यंत्रांचा प्रभाव किती?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
19 Aug 2010 - 10:36 am
गाभा: 

मी लहान असताना फोन ही नवीच गोष्ट आली होती. एखाद्याकडे छान अपडेटेड टेलिफोनची डायरी हा जितका चर्चेचा विषय असे तितकाच जास्तीतजास्त नंबर पाठ असणे हा होता. माझे स्वतःचे अनेक नंबर्स तोंडपाठ होते व घरात सगळे जण नंबर डायरीत शोधण्याआधी मला विचारत. तेव्हा काय मजा यायची. तर ते असो. पुढे मोबाईल आले आणि नंबर लक्षातठेवणे बंद झाले. आणि आता अशी वेळ आली आहे की ना डायरी मेंटेन्ड आहे आणि मोबाईल नसला तर फारसे नंबर्स लक्षातही नाहित.
------------
माझी आई सांगत होती. आम्ही "तरी बरं तुम्ही नुसते पाढे पाठ केले. आम्हाला पावकी, निमकी, पाऊणकी, दिडकी, अडिचकी वगैरे असायचं शिवाय उभे पाढे आडवे पाढे पाठ नसले तर तुमच्या आजोबांचा बसलाच रट्टा पाठीत." मात्र सध्या मुलांना पाढे पाठ करणे नकोसे झालेय. पुर्वी आमचा भाजीवाला, वाणी, केमिस्ट तोंडी हिशोब करायचे, आता प्रत्येकाकडे "कॅल्क्युलेटर" आले आहेत. किलोचा भाव दुप्पट करतानाही त्यांची बोटे क्यॅल्क्युलेटरकडे वळतात.
------------
आजी सांगते पूर्वी की नाहि कोंबडा आरवला की जाग यायची आता लोकांना घड्याळाचा गजर झाला नाही तर सकाळ झाल्यासारखंच वाटत नाही.
------------
बाबा म्हणतात " टाईपरायटर असताना प्रत्येक गोष्ट विचार करून टंकावी लागायची. चुक करणे महागात पडत असे. पुढे कंप्युटर आले आणि चुक सुधारणे सोपे झाले. पण याचा फायदा झाला का तोटा? आता लोक एखादी गोष्ट टंकण्याआधी जराही विचार करत नाहीत आधी टंकतात आणि मग चुका शोधून काढत बसतात. हे टंकनापर्यंत होतं तिथपर्यंत ठिक होतं.. आता नव्या पिढीच्या आचारातही ते उतरू लागलंय. आधी बिनधास्त कृती करायची आणि मग चुकांबद्द्ल हळहळायचं. प्रत्यक्ष जीवनातल्या सगळ्या चुकांना 'अन् डु' बटण थोडेच असते?"
-------------

तर तुमच्याही आयुष्यातल्या सवयींवर, कामांवर, नैसर्गिक शक्तीस्थळांवर (जसे स्मरणशक्ती, पाककला, शिवणकला) यंत्रांनी कुरघोडी केलीय का?
कित्येक गोष्टी यंत्रांशिवाय तुम्ही करू शकणार नाहीत का? तुमच्या रोजच्या सवयींवर, शक्तीस्थानांमधे यंत्रांचा सहभाग किती?
आणि टोकाचा प्रश्न विचारायचा तर तुमचे आयुष्य यंत्र नसतील तर थांबेल असे तुम्हाला वाटते का?

प्रतिक्रिया

आयुष्य थामनार नाय. कामाचा येग कमी व्हईन. गोंधळ वाढन.
यंत्राशिवाय काय जमणार नाय ही गोठ एकदब सोळा आणे खरी.

बाबुराव :)

नगरीनिरंजन's picture

19 Aug 2010 - 11:11 am | नगरीनिरंजन

रोजच्या सवयींवर आणि एकूणच आयुष्यात यंत्रांचा नुसता सहभाग नसून आता तर यंत्रांचं नियंत्रणच आहे की काय असं वाटू लागलं आहे. कित्येक सवयी यंत्रांसाठी बदलाव्या लागल्या आहेत. ही सगळी समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था ही सुद्धा एक यंत्र असून त्याचा मी एक रोज ठराविक हालचाली करणारा भाग आहे असंही वाटतं.
यंत्र नसतील तर आयुष्य थांबेल असं वाटत नाही उलट खरं नैसर्गिक आयुष्य सुरु होईल.

तुम्ही तात्याराव सावरकरांचा यंत्रयुगावरचा लेख वाचलाय का हो?

वेळ मिळाला तर टंकेन आज यावर काहीतरी

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

च्यायला ॠषीबॉय किती विचार करतो बे तु ?
साला आपण तर कधी येवढा विचारपण केला नाही. खरच खुप फरक पडलाय असे वाटते का ह्या यंत्रांनी ?

भारतीय's picture

19 Aug 2010 - 12:22 pm | भारतीय

चालायचच.. काळानुसार हे बदल होणारच.. सध्या कलियुगकी काय ते म्हणतात, ते आहे.. यापुढील युग हे यंत्रयुग असण्याची शक्यता आहे..

कुरघोडी - कुरघोडी नाही पण वर्चस्व मात्र आहे. मला वाटतं ही गोष्ट यंत्रांच्या सहज उपलभ्धतेमुळे झाली आहे. ( भारतात गाडीशिवाय सोसायटीच्या गेटपर्यंत जाणंही जिवावर येतं कारण गाडीची उपलब्धता. इथे गाडीच नाही. पावसात बर्फात कडमडत २-३ किमी चलणे होतेच..चालावेच लागते )
मी स्वतः यंत्रांच्या अधीन न होण्याचा थोडाफार प्रयत्न करते.
उदा: टेलिफोन नं. ची डायरी पर्स मध्ये ठेवते.
कागदावर पत्र लिहायला आवडतं. एकूणच कागद पेन ची सवय टिकवून आहे.
शेजारणीला निरोप द्यायला, आमंत्रण द्यायला स्वतः जाते. फोन करून काम भागवत नाही.
भाजी चिरणे, कणिक मळणे या कामांसाठी यंत्र वापरत नाही.
घरातला संगणक, टीव्ही बंद पडला तर अस्वस्थ होत नाही. मनोरंजनासाठी कृत्रीम गोष्टींवर अवलंबून नाही.
यंत्र नसतील तर आयुष्य थांबणार वगैरे नाही. १८ तास वीज नसलेल्या खेड्यात रहायची सवय आहे. उलट ते आयुष्य जास्त शांत असेल असे वाटते. काही क्षेत्रात मात्र यंत्रे नसली तर जीवन थांबू शकते. वैद्यकीय क्षेत्र, दळणवळण इत्यादी.
सध्या एवढेच :)
विचार करण्यासाठी चांगला विषय सुचवलात. धन्यवाद :)

भारतीय's picture

19 Aug 2010 - 12:31 pm | भारतीय

>>मी स्वतः यंत्रांच्या अधीन न होण्याचा थोडाफार प्रयत्न करते.

--प्रशंसनीय!
पण नंतर हे का?
==उदा: टेलिफोन नं. ची डायरी पर्स मध्ये ठेवते.
-- टेलिफोनची डायरी हेही एक यंत्र व पर्स हेही एक यंत्रच! (मॅन्युअली ऑपरेटेड)
>>उदा: टेलिफोन नं. ची डायरी पर्स मध्ये ठेवते.
कागदावर पत्र लिहायला आवडतं..
--म्हणजे टेलिफोन वापरता तुम्ही, मग कागदावर पत्र का लिहिता?
निषेध!! निषेध!! निषेध!!

मितान's picture

19 Aug 2010 - 1:02 pm | मितान

मला वाटलं स्वता:बद्दलही काहीतरी लिहाल.. :)

आम्हाघरीधन's picture

19 Aug 2010 - 12:35 pm | आम्हाघरीधन

मी लहान असताना फोन ही नवीच गोष्ट आली होती. एखाद्याकडे छान अपडेटेड टेलिफोनची डायरी हा जितका चर्चेचा विषय असे तितकाच जास्तीतजास्त नंबर पाठ असणे हा होता. माझे स्वतःचे अनेक नंबर्स तोंडपाठ होते व घरात सगळे जण नंबर डायरीत शोधण्याआधी मला विचारत. तेव्हा काय मजा यायची. तर ते असो. पुढे मोबाईल आले आणि नंबर लक्षातठेवणे बंद झाले. आणि आता अशी वेळ आली आहे की ना डायरी मेंटेन्ड आहे आणि मोबाईल नसला तर फारसे नंबर्स लक्षातही नाहित.

खरंच खुप छान सवय आहे लक्षात ठेवण्याची, जरूर नियमीतता आणावी..
मी लहान पणापासुन दुरध्वनी क्रमांक अन आता भ्रमणध्वनी क्रमांक लक्षात ठेवण्यात यशस्वी झालो आहे... आजही एखादा दुरध्वनी क्रमांक अथवा भ्रमणध्वनी क्रमांक एकदा लावुन झाला कि तो कायमस्वरूपी लक्षात राहुन जातो.. त्यामुळे आजवर कधी दुरध्वनी क्रमांक अन आता भ्रमणध्वनी क्रमांक या साठी नोंदवही ठेवण्याची बुद्धी मला सुचली नाही...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Aug 2010 - 12:44 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

सुखासिनतेकडेच झुकण्याचा मानवाचा एकंदर स्वभाव किंवा स्थायीभावच आहे.
बुद्धीच्या जोरावर त्यांने ही सारी दुनिया बनवली आहे. कष्ट आणि वेळ वाचवायचा एक अतिशय यशस्वी मार्ग म्हणजे यंत्र!
त्यामुळे वेळ असेल आणि फार KDU (कामं-धंदे-उद्योग) नसतिल त्याना हे यंत्रविरहित दिनचर्या तत्सम मार्ग अवलंबुन पाहता येतिल.
पण रात्र थोडी सोंगे फार (कमी-उपलब्ध वेळात भरपूर काम) अशी ज्यांची स्थिती आहे त्यांना यंत्र म्हणजे जादुची छडीच आहे.

सहज's picture

19 Aug 2010 - 12:52 pm | सहज

छान लिहले आहेस.

