विश्वनाथ आनंद "भारतीय नसल्यामुळे"...सॉरी सॉरी सॉरी...

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
24 Aug 2010 - 9:16 pm
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6425945.cms
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ग्रॅंड मास्टर बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद हा भारतीय नाही असा शोध लावला आहे.
त्याला हैद्राबाद विद्यापीठ सन्माननीय डॉक्टरेट देणार आहे. त्याकरता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यावेळेस त्या मंत्रालयाने हा शोध लावला.
आणि नंतर माफीही मागितली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6426892.cms

जरी अगदी क्रिकेटपटू वा नट नसला तरी विश्वनाथ आनंद हा एक प्रसिद्ध, वलयांकित व्यक्ती आहे. अशा प्रकारामुळे ह्या मंत्रालयाची नाचक्की झाली आहे. असल्या प्रकारचे वादग्रस्त निर्णय दहा वेळा तपासून मग का घेतले जात नाहीत?

आपले काय मत? या प्रकाराला जबाबदार असणार्‍या व्यक्तीला काही शिक्षा होईल का?

प्रतिक्रिया

असुर's picture

24 Aug 2010 - 9:24 pm | असुर

मायला, आग लावा त्या मंत्रालयाला!

चतुरंगराव, कुटं मोर्चाफिर्चा काढनार असाल तर आमीहायेच!

--(६४वा प्यादा) असुर

विश्नापा's picture

24 Aug 2010 - 9:59 pm | विश्नापा

या मन्त्रालयातील मंडळी नक्कीचं विदेशी असली पाहिजेत.म्हणूनच तर ते आनंदला ओळ्खू शकले.

काय हे?
छ्या! कुठं गेले हे चतुरंग?;)

सुनील's picture

24 Aug 2010 - 9:42 pm | सुनील

चतुरंगशेठ बहुधा (मोर्च्यासाठी) हत्ती, घोडे, उंटांचा बदोबस्त करण्यासाठी गेले असावेत!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2010 - 9:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यादी आहेतच इथे मिपावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडायला.

भोंगळ कारभार आहे हा ... आपल्याच देशाने एवढा त्रास द्यावा त्याला!

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 9:48 pm | धमाल मुलगा

>>आपले काय मत?
काय असणार? काय उपेग?
त्या मताचा उपेग मतपेटीत जाण्यासाठी होतोय का? मग ते मत फाट्यावरच की हो.

>>या प्रकाराला जबाबदार असणार्‍या व्यक्तीला काही शिक्षा होईल का?
हॅ हॅ हॅ!!!! चौकशी समिती आणि त्यावर एखादे सुटकेस अ‍ॅटर्नी/म्याजिस्ट्रेट... विषय कट!
अहो साहेब,

इथं बिना 'परफॉर्मन्स अप्रेझल्स'च्या टॅक्स फ्री 'कॉर्पोरेट लेव्हल' सॅलरीच्या मारामार्‍या आणि सेटिंगा चालल्यात, असल्या 'क्षुल्लक' गोष्टींकडं लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला?

प्राजक्ताचि फुले's picture

24 Aug 2010 - 11:54 pm | प्राजक्ताचि फुले

इथं बिना 'परफॉर्मन्स अप्रेझल्स'च्या टॅक्स फ्री 'कॉर्पोरेट लेव्हल' सॅलरीच्या मारामार्‍या आणि सेटिंगा चालल्यात, असल्या 'क्षुल्लक' गोष्टींकडं लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला?

+१

चतुरंग's picture

24 Aug 2010 - 10:04 pm | चतुरंग

तो 'विश्वनाथन' असला तरी त्याची गुणवत्ता समजण्याच्या बाबतीत आमच्या सरकारचा सगळा 'आनंद'च आहे हे बघून आज एक बुद्धीबळवेडा म्हणून आमची मान शरमेने खाली गेली! (टाळ्या, टाळ्या ;) )

काय बोलावे असल्या आचरट निर्णयाबादल? कपिल सिब्बल ह्यांनी नंतर सारवासारवी केली पण त्याचा काय उपयोग?

