आंतरजालावर जी काय पडीक नाव असत्याल त्यातले एक नाव म्हंजी आदरणीय प्रमोद देव. लय लोकायचा मित्र असलेल्या या भल्या माणसाला जालीय हालचाली शिवाय चैन पडत नाय . मित्रमंडळी खूप असल्यामुळे हाक मारली की त्यायचा गोतावळा जमा होतो. आमच्या आंतरजालीय खबरीनुसार त्यायच्या गुगल 'बझ बझाट' दररोज पार हजाराच्या खरडी पार करतो. येगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींचा तिथे वावर असतो. माणूस तसा जरासा तापट असावा. जरशीक मतभेदामुळे ह्यो देव माणूस माणूस मिसळपाववरुन आपल्या लेखनाला डिलीट मारुन पसार झाला. येगवेगळे अंक काढायची खासियत असलेल्या या मानसाला जालावरील लोकायचा लेखन असलेला अंक काढायचा लय नाद.शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवा ,ऋतू हिरवा आन त्यानंतर ते घेऊन आले गद्य पद्याचा वाचन असलेला 'जालवाणी' हा अंक. जालवाणी थोडं थोडं ऐकून आलो. प्रयोग म्हणुन अंक बरा वाटला. लिहिणार्याला आन वाचणार्याला प्रोत्साहान देणार्या उपक्रमाची नोंद म्हणून त्यायला शुभेच्छा दिल्या पाहिजे का नाय.
काय म्हणता ?
जालवाणी - अभिवाचनाचा अंक
गाभा:
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 4:40 pm | मदनबाण
जालवाणीच्या अंकाची कल्पना अतिशय सुंदर असुन अशा प्रकारचा जालावरील हा पहिलाच अंक/ प्रयोग असावा. :)
आमच्या आंतरजालीय खबरीनुसार त्यायच्या गुगल 'बझ बझाट' दररोज पार हजाराच्या खरडी पार करतो.
तुमची खबर अगदी पक्की असुन त्यांच्या बझ अविरत चालु असतो; अगदी २४ X ७. विविध क्षेत्रातली,देशातली परदेशातली सर्व मंडळी अगदी दिल खुलास गप्पा मारण्यासाठी तिथे सदैव हजर असतात... :) एक बझ जवळ पास ४८० /५०० खरडी झाला की गारद होतो आणि मग लगेच दुसरा बझ सुरु केला जातो... मिपावरची काही मंडळी आणि मी देखील त्या धमाल गप्पा मारणार्या मंडळीत हजर असतो...
एक वेगळा प्रयोग,म्हणुन हा अंक खरचं छान वाटला...:)
सर्व अभिवाचन करणार्या मंडळींचे आणि या अंकासाठी मेहनत घेणार्या सर्व मंडळींचे अभिनंदन... :)
15 Aug 2010 - 4:46 pm | सहज
अभिनंदन.
ऐकून प्रतिक्रिया देईन.
:-)
15 Aug 2010 - 4:53 pm | पाषाणभेद
सर्व मंडळींचे अभिनंदन. सवडीने ऐकतो सारं.
खरं म्हणजे आम्हीही काहीतरी तेथे टाकणार होतो. तशी देववाणी झाली होती. पण आपण मर्त्य मानव. पृथ्वीवरच्या धबडग्यात वेळ मिळाना नाही. पुढल्या वेळी नक्की.
16 Aug 2010 - 5:14 am | मीनल
लिहिणार्याला आन वाचणार्याला प्रोत्साहान देणार्या उपक्रमाची नोंद म्हणून त्यायला शुभेच्छा दिल्या पाहिजे का नाय.
आता या धाग्याची १४४ वाचने झाली आहेत. त्यात ३ शुभेच्छा आल्या. त्याबद्दल धन्यवाद.
त्यातील किती जणांनी अंक चाळला ते तो ` देव ` च जाणे.
आंतरजालावरील एका पडीकाने काढला असेल वाणी अंक. त्यात काय इतकं कौतुक????
छ्ये! तुमचं तर काही तरीच बॉ!
16 Aug 2010 - 7:53 am | बहुगुणी
एक वर्षापूर्वी मी असाच (मराठीतील नवीन कर्णिका या अर्थाने) मनकर्णिका या नावाचा उपक्रम सुरू केला होता. इथे मिपा वर प्रसिद्ध झालेले वामनसुत या स्वाती दिनेश यांचे सासर्यांचे अतिशय सुंदर लघु-आत्मचरित्र मी ध्वनिमुद्रित करून इथे सादर केलं होतं, त्याची आठवण झाली.
त्याच्या पहिल्या भागात प्रमोद देव साहेबांनी उपक्रम आवडल्याचं आणि तेही असा प्रयत्न करीत असल्याचं लिहिलं होतं.
कार्यबाहुल्याने मला मनकर्णिका पुढे चालू ठेवता आलं नाही, श्री. देव साहेब हा चांगला उपक्रम चालवताहेत हे फारच छान! (ते इथे हल्ली दिसत नाहीत हे लक्षात आलं होतं, पण त्यांनी मिपा सोडलं नसावं अशी आशा अहे.)
19 Aug 2010 - 10:51 am | उग्रसेन
प्रमोद देव आन त्यायच्या जालीय अंकाचं कवतुक करणार्याचे आभारी.
कवतुक न करणार्याला वाढदिसाच्या शुभेच्छा. :)
बाबुराव :)
19 Aug 2010 - 7:50 pm | गंगाधर मुटे
माझ्यासारख्या दुर्गम प्रभागातील एका माणसाला त्यांच्या निमित्ताने
"बिपाशाले लुगडं" आणि 'सभ्यतेची अभिरूची"
अशा दोन कवितांचे अभिवाचन करण्याची संधी मिळाली.
माझ्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे.