आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- ३ कप तांदुळ,१ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ, चवीनुसार मीठ.
कृती:-
तांदुळ आणि डाळ वेगवेगळे ५-६ तास भिजत घालावेत.नंतर पाणी काढुन टाकुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.{ तयार झालेले पीठ ५-६ तासचे झाकुन ठेवले तर आप्पे जस्त हलके होतात. लगेच करयचे असले तरि हरकत नाहि.} तयार झालेले पिठ एका पातेल्यात काढुन घेऊन त्यात खवलेला नारळ आणि चविनुसार मीठ घालुन एकजिव होई पर्यंत ढवळावे. आप्पे पात्राला थोडेसे तेल लावुन गॅसवर ठेवावे.
From APPE">
आप्पेपात्र थोडेसे गरम झाले की त्यात चमच्याने पीठ घालावे.
From APPE">
आता उलटवुन थोडेसे तेल सोडुन पुन्हा भाजुन घ्यावेत.
From APPE">
चटणीसाठी साहित्य:- खवलेला नारळ२ वाट्या, २-३ हिरव्या मिरच्या, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,१लहान तुकडा आल, २-३चमचे साखर, चविनुसार मीठ,१/२ लिंबाचा रस.
कृती:- खवलेला नारळ, मिरच्या, कोथिंबीर, आलं, मीठ साखर, सर्व एकत्र करुन मिक्सर मधे वाटावे. नंतर त्यात लिंबाचा रस घालुन पुन्हा एकदा मिक्सरमधुन फिरवुन घ्यावे. झाली चटणी तयार.
अशा प्रकारे आप्पे तयार करुन नारळाच्या चटणी बरोबर गरम गरमच खायला द्यावेत.
From APPE">
(एक व्यवहार्य सुचना- आजकाल तयार ओले पिठ मिळते. ते आणुन लगेचच आप्पे करता येतात.)
[स्वाती दिनेशला प्रॉमीस केल्यामुळे "व्यवहार्य सुचना" टाकली आहे]
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 6:03 pm | सुनील
अहाहा!
आप्पे तसे तिखटमिठाचे करतात तसे गोडाचेही करतात. तेही छानच लागतात.
तयार ईडली पीठ म्हणून जे मिळते त्याचे डोसेदेखिल छान होतात.
15 Aug 2010 - 6:04 pm | बरखा
आहा खुप दिवसा॑नी कोणी तरी अप्प्या॑ची आठवण करुन दिली.छानच.... फोटो पाहुन राहवत नाही. उद्या नक्की करुन पाहणार्.पण एक अड्चण आहे,अप्पे पात्र नसल्यास दुसरे काही वापरता येईल क?
15 Aug 2010 - 6:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तोंडाला पाणी सुटलं.
ती मिरच्या ठेवलेली वाटी झेब्रा डिझाईनची वाटली.
कोणा *** मिपाकराच्या भल्या 'फ्यामिली'ने मला एक दिवस मस्तपैकी डाळींचे आप्पे खायला घातले होते त्यांची आठवण झाली. अजून रेसिपी आंजावर नाही!
15 Aug 2010 - 6:35 pm | शानबा५१२
आता गवारीची भजी पण बनवा कुणीतरी!
15 Aug 2010 - 7:12 pm | मदनबाण
अरे हे आप्पे कसे पहायचे राहिले !!!
आप्पे मस्त झालेले दिसत आहेत...मध्यंतरी आप्पे हादडायची संधी मिळाली होती तेव्हा खाण्यासाठी हात अगदी मोकळा ठेवला होता... ;)
चिंतामणीराव तुमची ही पाकृ टाकण्याची मालिका अशीच अखंड चालु राहु दे... :)
15 Aug 2010 - 7:53 pm | स्वाती दिनेश
आप्पे मस्तच,
वर सुनीलभाऊंनी म्हटल्याप्रमाणे गोडाचे आप्पेही छान लागतात.
(ह्या भारतवारीत आप्पेपात्र आणावेच अशा विचारात)स्वाती
15 Aug 2010 - 8:33 pm | अर्धवट
मस्तच..
16 Aug 2010 - 7:34 pm | रेवती
टारगेट व बेड बाथ अँड बियाँड मध्ये आप्पेपात्र मिळते.