आनंद ह्या लोकांना ओळखून आहे कारण त्याला माहीत आहे त्याचे चाहते हे माझ्यासारखे जगभर असलेले बुद्धीबळवेडे आहेत. त्याला त्या डॉक्टरेट डिग्रीची काय तमा! जाऊदेत असल्या फालतू लोकांसाठी कुठे निदर्शने करता त्यापेक्षा आपण एखादा नवीन डाव बघूयात! :)

(हत्ती, घोडे, उंट ह्यांच्या गराड्यातला)चतुरंग

जयदेव's picture

24 Aug 2010 - 10:07 pm | जयदेव

मनुष्यबळ विकास मंत्रालयअत बहुदा भरतबहेरिल लोक काम करत आसवेत असे खत्रिलयक सिदध झअले आहे.
क्रुपया देशि सजग लोकन्चि गरज आहे आसे त्या सर्कारास सान्गन्याचि गरज आहे.

शिल्पा ब's picture

24 Aug 2010 - 10:09 pm | शिल्पा ब

हि हि हि....भारी गम्मतच म्हणायची.

एकदा येस मिनिस्टर हि सिरीज पहा...

अविनाशकुलकर्णी's picture

24 Aug 2010 - 10:19 pm | अविनाशकुलकर्णी

सुळे ताइंचे काय झाले?..त्यांचे पण असेच काहिसे होते..

दाद's picture

24 Aug 2010 - 10:23 pm | दाद

जावई शोध मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा

wings's picture

25 Aug 2010 - 7:58 am | wings

kon jawai?

हरकाम्या's picture

24 Aug 2010 - 11:04 pm | हरकाम्या

मला वाटते हा विश्वनाथन आनंद बहुधा " काँग्रेसचा " कार्यकर्ता नसावा.

त्या बिचार्याला एक पेटी सारावी लागली असेल तो भारतीय आहे हे पटवून देण्यासाठी.
ह्या वरून एक कौल टाकावासा वाटत आहे.

थांबा टाकतोच आता.........

चिंतामणी's picture

25 Aug 2010 - 8:59 am | चिंतामणी

आपले काय मत?

वाझोंटी मते देउन काही उपयोग नाही.

या प्रकाराला जबाबदार असणार्‍या व्यक्तीला काही शिक्षा होईल का?

तुम्ही बॉ भलतेच विनोदी आहात.
लाखो करोडोंचे घोटाळे उघडकीस आले तरी शिक्षा होते का?

>> लाखो करोडोंचे घोटाळे उघडकीस आले तरी शिक्षा होते का?
लाखो करोडोंचे घोटाळे कधीच उघडकीस येत नाय.
'आयपीएल' प्रकरणी पवारांना क्‍लीन चिट

नुकतिच सिब्बल ह्यांनी माफी मागितली,
Sibal apologises to Anand over citizenship row
माझा त्यांना एक सवाल,
ह्या सरकारी उलट सुलट कामकाजाचे सामान्य लोकांना जो काही त्रास होतो त्यांची माफी कधी मागणार ?
त्याहून पुढे तो विश्विख्यात आनंद होता, एक मोठा माणूस होता म्हणून त्याचे लगेचच उरकले,

Mr. Sibal said: “Vishwanathan Anand has done India proud, We should be proud of those who climb the heights of global excellence and keep the Indian flag flying.”
एका सामान्य माणसामुळे का कधी आपला झेंडा फडफडतो, का त्याच्या मेल्यामुळे तो फडफाडायचा थांबतो ? त्या आनंद मुळे flag flying व्हायला मदत होते, मग आमच्यासारख्या सामान्य माणसांमुळे काय ? आनंद ऐवजी एक सामान्य माणूस असता तर त्याचे किती हाल झाले असते ह्याचा विचार करा सिब्बल साहेब. हे उलट सुलट धंदे कधी थांबणार ?

अवांतर : इथे जिवंत असणार्या माणसाला देखील जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो.

