सात धारी भेंडे

जागु's picture
जागु in पाककृती
26 Aug 2010 - 1:01 pm

सात धारी भेंडे म्हणजे ह्या भेंड्यांना सात किंवा आठ किंवा नऊ धारा असतात. (गोल केलेल्या चकत्यांच्या फोटोत मोजु शकता सत्यतेसाठी) हे फक्त श्रावणात येतात. हे भेंडे आकाराने साधारण अर्धा फुट पेक्षा थोडे जास्त लांब असतात (आता पुढच्यावेळी फुटपट्टि घेउन माप मोजेन, कारण मिपाकरांना जरा सविस्तरच माहीती लागते ना, नाहीतर त्यावर भले मोठे मोठे, गहन प्रश्न पडतात).

दिसायला उंचीला मोठे आणि रुंदीला जाडेच असतात. पण जाडे दिसत असले तरी कोवळेच असतात. ह्याच्या खात्रीसाठी भाजीवालीच्या टोपलीतुन मोठा दिसणारा एक भेंडा उचलायचा आनी त्याच्या वरचे टोक कटकन मोडायचे. टोक भेंड्यापासुन वेगळे झाले की समजायचे भेंडा कोवळा आहे आणि जर नुसती वाकली तर समजायचे जुन आहे. कधी कधी भाजीवाली हा प्रयोग स्वतःच करुन दाखवते आणि एवढे करुन नाही घेतले की मोडलेल्या भेंड्याचा राग आपल्यावर काढते. असो, तर हे भेंडे चविला एकदम बेश्ट असतात.

किंमत म्हणाल तर नॉनव्हेज पेक्षा जास्त एका जुडीत तिन भेंडे असतात व ही जुडी रु. १२/- ला मिळते. एक पैसाही कमी नाही. फक्त जर जास्त प्रमाणात घेतलेत तर कमी होतात थोड्या प्रमाणात. भाव कमी न होण्याचे गुढ कारण म्हणजे आमच्याइथे फक्त एकाच गावातुन हे भेंडे लागवड करुन विकायला येतात. ह्या गावातील गावकरी शेजारच्या गावालाही ह्या भेंड्यांचे बी देत नाहीत त्यांचा उद्योग मंदाउ नये म्हणुन.

परतवलेली भेंडी :
लागणारे साहित्य:
सातधारी भेंडे १ ते २ जुड्या.
लसुण ४-५ पाकळ्या
मिरच्या २-३
कढीपत्ता १ फांदी
मिठ चविनुसार
चिमुटभर साखर
हिंग
हळद
ओल खोबर २ ते ३ चमचे
तेल

पाककृती :
प्रथम भेंडे स्वच्छ धुवुन स्वच्छा फडक्याने पुसुन घ्या. मग परतवलेले भेंडे करण्यासाठी ह्या भेंड्यांचे अंदाजे दिड इंच किंवा तुमच्या आवडीनुसार फोडी करुन त्याला मधेही चिरा. मधुन चिरण्याचे कारण ह्या भेंड्यांची जाडी आहे. साध्या भेंड्यांना फक्त मध्ये खाच पाडावी लागते.

चकत्यांची भाजी करताना अशी गोल चिरलेली भेंडी. आली ना शाळेच्या चित्रकलेची आठवण ? शाळेत भेंडा कापुन त्याला रंग लावुन त्याचे ठसे वहीवर उमटवायचा माझा आवडता चित्रकलेचा प्रकार होता.

आता लसुण ठेचुन घ्या, कढीपत्ता तयार ठेवा, हिरव्या मिरच्या कापुन घ्या. माझ्याकडे हिरव्या मिरच्या राहुन राहुन वापरत नाही म्हणून रागाने लाल झालेल्याही मिरच्या होत्या त्यांचाही नंबर लावला.

आता गॅसवर कढई किंवा तुम्ही ज्यात ही भाजी करणार आहात ते भांडे ठेवा. (नॉनस्टीक पॅन मध्ये चांगली होते ही भाजी). भांडे जरा गरम होउ द्या मग त्यावर तेल टाकुन अशी मस्त लसूण, मिरची, कढीपत्ता टाकुन दणदणीत फोडणी देउन त्यावर हिंग, हळद टाका (फोडणी दणदणीत द्यायची असली तरी ह्यात फोडणीचे साहित्य हळूच टाका नाहीतर तेल उडून आपल्यालाच दणका बसायचा.)

आता भेंडी घालून, मिठ, थोडी साखर, लिंबूरस टाकुन मस्त सर सर आवाज करत परता. आवाज भांड आणि कालथ्याचा काढा. तोंडाचा नको. नॉनस्टिक पॅन असेल तर हळूच आवाज काढा. नाहीतर नॉनस्टीक पॅन आपल खर रुप दाखवायला सुरवात करेल.

