंस्कृती.
वर म्हटल्याप्रमाणे चांगली मराठी पुस्तके,कादंबर्‍या बर्‍यापैकी खपतात.इतर भारतिय भाषांच्या तुलनेत मराटी पुस्तके नक्कीच जास्त खपत असावीत असा अंदाज आहे. गेल्यावर्षी मी कन्नड साहित्य संमेलन बघितले होते.पुस्तक विक्रीच्या बाबतीत आनंदी आनंद होता. ५०० प्रती खपवतानाही प्रकाशक मेटाकुटीला येतात.
ईतर(इंग्रजी/युरोपियन) भाषांची तुलना करायची तर भारतात पुस्तके वाचण्याचे प्रमाण त्या देशांच्या मानाने कमी आहे.पश्चिम बंगाल/तामिळनाडु (आणि खालोखाल महाराष्ट्र!) ह्या रा़ज्यांमध्ये वाचनाचे प्रमाण जास्त असावे.

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 9:34 pm | शेलार मामा मालुसरे

पुस्तकाचे प्रमोशन आणी मार्केटींग या बाबींवर खुप कमी लक्ष दिले जाते.
पुस्तकविक्रीचा प्रतिसाद वाढल्यानंतरही त्यासाठी परिसंवाद किंवा चर्चासत्र ठेवले जात नाही.
प्रकाशकांकडुन विशेष उपाययोजना आखल्या जात नाहीत.
पुस्तक एक प्रॉडक्ट समजून त्याची नियोजनबध्द जाहिरात केली जात नाही.
पुस्तकांच्या प्रचंड किंमतीमुळे विक्रीवर परिणाम होतो यावर विचार होत नाही.
पुर्वी भटकळ स्व्खर्चाने ग्रंथयात्रा काढत तसे प्रयोग आजकाल होताना दिसत नाहीत.

अशी काही कारणे यासाठी असू शकतील असे मला वाटते.

चिरोटा's picture

31 Aug 2010 - 9:42 pm | चिरोटा

ह्या सर्व कारणांमागे वाचनसंस्कृती कमी झाली आहे हे कारण असावे. आपण वर सांगितलेली कारणे मान्य आहेत पण पुस्तकाचा 'ऑडियन्स' किती ह्यालाही महत्व असते.'जगावेगळे' लिहिणार्‍या आणि ते वाचणार्‍यांची संख्या किती ह्यालाही महत्व आहे.

शिल्पा ब's picture

1 Sep 2010 - 10:33 am | शिल्पा ब

<<<मराठी पुस्तके कधी बेस्ट सेलर होणार ?

तुम्ही पुस्तकं विकत घ्यायला सुरुवात केल्यावर..

शेलार मामा मालुसरे's picture

1 Sep 2010 - 9:20 pm | शेलार मामा मालुसरे

मस्त पण मार्मिक उत्तर.

विलासराव's picture

1 Sep 2010 - 9:30 pm | विलासराव

"आमचा बाप आन आम्ही" हे नरेंद्र जाधव यांचे पुस्तक आजच आणले आहे. १९९३ ला ते जेव्हा प्रकाशित झाले त्याच वेळेस ४५ मिनिटात ५०० प्रती खपल्या आनी ५०० प्रतींची नोंदणी झाली (दुसर्या दिवशी डिलीवरी देण्याच्या बोलीवर). प्रकाशनाच्या दिवशीच १००० पुस्तके विक्री होण्याचा हा तोपर्यंतचा विक्रम होता. असे पुस्तकात नमुद करण्यात आलेले आहे.

या पुस्तकाबद्दल कोणाला काही माहीती असल्यास द्यावी.

अवांतर. तसेही मी ते वाचायला घेतलेच आहे.

