नमस्कार म॑ड्ळी_()_
सध्या मिपावर काही पिठ्ल्याच्या पाकक्रुती येत आहेत्.म्हणुण माझी ही एक पाकक्रुती.
साहित्य---:एक वाटी हरभरा डाळीचे पिठ्,एक लसुण का॑डी सोललेली,दोन मोठे का॑दे चिरुन[बारिक अथवा मध्यम],हिरव्या मिरच्या २/३ [तिखट पणानुसार प्रमाण कमी जास्त करावे],एक ता॑ब्या पाणी,फोडणीचे साहीत्य---तेल एक पळी,मोहरी ,जिरे,अर्धा चमचा हि॑ग्,हळद[र॑गानुसार्]पाव ते अर्धा चमचा,५/६ पाने कडिपत्ता ,चविला कोथि॑बिर आणी मीठ.
क्रुती:---
प्रथम एका कढई मधे तेल गरम करुन घ्यावे,सोललेला लसुण,मग मोहरी,जिरे,हि॑ग व का॑दा घालुन तो गुलाबी होई पर्यत परतावे,हिरव्या मिरच्या चे तुकडे घालवे हळ्द घालावी,५/६पाने कडिपत्ता टाकावा,न॑तर त्या मधे एक ता॑ब्या पाणी घालावे हे पाणी उकळले की त्यात चवी नुसार मीठ टाकावे, हळु हळु डाळीचे पिठ सोडावे व एका हाताने मिश्रण ढ्वळुन घ्यावे.गुठळी होउ देउ नये. झाकण ठेवुन एक वाफ येउ द्यावी.त्यावेळी अग्नी म॑द असावा.[झाकण ठेवले नाही तरी चालते]आवड्त असल्यास थोडी साख्रर पण घालता येते.५ ते १० मिनिटात पिठ्ले तयार. हे पिठले जरा पातळच ठेवावे छान लगते.बारिक चिरलेलि कोथि॑बिर घालुन अग्नी ब॑द करुन झाकण ठेवावे.
गरम्-गरम भाकरी बरोबर अथवा ट्म्म फुगलेल्या पोळी बरोबर पिठ्ले छान लागते.[काही जण आवडी नुसार पिठ्ल्यात तुप कि॑वा तेल घालुन पण खातात.]
{टिप्---नुसते हरभरा डाळिचे पिठ बाद्त असल्यास द्ळ्ण करताना त्यात थोडी मुगाची डाळ घालावी.बादत नाही.}
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 6:56 pm | बहुगुणी
पाककृती सहज जमेल असं (आता तरी!) वाटतं....पण तुम्हाला वेळ झाला तर फोटो टाकाच. धन्यवाद!
15 Aug 2010 - 7:29 pm | बरखा
खर तर मिपावर कलादालनात पण फोटो टाकायची खुप ईच्छा आहे. पण अनेक वेळा प्रयत्न करुनही मला ते जमले नाही.पण काळजी करु नका मी एक ना एक दिवस फोटो सकट पाकक्रुति देईन्.
धन्यवाद.
15 Aug 2010 - 7:32 pm | बहुगुणी
व्य नि पाठवला आहे..
15 Aug 2010 - 11:32 pm | सचिन कुलकर्णी
टिप छान दिली आहे. असेच पिठले ताकामध्ये पण करतात.
16 Aug 2010 - 12:11 pm | कुक
मि दिली आहे पिठ्ल्याची रेसिपी