ह्याचे रुपांतर किंवा भाषांतर नाही, पण अभय बंग यांचे ह्याच विषयावरचे "माझा साक्षात्कारी हृद्यरोग" हे अतिशय गाजलेले, चांगले पुस्तक आहे. स्वतः अभय बंग यांनी Reversing Heart Disease by Dr. Dean Ornish चे कित्येक दाखले दिले आहेत. त्याहुनही मह्त्वाचे म्हणजे अभय बंग यांचे उपाय अस्सल भारतीय आहेत.
>>'माझा साक्षात्कारी हृदयरोग' एक वाचनिय आणि संग्राह्य पुस्तक. डॉ. अभय बंगानी अगदी मुद्देसूद आणि भारतीयांच्या खाद्यसवयींच्या अनुषंगाने लिहीलय.
- ह्याच्याशी सहमत आहे. परंतु त्याच डॉ बंगाना २००४ मध्ये आणखी एक अॅटॅक आला होता ही माहिती बर्याच लोकांना नाही/नसते.
पुस्तक लिहिलय ते पहिल्या हार्ट अॅटॅक नंतर्.(१९९२ की १९९४ मध्ये. चू.भू.दे.घे)
२००४ मध्ये त्यांना दुसर्यांदा हार्ट अॅटॅक आला होता.
त्याबद्दल त्यांनी काही लिहिलेले माझ्या वाचनात अजुन तरी आलेले नाही.
शुभदा गोगटे यांनी डिन ओर्निशच्या कामाचा परिचय करून देणारे पुस्तक लिहिले आहे (हे मूळ पुस्तकाचे भाषांतर नाही). त्यात पुण्यात डॉ. जगदीश हिरेमठ यानी पुण्यात यशस्वीपणे डिन ऑर्निशचा कार्यक्रम कसा राबवला याचा परिचय आहे.
उत्तर देणार्या सर्वांचे आभार.
अभय बंग यांचे पुस्तक माझ्या संग्रही आहे.
परंतु, डॉ. डिन ओर्निशचे मराठी रुपांतर मिळाल्यास हवे आहे.
आमच्या नात्यात अथवा परिचयातल्या व्यक्तिंना जेव्हा अँजियोप्लास्टि अथवा बायपासचा सल्ला डॉ. कडून मिळतो,
तेव्हा, त्यातल्या बहुसंख्यांकांची आर्थिक स्थिती अँजियो करण्या इतपत नसते.
अश्यांना मी डॉ. अभय बंग व डॉ. डिन ऑर्नीशचे पुस्तक देऊन, वेगळ्या उपायांसाठी विचार करायला लाऊ शकतो.
घाबरलेले नातेवाईक आयुर्वेद अथवा अॅलोपॅथी + आयुर्वेद असले उपाय करायला मनापासुन तयार नसतात.
अश्यांना हि पुस्तके उपयुक्त ठरावीत.
---------------------------------------------
श्री. युयुत्सु साहेब,
शुभदा गोगटेंचे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?
कृपया माहीती द्यावी.

-तिसर्याचे अनुभव चौथ्याला लागू पडतीलच असे नाही. हृद्रोगासारख्या प्राणघातक आजारावर कोणताही सल्ला परिचयातील व्यक्तींना देताना - इतरांनी लिहिलेली पुस्तके ही केवळ त्या-त्या व्यक्तीच्या अनुभवाचे निवेदन असते, ते सर्वसामान्यपणे सर्वांनाच लागू पडेल असे नाही - याची स्पष्ट कल्पना द्यावी.
तुम्ही स्वतः हृद्रोग तज्ञ असाल तर पेशंटचा अँजिओग्राम पाहून त्याला शस्त्रक्रियेची कितपत गरज आहे हे ठरवा. नसाल तर तोच एंजिओग्राम कमीतकमी तीन कार्डिओलॉजिस्टना (वेगवेगळ्या संस्थांतील) दाखवावा आणि त्यांचे मत घ्यावे. मगच योग्य तो निर्णय घ्यावा. जर बहुमताने शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर ती करावीच करावी.
केवळ आर्थिक परिस्थिती हा शस्त्रक्रिया ठरवण्याचा निकष दोन्ही बाजूंनी (डॉक्टर - पेशंट) असू नये. (शक्य असल्यास ओपन चेस्ट 'कॅबेज' (बायपास) टाळावी.)पुस्तकांवर विसंबू नये.
शस्त्रक्रियेची गरज नसल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर पुस्तके वाचून उपचार करता येतील.
विसुनानांचे म्हणणे पटले.
ऑर्निशच्यासंदर्भात केवळ एक ऐकीव माहिती. ऑर्निशच्या पुस्तकात म्हणे हृद्रोग झालेल्यांनी तेल (म्हणजे स्निग्ध पदार्थ असावेत) पूर्ण वर्ज्य करावे अशी शिफारस केली होती. नंतर त्यात बदल केला गेला आणि पंधरा टक्क्यापर्यंत तेल असण्यास हरकत नाही वगैरे गोष्टी आल्या. हे केवळ ऐकीव आहे. मी ऑर्निश वाचलेला नाही. या बदलाबाबत कोणाला काही माहिती असल्यास जरूर येथे लिहा. अशी पुस्तके आणि त्याआधारे रोगनिवारण यासंदर्भात अशी ठोस माहिती महत्त्वाची.
