IT's पनीर मसाला

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
19 Aug 2010 - 10:46 am

सध्या चाललेल्या घडामोडींमधे आयटी(ब्याचलर) पुरुष / मुलगे व सैपाक हा विषय गेल्या ५-६ दिवसात मागे पडला. त्यालाच वर आणण्याचा एक क्षीण प्रयत्न, बॅचलरी ' पनीर मसाला'... ;)

PM

साहित्य:

१. पनीर - पाव किलो - साधारण एक बाय एक इंचाचे तुकडे करून
२. एक मोठा कांदा - चिरून
३. दोन मध्यम टोमॅटो - चिरून
४. अर्धा-पाउण चमचा - लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला
५. मीठ
६. तेल, हिंग, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची - फोडणीसाठी
७. आलं लसूण पेस्ट
८. एक चमचा दही
९. दोन चमचे लोणी
१०. अर्धा चमचा हळद

कृती:

एका तव्यावर थोडंस तेल टाकून त्यावर पनीरचे तुकडे खरपूस तांबूस भाजून घ्या.

एका कढईत तेल तापवायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात हिंग, जिरे, कडिपत्ता आणी २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या फोडणीस टाका.
जिरे तडतडले की त्यात कांदा टाकून मस्त गुलाबी होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो टाकून शिजे पर्यंत परता.
मिश्रण शिजलं की त्यात मीठ , हळद , आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घालून एकजीव करा.

आता त्यात शॅलो फ्राय केलेले पनीर टाका. अर्धी वाटी पाणी टाकून कढई झाका. तीन चार मिनीट मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.
त्यात दीड चमचा लोणी आणी एक मोठा चमचा दही टाका. मिश्रण एकजीव करून अजून पाच मिनीटे उकळी येऊ द्या. तयार आहे मस्त चमचमीत पनीर मसाला....

PM

सर्व्ह करताना वरून उरलेले अर्धा चमचा लोणी घाला आणी लुफ्त लुटा.....

PM

प्रतिक्रिया

पाकृ मस्तच. IT वालीच बायको कर म्हणजे अजुन सुगरण होशील .

कौशी's picture

19 Aug 2010 - 9:46 pm | कौशी

मस्त दिसतेय......किसलेला कान्दा ताकावा.

स्मिता_१३'s picture

19 Aug 2010 - 11:01 am | स्मिता_१३

छान दिसतोय पनीर मसाला !

पण आधीच पनीर, त्यात तळलेले आणी इतके लोणी..वजन काटा क्विंटल कडे धावेल ना !

प्रभो's picture

19 Aug 2010 - 7:11 pm | प्रभो

हाहाहा....

कॅलरी मोजणार्‍यांनी पाकृ बघू नये अशी सुचना टाकायला हवी होती. ;)

खरडपंच's picture

21 Aug 2010 - 11:08 am | खरडपंच

हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........

खरडपंच's picture

21 Aug 2010 - 11:08 am | खरडपंच

हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........

खरडपंच's picture

21 Aug 2010 - 11:08 am | खरडपंच

हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........

खरडपंच's picture

21 Aug 2010 - 11:08 am | खरडपंच

हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........

पुरावा द्या...उगाच फुकाची बडबड नको...

खरडपंच's picture

21 Aug 2010 - 11:33 am | खरडपंच

यजमान सर्द झालेले आहेत. कृपया संपादक महाशायांनीच यावर प्रकाश टाकावा

निखिल देशपांडे's picture

19 Aug 2010 - 2:10 pm | निखिल देशपांडे

आम्हाला पनीर नाही आवडत
त्यामुळे आमचा या पाकृ ला पास

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हाला पनीर नाही आवडत
त्यामुळे आमचा या पाकृ ला पास

+१ हेच म्हणतो.
पनीर उर्फ थर्माकोल डोक्यात जाते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पनीर उर्फ नटराज प्लास्टो इरेझर पाहूनच धडकी भरते.

मेघवेडा's picture

19 Aug 2010 - 2:46 pm | मेघवेडा

झाला हिसाब बराबर. पुन्हा चालवा आता.

प्रभ्या मायला तू काय ऐकत नाय बाबा.. गोभी मसाला काय पनीर मसाला काय.. बल्ले बल्ले करतो का बे सध्या?!?!

सहज's picture

19 Aug 2010 - 4:07 pm | सहज

मस्त रे प्रभो. लै भारी. ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला काढून) मिक्सर मधुन काढून घेतलीस तर अजुन भारी दिसेल.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार

ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला काढून) मिक्सर मधुन काढून घेतलीस तर अजुन भारी दिसेल.