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 10:26 am | मृत्युन्जय

इथे सगळेजण सरकारी कारभारावर टीका करत आहेत. परंतु कोणीतरी हे समजावुन सांगेल काय की आनंदने स्पेनचे नागरिकत्व का घेतले आहे? भारतात अजुनतरी dual nationality ची तरतुद नाही आहे. मग असे असतानाही आनंदने स्पेनचे नागरिकत्व घेतले असेल तर त्याला भारतीय नागरीक न म्हणने सयुक्तिक नाही का?

मध्यंतरी अमिताभ बच्चनने स्वतःला केवळ अनिवासी भारतीय म्हणुन घोषित केले होते तर मोठाच गहजब झाला होता. मग या प्रकारात वेगळी भूमिका का घेतली जावी? परदेशी नागरिकत्व ही तर त्यापुढची पातळी आहे ना?

गांधीवादी's picture

25 Aug 2010 - 10:40 am | गांधीवादी

सरकारी कारभार इतका स्वच्छं होता (निदन ह्या बाबतीती तरी ) तर सरकारने माफी का मागितली ?

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 10:48 am | मृत्युन्जय

माहित नाही. मी लोकसत्तामधील लेख वाचुन प्रश्न विचारला आहे. लोकसत्तामध्ये देखील सिब्बलचे असेच विधान आहे की "आनंद कुठल्याही देशाचा नागरीक असला तरीही आम्हाला त्याचा अभिमान आहे." इथे सिब्बलचे विधान आनंद भारतीय नागरीकच आहे या अर्थाचे नाही आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2010 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शंका उपस्थित केली आहे म्हणून फिडेची वेबसाईट पाहिली. हा फोटो मिळाला:

आणि सध्या खेळणार्‍या पहिल्या १०० पुरूष खेळाडूंची यादी पाहिली. त्यात आनंदचा क्रमांक तिसरा आहे. त्याच्या देशाचं नाव IND आहे, ज्याचा अर्थ इंडीया अथवा भारत असा लावता येतो.

(अधोरेखित शब्दांमधे लिंक्स आहेत.)

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 11:06 am | मृत्युन्जय

तो भारतीय झेंडा वापरतो त्याचा आनंद आहे. तो भारतीय नागरीकत्व अजुनही बाळगुन असेल तर त्याचा अभिमानही आहे (एरवीदेखील आहे) परंतु लोकसत्तामध्ये असे आले आहे की त्याने स्पेनचे नागरीकत्व घेतले आहे. याहुन जास्त माझा या विषयाचा अभ्यास नाही. माझी शंका देखील केवळ याच मुद्यावर होती / आहे.

त्याने स्पेनचे नागरीकत्व का घेतले हे कोणी सांगेल का?

निखिल देशपांडे's picture

25 Aug 2010 - 12:08 pm | निखिल देशपांडे

त्याने स्पेन चे नागरिकत्व घेतले आहे का माहित नाही. पण त्याचा कडे अजुन भारताचाच पासपोर्ट आहे व त्या पासपोर्टच्या कॉपी चा एक फॅक्स मनुश्यबळ विकास मंत्रालयाला आनंदच्या बायकोने पाठवला होता असे टाइम्स मधे वाचले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429450.cms

'मी नेहमीच तिरंगा लावून खेळलो. माझ्याकडे भारतीय पासपोर्टही आहे. तरीही राष्ट्रीयत्वाचा मुद्दा का उपस्थित होतोय, हे मला समजू शकलेले नाही.'

हैदराबाद विद्यापीठाने ऑक्टोबर २००९मध्ये आनंदला मानद डॉक्टरेट देण्याचा निर्णय घेतला. नियमानुसार मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव त्याचवेळी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे धाडण्यात आला; पण आनंदचे वास्तव्य स्पेनमध्येही असते, या शंकेचे प्यादे नाचवत सरकारी बाबूंनी मान्यतेबाबत चालढकल केली. खुद्द आनंदच्या पत्नीनेही त्याच्या पासपोर्टची फोटोकॉपी फॅक्स केली.

जर त्याने स्पेन चे नागरिकत्व घेतले असेल तर त्याचा कडे भारताचा पासपोर्ट कसा???

