'पोटाला घाला गो.. मायबाप'

अर्धवट's picture
अर्धवट in पाककृती
15 Aug 2010 - 8:38 pm

जालावरच्या समस्त बल्लवाचार्यांना शिरसाष्टांग नमस्कार,

गेले काही दिवस एका अडचणीच्या ठिकाणी येउन पडलेलो आहे. 'पोटाला घाला गो.. मायबाप' अशी आर्जवी स्वरात भीक मागण्याची वेळ आली आहे. तेव्हा ताकाला जाउन भांड न लपवता सरळ भिक मागायला सुरूवात करतो.

सध्याच्या केविलवाण्या अवस्थेत, गेले १० दिवस मॅगी करून खात आहे. शाकाहारी असल्याने खाण्याचे खुप हाल चाललेत. लै काव आलाय. माझ्या कडे असलेल्या साहित्यात होउ शकणार्‍या पाककृती द्याल तर पुण्य मिळवाल.

माझ्याकडे असणारे साहित्य येणेप्रमाणे

* एक मायक्रोवेव्ह ओव्हन
* दोन प्लॅस्टीकची भांडी.
* काही चमचे.

या साधनांच्या मदतीने तयार होणारी पाककृती हव्या आहेत. या शिवाय बाकी सर्व मार्केट मधुन खरेदी करावं लागणार आहे. अजुनही काही लागले तर मार्केट धुंडाळता येइल. इथे कुठल्या भाज्या मिळतात ते माहीती नाही, मसाले बहुदा मिळत नसावेत, मिठ आणि मिरे आणता येतील. पाककृतीसाठी लागणार्‍या साहित्याची यादी सर्वसमावेशक दिलीत तर जास्त बरं होइल, एखादी वस्तु राहिली तर ५ किलोमीटर चालत जावं लागेल. इकडे केवळ एक महिना असल्याने सगळी भांडीकुंडी आणायला लावू नयेत.

निवेदन - सदर धाग्याचा आयटी आणि सैपाकाशी संबंध लावून, धाग्याचं काश्मीर करण्यापुर्वी, गरिबाच्या पोटाचा इचार व्हावा. पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये.. फाट्यावर तर मारूच नये..

प्रतिक्रिया

तुम्ही भारतातून तिकडे जाताना कोणते मसाले किती प्रमाणात नेले आहेत ते सांगितल्यास बरे होइल.
तिथे ताज्या भाज्या, धान्यं कोणकोणती आहेत? उदा. तांदूळ, डाळी, पिठे वगैरे. त्यात करता येणार्‍या रेशिप्या सुचवताना आनंदच होइल. एखादे काचेचे मायक्रोवेव्हचे भांडे मध्यम आकाराचे मिळू शकेल काय? प्लॅस्टीकच्या भांड्यात फारवेळ शिजवणे चांगले नाही आणि भांडी नंतर पांढरट पडत जातात. भाज्या चिरण्यासाठी सुर्‍या, विळी काही आहे काय? आपण एखादा छोटा कुकर नेला असल्यास तसे कळवणे.

अर्धवट's picture

15 Aug 2010 - 9:24 pm | अर्धवट

कोणतेही मसाले नेलेले नाहीत.
धान्याचं माहीत नाही, पण शोधता येइल.
सध्या असलेले भांडे मायक्रोवेव्ह मधे चालणारेच आहे (त्यातच मॅगी करून गिळत आहे.)
भाजी आणि सुरी विकत आणता येइल.
कूकर नेलेला नाही..

बाकी इतके सदस्य मदतीला धावून आलेले पाहुन परमसंतोष जाहला.. धन्यवाद हो रेवतीतै.

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 10:01 pm | शानबा५१२

खिशात हात घालावा,पैसे काढावे व सरळ हॉटेल गाठाव!

मग काय!!...मी पण राहीलो आहे एक महीना एकटा,ह्या आधीच्या नोकरीच्या ठीकाणी.
नाही हो महाराष्ट्राच्या पण बाहेर नाही................घरापासुन ट्रेनने २ तास!

असो...............हां तर हॉटेल शोधा........जान है तो जहाँ है!