इन्द्र्राज पवार's picture

1 Sep 2010 - 12:40 pm | इन्द्र्राज पवार

पुस्तक खपाच्याबाबतीत इंग्रजी आणि मराठी भाषा यांची तुलना अप्रस्तुत होईल, त्याला कारण म्हणजे पैलवानांची विजोड जोडी. 'बेस्ट सेलर' ही संकल्पना इंग्रजीतील पुस्तकांना जशी चटकन 'अप्लिकेबल' होते तशी मराठीला होऊच शकत नाही. पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी, व.पु.काळे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, ह.मो.मराठे, अनिल अवचट, विश्वास पाटील आदी (अजून ही यादी वाढविता येईल) ही नावे 'नित्यनेमाने खपावू' मधील आहेत (हल्ली का कोण जाणे जी.ए.कुलकर्णी या नावालाही 'बर्‍यापैकी' दिवस आले आहेत. नाहीतर एक काळ असा होता की, त्यांच्या पहिल्यावहिल्या 'निळासावळा' या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती निघायला २३ वर्षांचा भरभक्कम काळ गेला होता); तर काही लेखक एकदोन पुस्तकात 'राम' म्हणतात (भले त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले असले तरी !)

वरील सर्व लेखकांच्या पुस्तकांची एकत्रीत खपाची आकडेवारी बघीतली (जिचा केवळ अंदाज बांधू शकतो, प्रकाशक नावाची एक बेरकी जमात सांप्रत महाराष्ट्रात आहे ती या लेखकाना कशाप्रकारे आपल्या दावणीला बांधते त्याचा किस्सा वेगळा आहे. भले लेखकाचा 'लेखकराव' जरी झाला तरी 'नारायणराव' व्यवहारात देशमुख, भटकळ, कोठावळे आणि भागवत बंधू या लेखकरावांच्या बापाचे बारसे जेवून आहेत) तरी ती लाखाच्या आसपास जाईल. त्याचेवेळी इंग्रजी पुस्तकांच्या खपांचे आकडे पाहून छाती धडधडायाला लागते.

काही वानगीदाखल ५ नावे व खप ~ इथे फक्त कादंबर्‍यांचा विचार करू या :
१. "टेल ऑफ टू सिटीज" ~ चार्ल्स डिकन्स : २० कोटी
२. "लॉर्ड ऑफ दि रिंग्ज" ~ जे.आर.आर.टॉल्किन : १५ कोटी
३. "दा विन्ची कोड" ~ डॅन ब्राऊन : ८ कोटी
४. "कॅचर इन दि राय्" ~ जे.डी.सॅलिन्जर : ७ कोटी
आणि
५. "हॅरी पॉटर" ~ जे.के.रौलिंग ~~ एकत्रीत खप : ४० कोटी

यातील डिकन्सची कादंबरी १८५९ (म्हणजे जवळपास १५० वर्षापूर्वी) प्रसिद्ध झाली होती तर "पॉटर, विन्ची" मालिका अलिकडील काळातील आहेत. याचाच अर्थ इंग्रजी पुस्तकांना प्रत्येक दशकात/शतकात जे वैश्विक रूप वा जी बाजारपेठ उपलब्ध आहे, ती 'मराठी' भाषेच्या तुलनेने महाकाय अशीच आहे. 'स्वामी, मृत्युंजय, बटाट्याची चाळ, महानायक, आम्ही आणि आमचा बाप' हे 'ऑल टाईम बेस्ट सेलर इन मराठी' असे आपण अन्य भाषिक मित्रांसमवेत चर्चा करताना म्हणू शकतो, पण त्यांच्या खपाची आणि इंग्रजी कादंबर्‍यांच्या खपाची तुलना संभावतच नाही. (भारतातील एकट्या 'चेतन भगत' च्या तिन्ही गाजलेल्या पुस्तकांची एकत्रीत विक्री पाच लाखाच्यावरील आहे.)

आता हरदिनी मराठी पुस्तके का खपत नाहीत? या प्रश्नाला उत्तर एकच आणि ते म्हणजे "पुस्तक" ही बाब नित्य खरेदीच्या यादीत आपल्याकडे कधीच असत नाही. मराठी घरात टीव्ही, डिव्हीडी, फ्रीझ, पंखे, म्युझिक सिस्टीम आणि तत्सम वस्तू 'मस्ट' सदरात येतात पण पुस्तकासाठी एका छोट्या कपाटासाठी जागा नसते. शिवाय प्रकाशकांमध्ये नावीन्याचा अभाव असतो आणि केवळ 'खपावू' पुस्तकांच्या आवृत्या काढल्या की झाली आपली मराठी भाषेची सेवा असे त्यांचे ब्रीद (कवितेची तर कशीबशी २०० ची आवृत्ती निघते, तर तीही १०-१५ वर्षे संपत नाही). लेखकाबरोबर कधीही खुलेपणाने, स्वच्छ व्यवहार करायचा नाही यावर तर प्रकाशकपंत कमिटी एकमेकाच्या गळ्यात पडतील. एखाद्या लेखकाला "वर" कसा आणायचा तर आपल्या ताटाखालील मांजर न बनू पाहणार्‍या एखाद्या होतकरूला "खाली" कसे गाडायचे हे सर्पसत्र तर वर्षानुवर्षे या क्षेत्रात घडत असते.

"कोसला" चा व्यवहार नेमाड्यांनी मागीतला म्हणून "राजे देशमुख" संतप्त झाले आणि एका रात्रीत या एकमेव अशा गणल्या गेलेल्या क्रांतिकारी कादंबर्‍याच्या प्रती सर्व दुकानातुन काढून घेवून, नेमाड्यांना 'कुठून झक मारली आणि लेखक झालो' असे करून टाकले, तर सर्वतोमुखी नाव झालेली किरण नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळिस' ची दुसरी आवृत्ती निघायला तब्बल २१ वर्षे लागली.

या झाल्या पडद्याआडील व्यवहारा (वा अव्यवहारा) च्या बाबी. श्री.मालुसरे यांच्या 'मराठी पुस्तके बेस्ट सेलर का होऊ शकत नाहीत' या सरळ प्रश्नाला सरळच उत्तर असेल तर ते आहे मराठीमाणसाची 'पुस्तक विकत घेऊन न वाचणे' ही मनोवृत्ती. "मी अमुकतमूक पुस्तक लायब्ररीतून क्लेम लावून वाचले", "ते पुस्तक? होय, ते माझ्या मित्राकडे आहे, पुढील आठवड्यात मी त्याच्याकडून आणणार आणि वाचणार" अशीच उत्तरे आपल्याकडे उपलब्ध असतात. (अर्थात याला सन्माननीय असे अपवाद आहेतच, जे दर महिना काही विशिष्ट रक्कम पुस्तक खरेदीवर अगत्यपूर्वक करतातच. पण 'मास' चा विचार करता तो आकडा नगण्य वाटतो.)

एक वैयक्तिक उदाहरण ~~ माझ्याकडे डॉ.श्रीराम लागू यांचे "लमाण" हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. ते रॅकवर एकदा पाहिल्यावर आमच्या घरी रविवारी गप्पाटप्पा करायला येणार्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीने ते पाहिले आणि मी नसताना घरातीलच अन्य ज्येष्ठाकडून "हे लमाण मी नेतो हं.... फार चांगले आहे असे म्हणतात, वाचून प्रशांतकडून पाठवून देतो...". इतक्या सहजतेने/हक्काने पुस्तक नेणारी ही व्यक्ती एका राष्ट्रीकृत बँकेत मॅनेजर या पदावर नोकरीत आहे, सौ. देखील दुसर्‍या बँकेत अधिकारी पदावरच आहेत, मुलगा एमबीएला, मुलगी मेडिकलला....गेल्या महिन्यात घेतलेली नवी कोरी "ह्युन्डाई" दाखविण्यासाठी घरी आले होते.... आता अशा 'पॅरेडाईज' मध्ये राहणार्‍या व्यक्तीस ४५० रुपयांचे 'लमाण' विकत घ्यावे असे वाटत नसेल तर पुस्तक खपाच्याबाबतीत आनंदच आहे.

असो.

इन्द्रा

मृत्युन्जय's picture

1 Sep 2010 - 1:09 pm | मृत्युन्जय

तुम्ही दिलेले उदाहरण तर सार्वजनिक आहे असे मला तरी वाटते. माझे कित्येक स्नेही / नातेवाइक माझ्या घरच्या लायब्ररीतील पुस्तके बिनदिक्कत घेउन जातात.

आपल्याला संग्राह्य न वाटता केवळ वाचनीय वाटत असतील हे ही एक कारण असु शकते. पुस्तक कायमस्वरुपी घरी बाळगण्याची गरजच काय? गरज पडेल वाचावेसे वाटेल तेव्हा वाचनालयातुन आणुन वाचु असाही एक सुर असतो. शिवाय महिना अगदी २५००० रुपये पगार (किंवा उत्पन्न) जरी असेल तरी रू. ५०० चे पुस्तक म्हणजे महिना पगाराचे २% होतात असा व्यावहारिक विचार होतो.

घरी जागा नसणे हे एक विचित्र कारण देखील असु शकते. मला नवीन पुस्तके विकत घेण्याला घरुन मनाई करण्यात आली आहे. घरात आधीच २०० पुस्तके आहेत अजुन आणुन कुठे ठेवणार आहेस हा प्रश्न असतो. सध्या ती पुस्तके जागा मिळेल तिथे कोंबुन ठेवली आहेत.

मी स्वतःदेखील सगळी पुस्तके विकत घेत नाहीत. मी आणि माझी बहीण एकमेकांकडे असलेली पुस्तके घेत नाही. डुप्लिकेशन नको म्हणुन.

या व्यतिरिक्त मराठी पुस्तके बेस्टसेलर न होण्याचे एक कारण असेही आहे की मुळात मराठीभाषिकांची (किंवा मराठी वाचुन आणि समजु शकणार्‍यांची) संख्या ती कितीक?शकणार्‍यांची)काही वाचनप्रेमी नसणार. नाहीतच. इंग्रजी पुस्तकांबद्दल असे नाही. इंग्रजी समजु शकणारे बरेच आहेत. मराठी पुस्तके फक्त मराठी माणुस घेइल. इंग्रजी पुस्तके मात्र इंग्रजाप्रमाणे मराठी, गुजराथी असे इतर भाषिक पण घेतील. त्यामुळे त्याचा खप नेहेमीच जास्त राहणार.

त्यामुळे मराठी पुस्तके बेस्टसेलर व्हावी असे वाटते असेल तर मुळात जगावर राज्य करा, त्यांच्या गळी मराठी भाषा उतरवा आणि मग पुस्तके आपोआप विकली जातीलच.

इन्द्र्राज पवार's picture

1 Sep 2010 - 2:29 pm | इन्द्र्राज पवार

तुम्ही दिलेले उदाहरण तर सार्वजनिक आहे असे मला तरी वाटते. माझे कित्येक स्नेही / नातेवाइक माझ्या घरच्या लायब्ररीतील पुस्तके बिनदिक्कत घेउन जातात.
~~ हो. जवळपास सार्वजनिक अशीच पुस्तके घेऊन जाणेबाबत परिस्थिती आहे. मी कामानिमित्य बाहेर, घर एकत्र कुटुंबपद्ध्तीचे, आजी पूर्ण अशिक्षित तर आई जवळपास अशिक्षित आणि एकूणच या दोघींचा घरातील वावर चुलीपुरताच. पुस्तकांच्या कपाटांना कुलुपे लावावी म्हटले तर त्याच कपाटातून अन्य भावंडांची शाळा-कॉलेजीसची क्रमिक पुस्तके. घरातील अन्य ज्येष्ठ पुरूष या ना त्या निमित्ताने सरकारी नोकरीशी/व्यापाराशी आणि स्थानिक राजकारणाशी निगडीत, साहजिकच घराला जवळपास चावडीचे रूप; खुला वावर.... त्यामुळे फार हतबलता येते.

आपल्याला संग्राह्य न वाटता केवळ वाचनीय वाटत असतील हे ही एक कारण असु शकते. पुस्तक कायमस्वरुपी घरी बाळगण्याची गरजच काय? गरज पडेल वाचावेसे वाटेल तेव्हा वाचनालयातुन आणुन वाचु असाही एक सुर असतो.
~~ ही मेंटॅलिटी सर्वत्रच आहे. शिवाय 'एकदा वाचून झाल्यावर त्या पुस्तकाची काय किंमत?' असाही व्यवहारी (वा मतलबी) विचार असतोच.

