बुलबुल तरंग - माहिती हवी आहे

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in काथ्याकूट
30 Aug 2010 - 10:52 pm
गाभा: 

सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत.
मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का??
याबद्दल पुस्तके इ. उपलब्ध असल्याचे माहित असल्यास तेही कृपया सांगावे.

प्रतिक्रिया

विकास's picture

30 Aug 2010 - 11:15 pm | विकास

लहानपणी मला वाढदिवसाला आणले होते. मला वाटते तेंव्हा त्याची किंमत ७०-८० रुपये इतकीच असावी! सुरवातीस पुस्तकात पाहून सारेगम, सारेग-रेगम, सारे-साग, वगैरे शिकलो. नंतर एका मित्राच्या भावाने "लैला मै लैला" वाजवून दाखवले. त्याचे बघून शिकलो. नंतर आपोआप कळले कसे वाजवायचे ते. आता कुठलेही गाणे जेंव्हा आवडते, तेंव्हा किबोर्डवर (संगणकाचा नाही) आपोआप बोटे योग्य ठिकाणी पडतात. सुरवातीस एखादा सूर चुकतो पण दोन-तीन वेळा वाजवल्यावर गाणे वाजवता येते. पण मी कधीच शिकलेलो नाही आणि शास्त्रीय संगीत माहीतही नाही :( .

फक्त इतकेच, स्वानुभवाने Sound of Music गाण्यतील, "when you know the notes to sing, you can sing most anything" या ओळींमधील तथ्य समजले. थोडक्यात हौस असेल तर केवळ वाजवत (सराव करत) रहा इतकेच म्हणेन.

संदीप चित्रे's picture

31 Aug 2010 - 12:35 am | संदीप चित्रे

>> आता कुठलेही गाणे जेंव्हा आवडते, तेंव्हा किबोर्डवर (संगणकाचा नाही) आपोआप बोटे योग्य ठिकाणी पडतात
म्हणूनच तर ह्या गोष्टीला 'भगवान की देन' म्हणतात ना :)

यशवंतकुलकर्णी's picture

30 Aug 2010 - 11:20 pm | यशवंतकुलकर्णी

विकासराव,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मला हौस तर दांडगी आहेच - सद्या त्यावरच सुरू आहे.
तुम्ही सांगितलेले नक्कीच लक्षात ठेवीन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2010 - 12:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाचून मी घरात सामानाचा आणखी एक नग वाढवणार का काय अशी भीती वाटायला लागली आहे.

(पार्ट टाईम संगीतप्रेमी) अदिती

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 12:12 am | यशवंतकुलकर्णी

घेऊन टाका, घेऊन टाका...नाही वाजवता आले तरी चालते.. अ‍ॅण्टीक म्हणून ठेवता येते.. :)

मस्त कलंदर's picture

31 Aug 2010 - 12:20 am | मस्त कलंदर

एका घरी गिटार पडून आहे. आठवड्यातून एकच दिवस ती शाळेला जाते आणि तरी कुणाला ती वाजवता येत नाही. इतर दिवशी ती आपलीच आहे असे पहिल्यांदा भासव आणि नंतर कायमचीच आपली म्हणून टाक तिला. है कै अन् नै कै????

अरे वाह बुलबुल तरंग अजुन मिळतो. मला वाटल की काळाच्या ओघात हे वाद्य नामशेष झाल की काय?
मी लहान असताना माझे बाबा वाजवायचे बुलबुल तरंग.

तेजाब मधील फेमस १ २ ३... वाल्या गाण्याची ओरिजनल ट्युन पहिल्यांदा (चित्रपटात येण्याच्या ही बर्‍याच आधी) गणपती विसर्जनच्या वे़ळी बुलबुल तरंग ऐकली होती.

विकास's picture

31 Aug 2010 - 4:41 am | विकास

तेजाब मधील फेमस १ २ ३... वाल्या गाण्याची ओरिजनल ट्युन पहिल्यांदा (चित्रपटात येण्याच्या ही बर्‍याच आधी) गणपती विसर्जनच्या वे़ळी बुलबुल तरंग ऐकली होती.

बरोब्बर! ती मला वाटते मूळ कोळीनृत्य/संगीतातून आली आहे.