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 12:16 pm | मृत्युन्जय

लोकसत्तामधील वाक्ये खालीलप्रमाणे आहेतः

चौसष्ट घरांचा राजा’ असलेल्या परंतु काही तांत्रिक कारणांसाठी स्पेनचे नागरिकत्व घेतलेल्या विश्वनाथन आनंदचे नाव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्याच्या नागरिकत्वाबद्दल काही आक्षेप घेतल्याने हैदराबाद विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या सन्माननीय डॉक्टरेटच्या यादीतून वगळण्यात आल्याने मोठीच खळबळ उडाली.

आता हे तांत्रिक कारण काय असावे हे मात्र मला माहित नाही. लोकसत्तामधील बातमी खरी की खोटी हे ही मला माहित नाही.

प्रथम पासपोर्ट घेतला असेल आणि मग नागरीकत्व बदलले असेल तर पासपोर्ट देखील बदलला जातो काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2010 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकसत्ताची बातमी खरी का खोटी माहित नाही. पण एन्डीटीव्हीवर हे सापडलं.
Anand, an NRI who lives in Spain, preferred to play down the controversy.

लोकसत्तात हे सापडलं:
विश्वनाथन आनंद बाबत असे प्रश्न उपस्थित करण्याची काही आवश्यकताच नव्हती अशी नाराजी सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. कर्तृत्ववान भारतीयांपैकी काही जणांनी समजा अगदी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व पत्करले असेल तरी आम्हाला या भारतीयांबाबत वाटणारा अभिमान तिळमात्र कमी होणार नाही. प्रशासकीय प्रक्रियेमुळे विश्वनाथन आनंद प्रकरणाची फाईल क्लिअर करण्यास विलंब झाला अशी सारवासारवही सिब्बल यांनी केली.
लोकसत्तातली बातमी खोडसाळ वाटते अथवा ज्या व्यक्तीने हे लिहीलं आहे तिला आपण लिहीलं आहे त्याचा अर्थ काय होतो हे कळलेलं नाही असं वाटत आहे.

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 1:09 pm | मृत्युन्जय

जर लोकसत्तातील बातमी खोडसाळ असेल तर प्रश्नच मिटतो. मी उद्याच लोकसत्ता बंद करुन टाकतो आणि परत राष्ट्रवादी वृत्तपत्राची कास धरतो :)

या मुद्याशी निगडीत अजुन एक बातमी सापडली:

UoH officials say that the honour would be conferred to Anand along with renowned mathematician David Mumford of Harvard University at a function later on Tuesday night, coinciding with the ongoing International Conference Of Mathematicians

इथे मला एक प्रश्न असाही पडतो की जर परदेशात राहणार्‍या परदेशी नागरिकांना हा सन्मान मिळु शकतो तर आनंदच्या बाबतीत हा प्रश्नच का उद्भवतो?

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 1:32 pm | मृत्युन्जय

हुप्प्याने दिलेल्या लिंक मधील ही वाक्ये:

विश्वनाथन आनंदला मानद डॉक्टरेटनं गौरवण्याचा निर्णय हैदराबाद विद्यापीठानं २००९ मध्ये घेतला होता. परंतु, परदेशी पुरस्कारविजेत्या व्यक्तीला कुठलीही पदवी-पुरस्कार देताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते.

मला या वाक्यांचा अर्थ खरेच नाही कळाला. याचे २ अर्थ होउ शकतातः

१. परदेशी पुरस्कार मिळालेल्या कुठल्याही व्यक्तीला हा सन्मान देण्यापुर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते

किंवा

२. कुठल्याहे परदेशी व्यक्तिला हा सन्मान देण्यापुर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते

जर अर्थ दुसरा असेल तर याचा अर्थ असा होतो की आनंद परदेशी नागरीक असल्याचा शोध विद्यापीठाने लावला. कारण नाहीतर त्याचे नाव मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मंजुरीसाठी पाठवण्यात काहीच मतलब नव्हता. आता हा खोडसाळपणा (जर तो तसा असेल तर) विद्यापीठाचा आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा नाही असा अर्थ नाही काय?

तरीही प्रश्न अर्थात उरतोच की दुसर्‍या कोण्या परदेशी नागरीकाला जर हा सन्मान मिळु शकत असेल तर आनंदला का नाही?

