विकांताची खादाडी : राजस्थानी भेंडी आणी एक बोनस !!

सुहास..'s picture
सुहास.. in पाककृती
16 Aug 2010 - 2:07 pm

डिसक्लेमर : वरील शिर्षकाचा आमचे मित्र 'भेन्डी बाजार' ऊर्फ 'प्रसन्न'चा काहीही संबध नाही,तसेच प्रसन्न आणी प्रसनदा ह्यांचाही अजुनतरी मिपासदस्य असण्याखेरीज काहीही संबध नाही.
प्रेरणा : भेटली कधी तर माझा नमस्कार सांगा.
साहित्य : कणेकरांचे आणी शिरवाळकरांचे...आपल हे ...सॉरी..भेंड्या.
कढई
पातेल
बेसन पीठ
तेल
ई.ई.ई.

कृती :
सर्वात पहिले भेंड्या धुवुन घ्या.

step 1

मग त्या कापा.चिरताना खाली दिलेल्या प्रमाणे कापायच्या आहेत. आतील बिया काढुन घ्यायच्या,नंतर त्याची ही वेगळी पाकृ करता येते, पण ह्या पाकृत त्याची काही गरज नाही. ऊच्चभ्रु भाषेत अश्या प्रकारचा जो 'काप' आहे,त्याला'ज्युलियन्स' म्हणतात.(बर ज्युलिएट म्हणत नाहीत.)

Step 2

चला आता मांत्रिक आय मीन तांत्रीकदृष्ट्या अतिशय महत्वाचा भाग. एकदा त्या चिरुन झाल्या की थोडा वेळ जाऊ द्या, जर भेंड्या एकदम डार्क ग्रीन असतील तर साधारण त्याला तासभर तरी हवा लागली पाहिजे(मला ह्या भेंड्या पार हिरवा ऑईलपेंट लावल्या टाईप भेटल्या होत्या बाजारात , त्यामुळे मी चांगला दिड-तास घालवला ,असो), काय गम्मत आहे बघा भेंडी तामीळ्नाड, पदार्थ राजस्थानी, बनविणारा मराठी ,बनवतोय कर्नाटकात,दिवस भारताचा स्वातंत्र्य-दिन!!
त्यानंतर , भेंडी एखाद्या पातेल्यात घेऊन,भेंड्यावर 'सुक्क्या' बेसनपिठाचा मारा करा. होय सुक्क बेसनपीठ , भेंड्याना ते बेसनपीठ लागल पाहिजे पण जास्त नाही.त्यामुळे मिश्रण चांगल हलवुन घ्या.
भेंड्या काढुन एखाद्या पेपरवर पसरवुन घ्या , माझ्या कडे पेपर नव्हता (प्लास्टिक होत.)

Step 3

त्यानंतर त्या भेंड्या, चागंल्या खरपुर तळुन घ्या . गॅस मंद आजेवर असेल तर चांगल्या कुरकुरीत होतात.

step 4

तेलातुन काढुन घ्या.झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ पातेल्यात काढुन घ्या. गरम असताना त्यामध्ये, काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर व मीठ चवीनुसार टाकुन एक जिनसी होईपर्यंत हलवुन घ्या. मस्त कुरकुरीत भेडी तय्यार ! विषेश : हिच पाकृ , भेंडी-फ्राय, सुनहरी भेंडी म्हणुनही प्रसिध्द आहे. सर्वात बेस्ट व्हेज चकना म्हणुनही ह्या पाकृचा वापर करता येतो.
टीप : अशाच प्रकारे आपण मासे ही बनवु शकतो. फक्त बेसनपिठाच्या एवजी कॉर्न-फ्लोवर वापरायच.

Step 5

बोनस : अंड्याच फोडुन कालवण ..
साहित्य :
गावरान अंडे (ईंग्लीश घेतली तरी चालतील पण त्याला अंड्याच्या ह्या प्रकारात चव येत नाही)
कांदे
टमाटे
लाल मिरची पुड
लसुन-आले पेस्ट
मीठ
कडीपत्ता- कोथंबिर
ई.ई.

कृती :

कढईत ,कांदे ,लाल होईपर्यत,तळुन घ्या.
त्यात टमाटे टाका, एकजिनसी होईपर्यत हलवुन घ्या .
मग लाल मिरची पुड, लसुन आले पेस्ट टाका, पुन्हा एक जिनसी होईपर्यंत हलवुन घ्या.
मग कडीपत्ता टाका.
हे सर्व झाल्यावर पाणी घाला.
मिश्रणाला ऊकळी आली की मग त्यात अंडे टाका.(फोडुन टाकुन द्यायचेत,अंडे फेटायचे किंवा मिश्रण हलवायचे नाही)
आता वरुन मीठ आणी कोथंबिर टाका. थोडस पानी ही टाका
आता हे मिश्रण साधारण , मंद आचेवर , साधारण सहा मिनीटे ऊकळु द्या, झाकण ठेवायचे नाही.

one step !!