तेल नको म्हणून तेल बंद केलेल्यांना पुढे हाडांसाठी (म्हणजे बहुदा सांध्यासाठी) आवश्यक घटक न मिळाल्याने इतर उगा प्रश्न निर्माण झाले आणि तेवढ्या तेलाने हृदयाचे (म्हणजे बहुदा कोलेस्टेरॉल आणि रक्तवाहिन्या वगैरे) फारसे बिघडत नाही असेही निदर्शनास आले अशी ही वाढीव ऐकीव माहिती आहे.
मधे बहुतेक डॉ ऑझ यांच्या कार्यक्रमात का असेच कुठेतरी ऐकले होते की तळलेले तेल (पदार्थ) कोलेस्ट्रॉल इ दृष्टीने घातक व ऑलीव्ह ऑइल इ. रुम टेंपरेचरला सॅलड इ मार्गे घेतलेले ओके.
धनंजय व जाणकारांना प्रश्न की न तापवलेले तेल जसे सॅलेड, तेल+मसाला हे पोळीचे तोंडीलावणे, अथवा लोणच्यातले तेल हे मग हेल्दी समजायचे का?
'अनमानधपक्या' अमूक हे चांगले (जसे ऑलिव्ह ऑईल, मासे, पांढरे मांस, ओमेगा ३, सॅलड, बीटा कॅरोटीन, रेड वाईन इ.इ.) असे वाचनात आले तरी ते भारतीय रुग्णास उपयुक्त ठरेलच असे नाही.
भारतीय वंशाच्या लोकांमध्ये याचे फारसे संशोधन झालेले नाही. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये पोट, कंबर आणि नितंब (अॅडिपोस टिश्यूज) यांच्यामध्ये मेद साठवून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. इथे पहा. हा प्रकार युड्किन-याज्ञिक पॅराडॉक्स (वाय-वाय पॅराडॉक्स) म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे इतर देशांमधले संशोधन भारतात लागू होईलच असे नाही.
तुमचे वय जर चाळीसच्या बाहेर असेल, तुम्ही भारतीय वंशाचे असाल, तुमच्या कुटुंबाच्या इतिहासात (आई-वडिल दोहोंच्या) कुणाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अथवा पक्षाघात (पॅरॅलिसिस) झालेला असेल, तुम्ही धूम्रपान/तंबाकू सेवन करत असाल, पुरुष असाल, मानसिक तणावाखाली असाल, व्यायाम करत नसाल, गरजेपेक्षा जास्त उष्मांक (क्यालरीज) दिवसागणिक तुमच्या उदरात जात असतील, तुम्हालाच मधुमेह असेल - यांपैकी एक वा अधिक कारणे जर अस्तित्वात असतील तर हृद्रोग/ सर्वसाधारण धमनीविकार होण्याची शक्यता बळावत जाते.
तेव्हा यातील जी कारणे टाळता येतील ती जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा. 'मी फक्त पांढरे मांस खातो किंवा तळलेले पदार्थ खात नाही' यावर विसंबून राहू नये. हृदयाच्या धमन्यांचा रोग ( कोरोनरी आर्टेरी डिसीज) हा एका दिवसात किंवा एका वर्षात होणारा आजार नाही. शस्त्रक्रियेलायक अडसर (हृदयाची कोणतीही एक धमनी ५०% पेक्षा जास्त बंद होणे) निर्माण होण्यास ५ ते २० वर्षे लागतात. ते टाळण्याचे/पुढे ढकलण्याचे उपाय स्पष्ट आहेत.
पण एकदा ही मर्यादा ओलांडली की तो अडसर शस्त्रक्रियेविना नाहीसा करणे किंवा कमी करणे हे वेळखाऊ आणि जवळजवळ अशक्य आहे.या काळात हा आजार जिवावर बेतू शकतो.
शुभदा गोगटेंचे पुस्तक (बहूधा) मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केले आहे. माझ्याकडे ते आहे. ते पुस्तक अवश्य वाचावे. ते हृदयविकार झालेल्या रुग्णाना नवी आशा देते.
विसुनानानी डिन ओर्निशला जॊ सरसकट विरोध दाखवला आहे तो अडाणीपणाचा निदर्शक आहे. अनेक भारतीय डॉक्टर डीन ऑर्निशला भारतीय अवतार द्यायचा प्रयत्न करत आहेत. पुण्यात मी स्वत: डॉक्टर हिरेमठांची एक दिवसीय कार्यशाळा attend केली आहे. या कार्यशाळेत आम्हाला एक ७५ वर्षाचे आजोबा दाखवण्यात आले. त्यांच्या हृदयात ५ पूर्ण ब्लॉक्स असून ते डिन ऑर्निश कार्यक्रम पुरा केल्यानंतर पुना हॉस्पिटलचे ५ मजले चढून जाऊ शकत होते. अनेक डॉक्टर कारण नसताना अॅन्जिओप्लास्टी आणि बायपासला भाग पाडतात. मी माझे स्वत:चे कोलेस्टेरॉल साध्या आयुर्वेदिक उपचारानी चमत्कार वाटेल इतके खाली आणले आहे. जिथे शक्य आहे तिथे preventive / alternative योग्य मार्गदर्शनाखाली जरुर करावेत.
माझा कुणाच्याही हृद्रोगाची तीव्रता कमी करण्याला विरोध का बरे असेल?
माझ्या प्रत्येक प्रतिसादास लक्षपूर्वक वाचून आधी त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मगच त्यावर भाष्य करणारे कोणतेही विधान करावे ही नम्र पण आग्रहाची विनंती.
विसुनानानी डिन ओर्निशला जॊ सरसकट विरोध दाखवला आहे तो अडाणीपणाचा निदर्शक आहे.
- हे विधान करताना वरील प्रतिसादकर्त्याने जो सुजाणपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !
प्रतिसादकर्ते 'प्रिव्हेन्टिव्ह' मेडिसीनबद्दल बोलतात. माझ्या उपरोक्त दुसर्या प्रतिसादात मी जे लिहिले आहे त्याचा अन्य अर्थ काय असू शकतो? हे मलाच कळेनासे झाले आहे.
जर प्रतिसादकर्ते डॉ. जगदीश हिरेमठांबद्दल (कारण त्यांचे बंधू शिरीष हेही हृद्रोगतज्ञ आहेत) बोलत असतील तर त्यांच्याशी मी या विषयावर (प्रिव्हेन्टिव्ह कार्डिओलॉजी) जवळजवळ दोन तास एकास-एक प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे. त्यांच्या अनुभवाबद्दल अथवा ज्ञानाबद्दल कोणतीही शंका नाही. माझे वरील प्रतिसाद कोणत्याही दृष्टीने चुकीचे आहेत काय? याची पडताळणी प्रतिसादकर्त्याने शब्दशः / अक्षरशः त्यांच्याकडूनही करून घेतल्यास बरे होईल.
प्रतिसादकर्त्याचे कॉलेस्टेरॉल खाली आले याबद्दल अभिनंदन, पण ५०% च्या वरचा कोरोनरी ब्लॉक कमी होण्यास काय करावे लागेल? आणि किती काळ? तेही शोधावे.
प्रत्यक्ष डॉक्टरांशॉ बोलून (दोन किंवा तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ञ डॉ.ची मते आजमावून) मगच योग्य तो निर्णय घेणे श्रेयस्कर.
सर्वसाधारणपणे भारतीय लोकात दिवस उशीरा सुरु करुन उशिरा संपवणे हे हल्ली फारच मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहे. शहरातून तर नक्कीच हे दिसते. रात्री उशिरा आणि चमचमीत खाऊन झोपणे हे तर आरोग्याला अत्यंत हानिकारक समजले जाते ते सर्रास करताना दिसतात लोक. व्यायामाचा अभाव ही सुद्धा अतिशय काळजी करायला लावणारी गोष्ट आहे.
आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेंशन घेऊन सतत पळत राहणे - आदल्या दिवशीच दुसर्या दिवशीची कामे ठरवून घ्या, मोजकी कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा, वेळाचे नियोजन करा अन्यथा कामे अपूर्ण राहून किंवा अजिबात न होऊन मनावर येणार्या ताणाचे रुपांतर थेट हृदयावरल्या ताणात होते.
----------------------------
ह्या धाग्यासंदर्भात कदाचित थोडे अवांतर वाटेल परंतु लिहिल्याखेरीज राहवत नाहीये -
दोनच महिन्यांखाली आमच्या इथल्या एका बंगाली मित्राला जोरदार हार्टअॅटॅक येऊन गेला. पंधरा दिवस आयसीयू आणि पुढे पंधरा दिवस रीहॅब मधे होते महाशय (नशीब बलवत्तर म्हणून बरेवाईट काही झाले नाही!)! वय ४० च्या आतबाहेर. दोन लहान मुले मुलगा साडेआठ वर्षे आणि मुलगी ४ वर्षे. दोघेही नवरा बायको आयायटीमधून डॉक्टरेट वगैरे झालेले. दोघेही पूर्णवेळ भरपूर ताणाच्या नोकरीत व्यस्त.
माझी काही निरीक्षणे - सतत भरपूर कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, हे नक्की. तसा तो जाड अथवा स्थूल नाहीये परंतु सतत काही ना काही वेळ गाठण्यासाठी पळत राहणे. आठवड्याभरात स्वतःच्या कामांसाठी आणि संपूर्ण आठवड्यात (विकांतासह) मुलांच्या सतराशे साठ क्लासेस साठी कराटे क्लास, पोहोण्याचा क्लास, पियानोचा क्लास, रविवारचा शिशुवर्ग सारखी पळापळ चालूच! अजिबात उसंत न घेता एवढा ताण तुम्हाला झेपत नाही. असे माझे निरीक्षण.
आयुष्यात धिमेपणाने बर्याचशा गोष्टी करायला काही बिघडत नसते असे माझे मत. मुलांना सतत कुठे ना कुठे गुंतवून त्यांच्यावर सारखा काहीतरी शिकवण्याचा मारा करत राहणे कितपत संयुक्तिक आहे असा मला पडणारा प्रश्न. आपण जरा ब्रेक घेऊन मागे वळून बघतो का की आपण खरंच करतो आहे ते कितपत गरजेचे आहे? विकांताला तरी जरा थांबून आपण घरातच शांतपणे बसून सगळ्या कुटुंबियांनी एकत्र वेळ घालवणे करतो का? हास्यविनोद, पुस्तक वाचणे, शांतपणे संगीत ऐकणे किंवा इतर कोणतेही ताण कमी करण्याचे उपाय करतो का?