शिवाय महिना अगदी २५००० रुपये पगार (किंवा उत्पन्न) जरी असेल तरी रू. ५०० चे पुस्तक म्हणजे महिना पगाराचे २% होतात असा व्यावहारिक विचार होतो.

~~~ २५०००/- मासिक उत्पन्न असणारा जरी असला तरी त्याने दर महिन्याला ५०० चे पुस्तक घेतलेच पाहिजे असा काही दंडक नाही; त्यामुळे टक्केवारीचा प्रश्न उद्भवू नये. मात्र माझ्या उदाहरणातील श्रीयुत बॅन्क मॅनेजर अधिक सौ.बॅन्क मॅनेजर या दोघांचे एकत्रीत वेतन किमान ६० हजार तरी असेल? मग अशा माधव-माधवीने वर्षाला दीडदोन हजार पुस्तकावर खर्च केले तर त्यांच्या पासबुकाला किती कसर लागेल?

घरी जागा नसणे हे एक विचित्र कारण देखील असु शकते. मला नवीन पुस्तके विकत घेण्याला घरुन मनाई करण्यात आली आहे. घरात आधीच २०० पुस्तके आहेत अजुन आणुन कुठे ठेवणार आहेस हा प्रश्न असतो. सध्या ती पुस्तके जागा मिळेल तिथे कोंबुन ठेवली आहेत.

~~ मान्य. तरीदेखील तुम्ही पुस्तके विकत घेताच ही बाब अभिनंदनीय नाही का? प्रश्न 'इच्छे'चा आहे. दहा बाय दहाच्या किचनमध्ये फ्रीझ आणि डायनिंग टेबल व त्यावरील अगणित भांडी हे कशारितीने "मॅनेज" केले जाते हे पाहिल्यावर पुस्तकासाठी बेडरूममध्ये एक कोपरा असायला काही हरकत नसावी. पण वर म्हटल्याप्रमाणे "इच्छा" महत्वाची.

मी स्वतःदेखील सगळी पुस्तके विकत घेत नाहीत. मी आणि माझी बहीण एकमेकांकडे असलेली पुस्तके घेत नाही. डुप्लिकेशन नको म्हणुन.

~~ हे मीदेखील करतो. मराठी 'शेअर' करतो, मात्र इंग्रजी साहित्य विकत घेऊनच वाचतो

इंग्रजी पुस्तकांबद्दल असे नाही. इंग्रजी समजु शकणारे बरेच आहेत. मराठी पुस्तके फक्त मराठी माणुस घेइल.

~~ बरोबर आहे. पण मराठी पुस्तक स्वतःसाठी नाही तर वाढदिवस, वास्तुशांत, परीक्षेतील यश, विवाहप्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी म्हणून जरी घेतले तरी निश्चितच फरक पडू शकतो. ही बाब मी कटाक्षाने करतो. अर्थात ज्याला द्यायचे त्याची आवडनिवड माहिती करून घेतलेली असते. उगाच मित्र आहे म्हणून त्याला विजया राजाध्यक्षांचे (मला व्यक्तीशः आवडलेले) "शोध मर्ढेकरांचा" हे पुस्तक देणार नाही.

त्यामुळे मराठी पुस्तके बेस्टसेलर व्हावी असे वाटते असेल तर मुळात जगावर राज्य करा, त्यांच्या गळी मराठी भाषा उतरवा आणि मग पुस्तके आपोआप विकली जातीलच.

~~ हे होईल? व्हावे... आशा अमर असते !

इन्द्रा

स्वतःची पुस्तके खरंच जपायची असतील तर ती कोणालाही देऊ नयेत. फार तर फार वाईटपणा अंगी येईल. आता, तोच नको असेल, तर तक्रार करु नये :)

इन्द्र्राज पवार's picture

2 Sep 2010 - 12:09 pm | इन्द्र्राज पवार

"फार तर फार वाईटपणा अंगी येईल."

हेही करून पाहिले आहे... पण वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "एकत्र कुटुंब" पद्धतीत राहताना काहीवेळा आपल्या आवाजाला दडपावे लागतेच. शिवाय नकाराच्यावेळी अनेक ज्येष्ठांपैकी कुणातरी फटका देतोच "अरे दे की वाचतोय म्हणतोय तर! त्यो काय त्यातली पाने खावून टाकणार हाय का रं लेका?"

