मिपा टॉप २५

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
24 Aug 2010 - 3:48 am
गाभा: 

मिपा टॉप २५ मधील सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मुख्य म्हणजे सर्वोच्च पंचवीसांत दोन-दोनदा सहभाग असणारे अदिती, आणि सुधीर काळे ह्यांना ह्यापी बर्डे देखील !!!

प्रथम क्रमांकावर असलेल्या चोता दोन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा. म्हणजे ते जमा करता येईल.

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ... छोटा डॉन 242
पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे डॉ.प्रसाद दाढे 234
हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते? ३_१४ विक्षिप्त अदिती 231
लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा! सुधीर काळे 213
इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? सुधीर काळे 180
मराठी अंताक्षरी आजानुकर्ण 179
Drinks ...मुली आणि मद्यपान! जाई अस्सल कोल्हापुरी 165
IT WIFE आणि स्वयंपाक अद्ययावत सुजय कुलकर्णी 158
मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे? अमोल केळकर 156
आजची स्त्रीची प्रतिमा - १ ३_१४ विक्षिप्त अदिती 147
जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी चिंतातुरजंतू 142
घरगुती सावरकर भोचक 138
मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन! राजेश घासकडवी 138
नवनिर्माण सूचना. सरपंच 136
अतिलघुकथास्पर्धा Anonymous 134
आणि माझा मारूती झाला-२ विनायक प्रभू 131
मराठी अमेरिकन्स .. महेंद्र 127
पी.जे. (अतिशय फालतू जोक) प्राजु 125
महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा मेथांबा 123
वारंवार विचारले जाणारे प्रश्न. अद्ययावत सरपंच 121
लेखकाला स्वतःचा लेख स्वसंपादन करायचा अधिकार अद्ययावत जयंत कुलकर्णी 120
निषेध निषेध तीव्र निषेध... प्रशु 119
नथुराम गोडसे आणि हिटलर निमीत्त मात्र 111
हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे सर्वसाक्षी 111
माझे आवडते प्रेरणावाक्य त्रास 110

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 4:00 am | मिसळभोक्ता

ह्या निमित्ताने, प्रतिसादांच्या संख्येने उतरती भाजणी केल्यास, तुम्ही कितव्या पानावर येता, ते कळवावे.

आम्ही चौथ्या पानावर आहोत. (८२ प्रतिसाद)

मुक्तसुनीत's picture

24 Aug 2010 - 4:12 am | मुक्तसुनीत

सर्व टॉपर्सचे अभिनंदन !
- तळागाळातला.

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 4:39 am | मिसळभोक्ता

मुसुशेठ,

तुम्ही तिसर्‍या पानावर आहात. (चैत्र, ८७).

आमोद शिंदे's picture

24 Aug 2010 - 5:58 am | आमोद शिंदे

अहो माझा नंबर तर पाताळात आहे :) लोकप्रियतेच्या शर्यतीत माझे नेहमीच असे असते. :(

राजेश घासकडवी's picture

24 Aug 2010 - 4:33 am | राजेश घासकडवी

गेल्या आठेक महिन्यात पॉप्युलेशन दीडपट झालेली आहे (बिल्लाक्रमांकाप्रमाणे). त्यामुळे आठ महिन्यांपूर्वीचे शंभर प्रतिसाद हे आजच्या दीडशेच्या बरोबर. (किमान. खरं तर वादविवादांची परम्युटेशनं अजूनच वाढतात, पण तेवढा छिद्रान्वेषीपणा करायला नको) तर तसं नॉर्मलायझेशन करून ही यादी पुनर्प्रकाशित करता येईल का?

दुसरं म्हणजे अदितीचा धागा बंद करण्यात संपादक मंडळाचा तो टॉपला जाऊ नये अशी इच्छा असावी अशी दाट शक्यता आहे. ही तक्रार मी मंडळाच्या खवतही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर हघे असंही म्हटलं आहे. आयला, आम्हाला आमच्या जिवाची काळजी आहेच. नाहीतर मारुती कांबळे व्हायचा आमचा.