ह्या सगळ्या घटनातून मी काढलेले सर्वसाधारण निष्कर्ष - अतिरिक्त धावपळ उपयोगाची नाही. व्यायामाला पर्याय नाही. मिताहाराला पर्याय नाही. मनावरचा ताण कमी ठेवणे अत्यंत गरजेचे. इतर लोक करतात म्हणून त्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला काय आणि का ह्या प्रश्नांची संयुक्तिक उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोवर ती/त्या गोष्टी टाळणे हे उत्तम.
माझ्या मावशीला अर्जंट बायपास सांगितली होती. पन तिने तसे न करता डॉ. साने यांच्या माधवबाग मधे उपचार घेतले. आनी साधा एक जिना चढ्ताना धाप लागणारी मावशी आता २-३ मजले सहज चढुन जाते अन घरातील ईतर कामेही आरामात करते.
मुळात व्यायाम जरी आपण करीत असलो तरी मनावरचा ताण देखिल घातक ठरतो. माझे वडील सायकलचा भरपुर दररोज व्यायाम करत असताना देखिल त्याना २००२ ला सिव्हीअर अॅटक येवुन गेला. त्यासाठी त्याचा कामाचा ताण कारणीभुत ठरला. त्यामुळे मन प्रसन्न राहिल हे बघणे व कामाचा कमीत कमी ताप ह्या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत.
चतुरोवस्कींनी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
पुर्वी मी कामा संदर्भात बरीच पळापळ करीत असे, परंतु आता ते कमी केले.
आता मी मोजकेच परंतु प्राथमीकते नुसार काम करायचा ज्यास्तीतजास्त प्रयत्न करतो.
सायंकाळी ५ ते ५.३० ला "शटर डाऊन" हि माझी गेल्या पाच वर्षांतील कामाची पद्धत आहे.
आरोग्य सुधारायला ह्याचा खूप उपयोग झाला.
ह्या बदलाला कारणीभूत ठरले ते जर्मन लोक.
ह्यांची दिनचर्या फार जवळून पाहीली. कोठलीही घाई गडबड न करता नेटके काम करण्यावर त्यांचा भर असतो.
जर्मन लोक आठवड्याचे सर्वात कमी तास काम करणारे लोक आहेत.
तरिही उच्च दर्जाची उत्पादने व उच्च उत्पादकता ह्यात त्यांच्या जवळपास फिरकणारे कमीच.
कामाव्यतिरिक्त वेगवेगळे छंद जोपासुन ते आपले आयुष्य फार चांगल्या प्रकारे जगतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिकच काय, पण आणखी कुठल्याही औषधाची गरज नाही."
खाण्यावर नियन्त्रण ठेवा. योग्य ते खा. चाला. हलका व्यायाम करा. प्राणायाम आणि ध्यान शिकून नियमितपणे करा. फक्त एवढ पुरे. (मी डॉक्टर नाही. ) पण कोलेस्टेरॉल वाढण्याचा थोडा अनुभव आहे.
एल डी एल सहा महिन्यात २०० वरून साठ वर आणले आहे. कोणतेही औषध न घेता. प्राणायाम, ध्यान वगैरे काहीच नाही. कामाच्या स्वरूपात बदल नाही, पण कामाच्या पद्धतीत बदल केला. मुख्य म्हणजे, "नाही" म्हणायला शिकलो !
कामाच्या स्वरूपात बदल नाही, पण कामाच्या पद्धतीत बदल केला.
अगदी!
माझेही एल डी एल थोडे जास्त होते ते काही औषधावीना कमी झाले.
आमचे डॉ. फार चांगले भेटले आहेत. फार औषधे देण्याची त्यांचीच इच्छा नसते.
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 10:53 pm | मनिष
ह्याचे रुपांतर किंवा भाषांतर नाही, पण अभय बंग यांचे ह्याच विषयावरचे "माझा साक्षात्कारी हृद्यरोग" हे अतिशय गाजलेले, चांगले पुस्तक आहे. स्वतः अभय बंग यांनी Reversing Heart Disease by Dr. Dean Ornish चे कित्येक दाखले दिले आहेत. त्याहुनही मह्त्वाचे म्हणजे अभय बंग यांचे उपाय अस्सल भारतीय आहेत.
16 Aug 2010 - 12:36 am | उपास
सहमत.
माझा साक्षात्कारी एक वाचनिय आणि संग्राह्य पुस्तक. डॉ. अभय बंगानी अगदी मुद्देसूद आणि भारतीयांच्या खाद्यसवयींच्या अनुषंगाने लिहीलय.
16 Aug 2010 - 6:14 pm | भाऊ पाटील
>>'माझा साक्षात्कारी हृदयरोग' एक वाचनिय आणि संग्राह्य पुस्तक. डॉ. अभय बंगानी अगदी मुद्देसूद आणि भारतीयांच्या खाद्यसवयींच्या अनुषंगाने लिहीलय.
- ह्याच्याशी सहमत आहे. परंतु त्याच डॉ बंगाना २००४ मध्ये आणखी एक अॅटॅक आला होता ही माहिती बर्याच लोकांना नाही/नसते.
17 Aug 2010 - 12:17 am | पारुबाई
डॉ.अभय बन्ग याना हार्ट अॅटॅक आल्यानन्तर च त्यानी हे त्यान्च्या अनुभवावर हे पुस्तक लिहिले आहे.
17 Aug 2010 - 12:46 pm | भाऊ पाटील
पुस्तक लिहिलय ते पहिल्या हार्ट अॅटॅक नंतर्.(१९९२ की १९९४ मध्ये. चू.भू.दे.घे)
२००४ मध्ये त्यांना दुसर्यांदा हार्ट अॅटॅक आला होता.
त्याबद्दल त्यांनी काही लिहिलेले माझ्या वाचनात अजुन तरी आलेले नाही.
16 Aug 2010 - 10:09 am | युयुत्सु
शुभदा गोगटे यांनी डिन ओर्निशच्या कामाचा परिचय करून देणारे पुस्तक लिहिले आहे (हे मूळ पुस्तकाचे भाषांतर नाही). त्यात पुण्यात डॉ. जगदीश हिरेमठ यानी पुण्यात यशस्वीपणे डिन ऑर्निशचा कार्यक्रम कसा राबवला याचा परिचय आहे.
16 Aug 2010 - 10:38 am | संजय अभ्यंकर
उत्तर देणार्या सर्वांचे आभार.
अभय बंग यांचे पुस्तक माझ्या संग्रही आहे.
परंतु, डॉ. डिन ओर्निशचे मराठी रुपांतर मिळाल्यास हवे आहे.
आमच्या नात्यात अथवा परिचयातल्या व्यक्तिंना जेव्हा अँजियोप्लास्टि अथवा बायपासचा सल्ला डॉ. कडून मिळतो,
तेव्हा, त्यातल्या बहुसंख्यांकांची आर्थिक स्थिती अँजियो करण्या इतपत नसते.
अश्यांना मी डॉ. अभय बंग व डॉ. डिन ऑर्नीशचे पुस्तक देऊन, वेगळ्या उपायांसाठी विचार करायला लाऊ शकतो.
घाबरलेले नातेवाईक आयुर्वेद अथवा अॅलोपॅथी + आयुर्वेद असले उपाय करायला मनापासुन तयार नसतात.
अश्यांना हि पुस्तके उपयुक्त ठरावीत.
---------------------------------------------
श्री. युयुत्सु साहेब,
शुभदा गोगटेंचे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?
कृपया माहीती द्यावी.
धन्यवाद!
16 Aug 2010 - 10:56 am | विसुनाना
-तिसर्याचे अनुभव चौथ्याला लागू पडतीलच असे नाही. हृद्रोगासारख्या प्राणघातक आजारावर कोणताही सल्ला परिचयातील व्यक्तींना देताना - इतरांनी लिहिलेली पुस्तके ही केवळ त्या-त्या व्यक्तीच्या अनुभवाचे निवेदन असते, ते सर्वसामान्यपणे सर्वांनाच लागू पडेल असे नाही - याची स्पष्ट कल्पना द्यावी.
तुम्ही स्वतः हृद्रोग तज्ञ असाल तर पेशंटचा अँजिओग्राम पाहून त्याला शस्त्रक्रियेची कितपत गरज आहे हे ठरवा. नसाल तर तोच एंजिओग्राम कमीतकमी तीन कार्डिओलॉजिस्टना (वेगवेगळ्या संस्थांतील) दाखवावा आणि त्यांचे मत घ्यावे. मगच योग्य तो निर्णय घ्यावा. जर बहुमताने शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर ती करावीच करावी.
केवळ आर्थिक परिस्थिती हा शस्त्रक्रिया ठरवण्याचा निकष दोन्ही बाजूंनी (डॉक्टर - पेशंट) असू नये. (शक्य असल्यास ओपन चेस्ट 'कॅबेज' (बायपास) टाळावी.)पुस्तकांवर विसंबू नये.
शस्त्रक्रियेची गरज नसल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर पुस्तके वाचून उपचार करता येतील.
16 Aug 2010 - 11:38 am | संजय अभ्यंकर
मी डॉ. नाही.
अश्यांना (आप्तेष्टांना) मी डॉ. अभय बंग व डॉ. डिन ऑर्नीशचे पुस्तक देऊन, वेगळ्या उपायांसाठी विचार करायला लाऊ शकतो
हि पुस्तके रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना देऊन केवळ त्यांच्या पुढे एक पर्याय ठेवणे एवढाच आहे.
निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे.
हि पुस्तके वाचून रुग्ण व त्याच्या आप्तेष्टांनी सम्बंधीत डॉ. शी चर्चा करणे आवश्यक आहे हे मी आवर्जून सांगतो.
तुम्ही मांडलेल्या मुद्यांबद्दल पुन्हा एकदा आभार.
16 Aug 2010 - 3:46 pm | श्रावण मोडक
विसुनानांचे म्हणणे पटले.
ऑर्निशच्यासंदर्भात केवळ एक ऐकीव माहिती. ऑर्निशच्या पुस्तकात म्हणे हृद्रोग झालेल्यांनी तेल (म्हणजे स्निग्ध पदार्थ असावेत) पूर्ण वर्ज्य करावे अशी शिफारस केली होती. नंतर त्यात बदल केला गेला आणि पंधरा टक्क्यापर्यंत तेल असण्यास हरकत नाही वगैरे गोष्टी आल्या. हे केवळ ऐकीव आहे. मी ऑर्निश वाचलेला नाही. या बदलाबाबत कोणाला काही माहिती असल्यास जरूर येथे लिहा. अशी पुस्तके आणि त्याआधारे रोगनिवारण यासंदर्भात अशी ठोस माहिती महत्त्वाची.
