फ्लॉवर मुगडाळ आमटी हा प्रकार अगदी सोप्पा त्यातुन वेगळी भाजी नको करायला आणि घरात सगळ्यांच्या आवडीचा त्यामुळे आठवड्यातुन एकदा तरि मी करतेच.
लागणारे साहित्य:
फ्लॉवर मोठे तुकडे करुन
मुगडाळ
बटाटा १ तुकडे करुन
फोडणी : राई, जिर, कढीपत्ता, हिंग, हळद, मसाला
मिठ चविपुरते
मोडून मिरची, कोथिंबिर
लिंबु रस छोटा अर्धा.
थोडा गुळ
तेल
हे काही आमटीचे सामान :
हे फोडणीचे सामान :
फोडणीचे सामान (कढीपत्ता) कंटीन्यु आणि धुतलेले फ्लॉवर्,त्यात आत गायब बटाटे आणि मुगडाळ:
तयार आमटीचा फोटो माझ्या कॅमेर्यातुनच गायब झालाय.
क्रमवार पाककृती:
प्रथम प्लॉवर, मुगडाळ, बटाता एकत्र धुवुन घ्या. आता गॅसवर टोप / कुकर ठेवा व त्यात तेलावर वरील फोडणी द्या. आता लगेच धुतलेल जिन्नस घाला. पटकन घाला नाहितर मसाला करपेल. मग त्यात उरलेले सगळे साहित्य घाला म्हणजे मिठ, गुळ, लिंबुरस, मोडलेली मिरची, कोथिंबीर. जर टोपात करत असाल तर हे सगळ आमटी शिजत आल्यावर घाला म्हणजे स्वाद चांगला येतो. कुकर असेल तर कुकरच्या ३ शिट्या द्या. झाली आमटी तयार.
अधिक टिपा:
ह्या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात. पण त्या घालायच्या असतील तर टोपातच करा. खरतर टोपातच ह्या आमटीचा स्वाद चांगला येतो.
तुम्हाला आवडत असल्यास आल लसुण पेस्ट, गोडा मसालाही घालु शकता.
प्रतिक्रिया
13 Aug 2010 - 2:25 pm | मनि२७
अरे वाह!!!
छान पाकृ.. करायला पण सोपी आहे...
जागू ताई मस्त...
13 Aug 2010 - 2:30 pm | स्मिता चावरे
असेच म्हणते..
13 Aug 2010 - 4:43 pm | पर्नल नेने मराठे
टोप म्हणजे काय?
माझ्याकडे नाहिये.
13 Aug 2010 - 5:06 pm | सूड
अगों टोप म्हणजें पातेलें, काय जागुताई बरोंबर नं !!
25 Aug 2010 - 4:42 pm | जागु
पातेलेच हो.
13 Aug 2010 - 5:06 pm | माया
तयार आमटीचा फोटो माझ्या कॅमेर्यातुनच गायब झालाय.
त्रिवार निशेद.
पाकॄ छानच! करुन पहाते.
13 Aug 2010 - 6:54 pm | रेवती
वा!! जागुतै, आमटीची वेगळीच पाकृ!
भाज्या घालून आमटी केली कि पुन्हा वेगळी भाजी करायला नको.;)
14 Aug 2010 - 12:54 pm | चिंतामणी
हे सगळ्यात भारी.
तयार आमटीचा फोटो माझ्या कॅमेर्यातुनच गायब झालाय.
25 Aug 2010 - 4:44 pm | जागु
माया, चिंतामणी कॅमेर्याने बहुतेक खाऊन टाकला.