दिपक's picture

19 Aug 2010 - 1:01 pm | दिपक

इंटरनेटमुळे माहितीचा सागर आपल्यासमोर आहे. काही महिन्यांपुर्वी म.टा. मध्ये माहितीच्या महापुरात... लेख आला होता. त्यातले विचारही पटले होते

नंदन's picture

19 Aug 2010 - 1:09 pm | नंदन

आहे. संगणक/आंतरजाल हे त्यातलं सर्वात प्रभावी यंत्र. अर्थात यातही तारतम्य हवेच. वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी मात्र कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करतो - उदा. तोंडी आकडेमोड, प्रवासात जीपीएसचा किमान वापर (हे अगदीच फुटकळ उदाहरण, पण लेखाबाहेरचं म्हणून द्यावंसं वाटलं.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 1:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> प्रवासात जीपीएसचा किमान वापर <<
भारतातल्या बर्‍याचशा शहरांमधल्या जुन्या वस्त्यांमधून, उदा: पुण्याबाहेरच्या लोकांसाठी पुण्यातल्या पेठा, बंगळूरूचा जुना शहराचा भाग, बाहेर पडण्यासाठी जीपीएस आणि गूगल म्याप्स असतील तर चक्रव्यूहातून बाहेर पडताना अभिमन्यू होत नाही.

शक्यतोवर तोंडी आकडेमोड, व्यायामासाठी यंत्र वापरण्याऐवजी खेळ खेळणे (पण त्यातही बूट, मोजे, रॅकेट, बॅट, चेंडू, शटल्स अशी "यंत्र" वापरावी लागतात) हे प्रकार मीसुद्धा करते.
अगदी मोजके अपवाद वगळता फोन नंबर्स माझ्या कधीच लक्षात राहिले नाहीत आणि आता तसा प्रयत्नही करत नाही. ज्या गोष्टी शोधून लगेच सापडतात, संदर्भ हाताशी असतात त्या लक्षात ठेवाव्या असं कधी वाटत नाही. भले फोन नंबर्स असोत वा मॅक्सवेलची समीकरणं!

रोजच्या कामांसाठी काही ठिकाणी यंत्र वापरून आपल्या आवडीची कामांसाठी जास्त वेळ देता येतो. उदा: कपडे धुण्यासाठी यंत्र वापरून वेळ (आणि पाणी?) वाचवता येतो. प्रेशर कुकर, स्वयंपाकाची वापरण्यास सोपी गॅस शेगडी, इत्यादी यंत्रांमुळे अगदी आजारी असतानाही एकट्या माणसाचाही खाण्यापिण्याचा प्रश्न येत नाही.

नंदन's picture

19 Aug 2010 - 1:36 pm | नंदन

सहमत, तारतम्य महत्त्वाचे हे वर म्हटलेच आहे. जीपीएसचं उदाहरण द्यायचं कारण हे की त्यावर पूर्णपणे विसंबून भलत्याच जागी पोचणे (शहरात नव्हे, विशेषकरून राष्ट्रीय उद्यानांत), नकाशा पाहून जी थोडीफार परिसराची/अंतरांची कल्पना येते ती गमावणे इ. गोष्टी अलीकडेच पाहण्यात आल्या.

असेच काहीसे पण तरीही यंत्रांवर विसंबण्यात काही वाईट वाटत नाही.

टाईपराईटरच्या चुकांपेक्षा संगणकातील चुका ठीकच. जी व्यक्ती संगणकावर चुका सहज दुरुस्त करता येतात म्हणुन दुरुस्त करत नाही, तिने टाईपराईटरवर सहज दुरुस्त करता येत नाहीत म्हणुन दुरुस्त केल्या नसत्या. जिथे चुकांमुळे मोठे नुकसान होते तिथे त्या दुरुस्त केल्या की नाहीत याची काळजी घेतली जातेच. (पुर्वी टाईप तेव्हाच करायचे जेव्हा गरजेचे आहे, आज संगणकावर ट्वीट पासुन काय वाटेल ते लिहताना सर्व अगदी बरोबरच असले पाहिजे असे नाही (असले तर उत्तम पण नसले तर बिघडत नाही) त्यामुळे ही तुलना पटत नाही, तसेच इतर अनेक तुलनाही)

मोबाईलयायच्या आधीचे लक्षात ठेवलेले नंबर्स अजुनही माझ्या लक्षात आहेत (म्हणजे मी लक्षात ठेवु शकतो) पण मोबाईल आल्यानंतर मी नंबर्स लक्षात ठेवत नाही. नवीन तंत्रज्ञान वापरुन माझ्या मोबाईलच्या नंबरांचा बॅकअप मी नियमीत ठेवतो, त्याशिवाय अनेक इतर मार्गाने मी गेलेले नंबर सहजी मिळवु शकतो. असे असताना मी का बरे नंबर लक्षात ठेवु? आणि ठेवु तरी कीती? :-)

मी यंत्रांच्या स्वाधीन आहे का? हो. पण त्यात वाईट काय आहे? यंत्रे बनवली ती वापराकरताच. यंत्राशिवाय एखादी गोष्ट करता येत नसेल तरी त्याची काळजी करण्याचे कारण काय? ती यंत्रे एकदम नाहीशी तर होणार नाहीएत!

नितिन थत्ते's picture

19 Aug 2010 - 2:27 pm | नितिन थत्ते

Nile शी सहमत.

मी पण पूर्वी नंबर लक्षात ठेवीत असे. पण ठेवायचे तरी किती?

पूर्वी माझ्या मामाच्या घरी एक फोन होता. आता तो मूळ फोन + त्याचा मोबाईल + त्याच्या २ मुलांचे प्रत्येकी लॅण्डलाईन व मोबाईल + त्या मुलांच्या स्पाउसेसचे मोबाईल असे ८ झाले.