तेल नको म्हणून तेल बंद केलेल्यांना पुढे हाडांसाठी (म्हणजे बहुदा सांध्यासाठी) आवश्यक घटक न मिळाल्याने इतर उगा प्रश्न निर्माण झाले आणि तेवढ्या तेलाने हृदयाचे (म्हणजे बहुदा कोलेस्टेरॉल आणि रक्तवाहिन्या वगैरे) फारसे बिघडत नाही असेही निदर्शनास आले अशी ही वाढीव ऐकीव माहिती आहे.
16 Aug 2010 - 3:57 pm | सहज
मधे बहुतेक डॉ ऑझ यांच्या कार्यक्रमात का असेच कुठेतरी ऐकले होते की तळलेले तेल (पदार्थ) कोलेस्ट्रॉल इ दृष्टीने घातक व ऑलीव्ह ऑइल इ. रुम टेंपरेचरला सॅलड इ मार्गे घेतलेले ओके.
धनंजय व जाणकारांना प्रश्न की न तापवलेले तेल जसे सॅलेड, तेल+मसाला हे पोळीचे तोंडीलावणे, अथवा लोणच्यातले तेल हे मग हेल्दी समजायचे का?
16 Aug 2010 - 4:45 pm | विसुनाना
'अनमानधपक्या' अमूक हे चांगले (जसे ऑलिव्ह ऑईल, मासे, पांढरे मांस, ओमेगा ३, सॅलड, बीटा कॅरोटीन, रेड वाईन इ.इ.) असे वाचनात आले तरी ते भारतीय रुग्णास उपयुक्त ठरेलच असे नाही.
भारतीय वंशाच्या लोकांमध्ये याचे फारसे संशोधन झालेले नाही. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये पोट, कंबर आणि नितंब (अॅडिपोस टिश्यूज) यांच्यामध्ये मेद साठवून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. इथे पहा. हा प्रकार युड्किन-याज्ञिक पॅराडॉक्स (वाय-वाय पॅराडॉक्स) म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे इतर देशांमधले संशोधन भारतात लागू होईलच असे नाही.
तुमचे वय जर चाळीसच्या बाहेर असेल, तुम्ही भारतीय वंशाचे असाल, तुमच्या कुटुंबाच्या इतिहासात (आई-वडिल दोहोंच्या) कुणाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अथवा पक्षाघात (पॅरॅलिसिस) झालेला असेल, तुम्ही धूम्रपान/तंबाकू सेवन करत असाल, पुरुष असाल, मानसिक तणावाखाली असाल, व्यायाम करत नसाल, गरजेपेक्षा जास्त उष्मांक (क्यालरीज) दिवसागणिक तुमच्या उदरात जात असतील, तुम्हालाच मधुमेह असेल - यांपैकी एक वा अधिक कारणे जर अस्तित्वात असतील तर हृद्रोग/ सर्वसाधारण धमनीविकार होण्याची शक्यता बळावत जाते.
तेव्हा यातील जी कारणे टाळता येतील ती जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा. 'मी फक्त पांढरे मांस खातो किंवा तळलेले पदार्थ खात नाही' यावर विसंबून राहू नये. हृदयाच्या धमन्यांचा रोग ( कोरोनरी आर्टेरी डिसीज) हा एका दिवसात किंवा एका वर्षात होणारा आजार नाही. शस्त्रक्रियेलायक अडसर (हृदयाची कोणतीही एक धमनी ५०% पेक्षा जास्त बंद होणे) निर्माण होण्यास ५ ते २० वर्षे लागतात. ते टाळण्याचे/पुढे ढकलण्याचे उपाय स्पष्ट आहेत.
पण एकदा ही मर्यादा ओलांडली की तो अडसर शस्त्रक्रियेविना नाहीसा करणे किंवा कमी करणे हे वेळखाऊ आणि जवळजवळ अशक्य आहे.या काळात हा आजार जिवावर बेतू शकतो.
अर्थातच डॉ. धनंजय यावर अधिकारवाणीने बोलू शकतील.
16 Aug 2010 - 7:06 pm | श्रावण मोडक
मुद्दा आहे.
येथे हा मुद्दा विशिष्ट आहाराविषयी आहे. पण असे संशोधन मधुमेहाविषयी भारतीय वंशासाठी झाले आहे का? माझ्यासमोर नेहमीच असणारा हा एक प्रश्न आहे.
16 Aug 2010 - 12:02 pm | युयुत्सु
शुभदा गोगटेंचे पुस्तक (बहूधा) मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केले आहे. माझ्याकडे ते आहे. ते पुस्तक अवश्य वाचावे. ते हृदयविकार झालेल्या रुग्णाना नवी आशा देते.
16 Aug 2010 - 11:27 am | अनुराग
विसुनाना शि सहमत.
16 Aug 2010 - 12:28 pm | सुत्रधार
+१
16 Aug 2010 - 5:23 pm | युयुत्सु
विसुनानानी डिन ओर्निशला जॊ सरसकट विरोध दाखवला आहे तो अडाणीपणाचा निदर्शक आहे. अनेक भारतीय डॉक्टर डीन ऑर्निशला भारतीय अवतार द्यायचा प्रयत्न करत आहेत. पुण्यात मी स्वत: डॉक्टर हिरेमठांची एक दिवसीय कार्यशाळा attend केली आहे. या कार्यशाळेत आम्हाला एक ७५ वर्षाचे आजोबा दाखवण्यात आले. त्यांच्या हृदयात ५ पूर्ण ब्लॉक्स असून ते डिन ऑर्निश कार्यक्रम पुरा केल्यानंतर पुना हॉस्पिटलचे ५ मजले चढून जाऊ शकत होते. अनेक डॉक्टर कारण नसताना अॅन्जिओप्लास्टी आणि बायपासला भाग पाडतात. मी माझे स्वत:चे कोलेस्टेरॉल साध्या आयुर्वेदिक उपचारानी चमत्कार वाटेल इतके खाली आणले आहे. जिथे शक्य आहे तिथे preventive / alternative योग्य मार्गदर्शनाखाली जरुर करावेत.