त्यानंतर मी काही फुलके केले आणी दुपारचा भाताला जिरे-मोहरी,मिरची टाकुन परतवुन घेतला.

या मंडळी जेवायला !!
at last the meal is ready !!

जाता जाता : आमचा मोबाईल कॅमेरा केवळ १.५ एम्.पी.चा आहे,भांडेही जरा कमीच आहेत.,कृपया संभाळुन घेणे.

प्रतिक्रिया

अनाम's picture

16 Aug 2010 - 2:17 pm | अनाम

झक्कास बेत आहे. :)

सुहासराव नवशिक्यांसाठी एक टीप टाकायला विसरलात का?
भेंडी धुतल्यावर स्वच्छ फडक्याने पुसुन घ्यावीत. नाहीतर कापल्या कापल्या बुळबुळीत होतात. :)

सुहास..'s picture

16 Aug 2010 - 2:35 pm | सुहास..

भेंडी धुतल्यावर स्वच्छ फडक्याने पुसुन घ्यावीत. नाहीतर कापल्या कापल्या बुळबुळीत होतात >>

मी सहसा ते वापरत नाही !! तासभर हवा लागु देतो !!

बाकी टीप ही चांगली

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 2:18 pm | परिकथेतील राजकुमार

ज्जे बात ;)

भारीच रे एकदम !

नगरीनिरंजन's picture

16 Aug 2010 - 2:23 pm | नगरीनिरंजन

चमचमीत दिसतंय! तों.पा.सु.आ.

सहज's picture

16 Aug 2010 - 2:25 pm | सहज

बुळबुळीतपणामुळे जे भेंडी खात नाहीत त्यांच्याकरता उत्तम पर्याय.

बर्‍यापैकी मेहनत असलेली व वेळ खाणारी पाकृ केल्याबद्दल आपले कौतुक वाटते.

:-)

सुनील's picture

16 Aug 2010 - 2:32 pm | सुनील

पाकृ झकास. त्या काढलेल्या बियांची वेगळी पाकृदेखिल द्या बर का!

रश्मि दाते's picture

16 Aug 2010 - 3:42 pm | रश्मि दाते

आपण श्रावणसोमवारी ही रेसिपी टाकली ,काय म्हणावा याला.
बोनस असली म्हणुन काय झाले.
बाकि दिस्तात म्स्त ,मझी आवडती भेंडी तो.पा.सु.ट्.ले
आम्हि चाट मसाला हि टाकतो
बियांची आमटी करतात आम्च्या कडे

धमाल मुलगा's picture

16 Aug 2010 - 3:54 pm | धमाल मुलगा

सुहास, ब्याक इन किचन. :)
(बेट्या, बायको आयटीतली नसली तरी तु मात्र एकुणच काळाची पावलं बरोब्बर ओळखलेली दिसताहेत. ;) )

चला, श्रावणात चखण्याची चांगली सोय झाली. ;)

>>काय गम्मत आहे बघा भेंडी तामीळ्नाड, पदार्थ राजस्थानी, बनविणारा मराठी ,बनवतोय कर्नाटकात,दिवस भारताचा स्वातंत्र्य-दिन!!
व्वा! जेवताना ब्याकग्राऊंडला 'स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट'चं टायटलसाँग प्ले करुन फुड कंझ्युम करायचं ना....हौ वंडरफुल फिलिंग (फिलिंग म्हणतोय मी, फिलींग नव्हे!) :D

एक शंका : हे साहित्यामधे आपण नेहमी वापरत असलेलं 'ई.ई.ई.' कुठे मिळेल? आमच्या शनिवारपेठेतल्या दिलीप देसी सुपरमॉलमध्ये मी विचारलं पण त्यांनाही ठाऊक नाही. स्पेन्सर्स ग्रोसरी मध्ये मिळेल का? =)) =))

निखिल देशपांडे's picture

16 Aug 2010 - 3:57 pm | निखिल देशपांडे

सुहाश्या एकदा करुन बघतो रे...

मनि२७'s picture

16 Aug 2010 - 4:44 pm | मनि२७

अप्रतिम......
झक्कासच आहे..... :-)

मी भेंडी च्या वाटेला सहसा जात नाहि बुळबुळीत पणामुळे पण ही जरा कुरकुरीत दिसते आहे चकणा करुन पाहणार !!!

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2010 - 4:52 pm | इंटरनेटस्नेही

सुंदर आहे! अशा वेळेस हातात बीअर आणी कुरकुरीत भेंडी पाहिजे! अहा हा!

स्वाती२'s picture

17 Aug 2010 - 8:34 pm | स्वाती२

मस्त!

कुक's picture

18 Aug 2010 - 4:14 pm | कुक

कालच केली होति मस्त कुरकुरीत झाली होती

स्मिता_१३'s picture

29 Aug 2010 - 8:08 pm | स्मिता_१३

सुहासराव,

कालच केली होती भेंडी. अगदी चटकदार झाली होती. घरातही सर्वांना आवड्ली.

पाककृतीबद्दल धन्यवाद !