सुनील's picture

15 Aug 2010 - 8:48 pm | सुनील

तुमच्या शाकाहारात अंडी बसतात का? तुमच्याकडे असलेली प्लास्टीकची भांडी मायक्रोवेवमध्ये वापरण्यायोग्य आहेत काय? गॅस किंवा एलेक्ट्रिक तव्याची सोय बिलकुलच होऊ शकणार नाही काय? फ्रीजची सोय आहे काय? दुधाची उपलब्धता आहे काय?

पंगा's picture

15 Aug 2010 - 8:50 pm | पंगा

तुमच्या शाकाहारात अंडी बसतात का?

अंडी मायक्रोवेवमध्ये?

कशी?

सुनील's picture

15 Aug 2010 - 9:05 pm | सुनील

मी अंडी शाकाहारत बसतात का असे विचारले होते. अंडी मायक्रोवेवमध्ये बसतात का, असे नाही!!

अवांतर - मायक्रोवेवमध्ये पाणी गरम करून उकडलेली अंडी करणे अशक्य नसावे!

बहुगुणी's picture

15 Aug 2010 - 9:25 pm | बहुगुणी

इथे कृती दिलेली आहे अंडी मायक्रोवेव्ह मध्ये उकडण्याची.

पंगा's picture

15 Aug 2010 - 9:31 pm | पंगा

मी अंडी शाकाहारत बसतात का असे विचारले होते. अंडी मायक्रोवेवमध्ये बसतात का, असे नाही!!

बरोबर. पण धागाप्रवर्तकास शिजवण्यासाठी (वाचताना या दोन शब्दांमध्ये कृपया थोडा विराम घ्यावा.) केवळ मायक्रोवेवचा उपयोग अभिप्रेत आहे असे वाटले. (चूभूद्याघ्या.)

अवांतर - मायक्रोवेवमध्ये पाणी गरम करून उकडलेली अंडी करणे अशक्य नसावे!

साशंक आहे.

मायक्रोवेवमधून पाणी उकळून ते बाहेर काढून मग त्याला कोणतीही अतिरिक्त उष्णता न देता त्यात अंडी टाकल्यास ती प्रभावीपणे उकडली जातील का, याबद्दल साशंक आहे. (प्रयोग करून पाहिलेला नाही.)

उलटपक्षी, पाणी अंड्यांसकट मायक्रोवेवमध्ये उकळल्यास अंड्यांचा स्फोट होऊन त्याच्या अंतर्भागातील पदार्थ मायक्रोवेवमध्ये चहुकडे पसरून मायक्रोवेव साफ करण्याचे कष्ट घ्यावे लागण्याची शक्यता आहे असे वाटते. (प्रयोग करून पाहण्याची इच्छा नाही.)

पंगा's picture

15 Aug 2010 - 8:55 pm | पंगा

गॅस किंवा एलेक्ट्रिक तव्याची सोय बिलकुलच होऊ शकणार नाही काय?

तात्पुरत्या रहिवासासाठी आलेले असल्यास बहुधा हॉटेलात राहत असणार. हॉटेल एक्स्टेंडेड स्टे स्वरूपाचे असल्याखेरीज गॅस किंवा इलेक्ट्रिक तव्याची सोय होणे कठीणच वाटते. (चूभूद्याघ्या.)

अंडी बसतात.
प्लॅस्टीकची भांडी मायक्रोवेव्ह मधे चालणारीच आणलियेत.
फ्रिज आहे, दुध मिळेल.
तव्याचं मात्र अवघड आहे. (इतके दिवस आयत्या तापल्या तव्यावरच पोळी भाजायची सवय असल्याने, अंमळ अवघड आहे. )

धन्यवाद सुनिल भौ..

पंगा's picture

15 Aug 2010 - 9:44 pm | पंगा

(आपण अमेरिकेत आहात असे गृहीत धरले आहे. नसल्यास चूभूद्याघ्या. अमेरिकेऐवजी ब्रिटनसारख्या भारतीयांनी बजबजलेल्या देशांत असल्याससुद्धा परिस्थिती फारशी वेगळी नसावी.)

सर्वप्रथम, जवळपास भारतीय किराणामालाचे दुकान कोठे आहे, ते शोधून काढावे. नंतर, ज्याच्याजवळ वाहन आहे अशा एखाद्या सहकार्‍यास पकडून तेथे कूच करावे.

