साहित्य : १०० ग्रॅम स्वीट कॉर्न, १कांदा, १टोमॅटो, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी(१बटाटा), थोडी बारीक शेव, १ टीस्पून चाट मसाला, १कप दही, १/२वाटी कॉथिंबीर.
From Corn Bhel">
चटणी करता साहित्य – १ वाटी कोथिंबीर, २हिरव्या मिरच्या, पुदिना पाने (मूठभर), मीठ, साखर.
गोड चटणी साठी- १ वाटी गुळ, १/२वाटी चिंचेचा कोळ, १ टी स्पून लाल तिखट, मीठ.
कृती - प्रथम कोथिंबीर, मिरची, मीठ, पुदिना आणि साखर एकत्र वाटून एका बाउल मधे काढून ठेवावे. नंतर चिंचेचा कोळ, गूळ, तिखट-मीठ एकत्र वाटून एका बाउल मधे काढून ठेवावे. दोन्ही चटण्या तयार झाल्या.
स्वीट कॉर्न वाफवून घ्यावेत.
From Corn Bhel">
कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. दही फेटून घ्यावे.
From Corn Bhel">
नंतर एका बाउलमधे वाफवलेले कॉर्न, चिरलेला कांदा आणि टोमॅटो, बटाट्याच्या फोडी, १ चमचा हिरवी चटणी, २ चमचे गोड चटणी, २ टेबल स्पून फेटलेले दही, चाट मसला एकत्र करावे. वरून बारीक शेव घालावी. शेवटी कोथिंबीर घालून खायला द्यावे. (आवडीप्रमाणे वरून लाल तिखट भुरभुरावे.)
From Corn Bhel">
From Corn Bhel">
From Corn Bhel
पा.कृ.- सौ. ज्योती पळसुले.
फोटो- चिंतामणी
प्रतिक्रिया
14 Aug 2010 - 4:41 pm | अनाम
वारलो :)
14 Aug 2010 - 4:46 pm | अर्धवट
लई भारी
14 Aug 2010 - 4:47 pm | शानबा५१२
बाहेरच्या खाण्यातली मजा देणारा पदार्थ दीसत आहे.
14 Aug 2010 - 6:37 pm | रेवती
छान रंगीबेरंगी फोटू!
चवदारही असणार. करून बघीन.
14 Aug 2010 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार
नुसते फोटु दाखवुन जळवा च्यामारी !!
घरी आलो की देतात मग खारे शेंगदाणे नुसते ;)
14 Aug 2010 - 6:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो लैच भारी.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2010 - 6:57 pm | मदनबाण
तोंडाला पाणी सुटले...
14 Aug 2010 - 7:32 pm | वेताळ
मस्तच दिसते चॅट.....
15 Aug 2010 - 8:22 am | पारुबाई
चटकदार पाककॄती.
15 Aug 2010 - 11:02 am | स्वाती दिनेश
बरेच दिवसात केले नाहीये, हा फोटो बघून लवकरच करायला हवे आहे याची तीव्र जाणीव झाली आहे,:)
(मी कॅन्ड मके घेते, ते वाफवायची गरज भासत नाही.)
स्वाती
15 Aug 2010 - 1:22 pm | चिंतामणी
मी कॅन्ड मके घेते
चांगले आहे. तुमचा वेळ वाचेल त्यामुळे.
पुढच्यावेळी पा.कृ.टाकताना अश्या व्यवहार्य सुचनांचा विचार करणात येईल.
15 Aug 2010 - 11:03 am | बेसनलाडू
(खवय्या)बेसनलाडू
29 Aug 2010 - 7:37 pm | कशेडी घाट
अप्रतिम आहे....जिभेचे लाड पुरवण्यासाठी थोडा हटके पदार्थ आहे.