आमच्या इथे समर सुरु झाला की गावागावातून जत्रा भरतात. पूर्वी या जत्रा म्हणजे आपल्याजवळ्च्या गुराढोरांचे तसेच शेतीमालाचे प्रदर्शन करण्याची संधी असायची. आता त्या जोडीला मनोरंजनासाठी अनेक गोष्टीही असतात. या जत्रांचा एक अविभाज्य घटक म्हणजे वेगवेगळे फूड स्टॉल. बुढ्ढी के बाल पासून ते एलिफंट ईअर पर्यंत वेगवेगळे प्रकार इथे खायला मिळतात. या जत्रेतला माझा आवडता प्रकार म्हणजे फ्राईड ग्रीन टोमॅटो.
साहित्यः
४ कच्चे टोमॅटो
१ अंडे
१/४ कप कॉर्नमिल(नसल्यास मैदा आणि ब्रेड क्रंब्ज एकत्र करुन)
चवी प्रमाणे मीठ आणि मिरेपूड(किंवा तिखट)
तळण्यासाठी तेल
कृती:
टोमॅटो धुवून त्याच्या १/४ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात. छोट्या बोल मधे अंडे फोडून फेटून घ्यावे.
कॉर्नमिल मधे मीठ आणि मिरेपूड(मी तिखट वापरते) नीट मिसळून घ्यावे. फ्राईंग पॅन मधे साधारण १/४ इंच येइल इतपत तेल तापत ठेवावे. टोमॅटोच्या चकत्या फेटलेल्या अंड्यात बुडवून नंतर कॉर्नमिल मधे घोळवाव्यात. जास्तीचे कॉर्नमिल झटकून टाका. तापलेल्या तेलात या चकत्या तळा. गरमा गरम फ्राईड ग्रीन टोमॅटो तयार आहेत.
प्रतिक्रिया
19 Aug 2010 - 6:06 pm | रेवती
कधीच न ऐकलेली/ पाहिलेली पाकृ!
खूप वेगळी व छान!
याबरोबर तोंडीलावणे म्हणून केचप घ्यायचे कि काय?
चव कशी लागेल याबद्दल उत्सुकता आहे.
19 Aug 2010 - 7:16 pm | स्वाती२
अगं आम्ही नुसतेच खातो. कच्चा टोमॅटोचा आंबटपणा आणि वरचे तळलेले कव्हर याची वेगळीच चव येते.
19 Aug 2010 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार
दिसतायत तर भारी. एकदा गिळुन बघायला पाहिजेत, कोणी करुन देत असेल तर ;)
19 Aug 2010 - 6:26 pm | चिंतामणी
Drinks ...मुली आणि मद्यपान! वरचा पोस्ट उडवलास वाटते.
असो.
दोघे एकत्र बसताना चकणा चांगले म्हणुन आहे.
19 Aug 2010 - 6:34 pm | सहज
हटके...एक्वायर्ड टेस्ट ...
19 Aug 2010 - 6:36 pm | प्रियाली
माझ्याकडे झाडाला बरेच ग्रीन टोमॅटो आहेत. करून बघते.
बायदवे, दुधी मस्त आले आहेत. कालच दोन काढले. फोटो टाकेन नंतर.
जत्रेत आवडणारे पदार्थ
जायरो
गरम कुत्रा
कॉटन कँडी/ बुढ्ढीके बाल
एलिफंट इयर्स आणि
आइसक्रिम/ शेव्ड आईस वगैरे
19 Aug 2010 - 6:37 pm | प्रभो
झकास...
19 Aug 2010 - 6:50 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त पाणी सुटलय तोंडाला..
करुन पाहते.
19 Aug 2010 - 9:35 pm | शहराजाद
हा माझा अत्यंत आवडता पदार्थ.
ह्यावर्षी मी जास्त गर आणि कमी बिया/ रस असलेल्या मोठ्या आकाराचे टोमेटो परसबागेत लावले, फक्त फ्राइड ग्रीन टोमेटो करण्यासाठी. पण आत्ता त्यावर एकाही तळण्याजोगा टोमेटो शिल्लक नाही आणि फार्मर्स मार्केटला अजून तीन दिवस आहेत. तोपर्यंत आम्ही काय हे फोटो खायचे? आमच्या झाडावरचे टोमेटो संपले असताना अशा अधल्यामधल्या वारी तुम्ही छान पाकृ टाकलीत, वरून छान फोटोही टाकलात, त्याबद्दल स्वातीतै तुमचा निषेध ( तोंडाचे पाणी गिळून :))
मी हा पदार्थ थोड्या वेगळ्या पद्ध्तीने करते.
टोमेटोच्या चकत्यांना वरून फक्त मीठ आणी भरपूर मिरपूड लावायची.
अण्डे न लावता मक्याच्या बारीक रव्यात घोळवायचे. ( यामुळे वरचे आवरण पातळ होते व चिकटून राहते)
तेल व बेकन फॅट निम्मे-निम्मे घेऊन तव्यावर तळून काढायचे. बेकन फॅटने खमंग , खास दक्षिणेकडची चव येते.
19 Aug 2010 - 10:11 pm | पुष्करिणी
छान दिसतोय पदार्थ...ग्रीन टोमॅटो म्हणजे कच्चे टोमॅटो का?
19 Aug 2010 - 10:15 pm | शिल्पा ब
नाव ऐकून आहे...याच नावाचा छानसा पिच्चर सुद्धा आहे...
असो..करून बघायला हरकत नाही...पण अंड्याच्या ऐवजी आपलं नेहेमीचं पीठ वापरून बघेन..
20 Aug 2010 - 2:16 am | चिंतामणी
पण वांग्याचे असे काप (अंडे न वापरता) लै भारी होतात.
रेसिपी तयार आहे. पण फोटु नाहीत. (त्याशिवाय इथले लोक विश्वास ठेवत नाहीत.). पुन्हा एकदा करतो. फोटु काढतो अन येथे ठेवतो.
(निरागस) खवैया चिंतामणी
20 Aug 2010 - 2:18 am | चिंतामणी
तुला खायला (साग्रसंगीत) बोलावतो आणि मग पोस्ट करतो.
20 Aug 2010 - 2:25 am | मीनल
कालच कुणीतरी त्यांच्या बागेतील कच्चे टोमॅटो पाठवले आहेत. करून पाहेनच.
20 Aug 2010 - 5:38 am | चित्रा
नक्की करून पाहीन.
20 Aug 2010 - 11:58 am | प्राजक्ता पवार
आपण वांग्याचे , सुरणाचे काप करतो त्याच वर्गातील हा पदार्थ दिसतोय . छान. करुन बघेन.
हे एलीफंट ईयर्स म्हणजे काय प्रकार आहे ?
20 Aug 2010 - 7:36 pm | स्वाती२
एलिफंट इअर्स म्हणजे यीस्ट वापरुन फुगवलेला मैद्याचा प्रकार असतो. खाली दुवा दिलाय.
http://allrecipes.com//Recipe/elephant-ears-2/Detail.aspx
20 Aug 2010 - 1:59 pm | स्वाती दिनेश
आवडले फ्राइड टोमॅटो..
स्वाती
20 Aug 2010 - 2:54 pm | मदनबाण
हेच म्हणतो... :)
20 Aug 2010 - 7:29 pm | स्वाती२
सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद!
25 Aug 2010 - 7:19 pm | विसोबा खेचर
छान..:)