हुप्प्याने दिलेल्या दुव्यामुळे आनंदची नागरीकत्वाबद्दल अजुन संभ्रम निर्माण झाले आहेत. कोणी जाणकार माणुस स्पष्ट करु शकेल काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2010 - 1:15 pm | बिपिन कार्यकर्ते

परंतु काही तांत्रिक कारणांसाठी स्पेनचे नागरिकत्व

हाहाहा!!! मराठी वृत्तपत्रांनी रेसिडेन्ट आणि सिटिझन वगैरे शब्दांचे भाषांतर करताना नेहमी / सतत करतात तशी गल्लत केली आहे. आनंद भारताचा नागरिक आहे पण तो स्पेन मधे स्थायिक असावा जेणेकरून त्याला स्पेनमधे जा ये करताना व्हिसा वगैरे लागत नसावा तसेच काही स्थानिक अधिकारही मिळत असावेत. मराठी वृत्तपत्रांच्या जनरल नॉलेज बद्दल न बोलणे बरे.

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 1:18 pm | मृत्युन्जय

तसे असेल तर "आनंद" आहे :)

प्रदीप's picture

25 Aug 2010 - 6:20 pm | प्रदीप

मराठी वृत्तपत्रांच्या जनरल नॉलेज बद्दल न बोलणे बरे.

बँ. ऑ. स्पॉ.

साधी गोष्ट आहे की वर अदितीने म्हटल्यापमाणे
१ - आनंद भारताचा झेंडा लाऊन खेळतो याचा अर्थच तो भारताचा नागरिक आहे तसे असल्याखेरीज त्या देशाचा झेंडा लावता येत नाही.
२ - पासपोर्ट भारतीय म्हणजे नागरिकत्वही नि:संशय भारतीयच.
३ - तो एनाराय आहे आणि स्पेनमध्ये राहतो.

४ - तो स्पेनमध्ये का गेला ह्याची कारणे मी वाचली होती ती अशी -
अ - जानेवारी ते जून चालणार्‍या बुद्धीबळस्पर्धतल्या बहुतांश युरोपिअन भागात होतात. तिथे राहून सराव करणे आणि स्पर्धात भाग घेणे त्याला सोयीचे जाते. उरलेल्या अर्ध्या वर्षात तो काही महिने भारतात असतो.
ब - Jameo do Oro हा सर्वोच्च नागरी सन्मान स्पेनने त्याला २००३ च्या डिसेंबरमध्ये बहाल केला त्यामुळे त्याने भारताबाहेरचे राहण्याचे ठिकाण म्हणून स्पेनची निवड केली.
---------------------------------------------------------
ता. क.
आणखीन काही कारणे अशी असावीत - जी कुठेही वाचलेली नाहीत परंतु तर्काने जाणणे फारसे अवघड नसावे - तो खेळतो त्या बहुसंख्य स्पर्धातून त्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम ही बहुदा अमेरिकन डॉलर्स आणि यूरो ह्या चलनाद्वारे मिळते. अर्थात तो एनाराय असला की त्याला त्या रकमेचे नियोजन करणे सोयीचे जात असणार.

शिवाय स्पॅनिश सरकरने त्याला काही खास सोयी सवलती उपलब्ध करुन दिल्या असतील की ज्यामुळे त्याला तिथे राहणे योग्य आणि सोयिस्कर वाटत असावे.

(आनंदचा चाहता)चतुरंग

असुर's picture

25 Aug 2010 - 9:26 pm | असुर

+१
आनंद हा संपूर्ण भारतीयच आहे. फक्त त्याच्याकडे स्पेनमध्ये कायमस्वरुपी वास्तव्याचा अधिकार आहे. थोडक्यात तो स्पेन मध्ये राहणारा अनिवासी भारतीय आहे.
यात शंका येण्यासारखी काहीच बाब नाहीये. तरीदेखील ज्यांना कुणाला शंका असेल त्यांनी आनंदला संपर्क (कसाही, कुठेही) करुन त्याच्या पारपत्राची प्रत मागवून घेणे!

--असुर