भेंडे शिजले की त्यावर ओल्या खोबर्‍याची बरसात करा. ही बघा मस्त परतलेली भेंडी तय्यार. लसुण आणी भेंडीच मस्त कॉम्बीनेशचा वास येतो आणि खात सुटतात सगळे.

प्रतिक्रिया

माया's picture

26 Aug 2010 - 1:10 pm | माया

जागु ताई,
छानच गं! करुन पहाते. (साध्या भेंड्या वापरुन :))

परिकथेतील राजकुमार's picture

26 Aug 2010 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मस्त !
आज घरुन हाच डबा आणलेला होता :)

चिंतामणी's picture

26 Aug 2010 - 7:47 pm | चिंतामणी

कोणाच्या घरून??????????????

archana2285's picture

26 Aug 2010 - 5:32 pm | archana2285

पाकॄसाठी धन्यवाद जागुताई.

आजच बाबांनी गावावरुन परत येताना असली भेंडी आणली ,खास मला आवडते म्हणून. थोडी भेंडी टॉमेटॉच्या सारात टाकली. बाकी भेंड्यांची आज संध्याकाळी अशी भाजी करुन पाहावी म्हणतेय.

चित्रा's picture

26 Aug 2010 - 5:52 pm | चित्रा

नुसती लसूण-कढीपत्त्याची फोडणी दिलेली पाककृती पहिल्यानेच पाहिली.
करून पहायला हवी.

माझ्याकडे हिरव्या मिरच्या राहुन राहुन वापरत नाही म्हणून रागाने लाल झालेल्याही मिरच्या होत्या त्यांचाही नंबर लावला ....... हे आवडलं.
....आणि रेसिपी बघायला हवी करुन..

अजबराव's picture

26 Aug 2010 - 7:41 pm | अजबराव

मला असे वाटत आहे कि भाजि शिजुन हिरवि दिसत नहिये....तिचा रन्ग टिकुन रहावा यासाथि काय करता येइल???
कि शिजवलेलि भाजि याच कलर चि दिसते??

माझी आई हिरव्या भाज्यांमध्ये हळद मसाला कमी वापरते आणि लिंबाच्या रसाचा वापर करते.
तसच भाज्या झाकण लावुन शिजवल्या तर त्यांचा हिरवा रंग फिका होतो.

अजबराव, अनाम भेंडी जास्त शिजवली गेल्यामुळे असा कलर आला आहे. नाहीतर इतरवेळी हिरवीच राहतात.

जागुतै, आजकाल फर्मास पाकृ टाकते आहे.
फोडणीतला वेगळेपणा दिसतो आहे.
ट्राय करायला हरकत नाही.
आजकाल जागु आणि सुहास यांच्या पाकृ सांगण्याच्या ष्टाईलमध्ये बराच बदल दिसून येतो.
ही अशी गरमागरम भाजी आणि पोळी म्हणजे स्वर्गसुख नक्कीच!
तुझ्यामुळे भाज्यांचे वेगवेगळे प्रकार आम्हाला कळत आहेत.
भेंडी मध्येही असे काही प्रकार असतात हे माहित नव्हते.

जागु's picture

27 Aug 2010 - 12:32 pm | जागु

खुप खुप धन्यवाद रेवती.

चिंतामणी's picture

26 Aug 2010 - 7:51 pm | चिंतामणी

(आता पुढच्यावेळी फुटपट्टि घेउन माप मोजेन, कारण मिपाकरांना जरा सविस्तरच माहीती लागते ना, नाहीतर त्यावर भले मोठे मोठे, गहन प्रश्न पडतात).

कधी कधी भाजीवाली हा प्रयोग स्वतःच करुन दाखवते आणि एवढे करुन नाही घेतले की मोडलेल्या भेंड्याचा राग आपल्यावर काढते.

माझ्याकडे हिरव्या मिरच्या राहुन राहुन वापरत नाही म्हणून रागाने लाल झालेल्याही मिरच्या होत्या त्यांचाही नंबर लावला .......

(फोडणी दणदणीत द्यायची असली तरी ह्यात फोडणीचे साहित्य हळूच टाका नाहीतर तेल उडून आपल्यालाच दणका बसायचा.)

असल्या सुचना/चिमटे/दणक्यासकट ही पाकृ चांगली वाटली.
जरूर करून बघणार.

मस्त कलंदर's picture

26 Aug 2010 - 10:55 pm | मस्त कलंदर

अगदी हेच म्हणायचे होते पण टंकाळ्यामुळे कुणालातरी +१ म्हणायची वाट पाहात होते. धन्यवाद हो चिंतामणी. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2010 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भेंडी फारशी आवडत नाही, मारूनमुटकून खाते. म्हणून का काय रेसिपीपेक्षा चिमटेच जास्त आवडले.

सहज's picture

27 Aug 2010 - 10:10 am | सहज

हेच. भाजी इतकी काही खास वाटत नाही म्हणुनच पाकृ पेक्षा कटाकट मोडणार्‍या कोवळ्या भेंडीपेक्षा फ्रेश वाटले लेखन!

चिंतामणी, मस्तकलंदर, आदिती धन्यवाद. सहज नक्की करुन पहा.
सहज तुम्ही एकदा करुन पहा ह्यात खोबर नाही घातल तरी चांगली लागते.

बरं जागुतै, कधी येऊ जेवायला?
नुसत्याच पाकृ टाकणार आणि आमंत्रण नाही, हा निव्वळ अन्याय आहे. आम्हा बॅचलरांना नुस्ते फोटू आणि तोंडाला सुटलेलं पाणी यावर जिवंत रहावं लागतंय!

णिसेद* णिसेद* णिसेद* !!! त्रिवार णिसेद*!

*ज्याचा त्याला कॉपीराईट!

--(भेंडीचा भुकेला) असुर

असुर कधी येणार आणि तुम्ही किती भेंडे खाणार तेही सांगा म्हणजे कमी नको पडायला. म्हणजे तुम्ही भेंड्यांचे भुकेले आहात म्हणुन विचारल.

म्हणजे असं आहे बघा जागुतै, हातचं राखून आणि मन मारुन अगदी बेतास बात असं सकाळच्या न्याहारीइतकं जेवलो, तर २ पोती भेंडे पुरतील बहुधा! :-)
कधी यायचं काय म्हणून काय विचारताय, पुढच्या वेळी पाकॄ टाकाल ना, तेव्हा जाहीर आमंत्रणच द्या की!

बाकी, तुम्ही इतकं मनमोकळेपणे विचारलंत आणि आमंत्रण दिलंत, भरुन पावलो. असाच लोभ असू द्या!

--असुर

जागु's picture

30 Aug 2010 - 12:53 pm | जागु

हो नक्कीच.

स्पंदना's picture

27 Aug 2010 - 7:12 am | स्पंदना

या मलेशियन भेंड्या! काय म्हणतात बर यांना? ओक्रा..आत मध्ये सात वा नउ घर बरोबर!!
आम्ही आणुन वेगळी दिसते म्हणुन हाय्ब्रीड असावी असा विचार केला होता. आता बिनधास्त करेन.

छान दिसतेय भाजी...मला भेंडीची भाजी नीट जमत नाही...या पद्धतीने करून बघेन...छान...अजूनही वेगवेगळ्या भाज्यांच्या पाकृ येऊ द्या.

स्मिता_१३'s picture

27 Aug 2010 - 10:58 am | स्मिता_१३

अहाहा !

जेवढी चटकदार पाकृ, तेवढीच चटकदार पाकृची मांडणी देखील.

जागुताई चे पुन्हा एकदा अभिनंदन !

मदनबाण's picture

27 Aug 2010 - 11:07 am | मदनबाण

नेहमी प्रमाणेच नविन माहिती मिळाली... :)

विसोबा खेचर's picture

27 Aug 2010 - 11:55 am | विसोबा खेचर

मस्त..:)

जागु's picture

27 Aug 2010 - 12:51 pm | जागु

माया, अर्चना, चित्रा, चिंतामणी, सुधांशू, अपर्णा, शिल्पा, स्मिता, मदनबाण, विसोबा तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

ऋषिकेश's picture

27 Aug 2010 - 12:55 pm | ऋषिकेश

:)
मी आधी "सात भारी धेंडे" असे वाचले आणि मिपावरील कोणत्या ७ धेंडांचा पंचनामा असेल हा विचार करत लेख उघडल्या पण छ्या! सात धारी भेंडे निघाले ;)

अवांतरः रेसिपी फ्रेश आहे.. मस्त

पक्या's picture

27 Aug 2010 - 9:21 pm | पक्या

सात धारी भेंडे ही नविनच माहिती मिळाली. आधी कधी हा प्रकार ऐकला नव्हता.
जागू ताई, तुमच्या साध्या साध्या रेसिपीज मधून बरीच नविन माहिती मिळत असते. धन्यवाद.

दिपाली पाटिल's picture

27 Aug 2010 - 9:53 pm | दिपाली पाटिल

मस्त गं जागू... मला आठवतंय की ऋषीपंचमीला बनवतात त्या भाजीत टाकतात ही भेंडी...

अनामिक's picture

28 Aug 2010 - 5:39 am | अनामिक

घेतलेले चिमटे आणि भेंडे दोन्ही आवडले.
करून बघतो!

ऋषीकेश, पक्या, दिपाली, अनामिक धन्यवाद.