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 4:38 am | मिसळभोक्ता

(किमान. खरं तर वादविवादांची परम्युटेशनं अजूनच वाढतात, पण तेवढा छिद्रान्वेषीपणा करायला नको) तर तसं नॉर्मलायझेशन करून ही यादी पुनर्प्रकाशित करता येईल का?)

उत्तम सूचना. याला आमचे उत्तर, म्हणजे: "तुम्हीच करा."

धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

24 Aug 2010 - 6:18 am | राजेश घासकडवी

उत्तम सूचना. याला आमचे उत्तर, म्हणजे: "तुम्हीच करा."

जल्ला आम्हाला तुम्ही केलाय त्यवढा पण येत नवता.

आणि आम्ही नवखे. आम्हाला नक्की कुठच्या काळी किती (खरे) सभासद होते, केव्हा काही आयडीमात्र होते वगैरे भानगडी नीट माहीत नाहीत. तेव्हा कोणीतरी थोरामोठ्यांनी, जाणकारांनी ते करावं.

आमोद शिंदे's picture

24 Aug 2010 - 5:49 am | आमोद शिंदे

दुसरं म्हणजे अदितीचा धागा बंद करण्यात संपादक मंडळाचा तो टॉपला जाऊ नये अशी इच्छा असावी अशी दाट शक्यता आहे.

सहमत आहे. मी आळश्यांचा राजा ह्यांना लिहिलेला भलामोठा प्रतिसाद सुर्पुर्त केल्यावर ती लाल पाटी समोर आली. :(

एक शंका: २३० + प्रतिसाद आले की चर्चा बंद करण्याचे काय कारण? सर्वरवर ताण तितकाच पडणार ना? (म्हणजे पुढचे प्रतिसाद नविन चर्चेत टाकले काय तिथेच टाकले काय ह्याने काय फरक पडतो?)

प्रियाली's picture

24 Aug 2010 - 4:58 am | प्रियाली

मिभोची फॅक्टरी सुरु झालेली दिसते.

टॉपर्ससोबत मिभोंचेही अभिनंदन!

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 5:18 am | मिसळभोक्ता

तुम्ही सहाव्या पानावरः (ठेव प्रियाली 74 )

सन्जोप राव's picture

24 Aug 2010 - 5:08 am | सन्जोप राव

प्रतिसादांच्या संख्येवरुन 'टॉप २५' वगैरे ठरवणे - त्यातही 'टॉप २५' हे तद्दन फिल्मी नाव वापरणे हे मिभोंच्या लेखनपरंपरेशी विसंगत आहे.
मिभो, लहानपणी आम्ही अशा सूरपारंब्या खेळत असू. लहानपणी तू अशा सूरपारंब्या खेळत असस. 'बघीतलंस, मनात आणलं तर तात्याला ५०-६० प्रतिसाद काही अवघड नाहीत' या अजरामर वाक्याची आठवण आली आणि डोळे भरुन आले.

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 5:15 am | मिसळभोक्ता

तुम्ही पाचव्या पानावर (अगा लेखकांनो सन्जोप राव 78)

टुक टुक !

धनंजय's picture

24 Aug 2010 - 5:36 am | धनंजय

आणखी छिद्रान्वेष : कित्येक बहुशतकी चर्चा अप्रकाशित झालेल्या आहेत. त्या सर्व दिसल्या असत्या तरी बहुधा मी चवथ्या पानावरच असतो.

अदृश्य शतकवीरांचेही अभिनंदन.

(चवथ्या पानावर असल्यामुळे) ब्यांकखात्याऐवजी पिनसह हातगोळा पाठवावा असा विचार करतो आहे. पिन तपासून सोबतच्या पाकिटातून परत पाठवावी.

मिभोकाका, ह्या प्रयोगाला किती माकडे लागली??? ;)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Aug 2010 - 11:32 am | प्रकाश घाटपांडे

प्रयोगासाठी लागणारी माकडे ही द्राक्षासवाच्या अंमलाखाली असत्यात. त्यो बी येक वायलाच प्रयोग म्हनायचा!