+१

सध्या तो फोटु वडा-सांबार म्हणुन देखील खपुन जाईल.

सहज's picture

19 Aug 2010 - 4:16 pm | सहज

पनीर पार जाळलेस का रे? का पनीरच्या नावाने तुला 'टोफू' घातला दुकानदाराने?

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2010 - 4:47 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म. चौकोनी वडा.. :)

आमोद शिंदे's picture

21 Aug 2010 - 4:50 am | आमोद शिंदे

>>सध्या तो फोटु वडा-सांबार म्हणुन देखील खपुन जाईल.

हाहाहहाहा फुटलो..खपवायचाच झाला तर (बिघडलेली) पावभाजी म्हणून सुद्धा खपून जाइल. पनीर पावभाजी!!

मदनबाण's picture

19 Aug 2010 - 2:14 pm | मदनबाण

आहाहा...पनीर !!! खल्लास्स्स्स्स्स्स... ;)

(पनीर प्रेमी)

स्मिता चावरे's picture

19 Aug 2010 - 2:16 pm | स्मिता चावरे

पाककृती सोपी दिसतेय. फोटो पाहून लगेच करून पहाविशी वाटतेय.

स्वाती२'s picture

19 Aug 2010 - 3:54 pm | स्वाती२

मस्त दिसतेय!

Nile's picture

19 Aug 2010 - 4:09 pm | Nile

मस्त दिसतेय.

पण पनीर वर इतकं बटर? पाहुनच अंमळ जाड झाल्यासारखे वाटले. आयटीवायल्या बायकां नीट खात नाही म्हणुन तु खास अश्या पाकृ बनवत आहेस असे दिसते. चालु दे चालु दे.

श्रद्धा.'s picture

19 Aug 2010 - 5:09 pm | श्रद्धा.

मस्तच आहे रे.... त्यात वर सांगितल्याप्रमाणे सुधारणा कर .... मिक्सरमधुन काढ आणि काजु पण टाक मिक्सरमधे म्हणजे ग्रेव्ही मस्त होइल....

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच आहे रे.... त्यात वर सांगितल्याप्रमाणे सुधारणा कर .... मिक्सरमधुन काढ आणि काजु पण टाक मिक्सरमधे म्हणजे ग्रेव्ही मस्त होइल....

थोडे पिस्ते देखील घातल्यास हिरवा माज दिसुन येईल ;)

छोटा डॉन's picture

19 Aug 2010 - 5:39 pm | छोटा डॉन

>>थोडे पिस्ते देखील घातल्यास हिरवा माज दिसुन येईल
+१, हेच म्हणतो.

शिवाय सध्याच्या पाकृत एवढे सगळे प्रयोग करण्यापेक्षा प्रभ्याने हाटेलात जाऊन कायदेशीर 'पनीर मसाला' खाल्लेले परवडेल असे सुचवतो.
आयला हे मिपाकर आहेत की भुतं ?
एक पनीर ... हे आपलं ... पाकृ व्यवस्थित पचु देत नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका उमलत्या स्वयंपाक्याचा उत्साह घालवून डान्राव तुम्ही काय त्याला बॅचलर थालिपीठं खायला घालणार का? प्रभ्या, तू बनव एकेक प्रकार! पण पनीर आणि मिरच्या टाळ रे!

चतुरंग's picture

19 Aug 2010 - 5:49 pm | चतुरंग

'उमलत्या' हा शब्द काळजाला भिडला! ;)

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
डच कथेतल्या अळीचे नाव प्रभो आहे तर :P

मदनबाण's picture

19 Aug 2010 - 5:56 pm | मदनबाण

बिचारा नाना उगाच ओरडतो की त्याचे प्रतिसाद उडतात म्हणुन !!! त्याला बहुधा कुठे आणि कसे प्रतिसाद द्यावेत हे समजत नसावे !!! ;) काय नाना बरोबर ना ? ;)

डच कथेतल्या अळीचे नाव प्रभो आहे तर

मी चुकुन

"डच कथेतल्या कळीचे नाव प्रभो आहे तर"

वाचले आणी खुर्चीवरुन पडलो.