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 1:46 pm | इन्द्र्राज पवार

"जुने टाकुनी द्यावे" या उक्तीनुसार यंत्राने मानवी जीवनात केलेल्या क्रांतीला सामोरे जाताना "नवा बदल" स्वीकारायचा हे गृहीत धरलेलेच असते. पु.लं. म्हणतात, "पहाटे पहाटे जात्यावर दळण दळताना आजी जी गाणी गुणगुणत असे ती फार आवडायची. पण याचा अर्थ असा नव्हे की आतादेखील एखाद्या आजीने त्यासाठी जाते हाती धरावे. काळाप्रमाणे या कविकल्पना मागे पडत जाणारच." त्याच अनुषंगाने मोबाईल आणि नेट ने केलेल्या क्रांतीची फळे आपण घेत असताना "जुने किती चांगले होते" हे म्हणण्यातही अर्थ नाही.

गणितामधील पावकी, निमकी, पाऊणकी, दीडकी या भेसूर चेटकिणींनी त्यावेळच्या मुलांचा मेंदू किती खाल्ला होता हे ती त्या काळातील मुलेच (जी आता गृहस्थाश्रमात असतील) सांगू शकतील. इतक्या अंकलप्या तोंड्पाठ करूनही आज त्यांना कॅलक्युलेटर अन् रेडी रेकनर लागतोच.

वैयक्तिकरित्या लिहायचे झाल्यास मी हे कबूल करतो की, लहानपणापासून असलेली चालत भटकण्याची सवय आता पूर्णपणे मोडीत निघाली आहे. साधी दुधाची पिशवी आणायची असली तरी पाय (आपोआप) पॅशनकडे वळतात. आता इन्व्हर्टर आहे त्यामुळे वीज खंडीत होण्याचा प्रश्न नाही, पण तो ज्यावेळी नव्हता आणि वीज गायब झाली तर "हातपाय मोडले" असल्याची जाणीव होत असे. केवळ एक पत्र (जे हाताने लिहु शकत होतो) जरी पाठवायचे असले तरी वीज येऊन परत कॉम्प्युटर चालू होईपर्यंत मी वाट पहात बसत असे. ही एकप्रकारे यंत्राने केलेली कुरघोडीच आहे, पण ती स्वीकृत आहे.

लेखक म्हणतात "आता घड्याळाचा गजर झाला नाही तर सकाळ झाल्यासारखी वाटत नाही." इथे आता घड्याळदेखील "कालबाह्य" होत आले आहे. आता "मोबाईल" वरच अलार्म लावला जातो अन तोही आपल्याला हव्या त्या "रिंगटोन" चा.

कालाय तस्मै नम:

घाटावरचे भट's picture

19 Aug 2010 - 2:07 pm | घाटावरचे भट

छान...

ऋषिकेश's picture

19 Aug 2010 - 2:53 pm | ऋषिकेश

एक खुलासा: यंत्रे हवीत की नाहि/ यंत्रे वापरावीत की नाही हा इथे चर्चेचा मुद्दा अपेक्षित नाही. तसा अर्थ ध्वनित होत असल्यास तो माझ्या लेखनातला दोष समजावा. यंत्रे हवीतच व ती माणसाच्या प्रगतीचा अविभाज्य भाग आहेत. श्री. पवार वर म्हणतात त्याप्रमाणे आज जात्यावर दळण्यात/ निमकीपाठ करण्यात काहिच हशील नाहि. प्रश्न असा आहे की तुम्ही यंत्रांची "मदत" घेता का त्यांच्यावर "अवलंबून" आहात. यंत्रांनी तुमच्या सवयींमधे, वागण्यात प्रसंगी स्वभावात काहि बदल केले आहेत का? वगैरे वगैरे. तुमच्यावर यंत्रांचा प्रभाव किती आहे?

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 3:18 pm | इन्द्र्राज पवार

"प्रश्न असा आहे की तुम्ही यंत्रांची "मदत" घेता का त्यांच्यावर "अवलंबून" आहात."

हा प्रश्न सरळधोट म्हणून स्वच्छ आहे. पण असे असले तरी सदस्यांकडून तुम्हास केवळ "होय" किंवा "नाही" असे उत्तर नक्कीच अपेक्षित नसणार. कारण इथे आपण "ऑब्जेक्टीव्ह अन्सरिंग" साठी एकत्र आलेलो नाही. जसे पाटीवर सुर्याचे चित्र काढा असे गुरुजींनी म्हटले की, साहजिकच आपण मग डोंगराचे तीनचार त्रिकोण, खाली नदी, वर आकाश, दोनचार घारी इ. गिरगुटून मग "पूर्वेला फाकलेला सुर्य" दाखवत असू. अगदी तसेच आपल्या धाग्यातील प्रश्नाच्या स्वरूपामुळे दोन्ही बाजूना स्पर्श करता आला इतकेच. हा एक प्रकारचा "नॉस्टॉल्जिया" देखील आहेच आहे.

शिवाय तुमच्या लेखातील तो "कुरघोडी" चा प्रयोग. हा भाव असे दर्शवितो की, पूर्वीचे जे काही होते तीवर मात करून एका गब्रूने काहीतरी कमावले (जसे 'trample upon'). त्यामुळे लिखाणाचा स्वर असा झाला की, त्यातील अनुक्रमे "नंबर पाठ करणे, पाढे घोकणे, कोंबड्याचे आरवणे, मॅन्युअल टाईपरायटर" या सर्व चांगल्या गोष्टीवर यंत्राने "मात केली"...(जे एका अर्थी खरेच आहे.)

मुंबईतून ट्राम गायब झाली, तसेच लाडकी "आगीनगाडी आणि तिची कुईईई" करणारी शिट्टी गेली, त्याजागी डौलदार "राजधानी एक्सप्रेस" आली....पूर्वी शांतपणे सफर करणार्‍या प्रवाश्याने आता हा बदल आपल्या सवयीचा एक नवा भाग म्हणून स्वीकारला आणि तद्वत आपल्या स्वभावाची सुईदेखील बदलली.

थोडक्यात हा कुरघोडीचा खेळ अखंड चालणारच आहे.

स्वाती दिनेश's picture

19 Aug 2010 - 4:27 pm | स्वाती दिनेश

तारतम्याने यंत्रांचा वापर व्हावा/करावा ह्या नंदनच्या मताशी सहमत,
स्वाती

धनंजय's picture

19 Aug 2010 - 4:36 pm | धनंजय

चर्चा आणि चिंतन चांगले आहे.

लहानपणाच्या तुलनेत आताच्या आयुष्यात आणि वागण्यात यंत्रांचा खूप अधिक प्रभाव जाणवतो. हे निश्चित.

कला क्षेत्रात यंत्राने घेतलेली विचित्र मुसंडी आहे "ऑटो ट्यून". ध्वनीमुद्रणाची लय जशीच्यातशी ठेवून ध्वनीची श्रुती (pitch) बदलण्याचे तंत्रज्ञान (दुवा) हल्लीच सहज मिळू लागले आहे. आजकाल पॉप संगीत गाणारे खूप गायक गाणे सर्वांगाने बरोबर गाण्याऐवजी आदमासे बरोबर गातात, मग मुद्रणात श्रुती ठीकठाक करून घेतात.

मात्र नवीन तंत्राचा उघड-उघड वापर करून नवीन आस्वादवस्तू तयार करण्याची कलाकारांची सर्जनशीलतासुद्धा पूर्वीसारखीच आहे. याबबत शेरचे "बिलीव्ह (दुवा)" गाणे प्रसिद्ध आहे - आवाजाच्या श्रुतींची ओढाताण करून तिने मुद्दामून वैचित्र्यपूर्ण रचना केली. त्यानंतर अनेक कलाकार अशा प्रकारचे प्रयोग करू लागले आहेत.

हे माझ्या रोजवापरातले उदाहरण नाही, पण रोज-ऐकण्यातले आहे. वेगळेच आणि सहज लक्षात न-येणारे म्हणून मनात आले.

नितिन थत्ते's picture

19 Aug 2010 - 4:57 pm | नितिन थत्ते

८०च्या आसपास चित्रपटसंगीतात आलेली ग्रॅज्युअली उतरणार्‍या आवाजाची (आप जैसा कोई - कुर्बानी) फॅशन आठवली जी यंत्राच्या उपयोगानेच शक्य होती.

तसेच हल्ली भय्यांच्या गाण्यांमध्ये पाइपमधून येणार्‍या आवाजात गायलेला आवाज असतो तो पण यंत्राच्या सहाय्यानेच येत असणार.

इतर काही गोष्टींमध्ये झेरॉक्स (फोटोकॉपी) ची क्रांती विचारात घ्यायला हवी. या क्रांतीने काही बाबी आमूलाग्र बदलून गेल्या.

(फूलस् कॅप ऐवजी ए फोर कागद वापरण्याची सुरुवात या झेरॉक्स मशीन मुळेच झाली).

विकास's picture

19 Aug 2010 - 5:03 pm | विकास

चर्चाप्रस्ताव एकदम मस्त आहे!

यंत्रांनी तुमच्या सवयींमधे, वागण्यात प्रसंगी स्वभावात काहि बदल केले आहेत का?

जरा थांबा, मी पटकन हा प्रश्न संगणकात घालून तो काय उत्तर देतो ते सांगतो ;)

असो, सुदैवाने इतकी वेळ अजून आली नाही की आपण आर्थर क्लर्कच्या हॅल वर अवलंबून आहोत. पण व्यक्तीगत माझ्याबाबतीत यंत्राची कुरघोडी ही हस्ताक्षरासंदर्भात झाली आहे. सतत टंकण्याच्या सवयीने, (१) मला आता हाताने लिहायचे असेल तर पुर्वीसारखे चांगले हस्ताक्षर हे फारच काळजीपूर्वक लिहून काढता येते. (२) कधी कधी असे देखील वाटते की हाताने लिहीण्यापेक्षा, जर टंकायला लागलो तर पटकन सुचयला लागते.

बाकी मोबाईलमधे नंबर ठेवणे वगैरे प्रकाराचे परीणाम आहेतच.

मात्र याव्यतिरीक्त (माझ्यासंदर्भात म्हणायचे नाही पण) एक गंभीर कुरघोडी ही संगणकांमुळे होत आहे, ते म्हणजे बसून रहाण्याची आणि तसेच काम करायची सवय. त्यामुळे होणारे आजार ही काळजीची गोष्ट आहे.

अर्थात शेवटी एक प्रश्न पडतो की याला यंत्रांची कुरघोडी/प्रभाव म्हणायचे का अधुनिकतेच्या बुरख्यखालची आपली पराधीनता?

ऋषिकेश's picture

19 Aug 2010 - 6:35 pm | ऋषिकेश

थोडक्यात हा कुरघोडीचा खेळ अखंड चालणारच आहे.