आमोद शिंदे's picture

24 Aug 2010 - 5:52 am | आमोद शिंदे

मिसळभोकांनी सुरु केला आहे म्हणजे हा धागाही टॉप २५ मधे जाणार हे नक्की :)

सहज's picture

24 Aug 2010 - 5:52 am | सहज

१) सांख्यिकी विदा विश्लेषण हे मिभोंच्या लेखनपरंपरेशी सुसंगत आहे असे वाटते. मिपाकरांना त्यांच्या लोकप्रिय चर्चेच्या गुर्‍हाळापाशी नेउन पुन्हा एकदा आरसा दाखवल्याप्रमाणे हे असावे असे समजतो.
१.१) यात लेखांची वाचनसंख्या कळली तर अजुन लोक कुठल्या चर्चा रस घेउन वाचतात ते कळेल.
१.२) यात अवांतर प्रतिसाद किती?
१.३) मुख्य म्हणजे एकाच धाग्यात जास्तीत जास्त प्रतिसाद कोणत्या सदस्याचे? व वरील सर्व २५ चर्चात मिळुन जास्त प्रतिसाद कोणाचे?

२) धनंजय म्हणाल्यासारखे हुतात्मा शतकवीर चर्चांना आदरांजली :-)

१.२) यात अवांतर प्रतिसाद किती?

१.३) मुख्य म्हणजे एकाच धाग्यात जास्तीत जास्त प्रतिसाद कोणत्या सदस्याचे? व वरील सर्व २५ चर्चात मिळुन जास्त प्रतिसाद कोणाचे?

मिभोंनी चांगला विषय ठेवला आहे. हा पहीलाच प्रयत्न असावा. परन्तु वरील मुद्दा विचार करण्यासारखा आहे. वर उल्लेखिलेल्या अनेक विषयांमधे दोन्ही प्रकार दिसतात.

पुढील टॉपर्स जाहीर करतान जरूर विचार करावा या मुद्यांचा.

आमोद शिंदे's picture

24 Aug 2010 - 5:57 am | आमोद शिंदे

ह्या चर्चांचे दुवेही त्यात एंबेड केले तर वाचायला सोपे जाईल.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Aug 2010 - 11:42 am | प्रकाश घाटपांडे

आजुक येक सुचवनी धपा धप येनारे प्रतिसाद खरे लेखांन्ला असत्यात कि प्रतिसादांना हे ठरवायला सोपी आयडिया काय हाय कि नाय?

अरुण मनोहर's picture

24 Aug 2010 - 5:58 am | अरुण मनोहर

.

नंदन's picture

24 Aug 2010 - 6:19 am | नंदन

धर्म, नथुराम, पाकिस्तान, पुणे, अनिवासी, आयटी, स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामी वृती आणि अभाव, स्वातंत्र्य/स्वैराचार, ओळखी/तक्रार/प्रश्न आणि गाणी हे नेहमीचे यशस्वी विषय/कीवर्ड्स आले आहेत अपेक्षित २५ मध्ये :). अजून पाच वर्षांनी काय शीर्षकं येतात ते पहायचं. विषय बहुतेक बदलायचे नाहीत.

सुहास..'s picture

24 Aug 2010 - 11:25 am | सुहास..

धर्म, नथुराम, पाकिस्तान, पुणे, अनिवासी, आयटी, स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामी वृती आणि अभाव, स्वातंत्र्य/स्वैराचार, ओळखी/तक्रार/प्रश्न आणि गाणी हे नेहमीचे यशस्वी विषय/कीवर्ड्स आले आहेत >>>

एक नंबर नंदनराव !!

टॉपर्सचे अभिनणंद !! (बोलनेमे क्या जाता है)

नंदन-जी,
'काश्मीर' हा विषय राहिला असं वाटतंय्.
सुधीर काळे

नितिन थत्ते's picture

25 Aug 2010 - 5:22 pm | नितिन थत्ते

तो पाकिस्तान या विषयात इन्क्लूडेड आहे. :)

श्रावण मोडक's picture

25 Aug 2010 - 6:08 pm | श्रावण मोडक

हाण्ण! आता या धाग्यावरचे प्रतिसाद 'वाढता-वाढता वाढे' होणार... :)

मिपावर मिपाविषयी असणारे लेख म्हणजे हिटच जातात.