भारतीय किराणामालाच्या दुकानांत तयार 'फ्रोझन मील्स' प्रकारात बरेच शाकाहारी पर्याय सापडावेत. (दर्जा तितकासा चांगला नसतो, त्याचाही कंटाळा येतो आणि किंमतही त्या मानाने फार पडते, पण काम चालून जाते. एका वेळेस दोन आठवड्यांपर्यंतचा ऐवज आणून फ्रीझरमध्ये टाकला की काम भागले.)

आजकाल अमेरिकन किराणामालाच्या दुकानांतसुद्धा क्वचित्प्रसंगी भारतीय प्रकारची फ्रोझन मील्स दिसतात, पण निवड मर्यादित असते आणि किंमत आणखीही जास्त असू शकते.

सुनील's picture

15 Aug 2010 - 9:45 pm | सुनील

अहो पंडितराव, अर्धवटराव अफ्रिकेच्या जंगलात आहेत. अमेरिकेत नाहीत. जरा आसपास पहा की!!

पंगा's picture

15 Aug 2010 - 9:55 pm | पंगा

मग स्थानिक परिस्थितीची काहीच कल्पना नसल्याने, क्षमस्व.

(तरीही, एक शेवटचा प्रयत्न. टांझानियात - धागाप्रवर्तक टांझानियात आहेत असे व्यनित म्हणालेसे वाटते - भारतीय मूळ असलेले बरेच लोक आहेत असे वाटते. म्हणजे भारतीय दुकाने कोठे ना कोठे असावीत. (जवळ, सहज जाण्यासारखी असतील की नाही हे मी अर्थातच सांगू शकत नाही; नसल्यास क्षमस्व.) तेथील परिस्थिती काय आहे, काही कल्पना आहे काय?)

शिल्पा ब's picture

16 Aug 2010 - 2:05 am | शिल्पा ब

आजूबाजूला न बघता किती हो तुमचे प्रश्न...आणि मदत नाही ती नाहीच.क्षमस्व म्हटलं कि झालं.

हा व्हेजिटेबल पुलाव..

रसमलाई


वांग्याचं भरीत

उकडीचे मोदक (हे करून पहायचेच आहेत मला एकदा, लईच भारी दिसतात!)

शानबा५१२'s picture

15 Aug 2010 - 9:57 pm | शानबा५१२

बढीया है!

बहुगुणी's picture

15 Aug 2010 - 10:10 pm | बहुगुणी

सुधा कुलकर्णींचीच ही आणखी एक कृती:

ढोकळा

(या पुढील दोन्ही पाककृतींसाठी जरा अतीच मसाले दिसताहेत, आणि हे उपलब्ध २-अडीच भांड्यांमध्ये तयार होण कठीण आहे! भांड्यांच्या अदलाबदलीत वेळ आधिक जाईल...)

चना मसाला

रसम

कुंदन's picture

15 Aug 2010 - 10:21 pm | कुंदन

नायजेरियामध्ये गणपा आहे.
त्याला किडनॅप करा थोडे दिवस.

पुष्करिणी's picture

15 Aug 2010 - 11:02 pm | पुष्करिणी

१. भात करणं सोप्पं आहे - तांदूळ आणि पाणी १:२ प्रमाणात आणि २० मिनिटं ( मायक्रोवेव्ह ओव्हन ची पॉवर रेग्युलर आहे असं अझ्युम करतेय )

२. वरण : डाळी तिकडे मिळत असतीलच ( आमच्याकडॅ सगळ्या डाळी आफ्रिकेतून येतात ): तूर आणि हरभरा डाळ सोडून इतर डाळी शिजायल्या सोप्या आहेत . शिजवायच्या आधी १ तास पाण्यात ( गरम पाणी असल्याम उत्तम ) भिजवा लवकर शिकतील .
डाळ आणि पाणी १: २.५ प्रमाणात आणि २०-२२ मिनिटं. ( मधून मधून ढवळायला लागेल ).

भात -वरण आरामात होइल, अर्धा चमचा बटर घाला आणि खा ( तुमच्याकडे फोडणीचं काहीच सामान नाही असं समजून ).

