साहित्य : २ मोठे बीट, खवा अर्धा पावशेर, साखर १ मोठी वाटी,वेलदोड्याची पुड १ मोठा चमचा,बारीक तुकडे केलेले काजु अर्धी वाटी, १ चमचा तुप, बर्फ़ी वर लावायला चांदीचा वर्ख.
From RecipeeFrom RecipeeFrom RecipeeFrom RecipeeFrom Recipee
कृती :- प्रथम बीटची साले काढुन घेउन ते किसुन घ्यावे. किसलेले बीट मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावे. मिक्सरवरुन बारीक केलेले बीट जाड बुडाच्या कढईत कोरडे होईपर्यंत परतुन घ्यावे. कोरडे झालेले बीट एका डीश मधे काढुन घेउन त्याच कढईत खवा परतायला घ्यावा.खवा चांगला लाल होइपर्यंत भाजावा. खवा लालसर झाल्यावर त्यात आधी परतुन घेतलेले बीट घालुन त्यातच साखर घालावी आणि मिश्रण एकजीव करुन परत घट्ट होइपर्यंत परतावे.हे मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पुड आणि काजु घालावेत. मिश्रणाचा थापता येइल असा गोळा तयार झाला की तो तुप लावुन ठेवलेल्या डीश मधे घेउन वर प्लॅस्टीकचा कागद ठेऊन एकसारखे थापावे... थोडे कोमट झाले की त्याच्या वड्या पाडाव्यात आणि त्यावर चांदीचा वर्ख लावुन लावुन त्या वड्या डीश मधे काढुन सर्व्ह कराव्यात.From RecipeeFrom Recipee
टीप :- आपण असेही या वड्या करु शकतो. कोरडा झालेला बीट आणि खवा एकत्र करुन परत चांगले परतुन घ्यावे. घट्ट होइपर्यंत. आणि गार झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी जसे आपण बेसनाच्या लाडवाला घालतो तसे आणि वड्या थापाव्यात.
प्रतिक्रिया
17 Aug 2010 - 3:05 pm | नगरीनिरंजन
वा वा! सुंदर दिसतेय बर्फी.
बीट पोटात घालायचा नामी उपाय सापडला.
धन्यवाद.
17 Aug 2010 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार
मिश्रण अंमळ जळाले आहे असे वाटते ;)
पण एकुण फोटु पाहुन, खायची तिव्र इच्छा होत आहे हि पाकृ.
17 Aug 2010 - 5:20 pm | श्रद्धा.
पशा मेल्या जळले नाहीय ते मिश्रण चांगले भाजल्यावर कोरडे होताना रंग बदलतो....जरा आता किचन मधे लक्ष घालत जा....
17 Aug 2010 - 3:25 pm | अनाम
अरे कालच सकाळ मध्ये रेसिपी चाळताना ही पाककृती पाहीली होती.
म्सत दिसतेय :)
17 Aug 2010 - 5:21 pm | श्रद्धा.
अनाम....
ठांकु.... माझीच ती...
17 Aug 2010 - 4:27 pm | मदनबाण
यम्म,यम्म... :)
17 Aug 2010 - 7:50 pm | सहज
झकास!
17 Aug 2010 - 7:58 pm | चतुरंग
अशा केलेल्या होत्या त्याची आठवण झाली आणि तोंड पाणावले! ;)
(अनबीटेबल्)चतुरंग
17 Aug 2010 - 10:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिक्रिया आवडली, विशेषतः तोंड पाणावले हे वाक्य!!
रेसिपीसुद्धा आवडली. लवकरच करून पहाते.
17 Aug 2010 - 10:28 pm | सुनील
आमचेही तोंड पाणावले!
मस्त पाकृ.
21 Aug 2010 - 12:34 pm | चावटमेला
छान पाककृती, आमची आईसुद्धा मस्त बीटाची बर्फी करते, फक्त ती खवा वापरत नाही, ओले खोबरे मिक्स करते बीट सोबत , आता खवा वापरून देखील करायला सांगतो..
21 Aug 2010 - 6:56 pm | विसोबा खेचर
छान.. :)