16 Aug 2010 - 6:48 pm | विसुनाना
माझा कुणाच्याही हृद्रोगाची तीव्रता कमी करण्याला विरोध का बरे असेल?
माझ्या प्रत्येक प्रतिसादास लक्षपूर्वक वाचून आधी त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मगच त्यावर भाष्य करणारे कोणतेही विधान करावे ही नम्र पण आग्रहाची विनंती.
- हे विधान करताना वरील प्रतिसादकर्त्याने जो सुजाणपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !
प्रतिसादकर्ते 'प्रिव्हेन्टिव्ह' मेडिसीनबद्दल बोलतात. माझ्या उपरोक्त दुसर्या प्रतिसादात मी जे लिहिले आहे त्याचा अन्य अर्थ काय असू शकतो? हे मलाच कळेनासे झाले आहे.
जर प्रतिसादकर्ते डॉ. जगदीश हिरेमठांबद्दल (कारण त्यांचे बंधू शिरीष हेही हृद्रोगतज्ञ आहेत) बोलत असतील तर त्यांच्याशी मी या विषयावर (प्रिव्हेन्टिव्ह कार्डिओलॉजी) जवळजवळ दोन तास एकास-एक प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे. त्यांच्या अनुभवाबद्दल अथवा ज्ञानाबद्दल कोणतीही शंका नाही. माझे वरील प्रतिसाद कोणत्याही दृष्टीने चुकीचे आहेत काय? याची पडताळणी प्रतिसादकर्त्याने शब्दशः / अक्षरशः त्यांच्याकडूनही करून घेतल्यास बरे होईल.
प्रतिसादकर्त्याचे कॉलेस्टेरॉल खाली आले याबद्दल अभिनंदन, पण ५०% च्या वरचा कोरोनरी ब्लॉक कमी होण्यास काय करावे लागेल? आणि किती काळ? तेही शोधावे.
16 Aug 2010 - 6:03 pm | चतुरंग
प्रत्यक्ष डॉक्टरांशॉ बोलून (दोन किंवा तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ञ डॉ.ची मते आजमावून) मगच योग्य तो निर्णय घेणे श्रेयस्कर.
सर्वसाधारणपणे भारतीय लोकात दिवस उशीरा सुरु करुन उशिरा संपवणे हे हल्ली फारच मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहे. शहरातून तर नक्कीच हे दिसते. रात्री उशिरा आणि चमचमीत खाऊन झोपणे हे तर आरोग्याला अत्यंत हानिकारक समजले जाते ते सर्रास करताना दिसतात लोक. व्यायामाचा अभाव ही सुद्धा अतिशय काळजी करायला लावणारी गोष्ट आहे.
आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेंशन घेऊन सतत पळत राहणे - आदल्या दिवशीच दुसर्या दिवशीची कामे ठरवून घ्या, मोजकी कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा, वेळाचे नियोजन करा अन्यथा कामे अपूर्ण राहून किंवा अजिबात न होऊन मनावर येणार्या ताणाचे रुपांतर थेट हृदयावरल्या ताणात होते.
----------------------------
ह्या धाग्यासंदर्भात कदाचित थोडे अवांतर वाटेल परंतु लिहिल्याखेरीज राहवत नाहीये -
दोनच महिन्यांखाली आमच्या इथल्या एका बंगाली मित्राला जोरदार हार्टअॅटॅक येऊन गेला. पंधरा दिवस आयसीयू आणि पुढे पंधरा दिवस रीहॅब मधे होते महाशय (नशीब बलवत्तर म्हणून बरेवाईट काही झाले नाही!)! वय ४० च्या आतबाहेर. दोन लहान मुले मुलगा साडेआठ वर्षे आणि मुलगी ४ वर्षे. दोघेही नवरा बायको आयायटीमधून डॉक्टरेट वगैरे झालेले. दोघेही पूर्णवेळ भरपूर ताणाच्या नोकरीत व्यस्त.
माझी काही निरीक्षणे - सतत भरपूर कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, हे नक्की. तसा तो जाड अथवा स्थूल नाहीये परंतु सतत काही ना काही वेळ गाठण्यासाठी पळत राहणे. आठवड्याभरात स्वतःच्या कामांसाठी आणि संपूर्ण आठवड्यात (विकांतासह) मुलांच्या सतराशे साठ क्लासेस साठी कराटे क्लास, पोहोण्याचा क्लास, पियानोचा क्लास, रविवारचा शिशुवर्ग सारखी पळापळ चालूच! अजिबात उसंत न घेता एवढा ताण तुम्हाला झेपत नाही. असे माझे निरीक्षण.