छोटा डॉन's picture

19 Aug 2010 - 5:55 pm | छोटा डॉन

>>एका उमलत्या स्वयंपाक्याचा उत्साह घालवून डान्राव तुम्ही ( अनावश्यक मजकुर फाट्यावर मारला आहे )
-१
आजकाल मिपावर प्रामाणिक मत द्यायला 'उत्साह घालवणे' अशी संज्ञा रुढ झाली आहे हे माहित नव्हते, असो.
इथुन पुढे जसे ४ लोक म्हणतात तसे 'चान चान' म्हणु ...
ही रेसिपीही चान चान आहे असेच म्हणतो. :) :)

>>प्रभ्या, तू बनव एकेक प्रकार! पण पनीर आणि मिरच्या टाळ रे!
(पुर्वार्धाला ) +०.५ / -०.५ ( उत्तरार्धाला )
बाकी 'पनीर मसाला' हा पदार्थ 'पनीर न घालता' बनव ह्या सल्ल्याची मौज वाटली, हरकत नाही आम्ही पनीर नसलेला पनीर मसालाही खाऊ.
तसेही आम्हाला शंकर नसलेली शंकरपाळी आणि सीता नसलेले सीताफळ खायचा अनुभव गाठीशी आहेच :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 6:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजकाल मिपावर प्रामाणिक मत द्यायला 'उत्साह घालवणे' अशी संज्ञा रुढ झाली आहे हे माहित नव्हते, असो.
इथुन पुढे जसे ४ लोक म्हणतात तसे 'चान चान' म्हणु ...

'चान चान'च्या चालीवर ... श्री. चोता दोन, तुमचा अभ्यास कमी पडतो आहे यापुढे काहीही बोलण्याची इच्छा नाही, तरीही तुम्ही केलेले आरोप पाहून मन व्यथित झाले. आणि पुढचा प्रतिसाद टंकला आहे.

बाकी 'पनीर मसाला' हा पदार्थ 'पनीर न घालता' बनव ह्या सल्ल्याची मौज वाटली

आम्ही एकेक प्रकार असं लिहिलं होतं, पनीर आणि मिरची टाळून पनीर मसाला बनव असं सांगितलं नव्हतं. आपल्यासारखे ज्येष्ठ सदस्य वाचनात अशी चूक करतील अशी अपेक्षा नव्हती. असो.

>> तसेही आम्हाला शंकर नसलेली शंकरपाळी आणि सीता नसलेले सीताफळ खायचा अनुभव गाठीशी आहेच<<
मग त्याच न्यायाने जेव्हा पुण्यात याल तेव्हा या आमच्या गरीबाच्या होस्टेलवर आणि बीर नसलेली कोथिंबीर वडी आणि पुरण नसलेली पोळी खाऊन जा!!

काजू - क्रीम घातले असते तर पनीर बटर मसाला झाला असता तो म्हणून नाही घातले.. :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Aug 2010 - 5:20 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हं...छान दिसतं आहे.
अजुन जर्रा तिखट चाललं असतं नाही?...
आणि माजा साठी कांद्याशेजारी मस्त ५-६ तळलेल्या हिरव्या मिरच्या! ;)

(माझी एक भाची भुक लागली / भिती वाटली....या सगळ्याला आली म्हणते..मलाही जाम आवड्लं)

अजुन जर्रा तिखट चाललं असतं नाही?
अहो त्या रावणी पिठल्यात तिखट कमी पडलं का हो ? ;) नाही याचाही रावणी पनीर मसला करायचा विचार आहे वाट्ट !!! ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2010 - 5:54 pm | llपुण्याचे पेशवेll

माजासाठी हिरव्या मिर्च्या कशाला पाहीजेत. त्याच्याकडे हिरव्या नोटा असतील की. :)

प्रभो's picture

19 Aug 2010 - 7:11 pm | प्रभो

सर्व प्रतिसादक आणी वाचक मित्रांना धन्यवाद......

शिल्पा ब's picture

19 Aug 2010 - 10:36 pm | शिल्पा ब

छान दिसतेय भाजी...आणि काही कुणाच्या सल्ल्यांकडे लक्ष देऊ नका...चांगल्या पाकृच भजं करतात हे लोकं.

इंटरनेटस्नेही's picture

20 Aug 2010 - 4:45 am | इंटरनेटस्नेही

सदर पदार्थ मी दिनांक २४.०८.२०१० रोजी भारतीय प्रमाण वेळ १९:३० वाजता बनविणार आहे!

चित्रा's picture

20 Aug 2010 - 4:53 am | चित्रा

किती जाहिरात करावी लग्नायोग्य वय झाले त्याची?!

पाककृती/फोटो छान.

कांदा-लसूण मसाला ही गेल्या दशकातली मसाल्याची पाककृती आहे का पश्चिम महाराष्ट्राकडची परंपरागत आहे (पण मला माहिती नाही, अशी) असा एक अवांतर प्रश्न मात्र पडला.

प्रभो's picture

20 Aug 2010 - 7:16 am | प्रभो

कांदा-लसूण मसाला गेल्या दशकाच्या आधी होता का हे माहीत नाही..... पण सध्या जवळजवळ सगळीकडे पाकिटबंद मिळतो.

आणि दुसरी एक कंपनी जी हा मसाला इकडे विकते, ती म्हणजे राम बंधू.
(अनुभवी)बेसनलाडू

आणि केप्र अस्सल मराठमोळ्या थालिपिठाची भाजणी 'ठेपले का आटा' म्हणून विकत असल्याचे दिसले ते पाहून तर मला दरदरून घाम फुटला. त्यावर मराठीत 'थालिपीठ भाजणी' ठळक अक्षरात लिहिलेले असते, हे सर्व मराठीजनांचे सुदैव.
(घामाघूम)बेसनलाडू

अर्थात घरीच धान्ये भाजून दळून आणून तयार केलेल्या भाजणीच्या थालिपिठांच्या चवीसमोर बाकीच्या भाजण्या झक मारतात, असे आमचे मत आहे. बालपणापासूनचे असे चोचले असल्याने, आम्ही भारतातून घरीच बनविलेली भाजणी आयात करतो ;)
(आयातकार)बेसनलाडू

ठेपल्याची बाकी जोरदार चलती आहे, हे मात्र १००% खरे! थालिपिठाची तितकीशी नसावी.
(खोचक)बेसनलाडू

विकास's picture

20 Aug 2010 - 5:05 am | विकास

"शायद तेरे शादीका खयाल (तेरेही) दिलमे आया है" वगैरे झाले म्हणून शिकायला लागलास का? ;)

बाकी डिशमधे एकदम मस्त दिसतयं, बोलावले पाहीजे एकदा घरी! पोळ्या कोणी केल्यारे? :-)

प्रभो's picture

20 Aug 2010 - 7:18 am | प्रभो

पोळ्या कवन (विकत-फ्रोझन)च्या... :)
घडीची पोळी जमत नाही अजून नीट... ;)

सोया's picture

20 Aug 2010 - 9:50 pm | सोया


छान छानः तोनडाला पाणी सुट्ले, हे पनीर सॉयाबीनचे असते तर पोशटिक हॉईल.

रेवती's picture

20 Aug 2010 - 9:57 pm | रेवती

आधी या पाकृला वा!! छान ! म्हणून घेते.
आता शंका, या पदार्थाला मोहरीची, कढिपत्त्याची फोडणी देतात का?
दुसरे असे कि आता लग्न कर असे मी म्हटल्यावर जो दम दिलास तसा चित्रातैला का नाही दिलास?

मला आवडतं म्हणून मी यात २-३ कडिपत्याची पाने आणी खूप थोडे जिरे टाकतो..मोहरी नाही टाकत.. :)

पोळ्या ह्या विषयावरून ती आधीच कावली आहे माझ्यावर....एकाच वेळेस दोन दोन संपादकांशी पंगा घेणे जमत नाही अजून मला.. ;)

आमोद शिंदे's picture

21 Aug 2010 - 4:47 am | आमोद शिंदे

मोहरी नाही टाकत..

पहिल्या चित्रात उजवीकडच्या ठोकळ्यावर (ह्याला पनीर नाही हो म्हणवत!) मोहरी सारखा दिसणारा प्रकार काय आहे?

प्रभो's picture

21 Aug 2010 - 5:12 am | प्रभो

ते मिरचीचं बी आहे... काळं पडलेलं.....

बादवे , धाग्याचा टीआरपी वाढवल्याबद्दल धन्यवाद... ;)

आमोद शिंदे's picture

21 Aug 2010 - 4:50 am | आमोद शिंदे

फोटो बघून भूक मेली.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Aug 2010 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

फोटो बघून भूक मेली.

=)) =))

आता ह्यावर प्रभ्या 'प्रतिक्रीया बघुन स्वयंपाकाची उर्मी मेली' अशी प्रतिक्रीया देणार का ?

निवेदिता-ताई's picture

12 Oct 2010 - 12:18 pm | निवेदिता-ताई

मस्त..........पनीर मला फार आवडते.

आवडली. जमल्यास करून बघेन. पनीर म्हणजे जीव की प्राण!

जागु's picture

12 Oct 2010 - 2:28 pm | जागु

छान आहे पाकृ.