जिरे मिळाले तर भात करायच्या आधी अर्धा चमचा बटर पातेल्यात वितळवा, त्यात जिरे घाला , झाकण ठेवा आणि २५-३० सेकंद ओव्हन मध्ये ठेवा., बाहेर काढून त्यात तांदूळ -पाणी घाला आणि वर सांगितल्या प्रमाणे भात करा; झाला जिरा-राइस.

लसूण्-आलं मिळालं तर फक्त मिरपूड ही मिरची/तिखटाची पोकळी भरून काढू शकेल.

३. गाजर्, मटार्, ढोबळी मिरचीचे बारिक तुकडे करून शिजवता येतील. वर बटर-मिरपूड्-मीठ टाकून चविष्ट साईडडिश तयार.
४.मक्याचे दाणे स्टीम करा, वर बटर्-मिरपूड्-मीठ आणि लिंबाचा रस ; स्नॅक तयार.

एकदम हेल्दी फूड.

५. तिकडं खुसखुस ( जाड रव्यासारखा दिसतो ) नावाचा प्रकार मिळत असेल तर भातासारखाच शिजवायचा.
६. सिमोलिना ( रवा ) मिळाला तर खीरही करता येइल.
७. पास्ता मिळत असेल तर पास्ता सॉसही मिळेल; ते सॉस बर्‍याच पाकृ. आयतं वापरता येइल.

ऋषिकेश's picture

15 Aug 2010 - 11:03 pm | ऋषिकेश

तहान भुक विसरून "धिस टाईम फॉर आफ्रिका" लिहून संपवा :) ;)

बाकी म्यागी आणि मिपावरचे कुक आहेत तो पर्यंत फिकीर नॉट

रेवती's picture

16 Aug 2010 - 12:59 am | रेवती

मीही सुधा कुलकर्णींचे व्हिडिओज सांगणार होते जे बहुगुणींनी आधीच सांगितले आहेत.
ब्रेड मिळत असल्यास जॅम्/भाज्या यांची सँडविचेस करता येतील. कणिक, ज्वारी, तांदूळ, बेसन ही किंवा यापैकी मिळणारी पीठे मायक्रोवेव्हमध्ये कोरडी भाजून भाज्या चिरून घालून मायक्रोवेव्हची थालिपिठे करता येतील. खुसखुशीत होत नाहीत पण सध्या इलाज नाही. मायक्रोवेव्हमध्ये रवा चांगला भाजून उपमा करता येइल. शिरा करण्याची कृती सुधा कुलकर्णींच्या व्हिडीओ मध्ये सापडेलच. त्यांचीच पावभाजीची पाकृ नक्की उपयोगी पडेल. भेळपुरीचे सामान मिळते आहे का ते पहा. दह्यातल्या कोशिंबीरी करून गव्हाच्या तॉर्तीयांबरोबर बर्‍या लागतील. तुरीची डाळ बराच वेळ भिजत घालून नंतर मायक्रोवेव्ह केल्यास वरण शिजू शकेल. भात आपण करालच. तिकडे केळीची पाने मिळत असतील तर पानगी नावाचा प्रकार करता येइल. पापड मिळत असले तर मुगाची खिचडी करून पापड मायक्रोवेव्हमध्ये भाजता येइल. पास्ता करता येइल, ज्याची कृती तूनळीवर आहे.

एक माझासुद्धा मदतीचा प्रयत्न -
भात, पुलाव , शिकरण, पास्ता, आफ्रिकेत डाळी मिळतात उदा. इथिओपिअन जेवणात डाळी असतात....इंजीरा नावाचा दोश्यासारखा ब्रेड असतो..
अजून एक सांगू का ? मी इथे आफ्रिकन जेवण जेवलेले आहे...त्यात मसाले न घालता भाज्या असतात, (अगदी कोबीची भाजी सुद्धा मिळू शकते) ब्रेड असतात त्यामुळे अगदीच काही नाही तर एखादे जवळपासचे हॉटेल शोधून पहा...एकदातरी भेट द्याच हाटेलला...फार काय अडला जीव जेवी कॅन्टीनचे जेवण..

videos आहेतच दिलेले...त्यामुळे घरी करायला साधं जेवण भात, डाळीचं साधं वरण आणि शिकरण असं खाता येईल...आहातच तिथे तर आफ्रिकन जेवण जेऊन पहा.

