दहा लाखाची लॉटरी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in काथ्याकूट
27 Aug 2010 - 9:56 am
गाभा: 

दहा लाखाची लॉटरी

आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
मला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले.
त्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता.
बॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही.
त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
.
.
. मी दहा लाखाचे काय करू? जे माझ्याजवळ त्यात मी समाधानी आहे असे म्हटल्यावर तिकडून फ़ोन डिस्कनेट करण्यात आला.
.
जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.

गंगाधर मुटे

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

27 Aug 2010 - 9:59 am | शिल्पा ब

कदाचित identity theft चा प्रकार चालू असेल.

मदनबाण's picture

27 Aug 2010 - 10:03 am | मदनबाण

आत्ता पर्यत फ़क्त एसएमएस यायचे,आता फोनवायला पण लागले ?
सध्या मी सुद्धा एसएमएस प्रकरणामुळे लयं हैराण हाय बघा !!! सतत कुठले ना कुठले फालतु एसएमएस येत राहतात्...शेयर बाजारातील टीप पासुन गुडगाव मधे फ्लॅट खरेदीच्या ऑफर पर्यंत सर्व काही.
मी डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवले आहे,तरी सुद्धा हे एसएमएस यायचे काही थांबत नाहीत्.तक्रार करुन थकलो आणि आता पार वैतागलो आहे. :(

गंगाधर मुटे's picture

27 Aug 2010 - 10:06 am | गंगाधर मुटे

हिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.

मलाही ह्याच नंबर वरुन फोन आला होता, पण +९२ हा पाकीस्तानी आय.यस्.डी. नंबर माहीत असल्या मुळे मी त्यालाच शीव्या घातल्या.
आणी हो नवीन uninor नं. लाच ह्या नंबर वरुन call येतो.

प्राजक्ताचि फुले's picture

27 Aug 2010 - 7:45 pm | प्राजक्ताचि फुले

uninor चे मुळ connection पाकिस्तान मध्ये आहे असे ऐकुन आहे....

येडबंबू's picture

27 Aug 2010 - 10:44 am | येडबंबू

च्या मारी हे हरामखोर पाकडे ... किती वेगवेगळ्या प्रकारांनी त्रास देतात ... मला तर असले फोन आले की त्यान्ना मि माझा नंबर कुठुन मिळाला हे सांगा म्हणून आडून बसतो.

अवांतरः uninor पाकीस्तानी कंपनी आहे काय?

---

योगी९००'s picture

27 Aug 2010 - 7:16 pm | योगी९००

uninor ही नॉर्वेजियन Telenor ची बहीण आहे..

इन्द्र्राज पवार's picture

27 Aug 2010 - 12:57 pm | इन्द्र्राज पवार

तुम्ही सर्व "युनिनॉर" या नव्या कंपनीविषयी लिहित आहात, पण "एअरटेल" ही प्रस्थापित (आणि म्हणून विश्वासार्ह अशी प्रतिमा असलेली) कंपनीदेखील ग्राहकाचा "मामा" करण्यात अग्रेसर आहे. विश्वचषक फूटबॉलच्या वादळात "आजच्या सामन्यातील संभाव्य विजेता कोण? अंदाज बांधा, एसएमएस करा आणि पुढच्या सामन्यासाठी साउथ आफ्रिकेला जाण्याची तिकिटे मिळवा" असा शंख करणारे मेसेजेस येत असत, ती सुरुवातीला ठेवली (भाग घेतला नाही). नंतरची डिलिट करून टाकली.

विश्वचषक सामने संपले. रूटीन सुरू झाले आणि एक दिवस एअर टेलचा मेसेज आला, "आमच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या फूटबॉल स्कोअरचा आपण लाभ घेतला त्याबद्दल धन्यवाद. सेवेबद्दल १० रुपयाचा आकार आपल्या बॅलन्समधून कापण्यात आला आहे..." मी चक्रावलो. कारण मी तर कधीही मोबाईलवर स्कोअर पाहिलेला नव्हता. हा दहाचा भुर्दंड कशापायी? म्हणून तात्काळ आलेल्या नंबरवर "रिप्लाय" करून पैसे न कापण्याबद्दल सूचना केली. पण तिकडून प्रतिसाद इल्ला.

इतकेच काय पण अगदी २० ऑगस्टलादेखील "युरोपिअन फूटबॉल" चा स्कोअर पाहिला म्हणून परत दहाचा दणका आला. या खेपेस चक्क कोल्हापुरी मिर्चिच्या झणझणीत शिव्या घालून पत्र पाठविले. पण काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही.

नितिन थत्ते's picture

27 Aug 2010 - 1:42 pm | नितिन थत्ते

एअरटेलचा एक नोडल ऑफिसर प्रत्येक सर्कलमध्ये असतो. ज्याचा मेल आयडी नेट वर मिळेत. त्याला मेल केल्यास काही उपयोग होऊ शकेल.

इन्द्र्राज पवार's picture

27 Aug 2010 - 3:29 pm | इन्द्र्राज पवार

थॅन्क्स.... जरूर मेल आयडी मिळवितो आणि पाहतो प्रयत्न करून. प्रश्न पाचदहाचा नाही, पण "काळ सोकावतो" याची प्रचिती येऊ नये यासाठी. आज फूटबॉलचे कापले उद्या टायगर वूड्सने अमेरिकन कप जिंकला म्हणून दहा रूपये द्यावे लागतील.

गंगाधर मुटे's picture

27 Aug 2010 - 3:50 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद.
एअरटेलच्या सर्कल नोडल ऑफिसरला एसएमएस केला. बघुया काही दखल घेतात काय ते?

अवलिया's picture

27 Aug 2010 - 1:09 pm | अवलिया

..

काय राव दाब चांस आला होता. त्या माणसाले एखांद्या कॅफे वा हाटिलात कॅश घेउन या सांगायच की.

लक्ष्मी अशी समोरुन चालत येत होती नी तुम्ही नाकारलीत... छ्यॉ बॉ.

अनिल २७'s picture

27 Aug 2010 - 4:02 pm | अनिल २७

मलाही एकदा असाच कॉल आला होता, ३-४ महिन्यापुर्वी.. पण मला मात्र २५ लाखांची लॉटरी लागली होती!! कॉल सकाळीच ७-७:१५ दरम्यान आला होता. लँड्लाईन नं होता व तो गुजरातमधील होता.. साल्यांची बोलायची पद्धत युपी बिहारी होती अन आवाजावरून अत्यंत गावठी वाटत होते ते.. खूप शिव्या हासडल्या त्यांना..