अशाप्रसंगी फुकाचा वाद नको म्हणून ह्यो 'ल्योक' गप्प बसतोच. काय करणार?

इन्द्रा

सुनील's picture

2 Sep 2010 - 1:00 am | सुनील

वाचनाची आवड आणि त्यातूनही पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय यांची टक्केवारी मराठी आणि इंग्रजी भाषकांत सारखीच आहे असे मानले (निश्चित असा विदा उपलब्ध नसल्यामुळे) तरी, इंग्रजी भाषकांची एकूण संख्या अधिक इंग्रजी मातृभाषा नसूनही इंग्रजी वाचणार्‍यांची संख्या पाहिली तर मराठी भाषकांची संख्या त्याच्या पसंगालाही पुरणार नाही. मग मराठी पुस्तके "बेस्ट सेलर" होणार कशी?

खेरीज, खप कमी म्हणून किंमत जास्त आणि किंमत जास्त म्हणून खप कमी, हे दुष्टचक्र आहेच!

पवारसाहेबांचा प्रतिसाद आवडला.

इन्द्र्राज पवार's picture

2 Sep 2010 - 12:03 pm | इन्द्र्राज पवार

"पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय यांची टक्केवारी मराठी आणि इंग्रजी भाषकांत सारखीच...."

~~ नाही असे असणे शक्य नाही. माझे काही युरोपियन आणि अमेरिकन मित्र आहेत, त्यांच्याबरोबर अन्य विषयासंदर्भात चर्चा करताना "पुस्तक" (बोथ फिक्शन अ‍ॅन्ड नॉन-फिक्शन) हा विषय असतोच असतो. "मी हे पुस्तक घेतले आज, वाचायला सुरुवात केली आहे....नंतर त्यावर लिहितोच तुला..."; "इ-बे वर आजच ऑर्डर दिली..."; "परवा अ‍ॅमेझॉनचे पार्सल आले, तुझ्या पसंदीची तीन पुस्तके आहेत त्यात... तुझ्या येथील भारतीय मित्राकडून पुढच्या आठवड्यात पाठवून देते...." अशी आणि अशातर्‍हेच्या मेल्स सातत्याने येत असतात. त्यामुळे "विकत घेऊनच वाचेन" ही प्रवृत्ती इंग्रजी वाचणार्‍यात फार रुळली आहे. कॉलेजला जाणारा एखादा माईक वा एखादी ल्युसीदेखील पिझ्झा बर्गर घेतल्याप्रमाणे सहजरित्या पुस्तक दुकानाच्या पायर्‍या चढत असते (असे त्या मित्रांचे म्हणणे आहे.), त्या तुलनेत भारतीयांमध्ये असे विषय केन्द्रीभूत होणे कठीण आहे. (क्रिकेट, कॅटरिना, कॅन्टीन हे विषय आवडीचे होतात.)

बॉकर अ‍ॅन्ड बीएमएल, लंडन आणि न्यू यॉर्क ही संस्था अशा प्रकारच्या "पुस्तके खरेदी" करण्याच्या मोहिमेचा सातत्याने मागोवा घेत असते. त्यांच्या पाहणीत तर गेल्या वर्षी ५७% ब्रिटीश, ५१% अमेरिकन खरेदीदारांनी पुस्तके विकत घेतली होती.

दोन महिन्यापूर्वी मी या परदेशी मित्रांना आपल्या "मनोहर माळगांवकर" यांच्याबाबत सविस्तरपणे मेल केला होता (सर्वांना एकत्रीतपणे), तर या ११ मित्रांपैकी तब्बल ८ जणांनी तात्काळ नवी दिल्लीस्थित 'रोली पब्लिकेशन' ला पत्र पाठवून माळगांवकरांच्या उपलब्ध असलेल्या तीन पुस्तकांची ऑर्डर नोंदविली. त्यातील एकीने तर प्रभावित होऊन "प्रिन्सेस" बद्दल सहा पानी अभिप्रायही पाठविला. काय दर्शविते ही वृत्ती?

इन्द्रा