जासुश's picture

16 Aug 2010 - 11:47 am | जासुश

तिथे गिट्स किंवा त्या सारख्या इतर कंपनी चे पॅकेट मिळत असतील. तर गिट्स चे इडलि चे पॅकेट आणावे पाण्यात मिक्स करावे. डब्याला तेल लावून त्यात इडली चे पीठ ओतावे. ३ मिनिट माइक्रोवेव मधे ठेवा. चोकोनी इडली तयार होईल. ती सांबार सोबत खाता येईल. तो पण ह्याच पॅकेट बरोबर मिळतो.ह्याच प्रकारे गिट्स किंवा प्रिया मिक्सस पासून ढोकळा बनवता येईल. कृती वर दिलेल्या इडली प्रमाणे करावी. रेडी टू ईट चे पॅकेट मिळत असतील तर ते घ्यावे रोज हॉटेल मधे जेवण महाग ही असते शिवाय ते भारतीय जेवण नसल्यामुळे प्यूर शाकाहारी असेलच असे नाही.

बेसनलाडू's picture

17 Aug 2010 - 4:45 am | बेसनलाडू

घ्या. बनवायला एकदम सोपा असा उपमा. पाकिटातील पावडर त्यावर दिलेल्या सूचनांनुसार पाण्यात उकळवायची. उपमा तयार.
(झटपट)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

16 Aug 2010 - 12:00 pm | नितिन थत्ते

आपले बिकाजीराव करोडपती काही काळापूर्वी आफ्रिकेत घाणीत - सॉरी आपलं 'घाना'त होते. त्यांचा अणुभव उपयुक्त ठरावा. अजून एक मिपाकर पण होते पण ते हल्लीच (मिपावरून) -काही लोकांच्या मते दोनदा- निवर्तले.

सूड's picture

16 Aug 2010 - 1:20 pm | सूड

ही रेसिपी माझी आई करीत असे.

पातेलेभर पाणी साधारण गरम करुन घ्यावे. दोन वाट्या जाडे पोहे चाळून चाळणीत तसेच ठेवून त्यावर हे पातेल्यातील गरम पाणी ओतून ते निथळू द्यावे. नंतर ते पोहे एका भांड्यात काढून त्यात चिरलेला गुळ, ओला नारळ, आणि वेलची जायफळाची पूड घालून फडशा पाडावा (बनवल्यास कसे झाले ते कळवावे ;))

सुनील's picture

16 Aug 2010 - 2:24 pm | सुनील

व्वा! अशा भरगच्च माहितीमुळे अर्धवटरावांचा किती फायदा होतो ते ठाऊक नाही पण माझा मात्र झाला!

बाकी राव, तुम्हाला फक्त महिना काढायचाय, त्यातील १० दिवस तर अगोदरच गेलेत. उरले वीस दिवसच! कशाला काळजी करताय?

धमाल मुलगा's picture

16 Aug 2010 - 4:02 pm | धमाल मुलगा

द्येवा,
तुमच्या दु:खात सहभागी आहे. मदत करणं अवघड आहे. (आम्ही स्वतःच तिच्यायला भारतातच राहुन तुमच्यासारखे दिवस कंठतोय. मदत काय करणार?)
असो, आपली अडचण लवकरात लवकर दुर होवो ही देवाकडे प्रार्थना...

अवांतरः सत्यनारायण घालुन बघा राव...काय मनातल्या विच्छा पुर्‍या झाल्या तर बरं... ;)

सुहास..'s picture

16 Aug 2010 - 6:19 pm | सुहास..

आम्ही स्वतःच तिच्यायला भारतातच राहुन तुमच्यासारखे दिवस कंठतोय. मदत काय करणार? >>>

हा हा हा !!

अर्ध्या ..मी तुझ्याजागी असतो तर बहुगुणीच्या सल्ल्यावर नक्की फॉलोव केले असते..

बाकी हॅप्पी किकींग...आपले हे.. कुकिंग

स्वयंपाक येणारी बायको करा. मग बघा वजन कसे कमी करु असे धागे काढता कि नाही.

