नारळी भात
साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर,
मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड, लवंग, केशर, खाण्याचा रंग,लिंबु, साजुक तुप,चिमुटभर मीठ
पाकक्रुती:
प्रथम थोड्या तुपावर लवंगा टाकुन त्यावर तांदुळ भाजुन घेणे. त्यानंतर त्यावर आधणाचे पाणी टाकुन भात मऊ मोकळा शिजवुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ टाकावे. १ चमचा तुप घालावे.भात शिजला की परातीत काढुन घ्यावा.
नंतर १ वाटी पाणी घेउन त्यात पाउण वाटी साखर घालुन पक्का पाक करावा. नंतर त्यात नारळाचा चव घालावा. त्यात लिंबु पिळावे व १ चिमुटभर रंग घालावा. त्यानंतर शिजवलेला भात घालावा. मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड घालुन थोडी वाफ येऊ द्यावी. थोडासा परतुन घ्यावा.
गरमागरम नारळी भातावर साजुक तुपाची धार सोडावी !! आणि आपल्या भाऊरायाचे तोंड गोड करावे!!!!
(पहिल्यांदाच लिहितेय, काही चुकले असल्यास समजुन घ्या.आणि IT वाल्यांचा नारळी भात कसा वाटला नक्की सांगा :) )
प्रतिक्रिया
24 Aug 2010 - 7:06 pm | मेघवेडा
पाकृ उत्तम.
नारळीभात केल्याशिवाय जशी नारळी पौर्णिमेची मजा येत नाही तशीच फोटोविना पाकृंना मजा येत नाही! :)
24 Aug 2010 - 7:17 pm | छोटा डॉन
>>नारळीभात केल्याशिवाय जशी नारळी पौर्णिमेची मजा येत नाही तशीच फोटोविना पाकृंना मजा येत नाही!
+१, हेच म्हणतो.
फोटो हवाच्च म्हणजे हवाच्च !!!
बाकी नारळीभात मला खुप आवडत असल्याने ही केवळ पोच, फोटो टाकल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन.
- छोटा डॉन
24 Aug 2010 - 7:54 pm | सूड
वरील दोन्ही प्रतिक्रियांशी सहमत.......फुलेबाई फोटो पाह्यजे बगा...आणि माझ्या माहितीप्रमाणे भात साधारण शिजला की त्यात नारळाचे दूध घालतात (आयटी वाले चव घालत असतील, पण त्याने चव कमी होईलसे वाटते). बाकी रेसिपी उत्तम
24 Aug 2010 - 11:32 pm | प्राजक्ताचि फुले
नारळाचे दूध घालण्याची पध्धत कोकणात आहे का?? कारण आमच्या इथे नारळ्च घालतात खवुन...!
25 Aug 2010 - 1:35 pm | सूड
हो.....नारळाचे दूध घालतात (निदान आमच्या घरी तरी), एकदा करुन पहा छान लागतो.
जाता जाता: आपण केशर फक्त साहित्यात लिहीलेत कृतीत त्याचा उल्लेख कुठे दिसत नाही.
24 Aug 2010 - 10:37 pm | मधुशाला
साखरभात आणि नारळीभात यात फरक काय?
(आमच्याकडे नारळीभात गूळ घालून करतात)
24 Aug 2010 - 11:27 pm | प्राजक्ताचि फुले
साखरभातामध्ये नारळ नसतो...
25 Aug 2010 - 2:38 am | मिसळभोक्ता
रावणभातात रावण कुठे असतो ?
25 Aug 2010 - 3:30 am | पिवळा डांबिस
हहपुवा!!!!
25 Aug 2010 - 3:24 am | चित्रा
मी घालते साखरभातातही थोडासा नारळ :)
नारळीभात छान आहे.
25 Aug 2010 - 9:29 am | चिंतामणी
नारळीभातात गुळ घातल्याशिवाय चव नाही.
गुळ पाहीजेच.
जाता जाता- उकडीच्या मोदकाच्या सारणातसुध्दा गुळच पाहीजे. साखर घालुन खमंग होत नाहीत.
खरवससुध्दा गुळ घालुन चांगला लागतो. (किती जणांनी असा खाल्ला असेल असे माहीत नाही)
26 Aug 2010 - 4:08 am | मधुशाला
हांगाश्शी.. लाख बोल्लात
(अवांतरः खरवस गूळ न घालता कसा करतात?)
25 Aug 2010 - 10:11 am | हेमा
नारळी भात गुळाचाच करतात आणि केश री भात साखरेचा
25 Aug 2010 - 1:14 pm | Shubhangi Pingale
सुन्दर आहे
25 Aug 2010 - 2:12 pm | सुहास..
छान !! फोटो ?
आयटी वाल्यांना भात आवडला हे वेगळे सांगायची गरज नसावी !!
26 Aug 2010 - 9:50 pm | विसोबा खेचर
नारळीभातात गुळाऐवजी साखर?????????????
धन्यवाद....
तात्या.
26 Aug 2010 - 10:06 pm | प्राजक्ताचि फुले
आमच्या कडे साखरच घालतात नारळीभातात.....