आपला लेख ह्याला अपवाद नसावा.

आणखी काही आकडे शोधालया जमले, तर बघा.

(चला महिनाभराच्या विरझणाची सोय झाली)

पण चक्क तिसर्‍या पानावर 'पाहुणा संपादक' म्हणून आमचे संपादकीय आहे ९० प्रतिसाद!
आता स्वतःचीच पाठ थोपटायला हवी! ;)

चतुरंग थोपटे

विकास's picture

24 Aug 2010 - 7:24 am | विकास

चतुरंगराव,

आपले विधान मी पटकन वाचताना चुकून "पेज ३ वर पाहुणा संपादक" असा अर्थ घेतला ;)

नंतर अर्थातच गैरसमज दूर झाला. ;) (काळजी नसावी :) )

चतुरंग's picture

24 Aug 2010 - 7:35 am | चतुरंग

अहो 'पेज ३ संपादक' असेच आले आधी माझ्याही मनात पण म्हटले स्वतःच कशाला स्वतःची स्तुती करा! ;)
शेवटी आम्ही जात्याच विडंबक पडलो ना त्यामुळे ते बरोबरच आहे! ;)

(पेज३संपादक)तीनरंग

शिल्पा ब's picture

24 Aug 2010 - 7:47 am | शिल्पा ब

अहो...आमच्या कोणत्यातरी धाग्याला १०० मिळाले कि..आम्ही पण स्वताचीच पाठ थोपटतो..

मिभोंना एक रिक्वेष्ट : मिपावर जास्तीत जास्त लिखाण करणारे आय डी यांची पण एक लिष्ट बनवा... म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लिखाण कोणाचे?

नितिन थत्ते's picture

24 Aug 2010 - 8:02 am | नितिन थत्ते

>>मिपावर जास्तीत जास्त लिखाण करणारे आय डी यांची पण एक लिष्ट बनवा... म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लिखाण कोणाचे

हॅ हॅ हॅ. त्यात रिसर्च काय करायचा?
सामंत काका (आणि लवकरच काळेकाका) सगळ्यांना हॉलो मारतील.

अवांतर: बिकांनी एकदा कॉम्पिटिशनचा प्रयत्न म्हणून खोबार भाग १ ते २८८ लिहायला घेतले होते पण ते ६-७ भागातच आउट झाले.

आमच्या शुचीला विसरलात का? आणि आता जाई बाई...(रागावू नका हो..) ;)

नितिन,
खरं सांगायचं म्हणजे माझे जे लेखन मला आवडते त्या लेखनाला त्या मानाने कमीच प्रतिसाद आले. काश्मीरच्या प्रश्नावरचा माझा लेख एक लेखन या नात्याने कांहीं खूप चांगला नव्हता. 'टाइम्स'मधील बातमी आणि पंतप्रधान/राष्ट्रपतींना मी लिहिलेले पत्र यापेक्षा त्यात माझे असे कांहींच कौशल्य नव्हते. केवळ वादविवादातून त्याला इतके प्रतिसाद मिळाले.
असो. आज आणखी एक टाइम्स'मधील बातमी व माझे कालच्या जकार्ता पोस्ट'मधे प्रकाशित झालेले पत्र जरूर वाच. हे पत्र लिहिल्याचा मात्र मला अभिमान आहे कारण कांहींसा अभ्यासही त्यामागे आहे व परदेशी राहून किरकोळ देशसेवाही होते. तरी जरूर वाच.
काका

लवकरच एखाद्या प्रक्षोभक विषयावर काथ्या कुटावा म्हणते आहे.
पान क्र. ३१ वरून किती वरच्या क्रमांकावर उडी मारता येते ते तरी कळेल.