अरुंधती's picture

16 Aug 2010 - 8:03 pm | अरुंधती

मॅगी नूडल्सना पर्याय म्हणजे पास्ता, पिझ्झा, सँडविचेस, सूप्स, वरणभात, मुगाच्या डाळीची किंवा अन्य डाळीची खिचडी, दह्यातल्या कोशिंबिरी, रायते, शिकरण, मोड आलेली कडधान्ये उकडून नुस्ती मीठ, चाट मसाला इ. घालून किंवा उकडून तिखट-मीठ घालून, फोडणीचा ब्रेड, फोडणीचा भात, चीझ चिली टोस्ट, सॅलडस, वांग्याचे ग्रिल्ड काप, अर्धवट शिजलेल्या बटाट्यात चीझ - उकडलेल्या भाज्या इ. चे सारण घालून बेक करणे, पनीर व इतर भाज्या (सिमला मिरची, मटार, टोमॅटो, कॉर्न, गाजर इ. इ.) ची गरम मसाला -मीठ-तिखट घालून भाजी, व्हाईट सॉसमध्ये उकडलेल्या भाज्या - वरून चीझ घालून बेक करणे.

धमाल मुलगा's picture

16 Aug 2010 - 8:44 pm | धमाल मुलगा

अरुंधतीताई झिंदाबाद!

ह्या दिलेल्या यादीमधुन एकेक पदार्थ रोज असं पाहिलं तरी काही आवडणार्‍या पदार्थांचे रोटेशन्स/रिपिटेशन करुन माझा महिनाभराचा तरी जेवणाचा प्रश्न सुटावा. :)

धन्यवाद अरुंधतीताई...
धन्यवाद अर्ध्यवट.

-(चतकोर चांदण्यात भुकाळलेला कैवल्य) ध.
{वरील कंसातील शब्दांचा श्रेयअव्हेर- प.प्पू.श्री. रामदासकाका.}

शाहरुख's picture

16 Aug 2010 - 9:45 pm | शाहरुख

http://theory.stanford.edu/~amitp/recipe.html

काही वर्षांपूर्वी या अ‍ॅप्लिकेशन बद्दल (किंवा अशाच दुसर्‍या कुठल्या तरी) वाचले होते..तुमच्या साठी शोधले आत्ता. बाकी तुम्हाला मदत मिळालेली आहेच भरपूर.

मिसळभोक्ता's picture

17 Aug 2010 - 3:05 am | मिसळभोक्ता

मायक्रोवेव्ह पण नको. भांडी पण नको. एका कागदावर सगळे होते.

सुनील's picture

17 Aug 2010 - 3:14 am | सुनील

एका कागदावर सगळे होते
सगळे म्हणजे?

(अज्ञानी) सुनील

मिसळभोक्ता's picture

17 Aug 2010 - 5:33 am | मिसळभोक्ता

सगळे, म्हणजे करणे आणि खाणे. नंतर ज्याची त्याची मर्जी.

स्पंदना's picture

17 Aug 2010 - 7:18 am | स्पंदना

जॅकेट पोटॅटोज!!
बटाटे तस्सेच्या तस्से मायक्रोवेव्ह मधेय घाला अगदी न धुता. ३ मिन फ्रॉम वन साइड २ मिन फ्रॉम अदर! डन!
एक गोष्ट मात्र इथुन पुढे ध्यानात ठेवा बरोबर कायम एक चाट मसाला पाकिट ठेवणे, अगदी काहिहि चवदार करुन खाता येते.
खर सांगु का? महिनाभर रहाणार ना? लगे हाथ श्रावणी करुन टाका, पुण्य मिळेल.

सुनील's picture

17 Aug 2010 - 7:45 am | सुनील

जॅकेट पोटॅटोसाठी बटाटा आतून पूर्ण शिजला पाहिजे शिवाय त्याची साल खरपूस झाली पाहिजे. मायक्रोवेवमध्ये बटाटा फारतर शिजून निघेल पण त्याची साल खरपूस होणार नाही. थोडक्यात, तो जॅकेट पोटॅटो नक्कीच होणार नाही.

खेरीज, जॅकेट पोटॅटोत घालायला बीन्स, कॉर्न इ. लागेल. तेही शिजवायला लागेलच की! नुसताच बटाटा खाण्यात काय अर्थ आहे?

Shubhangi Pingale's picture

27 Aug 2010 - 5:23 pm | Shubhangi Pingale

मी सागु का?
तुम्ह्रि पातळ पोहे दुधात भिजवुन साखर घालुन खा