स्वीटकॉर्न चा फ़जिता अथवा उसळ

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
17 Aug 2010 - 3:01 pm

From Recipee

साहित्य :- स्वीटकॉर्न अर्धा किलो , बारीक चिरलेला कांदा १ वाटी, दोन मिरच्या, कोथिंबीर अर्धी वाटी, फ़ोडंईचे साहित्य, तेल ,मीठ चवीनुसार, कडीपत्ता,साखर १ चमचा.

From Recipee

कृती :- प्रथम स्वीट कॉर्न मिक्सरमधुन जाडसर वाटुन घ्यावेत. तेलावर जिरे,राई,हिंग,कडीपत्ता,हळद,मिरच्या घालुन कांदा परतुन घ्यावा. त्यावर मिक्सरवरुन काढलेले स्वीटकॉर्न घालुन चांगले परतावे,त्यात साखर व मीठ चवीनुसार घालुन चांगली २ वेळा वाफ़ आणावी. आणि एका डीशमधे कोथिंबीर घालुन सर्व्ह करावे.
From Recipee

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Aug 2010 - 3:06 pm | llपुण्याचे पेशवेll

उसळ चांगली वाटत नाहीये.
फोटो छान दिसतो आहे. राई म्हणजे काय? फोडणीचा पदार्थ असतो का?

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

मेल्या आयटी वाल्या, राई म्हणजे मोहोरी.

पाकृ छान दिसत आहे. कॄपया पुढच्यावेळी डब्यातुन हेच घेउन यावे ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Aug 2010 - 3:17 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला असं आहे होय. म्हणून ते उडवीन चिंधड्या राई राई येवढ्या आहे होय.

सुनील's picture

17 Aug 2010 - 3:25 pm | सुनील

श्रद्धातै, उसळीची पाकृ छान आहे. परंतु कृपया त्याला फहिता (fajita) म्हणू ना हो! अगदी टोमॅटो आमलेट म्हटल्यासारखे वाटते!

...तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला येवढी शिंपल गोष्ट समजू नाय?

(हा फजिता बहुधा काहीतरी देशस्थी/देशावरचा प्रकार असावा असे वाटते. मी स्वतः खाल्लेला नाही, पण आमची सासू बर्‍याचदा फजिता-फजिता करून कौतुक करताना ऐकलेले आहे. काय प्रकार आहे बघायला पाहिजे एकदा.)

ओह ते फहिता आहे होय? मला वाटल की उसळ फसली म्हणुन फजिता ;) लिहिलय.

कृ. ह.घे.

नितिन थत्ते's picture

17 Aug 2010 - 6:04 pm | नितिन थत्ते

मला पण डिट्टो असेच वाटले.

फइता म्हणतात. पाकृ मस्त.

प्रियाली's picture

17 Aug 2010 - 6:15 pm | प्रियाली

फईता म्हणजे स्ट्रिप किंवा पट्टी. कांदा, मांस, टोमॅटो, भोपळी मिरची वगैरे लांब्या लांब्या कापून हा पदार्थ बनवला जातो. द. अमेरिकी जेवणात कढीपत्त्याचा समावेश पाहिलेला नाही, हळद, जिरे, मोहरीची फोडणीही पाहिलेली नाही, तेव्हा उगीचच लोकांनी हे फईता वगैरे आहे असे म्हणणे थांबवावे. हा पदार्थांवर अन्याय आहे. ;) मूळ लेखिकेने तसे काहीही म्हटलेले नाही याची नोंद घ्या आणि उगीच पदार्थाचे नको ते बारसे करायचे बंद करा. ;)

परंतु, याचे नाव फजिता असेल तर माझी हरकत नाही. उसळ तर वाटतेच पण फजिता असे नवे नाव लेखिकेनेच ठेवले असल्यास ठीक आहे.

सुनील's picture

17 Aug 2010 - 6:28 pm | सुनील

अगदी टोमॅटो आमलेट म्हटल्यासारखे वाटते
पण माझा आक्षेप वेगळा होता. तो उच्चाराला नव्हताच! मांसाशिवाय fajita म्हणजे टोमॅटो आमलेट, असा होता.

(परक्या भाषेतील शब्दांचे अगदी योग्य उच्चार आपण करू शकतो, असे मी समजत नाही. मात्र तसा प्रयत्न करायला हरकत नाही).

प्रियाली's picture

17 Aug 2010 - 6:33 pm | प्रियाली

प्रश्न केवळ उच्चाराचा नाही तर फहिता/ फईता म्हटल्याने ती ऑथेंटीक किंवा फ्यूजन फईता रेशिपी होईल ना. तसे इथे काहीच नाही. ;)

टॉमेटो आम्लेट एकवेळ ठीक आहे तेथे अंड्याच्या मिश्रणाऐवजी चण्याच्या पिठाचे मिश्रण वापरतात पण इथे तर मक्याच्या दाण्यांच्या पट्ट्या नसल्याने तो फईता नाहीच असे मला म्हणायचे आहे. :)

फजिता नाव बरं आहे. पदार्थ करताना फजिती झाली की फजिता म्हणावे.

सुनील's picture

17 Aug 2010 - 7:09 pm | सुनील

हे मान्य!

श्रद्धा.'s picture

18 Aug 2010 - 9:38 am | श्रद्धा.

प्रियाली....

मी काही नवे नाव नाही ठेवले या पदार्थाचे..... माझ्या लहानपणापासुन मी "फ़जिता"हेच नाव ऐकतेय....सासरी आल्यावर याला उसळ म्हणतात असे कळले... :)

विंजिनेर's picture

17 Aug 2010 - 6:47 pm | विंजिनेर

वा! श्रद्धा तै. फर्मास.
अजून येऊद्या अशाच पाकृ.

(बाकी वर काही लोक तोंड लांब करून - आपण मुळचे सान फर्नांडोचेच अशा थाटात फहिता/फजिता/फईता व्युप्तत्तीची चुपक्रमी चर्चा करत आहेत त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करा नाही तर योग्य तिथे मारा - कसें? )

शाहरुख's picture

17 Aug 2010 - 8:35 pm | शाहरुख

आवडीचा पदार्थ ! घरी कणसं किसायला लागायची :-)

छान फोटू!
पूर्वी कणसे किसून घेउन ही उसळ करत असत.
म्हणजे माझी आजी करायची.

स्वाती२'s picture

17 Aug 2010 - 9:08 pm | स्वाती२

मस्त! माझी आई करायची मधल्या वेळच्या खाण्याला.

ऋषिकेश's picture

17 Aug 2010 - 11:15 pm | ऋषिकेश

फहिता म्हणतात हे नक्की
कारण मी मेक्सिकन रेस्टॉरन्टात जाऊन फजिता ऑर्डर केल्यावर ती प्रचंड वेट्रेस, आपले प्रचंड दोळे आणखीनच प्रचंड करत मला "इट्स फहिता" अशी दमदार समज(दे)वून गेली होती!

बाकी हा फहिता वाटत नाहि.. हे फक्त सारण झालं तेही चीझ शिवाय.. मुळ फहिता व्रॅपमधे चीझसकट अतिशय लडबडलेला पण अति रुचकर असतो. याला रुचकर उसळच म्हणूयात ;)

बेसनलाडू's picture

17 Aug 2010 - 11:19 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू