मैत्रिणीचा मित्रच सुखी!

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
18 Aug 2010 - 3:49 pm
गाभा: 

सुख मानण्यात असतं हे विधान जरी खरं असलं तरी ते जाणण्यात मोठा आनंद दडलेला असतो. प्रत्येकालाच मैत्रीण लाभते असे नाही. परंतु ज्यांना एखादीचा सहवास जाणता आलाय तेच खरे जाणकार. त्यांना पुढच्या कोणत्याही गोष्टी नव्याने शिकाव्या लागत नाहीत किंवा त्यांचे नव्याचे नऊ दिवस मैत्रीच्या व्यवहारातच जुने झालेले असल्याने तेच खरे जुने जाणते बुजुर्ग म्हणून आत्मविश्वासाने काळोखालाही सामोरे जातात...
मैत्रिणीच्या संगतीत पावन झालेली धरती अशा भाग्यशाली मित्रांना अनोळखी न वाटल्याने त्यांचा खेळ उंचावत जाणार हे निश्चित.
माती तांबडी असली की तिला पुर्वानुभवाचा इतिहास असतोच असतो. एकदा का ती(लाल माती) अंगाला भिडली की मल्लांच्या स्नायुंना आपोआप अमिटणारे स्फुरण चढलेच म्हणून समजा. रेताड, मुरमाड मातीत आधीच लोळून झाले असल्याने तिचा कण अन् कण कोळून प्याला असल्याने नव्या फडातली मऊ चिकण माती अंगावर घेण्याचा स्पर्शानंद काही औरच वाटू लागतो. अशावेळी मातीलाही घामजलेल्या अंगाला चिकटण्याचा (दांडगा) अनुभव असेल तर कुस्ती रंगतदार होणार हे नक्की!
जे अनअनुभवी आहेत त्यांची पहिल्या आखाड्यातच भंबेरी उडते. नवख्या खेळाडूसोबत कोणता डाव खेळावा हेच नीटसे ठरत नाही. नवख्या मातीचा स्पर्शही नवाच असल्याने गुदगुल्या होण्याचा संभव अधिक असतो. कधी कधी नमनालाच घडाभर तेल ओतल्याशिवाय गण गौळण सुरु होत नाही, जमलेली भट्टी पेटत नाही. धुरकट वातावरणाचा परिणाम विमानाच्या लँडिंगवर होतो, असंही बऱ्‍याचदा नवशिक्या वैमानिकाच्या बाबतीत घडतं.
एकंदर काय तर कुस्तीच्या आखाड्यात थोडा बहुत अनुभव गाठीशी असेल तरच पाठीशी लाल माती प्रेमळतृप्तीचे हितगुज करू शकते. अन्यथा चितपट होणेच नशिबी येते.
याउलट मैत्रिणीने आपल्या खास ढंगात मित्राला निसरड्या मैदानावरच्या रणनिती समजावून दिलेल्या असतात, नव्हे तर नव्हे आखाड्यातील खाचाखोचाही सांगितलेल्या असतात. म्हणूनच तो मित्र अशाकामी तरबेज होतो, हुशार बनलेला असतो.
इतकेच नव्हे, तर त्या मैत्रिणीने प्रेमरंगापासून प्रेमभंगापर्यंतचे अनेक अनुभव मित्राच्या शिदोरीत सामावून दिलेले असतात. ती जरी ब्रेक अप करून नवा गडी नवा राज शोधायला मोकळी झाली असली तरी मित्राला तिने बांधून दिलेली शिदोरी आयुष्यभर चार्जिंग देत राहते, भलेबुरे इशारे सुद्धा देत राहते.
म्हणूनच पूर्वायुष्यात मैत्रीण लाभलेला मित्रच खरा सुखी, पूर्ण समाधानी व निश्चित तृप्त असतो...

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Aug 2010 - 3:57 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मैत्रिण्...कुस्ती.. निसरडे मैदान्..जरा confusion आहे,
पण भावना पोचल्या.(असं वाटतय तरी)
आयुष्यात जिवाभावाची एक मैत्रिण असावी...आणि ती मैत्रिण म्हणुनच असावी..