आयुष्यात धिमेपणाने बर्याचशा गोष्टी करायला काही बिघडत नसते असे माझे मत. मुलांना सतत कुठे ना कुठे गुंतवून त्यांच्यावर सारखा काहीतरी शिकवण्याचा मारा करत राहणे कितपत संयुक्तिक आहे असा मला पडणारा प्रश्न. आपण जरा ब्रेक घेऊन मागे वळून बघतो का की आपण खरंच करतो आहे ते कितपत गरजेचे आहे? विकांताला तरी जरा थांबून आपण घरातच शांतपणे बसून सगळ्या कुटुंबियांनी एकत्र वेळ घालवणे करतो का? हास्यविनोद, पुस्तक वाचणे, शांतपणे संगीत ऐकणे किंवा इतर कोणतेही ताण कमी करण्याचे उपाय करतो का?
ह्या सगळ्या घटनातून मी काढलेले सर्वसाधारण निष्कर्ष - अतिरिक्त धावपळ उपयोगाची नाही. व्यायामाला पर्याय नाही. मिताहाराला पर्याय नाही. मनावरचा ताण कमी ठेवणे अत्यंत गरजेचे. इतर लोक करतात म्हणून त्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला काय आणि का ह्या प्रश्नांची संयुक्तिक उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोवर ती/त्या गोष्टी टाळणे हे उत्तम.
17 Aug 2010 - 12:43 am | विलासराव
चतुरंग यांच्याशी सहमत.
माझ्या मावशीला अर्जंट बायपास सांगितली होती. पन तिने तसे न करता डॉ. साने यांच्या माधवबाग मधे उपचार घेतले. आनी साधा एक जिना चढ्ताना धाप लागणारी मावशी आता २-३ मजले सहज चढुन जाते अन घरातील ईतर कामेही आरामात करते.
17 Aug 2010 - 2:54 am | मिसळभोक्ता
कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिकच काय, पण आणखी कुठल्याही औषधाची गरज नाही.
17 Aug 2010 - 7:46 pm | वेताळ
मुळात व्यायाम जरी आपण करीत असलो तरी मनावरचा ताण देखिल घातक ठरतो. माझे वडील सायकलचा भरपुर दररोज व्यायाम करत असताना देखिल त्याना २००२ ला सिव्हीअर अॅटक येवुन गेला. त्यासाठी त्याचा कामाचा ताण कारणीभुत ठरला. त्यामुळे मन प्रसन्न राहिल हे बघणे व कामाचा कमीत कमी ताप ह्या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत.
18 Aug 2010 - 10:27 am | संजय अभ्यंकर
चतुरोवस्कींनी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
पुर्वी मी कामा संदर्भात बरीच पळापळ करीत असे, परंतु आता ते कमी केले.
आता मी मोजकेच परंतु प्राथमीकते नुसार काम करायचा ज्यास्तीतजास्त प्रयत्न करतो.
सायंकाळी ५ ते ५.३० ला "शटर डाऊन" हि माझी गेल्या पाच वर्षांतील कामाची पद्धत आहे.
आरोग्य सुधारायला ह्याचा खूप उपयोग झाला.
ह्या बदलाला कारणीभूत ठरले ते जर्मन लोक.
ह्यांची दिनचर्या फार जवळून पाहीली. कोठलीही घाई गडबड न करता नेटके काम करण्यावर त्यांचा भर असतो.
जर्मन लोक आठवड्याचे सर्वात कमी तास काम करणारे लोक आहेत.
तरिही उच्च दर्जाची उत्पादने व उच्च उत्पादकता ह्यात त्यांच्या जवळपास फिरकणारे कमीच.
कामाव्यतिरिक्त वेगवेगळे छंद जोपासुन ते आपले आयुष्य फार चांगल्या प्रकारे जगतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिकच काय, पण आणखी कुठल्याही औषधाची गरज नाही."
मि.भो. साहेबांनी कृपया यावर अधीक प्रकाश टाकावा.
धन्यवाद!
18 Aug 2010 - 11:28 pm | पैसा
खाण्यावर नियन्त्रण ठेवा. योग्य ते खा. चाला. हलका व्यायाम करा. प्राणायाम आणि ध्यान शिकून नियमितपणे करा. फक्त एवढ पुरे. (मी डॉक्टर नाही. ) पण कोलेस्टेरॉल वाढण्याचा थोडा अनुभव आहे.
19 Aug 2010 - 12:09 am | मिसळभोक्ता
हेच !
एल डी एल सहा महिन्यात २०० वरून साठ वर आणले आहे. कोणतेही औषध न घेता. प्राणायाम, ध्यान वगैरे काहीच नाही. कामाच्या स्वरूपात बदल नाही, पण कामाच्या पद्धतीत बदल केला. मुख्य म्हणजे, "नाही" म्हणायला शिकलो !
19 Aug 2010 - 12:15 am | चतुरंग
योग्य ठिकाणी "नाही" म्हणायला शिकणे अत्यंत महत्त्वाचे!
नाहीतर आहेच "भरल्या इनबॉक्सला ईमेलचे काय ओझे?" ;)
चतुरंग
19 Aug 2010 - 1:25 am | रेवती
कामाच्या स्वरूपात बदल नाही, पण कामाच्या पद्धतीत बदल केला.
अगदी!
माझेही एल डी एल थोडे जास्त होते ते काही औषधावीना कमी झाले.
आमचे डॉ. फार चांगले भेटले आहेत. फार औषधे देण्याची त्यांचीच इच्छा नसते.
19 Aug 2010 - 10:33 am | संजय अभ्यंकर
लै मोलाचा सल्ला!
नाही म्हणता येत नसेल, तर जगाची धुणी धुत बसावे लागते.