साहित्य-- १ वाटी चण्याच पिठ, १ मध्यम कान्दा बारिक चिरुन , दिड ग्लास पाणि, क्डीपत्याची पाने, २ मिरच्या बारिक चिरुन, हवा असल्यास टोमेटो, लाल तिखट १छोटा चमच, अरधा चमच हळद, मिठ चविनुसार, तेल फोडणिसाठी, राई, जिरे ईत्यादि
क्रुति--- प्रथम पाण्यात चण्याचे पिठ, हळद, मसाला, मिठ एकदम पातळ कालवा गुठळी राहु देउ नका. कढईत तेल तापवुन त्यात राई जिर्याचि फोडणि करा. त्यात मिरची व कडीपत्ता घाला कान्दा घाला, कान्दा लाल झाल्यावर(टोमेटो हवे असल्यास बारिक चिरुन घाला मि टोमेटो घालत नाही) त्यात कालवलेले पिठ घाला. थोडे शिजु द्या. पुर्ण आटवु नका थोडे पातळ ठेवा. थपथपित पिठल तयार.
चण्याच पिठ आगोदर तव्यावर थोडे भाजल्यास पिठल खम्नग होते
फोटोची अपेषा करु नका.
प्रतिक्रिया
15 Aug 2010 - 2:51 am | रश्मि दाते
प्रतीसादाची ही अपेक्षा करु नये
15 Aug 2010 - 9:09 am | कुक
@ रश्मि दाते
नागपुर करनी प्रतिसादाचि अपेषा करत नाही . पण पिठल तर करुन बघा. फुलके करुन त्या सोबत खा.
15 Aug 2010 - 5:38 pm | स्मृती
सेम कृती चण्याच्या पिठाऐवजी कुळथाचे पीठ वापरून करून बघा.. आणि भाकरीसोबत सर्व्ह करा.. अहाहा.. काय चव वर्णावी.. खाल्ल्यावरच कळेल!