जिन्क्स's picture

19 Aug 2010 - 7:34 am | जिन्क्स

घ्या...जाईतै कुस्तीच्या मैदानात बुद्धिबळ बघायला आल्या आहेत :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2010 - 4:00 pm | परिकथेतील राजकुमार

माती तांबडी असली की तिला पुर्वानुभवाचा इतिहास असतोच असतो. एकदा का ती(लाल माती) अंगाला भिडली की मल्लांच्या स्नायुंना आपोआप अमिटणारे स्फुरण चढलेच म्हणून समजा. रेताड, मुरमाड मातीत आधीच लोळून झाले असल्याने तिचा कण अन् कण कोळून प्याला असल्याने नव्या फडातली मऊ चिकण माती अंगावर घेण्याचा स्पर्शानंद काही औरच वाटू लागतो. अशावेळी मातीलाही घामजलेल्या अंगाला चिकटण्याचा (दांडगा) अनुभव असेल तर कुस्ती रंगतदार होणार हे नक्की!

सुंदर. आपल्या लेखनात प्रभुगुर्जी दिसले.

परायक प्रभु

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 6:09 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. लेखनात प्रभु गुर्जी दिसले. बाकी त्यासाठी काही काही भागात अशा औटघटकेच्या मैत्रिणी योग्य त्या मोबदल्यात मिळू शकतात. फक्त मातीत पाय रुतण्याचा धोका असतो इतकेच.

बाकी आपली बायकोही कोणाची मैत्रिण असेल असे वाटल्याने काळ्जात धस्स झाले. असो.

(कुस्तीगीर) पेशवे

विजुभाऊ's picture

18 Aug 2010 - 5:33 pm | विजुभाऊ

काय कळ्ले नाय बॉ
............ आग्दीच आननुभवी टारेश भाषाबडवी

अप्पा जोगळेकर's picture

18 Aug 2010 - 6:49 pm | अप्पा जोगळेकर

लग्न झाल्यावर कुस्तीचे जे मैदान मारावे लागते त्यासंदर्भात हा लेख असून तो अश्लीलतेकडे झुकणारा आहे असे आमचे मत आहे.
काय एकेक सब्दांचे खेळ आहेत. वा.

एकंदर काय तर कुस्तीच्या आखाड्यात थोडा बहुत अनुभव गाठीशी असेल तरच पाठीशी लाल माती प्रेमळतृप्तीचे हितगुज करू शकते. अन्यथा चितपट होणेच नशिबी येते.
आमचे विवाहित मित्र असेच म्हणतात.
- ( मैत्रिणीच्या शोधातला) अप्पा

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 10:28 pm | राजेश घासकडवी

म्हणजे आता सैपाकात निपूण, पूजापाठ करणारा सराईत मल्ल असेल तर त्याला कशाविषयीच बोलता येणार नाही बहुतेक.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2010 - 10:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता कुस्तीची पथ्यं येणार का?

बेसनलाडू's picture

19 Aug 2010 - 3:31 am | बेसनलाडू

भीमाची आठवण होते का? सैपाकात निपुणही, पूजापाठ करणाराही आणि सराईत मल्लही!
(स्मरणशील)बेसनलाडू
अर्थात, भीम कधी कुणाशी याविषयी बोलला/बोलू शकला असेल का?
(अनभिज्ञ)बेसनलाडू
दिवटे साहेब, लेख वाचून कुस्तीचे स्फुरण चढले.
(पैलवान)बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2010 - 7:50 am | llपुण्याचे पेशवेll

अर्थात, भीम कधी कुणाशी याविषयी बोलला/बोलू शकला असेल का?
नसेल बापडा. तेव्हा मराठी संस्थळे नव्हती ना!

अनामिक's picture

18 Aug 2010 - 10:46 pm | अनामिक

मित्राची मैत्रीण सुखी असं शिर्षक पण चाललं असतं, नाही का?

अशक्त's picture

18 Aug 2010 - 11:03 pm | अशक्त

या निमित्ताने स्व. दादा आठवले.

(जमिन आपलि उन्हान तापलि, लाल झालिया माति.......)

पिवळा डांबिस's picture

19 Aug 2010 - 3:28 am | पिवळा डांबिस

जमीन आपली, उन्हानं तापली, लाललाल झालीया माती...
दिवट्यांच्या रामाला, डाक्टरमामाला, बायकूची नाय वाटं भीती...
रट्टा पाठीवर जवां पडंल, पाणी थेंब थेंब गळं!!!!!
:)
(डॉसाहेब हलकेच घ्या हो!)

तुम्ही भलतेच पिवळे आणि डांबिस हो !!!
(तुम्हीपण ह. घ्या.)

शाहरुख's picture

19 Aug 2010 - 10:16 pm | शाहरुख

हा हा हा !

बोलघेवडा's picture

19 Aug 2010 - 9:20 am | बोलघेवडा

शांत गदाधारी भीम शांत !!!

लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता देणारे जज तुम्हीच का?