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 11:22 am | मिसळभोक्ता

"संपादकांच्या कथा आणि व्यथा" असा एक विषय सुचवतो :-) कमीत कमी दुसर्‍या पानावर गारंटीड !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2010 - 4:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, सुपारी दे! तुला पहिल्या पाचात आणून सोडते! ;-)

रेवती's picture

24 Aug 2010 - 7:53 pm | रेवती

सुपारी दे!
थांब गं देते! देवघराजवळच्या पेटीत चार सुपार्‍या, हळकुंडं ठेवलीत जपून.

यशोधरा's picture

24 Aug 2010 - 7:58 pm | यशोधरा

रेवती! =))

रेवती's picture

24 Aug 2010 - 8:56 pm | रेवती

ही ही ! जर पाचकळपणा दुसरं काही नाही.;)
पण आता खरच अदितीच्या मदतीनं एखादा धागा काढावा असं वाट्टय.
आमच्या चटण्या कोशिंबीरींच्या धाग्याला येउन येउन असे किती प्रतिसाद येणार?;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2010 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तसं नाही रेवती ताई! चटण्या कोशिंबीरीचे धागे काढच; माझ्यासारख्या विसरभोळ्या आळसटांसाठी चांगले संदर्भ तयार होतील. पण त्यात अमक्याची चटणी करता येईल, तमक्याचं भरीत करता येईल असल्या टिमक्या वाजव. आपल्याला सुपरवुमनायटीस* झाला आहे याची प्रचंड जाहीरात कर. शिवाय या सुपरवुमनायटीसचे फायदे तोटे यावर एक मोठ्ठं लेक्चर दे ... की झालाच समज धागा हिट!!

*सदर शब्द मंगला गोडबोले यांच्या 'पर्स हरवलेली बाई'मधून साभार उचलला आहे.

अवांतरः मिभोकाकांनी टॉप-२५ मधे माझाही धागा टाकल्यामुळे मलाही त्यांच्यासाठी थोडेफार प्रतिसाद देणं आलंच!

रेवती's picture

24 Aug 2010 - 11:18 pm | रेवती

धन्यवाद!
प्रयत्न करते.

असं बनायचं असतं होय सुपरवूमन! मला ठाऊकच नव्हतं ब्वॉ! स्वतःची जाहिरातही करावी लागते? त्यासाठी मिपावरच्या विवक्षित कंपूला सुपारी देईन म्हणते! :D

सुपारी चे ठिक आहे पण हळकुंडं कशाला ?

मिसळभोक्ता's picture

25 Aug 2010 - 11:45 pm | मिसळभोक्ता

हॅ हॅ हॅ ?

किती हळकुंडं जपून ठेवली आहेत, त्यावर अवलंबून आहे.

आम्ही फक्त अर्धेच जपून ठेवतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Aug 2010 - 11:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अर्धे वापरून पिवळे होण्यासाठी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2010 - 11:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मीच ती, मीच ती, मीच ती!

मारत्ये आता रेवतीताई मला!!

आम्ही पान क्र. ३१ वाले म्हणून कुणाला धाकच राहिला नाही बुवा!;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2010 - 12:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी दिलेली रेसिपी वापरून तर पहा! ३१ चा १३ तर ऑपॉप* होईल, पुढे १३ चं तीन करायला मी आहेच. तीनचं एक मात्र नशीबाचा भाग आहे! ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Aug 2010 - 3:42 am | विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे तुम्ही तीन तेरा करणार तर. :-)

श्रावण मोडक's picture

26 Aug 2010 - 9:52 am | श्रावण मोडक

तीनचं एक मात्र नशीबाचा भाग आहे! ;)

नशीब! ;) त्या शब्दांत मी "प्रयत्ने वाळूचा कण रगडता तेलही निघे," हे वाचू शकलो. हुश्श! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2010 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याचा विचार होता, पण मी आधीच 'धाग्याचा खफ कसा करावा' हा लेख लिहीला असल्यामुळे वेगळं आणखी लिहीण्याची गरज नसावी. ;-)

मेहेंदळे साहेबः श्श, कुठे बोलायचं नाही!

राजेश घासकडवी's picture

26 Aug 2010 - 11:02 am | राजेश घासकडवी

सुपारी दे! थांब गं देते! देवघराजवळच्या पेटीत चार सुपार्‍या, हळकुंडं ठेवलीत जपून.

हे फारच 'थांब अदिती, कुंकू लावते' टाईप वाटतंय...

पाहुणा's picture

25 Aug 2010 - 4:57 pm | पाहुणा

हा ३५% महिला आऱशणाचा परीणाम समजावा का ?
(महिला पण सुपारी घ्यायला लागल्यात म्हणून वाटले !)

आप्पा's picture

24 Aug 2010 - 11:27 am | आप्पा

या सर्व धाग्यांची लिंक दिली असती तर यातील न वाचलेले धागे वाचता आले असते. सर्व लेखकांचे अभिनंदन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Aug 2010 - 11:31 am | ज्ञानोबाचे पैजार

एकुणच या चर्चेचा रोख पहाता सध्या मि.पा. वर धागे फक्त प्रतिसाद मिळवण्या साठीच काढले जातात असे वाटते. मी मि.पा. चा जुना वाचक आहे. मला खेदाने असे नमुद करावेसे वाटते की लेखनाचा दर्जा सध्या हरवत चालला आहे. सदस्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात लिखाणाच्या दर्जाची घसरण होत आहे.

काहीतरी सवंग, चटपटीत, प्रक्षोभक किंवा कोणावर तरी टीका करणारे लिहीले आणि त्याला अमाप प्रतिसाद मिळाले तर त्यात कौतुक करण्या सारखे ते काय? (वरील यादी मधील काही उदाहरणे वानगी साठी घेता येतील)

पण कधी कधी वाटते की आपल्या अजुबाजुला जे चालले आहे त्याचेच प्रतिबिंब मि.पा.वर उठते आहे. जसे सिनेमा चालावा म्हणुन हिंदी चित्रपट निर्माते करत असलेल्या युक्त्या. किंवा टी.व्ही चॅनेल ची टी.आर. पी. टीकवण्या साठी चाललेली धडपड. मि.पा. ची अशी काहीतरी अवस्था होउ नये असे वाटते.

मि.पा. वर जशा नविन आ.डीं ची भर पडते आहे तशी काही जुनी मंडळी गायब झाली आहेत ज्यांचे लेखन खरोखर वाचनिय असायचे.

असे का झाले / होत आहे याचा शोधघेणे जरुरीचे आहे.

पैजारबुबा,

सुहास..'s picture

24 Aug 2010 - 11:53 am | सुहास..

पैजारबुवा >>

माफक करमणुक ?

छोटा डॉन's picture

24 Aug 2010 - 12:24 pm | छोटा डॉन

आता मिभोकाकांचा धागा आहे 'चान चान' म्हणणे ओघाने आलेच, तशी पद्धतच आहे म्हणे मिपावर :)

प्रथम क्रमांकावर असलेल्या छोटा डॉन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा. म्हणजे ते जमा करता येईल

घ्या, आम्ही समजत होतो की इथे लॉगिन केले की आमचे सर्व डिटेल्स ( खरे नाव, गाव, पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड नंबर, लायसन्स डिटेल्स, बॅक अकाउंट डिटेल्स वगैरे ) ऑपॉप ( कॉपीराईट : धमु ) तुमच्याकडे जमा होतात म्हणुन ;)
नाय, तसे आधी आम्ही कुठेतरी वाचले होते म्हणुन म्हटले.

- ( ट्रॅकर ) छोटा डॉन

घाटावरचे भट's picture

24 Aug 2010 - 1:08 pm | घाटावरचे भट

चांगलंय... चालू द्या.

- (पान १८) भट

अमोल केळकर's picture

24 Aug 2010 - 1:51 pm | अमोल केळकर

अरे वा आमचा ९ वा नंबर लागला !!
छान

( ९ वा ) अमोल

सुहास..'s picture

24 Aug 2010 - 3:56 pm | सुहास..

मेरा नंबर कब आयेगा ?

यशोधरा's picture

24 Aug 2010 - 4:43 pm | यशोधरा

काका, हमारा नंबरच नै क्या? :(
काका पार्शल हय!

डावखुरा's picture

24 Aug 2010 - 4:44 pm | डावखुरा

ज्ञानदेवे रचिला पाया,
तुका झालासे कळस..!

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 9:29 pm | धमाल मुलगा

ज्ञानदेवे रचिला पाया, (खरं,)
तु का झालासे कळस..!

असं म्हणायला हवं का? ;)

सूड's picture

24 Aug 2010 - 4:45 pm | सूड

टॉपर्सचे अभिणंधण...

मिभो.....विरजण घालण्याचे आपले व्यस्त वेळापत्रक सांभाळून हे मौल्यवान काम केल्याबद्दल आभार, बाकी आमचा नंबर कितवा हे विचारुन तुमच्या कामात अडथळा आणत नाही.

दाद's picture

24 Aug 2010 - 7:06 pm | दाद

पैजारबुवाशि सहमत !!

अनामिक's picture

24 Aug 2010 - 7:25 pm | अनामिक

याच गतीने या धाग्यावर प्रतिसाद आले तर हा धागा 'पेज ३' वरपण यायचा नाही!

लेखावर किती प्रतिसाद मिळाले त्यावर लेख उत्तम अथवा फालतू हे ठरविण्याचा एक लोकप्रीय प्रकार म्हणजे प्रतिसांदांची संख्या. हे लॉजीक फारच तोकडे वाटते.
हे म्हणजे एखादी भिन्न लिंगी ( हे बरे ना उगाच सुपरवुमनायटीस वाल्यांचा ओरडा नको) व्यक्तीने किती कमी/तोकडे कपडे परीधान केले यावरून त्याव्यक्तीचे सौंदर्य मोजण्यासारखे आहे.
धाग्यातले लिखाण उत्तम यासाठी किती प्रतिसाद मिळाले ही मोजपट्टी वापरणे म्हणजे एखाद्या जागेची खोली/उंची सांगण्यासाठी व्होल्टमीटर वापरण्यासारखे आहे.
सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी सेंटीमिटर एककाचा वापर सर्वार्थाने अयोग्य ठरतो.
चांगले काय हे ठरवण्यासाठी योग्य मोजपट्ट्या वापरा अन्यथा "काय जेवलात? " सारखे एकोळी धागे सर्वश्रेष्ठ ठरतील

मिसळभोक्ता's picture

27 Aug 2010 - 10:54 pm | मिसळभोक्ता

लेखावर किती प्रतिसाद मिळाले त्यावर लेख उत्तम अथवा फालतू हे ठरविण्याचा एक लोकप्रीय प्रकार म्हणजे प्रतिसांदांची संख्या. हे लॉजीक फारच तोकडे वाटते.

ज्यांच्या लेखनावर प्रतिसाद येत नाहीत, ते अशीच मनाची समजूत घालून घेतात.

त्यामुळे तुमच्याकडून हे अपेक्षितच होते.

ऋषिकेश's picture

27 Aug 2010 - 11:13 pm | ऋषिकेश

हे पान क्र. कसे मिळतात?

मस्त कलंदर's picture

27 Aug 2010 - 11:55 pm | मस्त कलंदर

नवे लेखनवर जायचे. आणि वरच्या हेडलाईनीतल्या (होय, आमच्याकडे असंच म्हंत्यात)प्रतिसाद या शब्दावर दोनवेळा टिचकी मारायची. पहिल्यांदा मारली , की शून्य प्रतिसादवाले सगळे धागे वरती येतात.. आणि दुसर्‍यांदा मारली, की जास्तीत जास्त वाले..
आता तू माझा मित्र म्हणून तुला डायरेक लिंक दिल्या गेलेली हाये.. :p

http://www.misalpav.com/tracker?order=comment_count&sort=desc

तू पान नं. २ आणि मी १९व्या पानावर आहे. :(