बेसनलाडू's picture

31 Aug 2010 - 4:45 am | बेसनलाडू

लैला मैं लैला, तेजाब मधील १ २ ३ यांप्रमाणे तुझे देखा तो यह जाना सनम हे मूलतः मेन्डॉलिनवर वाजवलेले गाणे बुलबुलतरंगवरही मस्त वाजते, हे एका मित्राने वाजवून दाखवले होते, तेव्हा कळले.
(कानसेन)बेसनलाडू

पाषाणभेद's picture

31 Aug 2010 - 5:46 am | पाषाणभेद

माझ्या वडिलांकडे हट्ट करून बुलबुलतरंग आणायला लावले होते. 'जनगणमन' वाजवता येत होते. नंतर सराव केला नाही. आता पडून असलेले मुलगा तारा खरडत बसतो. थोडक्यात सराव हवा. तुम्ही सराव करा विकास रावांसारखे जमून जाईल.

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 10:44 am | यशवंतकुलकर्णी

धन्यवाद पाषाणभेद... नक्कीच जमुन जाईल सराव केला तर...

हे वाद्य छान असते छोटेखानी आणि सुटसुटीत. आमच्या वर्गात वाजवायचे एक दोघेजण.
तारवाद्य मला कधी जमले नाही! मी तबला वाजवायचो तोही अर्धवटच राहिला, पण माझी ठेक्याची समज चांगली व्हायला तबला उपयोगी पडला.
(वाद्याची समज ही बरीचशी नैसर्गिक असते असे माझे मत आहे. शिकणे आणि सराव आवश्यकच परंतु ते तुमच्या गुणसूत्रातूनच बांधलेले धागे असतात.)

चतुरंग

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 10:47 am | यशवंतकुलकर्णी

(वाद्याची समज ही बरीचशी नैसर्गिक असते असे माझे मत आहे. शिकणे आणि सराव आवश्यकच परंतु ते तुमच्या गुणसूत्रातूनच बांधलेले धागे असतात.)

अगदी खरं! मी तबला शिकायचा प्रयत्न केला, पण दोन्ही हाताचा थाप एकाच वेळी पडली पाहिजे - हे काही जमलं नाही - सोडून दिला..
पेटीचंही तेच.
पण आता हे मस्त जमायला लागलंय....कदाचित संगणकाच्या किबोर्डची कृपा...

बुलबुल तरंग साठी पुण्यात अ ब चौकात मेहेन्दळेंकडे पुस्तक मिळेल.
मुम्बैत दादरला वेस्ट ला बाहेर पडले की एक दुकान आहे. तेथेसुद्धा पुस्तक मिळेल.
बहुतेक तंतुवाद्यांप्रमाणे या वाद्याला स्वतःच्या काही लिमिटेशन्स आहेत. फार खालच्या पट्टीत जाता येत नाही. स्केल चेंज करून वाजवायला अवघड जाते. आलापी वगैरे वाजवता येत नाही. बढत वाजवायला लिमिटेशन आहेत. साथीचे वाद्य म्हणून हे फार उपयोगी नाही पण झाला गत वगैरे वाजवता येते. पण मजा येते.
हल्ली हे वाद्य कव्वाली वाल्यांकडे दिसते.
तुम्हाला नक्की काय माहिती हवी आहे.

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 10:55 am | यशवंतकुलकर्णी

पेटी, हार्मोनियमची ढिगभर पुस्तकं आहेत...पण या बिचार्‍या वाद्यावर काही मिळाले नव्हते आतापर्यंत....अ ब चौकात शोधतो आलो की...खूपखूप धन्यवाद..

हे वाद्य बहुतेक बघितलं आहे मी पण आत्ता लक्षात येत नाहिये. जरा फटु टाकता का.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Aug 2010 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे

(सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते

आम्ही यकदा प्रयत्न केल्ता वाजवायचा! सा मदीच अडाकलो फुडच्या उर्वरित स्वरांकड पोचानीच. डाव्या हातानी तार छेडायचा टायगर हातात घेउन छेडायला लागल कि उजव्या हाताची बिटान फिरवनारी बोट आपाप थांबायची आन उजव्या हाताची बॉट फिरवायला लागलो कि डाव्या हाताचा टायगर आपाप थांबायचा.
बाकी टाईपिंग करता येनार्‍या मानसाला हे वाद्य लवकर जमत असावे अथवा उलट!

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 10:58 am | यशवंतकुलकर्णी

घाटपांडे साहेब,
तारा छेडताना पट्ट्यांवरून बोटे फिरणे हीच खरी गोम आहे...
तेवढं जमलं की झालं...मला तबला जमला नाही...पेटी पण नाही...
पण हे मात्र सहज जमून गेलंय...बघा अजून एकदा तुम्हीसुध्दा, सहज जमुन जाईल..

वाचक's picture

31 Aug 2010 - 10:09 am | वाचक

indian banjo (बुलबुल तरंग)

किंवा

indian banjo

ह्या लिन्क वरुन शिकायला काही मदत होते का पहा
गुगल सर्च

माझी पण लहानपणा पासुनची इच्छा आहे बॅन्जो किंवा किबोर्ड शिकायची. ह्यातले लवकर काय शिकता येईल?

ह्यालाच बॅन्जो किंवा बुलबुल तरंग असेही म्हणतात...
बॅन्जो लवकर शिकता येतो...आणि यात मास्तर लोक दुर्मिळ असल्याने हेच लवकर शिकता येते...शिका तुम्हीपण, आपण सोबत वाजवू एकदा..

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 11:04 am | यशवंतकुलकर्णी

वाचक,
सध्या असल्याच क्लिप्सच्या आधाराने चालू आहे...
लिंकबद्दल धन्यवाद..

मितभाषी's picture

31 Aug 2010 - 11:27 am | मितभाषी

बँजो शिकताय! अरे वा छान.
त्यासाठी तुम्ही 'स्वरसुधा'चे पुस्तके वापरु शकता. त्यात अगदि beginers पासुन आताचे नविन हिन्दी, मराठी गीते, भावगीते, भक्तीगीते, नाट्यसंगीत, इ इ नोटेशनचे पुस्तके मिळतात. हे वाद्य तुम्ही घरच्या घरी शिकु शकता.

एक धोक्याची सुचना- सुरुवातीला लगेच गाणे वाजवता आले पाहीजे असा हट्ट धरुन बसु नका. प्रथम बोटे एकमेकांत न अडकता जलद गतीने सफाइदारपणे फिरले पाहीजेत. ह्या पुस्तकांवर फार अवलबुन राहु नका. स्वतः नोटेशन्स काढायचा प्रयत्न करत राहा. हळूहळु जमेल. गाणे एकताना स्वरांच्या आरोह्-अवरोहाकडे निट लक्ष दिल्यास नोटेशन्स काढणे एकदम सोपे.

तुम्हाला शुभेच्छा. नविन जुन्या कुठल्याही गाण्याचे नोटेशन्स पाहीजे असतील तर कळवा.

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 11:32 am | यशवंतकुलकर्णी

भावश्या,
धन्यवाद ! धोक्याची सूचना आणि स्वरसुधाची पुस्तके आणि तुमचे नाव हे नोट करून ठेवतो.
नोटेशन कळण्याइतपत प्रकाश नाही पडला अजून, पण पुढे लागतीलच.
खूपखूप धन्यवाद..!!

सूड's picture

31 Aug 2010 - 2:49 pm | सूड

तुम्ही निदान नेट वर तरी शोधताय !! मी शिकेन म्हणून बासरी घेऊन आलो.....संगीत शिक्षक गाठला फी, क्लासची वेळ ठरली आणि पहिल्याच दिवशी तो म्हणतो "अरे आज क्लास आहे ?? प्लीज उद्या ये", जे डोकं सटकलं माझं ह्या रिप्लायने. पुन्हा काही मी फिरकलो नाही तिकडे, बासरी पण तशीच पडून आहे.

कानडाऊ योगेशु's picture

31 Aug 2010 - 5:04 pm | कानडाऊ योगेशु

जर पेटी येत असेल तर बुलबुल शिकणे अवघड नाही.कारण दोन्हीही मध्ये दोन्ही हातांचा ताळमेळ असणे महत्वाचे आहे.
एकात भाता हलवायचा तर दुसर्यात तारा छेडायच्या.
ठराविक गाणे वाजवण्यापुरती पेटी मी शिकलो होतो त्यावरुन बुलबुल वर सारेगम शोधुन तिच गाणे बुलबुलवर पण वाजवता आली. एकदा का सारेगमपधनीसा क्रम माहीत झाला की त्या स्वरांवटीवर आधारित वाद्ये वाजविणे अवघड नाही.
हाच सारेगम क्रम माऊथ ऑर्गनवर माहीत करुन घेतला व पेटीवर येत असलेली गाणी माऊथ ऑर्गन वरही वाजवता येऊ लागली.

यशवंतकुलकर्णी's picture

31 Aug 2010 - 5:22 pm | यशवंतकुलकर्णी

योगेशजी,
खरंय. कोणत्या ना कोणत्या वाद्याचा हात धरून सुरांच्या राज्यात प्रवेश होणे महत्वाचे..बाकी मग कधीही इतर वाद्यांशी हातमिळवणी करता येईल असे वाटते. खूपच मस्त प्रतिसाद मिळाले या धाग्यांवर. धन्यवाद.