सहमत आहे. आणि तो चालतच रहायलाही हवा.. ज्या संस्कृतींमधे बदल झाले नाहित त्याची प्रगती झालेली नाहि. प्रश्न कुरघोडी करण्याचा नसुन ही कुरघोडी तुम्हाला परावलंबी बनवत आहे का? तुमच्या विचारकरण्याच्या प्रक्रीयेमधे चांगले/वाईट परिवरर्तन आणत आहे का?
असल्यास कसे? कोणत्या यंत्रांमुळे?
एक उदा. माझ्या आईचे चटणी करताना मिक्सरवरील अवलंबित्त्व पूर्ण आहे. तिने पुर्वी पाटा-वरवंट्यावर चटणी वाटली आहे पण आता ती ते कसब मिक्सरमुळे विसरली आहे. यात तिने पाट्यावर वाटावे अशी माझी अपेक्षा नाहिच. मात्र यंत्राच्या सवयीने तीच्यातले एक कसब कमी झाले अशी नोंद (व काहिसा सल) तिच्या मनात आहे. [अर्थात हे केवळ उदा.]

अश्या प्रकारची उदा. ह्या चर्चेतून मिळत जातील तसतसे लक्षात येईल की माणूस काहि यंत्रे उगाच ('गरज' नसताना) वापरतो आहे. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक वाईट. तर असा यंत्रांचे अतिरेकी स्थान तुमच्या रोजच्या जीवनात आहे का? हे शोधायचा प्रयत्न आहे

सहज's picture

19 Aug 2010 - 6:53 pm | सहज

रोज जात्यावर पीठ दळायचे कसब गेल्याबद्दल बहुदा कोण्या मराठी स्त्रीच्या मनात फार सल नसावा :-)

ऋ तु म्हणतोस ते पटते म्हणून मी उर्जावापर कमी करण्याकरता पॉवर टुथब्रश, इलेक्ट्रिक शेव्हर वापरत नाही.

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 7:12 pm | इन्द्र्राज पवार

"रोज जात्यावर पीठ दळायचे कसब गेल्याबद्दल बहुदा कोण्या मराठी स्त्रीच्या मनात फार सल नसावा"

नक्कीच नाही. किंबहुना आता या क्षणी अगदी छोट्या शहरात पाचवी इयत्तेत शिकणार्‍या मुलीला "जाते" नावाचे अवजार दाखविण्यासाठीदेखील कुठ्ल्याही कुटुंब व्यवस्थेत ते अस्तित्वात नाही. घराशेजारी नव्याने झालेल्या व इंजिनवर चालणार्‍या पिठाच्या गिरणीमधील यंत्राच्या कर्णकर्कश आवाजांचा त्रास होतो म्हणून आमच्या एक नातेवाईकांने ८-१० खोल्यांची ऐसपैस जागा पडेल किंमतीत विकून उपनगराचा सहारा घेतला होता. पण पुढे हाय पॉवर इलेक्ट्रिक मोटर्स आल्या, कमर्शिअल वीजपुरवठा आला, तीनुसार पिठाच्या गिरणीच्या मशिनरीची संकल्पना बदलली आणि आता त्याच गिरणीत दळपकांडप करणार्‍या कामगारालादेखील दळप मशीनचा आवाज येत नाही. इथे आता त्या नातेवाईकाने 'सोन्यासारखी जागा मातीमोलाने गेली' असे आक्रंदन करुन काय होणार? शेवटी यंत्रसुधार ही या टप्प्यातील अटळ अशी स्थिती आहे, तिचे फायदेतोटे हे सापेक्ष होत राहणारच.

शरभ's picture

19 Aug 2010 - 8:35 pm | शरभ

खरं आहे.....पुर्वी क्रिकेट खेळायला मेदानात जायचो.....आता घरीच बसुन Cricket 2009 , Brian Lara etc खेळतो....
health ला वाइट....

वेताळ's picture

19 Aug 2010 - 8:58 pm | वेताळ

यंत्राशिवाय देखिल जगता येईल पण ते खुप अवघड आहे. निदान अजुन दोन वर्षे वाट बघावी लागेल. २०१२ ला सौर वादळामुळे सर्व चुंबकिय क्षेत्र प्रभावीत होणार आहे. त्यामुळे सर्व जगातील वीजेवर चालणारी उपकरणे बंद पडण्याचा खुप मोठा धोका आहे असे संशोधकाचे म्हणणे आहे.तेव्हा अजुन एक दोन वर्षात तो देखिल अनुभव आपल्याला मिळेल असे वाटते.

चिरोटा's picture

19 Aug 2010 - 9:07 pm | चिरोटा

तर तुमच्याही आयुष्यातल्या सवयींवर, कामांवर, नैसर्गिक शक्तीस्थळांवर (जसे स्मरणशक्ती, पाककला, शिवणकला) यंत्रांनी कुरघोडी केलीय का?

कुरघोडी नाही म्हणता येणार्.फायदा आहे.पण फायद्याबरोबर तोटे आलेच.मोबाइलमुळे थोडाफार स्मरणशक्तीवर नक्कीच परिणाम होत असावा.पण मोबाइलमध्ये घड्याळ्(चावी देणे/बॅटरी बदलणे नाही!),गजर,डायरी(पेनची गरज नाही!) ह्या अतिमहत्वाच्या सेवा असल्याने फायदे जास्त.
तीच तीच रटाळ कामे यंत्राकडे सोपवायची आणि महत्वाच्या गोष्टींकडे मनुष्याने लक्ष द्यायचे हा ह्यामागचा उद्देश असावा.

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2010 - 9:09 pm | मुक्तसुनीत

रोचक धागा.
या स्वरूपाचीच चर्चा - आणि या धाग्यासंदर्भातले माझे विचार - येथे: http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=7786&

वरील लिंक मेंबरशिपशिवाय चालत नसल्याचे लक्षांत आले. म्हणून मजकूर येथे देतो.

Very recently my mobile phone went dead. I have to say the phase between the 2 phones has been a close approximation of a metaphysical experience of sorts. I can enumerate a few features of how I have felt :

1. A certain kind of anxiety , mostly work -related.
2. A great deal of inconvenience.
3. Kicking my butt for making some mistakes that led to the loss of the equipment.
4. A fear of social stigma for not possessing what's being considered as threadbare feature of your existance.
5. Dealing with various aspects of pricing, "features" , feasibility while buying the new equipment.
6. I have not read this novel , but the words "Lightness of Being" come to mind. There were incidents when my boss couldnt leave a voice mail , couldnt reach me in the late evenings , and all he could inquire about was when I am going to get a new phone ! That doesnt happen every so often ...

I can only imagine the feeling of being born again if I had to actually change the number itself !

ETA : Need to add a thing or two to the list above :

- The suspense about the identity of calllers while receiving calls from people on the new equipment. The fun about how people would start talking assuming I have recognized them.. The excitment of being a version of Jason Bourne ;-)

- The disappointment made very obvious by some ( like my boss) about not thinking of buying a BlackBerry or a Palm-isq device that enables me to check emails and stuff.

ऋषिकेश's picture

19 Aug 2010 - 10:49 pm | ऋषिकेश

असाच काहिसा अनुभव हली ट्रेक्च्या वेळी येतो. मी मुंबईबाहेर फिरायला निघालो की मोबाईल पूर्ण बंद करून ठेवतो ते पुन्हा मुंबईत आल्याशिवाय चालु करत नाहि. (त्यामुळे कितीही तातडीचा निरोप असेल तर मला मिळायला उशीर होतो पण ती रिस्क मी घेतो).

कुर्गच्या मोठ्या ट्रेकला माझ्या तंबुत एकदा रात्री खडबड ऐकु आली. बघतो तो एकजण आपला मोबाईल चालु करण्यासाठी त्याने आणलेली बॅकअप बॅटरी शोधत होता (कारण जंगलात कुठलं चार्जिंग?). म्हटलं झोप काहि होत नाहि एका रात्रीत.. तर म्हणे अरे दिवसाच्या शेवटी एसेमेस बघितले नाहि तर झोपच येत नाहि. रोजच्या १५ एक कि.मी. पायपीटीनंतरही केवळ ह्या अ‍ॅडिक्शनपायी नीट झोपु शकणारा तो ट्रेकर अजूनही डोळ्यासमोर येतो.

अरेरे.. परत कशाला आणला त्याला जंगलातून.. तिकडच रात्रीचं खळ्ळ खटॅक नाय का करायचा..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2010 - 12:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेडीओ अ‍ॅस्ट्रॉनॉमर झाल्याचा फायदा! ऑफिसात मोबाईल सोडून मी जगभर फिरत बसते (आणि फोन करणारे बिचारे कंटाळून जातात)! विचारा आपल्या लिखाळ गुर्जींना! ;-)

अविनाशकुलकर्णी's picture

19 Aug 2010 - 9:33 pm | अविनाशकुलकर्णी

आधि होते .मंत्र..मग आले तंत्र..आता आहेत यंत्र.....मी घरात लक्ष्मीचे यंत्र पुजतो...

बहुगुणी's picture

19 Aug 2010 - 11:55 pm | बहुगुणी

माझ्या सेल फोन वर इ-मेल सुविधा आहे याचा सुरूवातीला वाटणारा आनंद लवकरच २४-तास 'ऑनलाईन' दिसण्याच्या 'असुविधे'मुळे विरून जायला लागला आहे. आधी संदेश दिसल्यावर शक्य तितक्या लवकर उत्तर देणारा मी, पण आता स्वतःला (आणि इतरांनाही!) शिस्त लावण्यासाठी माझ्या work message च्या signature line मध्ये आता ही टॅग लाईन ठेवली आहे:

Let us use e-mails wisely and "stay away from the electronic leash". Technology is supposed to give us free time, not make us digital slaves!

My Rule: Outside of a work-day, access e-mails only at defined times and respond quickly only if urgent. All other time is ‘my time’.:-)

Try it, it keeps you stress-free!

ही टॅग लाईन add केल्यापासून मला संध्याकाळी ६ नंतर सकाळी ८ पर्यंत येणार्‍या इ-मेल्स मध्ये लक्षणीय घट झालेली आहे:-)

हाहाहा...

म्हणून मी तर ऑफिसचे मेल घरी/मोबाईल वर काय....ऑफिसमधे पण ठरावीक वेळेत चेक करतो.. ;)

*उगाच नाय काय ऑफिसमधे असताना कानसेन मधे भाग घ्यायचो .. :)

चतुरंग's picture

20 Aug 2010 - 2:08 am | चतुरंग

म्हणूनच मी 'काळी बेरी' किंवा तत्सम 'सफरचंदांच्या' नादी लागलेलो नाहीये. ;)

चतुरंग

ऋषिकेश's picture

20 Aug 2010 - 9:36 am | ऋषिकेश

टॅगलाईनच्या आयडियाची कल्पना आवडली :)

यंत्रांच्या रोजच्या जीवनातला उपयोग नव्यानं सांगण्याची गरज नाही पण कधीकधी यंत्र वापरण्याच्या कंटाळा येतो.
आपण घरात असताना कोणते ना कोणते यंत्र चालूच असते. कधी कपडे धूवायचे तर कधी कपडे वाळवण्याचे, भांड्यांचे, तर कधी केर काढण्याचे! मी घरात येउन एक तास होवून गेला तेवढ्यात पाच फोन आले. जेंव्हा हे काही नसते तेंव्हा स्वयंपाकघरातील यंत्रे चालू असतात. अगदी निवांत वेळेतही संगणक, टिव्ही, सेलफोन्स चालू असतात.बाहेर असताना दुचाकी नाहीतर चारचाकी असतेच. आजच मी मुलाला रागावले व त्या टुई टुई आवाज करणार्‍या गेम्स सोडून काहीतरी वाच म्हणून सांगितले. मी एकदा माझा भ्रमणध्वनी घरी विसरून गेले त्याचा झालेला आनंद मला अजून आठवतोय. सगळ्यात आधी मानेवरचा (आणि कानावरचा) ताण सैल झाल्याचं आठवतं आहे.

ऋषिकेश's picture

20 Aug 2010 - 9:35 am | ऋषिकेश

मी एकदा माझा भ्रमणध्वनी घरी विसरून गेले त्याचा झालेला आनंद मला अजून आठवतोय. सगळ्यात आधी मानेवरचा (आणि कानावरचा) ताण सैल झाल्याचं आठवतं आहे.

हा हा हा..यावरून आठवलं.. आमच्या प्रोजेक्टमधे एक मुलगी होती, ती फक्त कोडींग व फोनिंग हे दोनच उद्योग करायची. तीही एकदा फोन विसरली तेव्हा कुठे तिला इतर टिममेंबर्सची नावं कळली.. ती चक्क आमच्याबरोबर कॉफीला आली वगैरे वगैरे..
(अनेक मुलांनी ती फोन नेहमी विसरो अशी प्रार्थनाही केली हा भाग अलाहिदा ;) )

मुळेच होतात. इकडे ६ महिन्यापुर्वी एक अपघात असाच मोबाईल पायी झाला. एसटीचा ड्रायव्हर आपला मोबाईल कानाला लावुन बोलत असताना गाडी वळणावरुन घाटात गेली. त्याने उडी मारली पण बाकी २० प्रवासी ठार झाले.

चित्रा's picture

20 Aug 2010 - 6:27 am | चित्रा

आयुष्य थांबणार नाही.
पण नेहमीप्रमाणे व्हावे याची मात्र वाट पाहीन असे वाटते.

इन्द्र्राज पवार's picture

20 Aug 2010 - 2:32 pm | इन्द्र्राज पवार

"यंत्रांनी तुमच्या सवयींमधे, वागण्यात प्रसंगी स्वभावात काहि बदल केले आहेत का?"

याच्या अनुषंगाने एक आठवण ताजी झाली. सहसा यंत्राने 'सवयीत बदल झाला' ही संज्ञा आपण आताच्या पिढी (विशेषतः मोबाईल, टू, फोर व्हीलर, कॉम्प्युटर्स, मल्टीप्लेक्स इ.) संदर्भात उपयोगात आणतो. पण इथला किस्सा माझ्या आजीच्या संदर्भातील आहे. नवीन आणि टुमदार अशा उपनगरातील बंगल्यात वास्तव्यास गेल्यानंतर माझ्या मामाने आपल्या आईसाठी (माझी आजी) स्वतंत्र बेडरूम, बाथरूमतर बांधलीच पण आंघोळीला तिला गरम पाणी मिळावे म्हणून फिलिप्सचा गीझरदेखील तिथे बसविला. वय वर्षे ८० झालेल्या आजीला आंघोळीसाठी तोपर्यंत जुन्या घराच्या परसात असलेल्या बंबातील गरम पाणी घेण्याची सवय, तसेच पावसाळ्यात बंब नसल्यास गॅस शेगडीवर पाणी गरम करून घेण्याची तरतूद इतपर्यंत सवय होती. तिला ही "गीझर" ची जादू हर्षभरीत करणारी वाटणे साहजिकच होते....सुरुवातीला "कशाला मला म्हातारीला इतक्या खर्चाची भांडी (गीझरला ती लाईटचे भांडे म्हणत्ये) आणलीस...मी काय गॅसवर गरम पाणी करून घेतले असते एक तपेलीभर.." इ. इ. वाक्ये. पहिले काही दिवस माझ्याकडून अन् नातीकडून बटण कसे चालू करायचे, लाल दिवा काय सांगतो, मशीन बंद केव्हा करायचे, कुठली तोटी सोडायची आदी तांत्रीक माहिती तिने प्राप्त केली...अन् दोन आठवड्याच्या आतच आजी गीझरच्या प्रेमातच जणू पडली. इतकी की, ज्यावेळी उपनगरात लोड शेडिंगची व्याप्ती वाढली आणि सकाळी ९.३० पर्यन्त वीज गायब होऊ लागली, तरीदेखील ही ८० वर्षाची आजीबाई लाईट येईपर्यंत आंघोळीला जाईनाच. "अगं आजी, मी गॅसवर पाणी गरम करून देतो ना.." या माझ्या सूचनेला, "गपं रे तू, आता यील धा मिन्टात वीज. आँ...करतो की आम्ही पण आता लाईटच्या भांड्याच्या पाण्यावर आंगोळ !"

यंत्राने सवयीत बदल केलेल्या अनेक उदाहरणातील हे एक अस्सलच !